दुःख तुलाही कळले असते!

Submitted by मुग्धमानसी on 8 July, 2013 - 03:36

मुळे जराशी बळकट असती तर गगनाला भिडले असते
गजांआडूनी ऋतू बघण्याचे दुःख तुलाही कळले असते!

कातर ओली एखादी सर तुझ्या आत पाझरली असती
तर मी कदाचित वसंत होऊन तुझ्या मनी मोहरले असते!

किनार्‍यावरी भिरभिरणारी नजर तुझी जर ठरली असती
क्षितिजावरती न्याहाळणारे तुला... नेत्र ते दिसले असते!

पहाट होते, सकाळ होते, दुपार आणि सांज रात्र मग
त्यानंतरचे मुके बहकणे तू असता तर टळले असते!

दवबिंदूंना पाहून साधे मोघम हसणे सुचले असते
तुझ्या बगिच्यातील फुलांचे हसणे सार्थक फळले असते!

त्या धारांच्या पल्याडचे ते तुला रिक्तपण दिसले असते
या प्रश्नांनी उठता-बसता तुलाही असे छळले असते!

’कशास मी ही उदास आतूर... उगाच झेलत संततधारा..’
फक्त एकदा भिजला असता, तर तुजला हे कळले असते!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहाट होते, सकाळ होते, दुपार आणि सांज रात्र मग
त्यानंतरचे मुके बहकणे तू असता तर टळले असते!

व्वा व्वा!

धन्यवाद!
अश्विनीमामी>> 'किती छान' काय? कविता - ललित की प्रेमभंग. Happy

खरंतर मलाही आत्ताच लक्षात आलं अशी काही सेंट्रल थीम वगैरे असल्याचं. Happy

आवडली

वा !
>>>कातर ओली एखादी सर तुझ्या आत पाझरली असती
तर मी कदाचित वसंत होऊन तुझ्या मनी मोहरले असते!<<< क्या बात है |

’कशास मी ही उदास आतूर... उगाच झेलत संततधारा..’
फक्त एकदा भिजला असता, तर तुजला हे कळले असते!

मी पुर्ते भिजले. कसलं भारी लीहितेस

टॉप टू बॉटम आवडली>>>+++१

नेहमीइतकी नाही आवडली.

जवळजवळ प्रत्येकच द्विपदीमध्ये काही ना काही तरी मिसिंग आहे असं वाटलं... कधी व्याकरण, कधी अर्थ, कधी स्पष्टपणा इत्यादी...

खुपच छान

अगदी मनापासुन आवडली

Pages