एकत्र कुटुंबाचा तिढा कसा सोडवायचा ????

Submitted by मिताली on 1 July, 2013 - 19:27

नमस्कार मायबोलीकर.

घरातल्या सगळ्या प्रकारामुळे अत्यंत अस्वस्थता आली आहे, नैराश्याच्या वाटेवर आम्ही दोघे (मी आणि नवरा) चाललो आहोत.
कुणाशी तरी बोललं तर मन हलकं होईल म्हणून इथे लिहीत आहे. जाणकार सल्ल्यांची आणि मार्गदर्शनाची गरज तर आहेच.

आमच्या लग्नाला दहा वर्षे झाली. नवरा-४० वर्षे, मी ३४ वर्षे. गेल्या ७-८ वर्षांपासून आम्ही दोघे शिक्षण, नोकरी अशा सबबींवर बाकीच्या कुटुंबापासून वेगळे राहत आहोत.आम्हाला ७ वर्षांचा एक मुलगा आहे.

गावाकडे ९ लोकांचं कुटुंब आहे.
१. सासू - ६५ वर्षे,
२. सासरे- ७२ वर्षे
दोघांच्याही नावे विमा वगैरे काही नाही. बँकेत जमा रक्कम नाही. सासर्‍यांच्या नावाने मोठा प्लॉट आहे. सध्या त्याची किंमत अंदाजे ७० लाखापर्यंत जाईल. पण त्यावर साधारण ३५ लाखाचं कर्ज आहे.
३. रमेश - ४७ वर्षे, गुटख्याचं व्यसन आहे. बाकी आजार सध्या तरी काही नाहीत. विमा नाही.बचत रक्कम नाही. नोकरी करत नाहीत.
४. रमेशची बायको- ४० वर्षे, आजार सध्या तरी काही नाहीत. विमा नाही. बचत रक्कम नाही. नोकरी करत नाहीत. थोडंफार सोनं बँकेत गहाण आहे.
५. रमेशचा मुलगा - १५ वर्षे, दहावीत शिकतो.होस्टेलला असतो.शालेय प्रगती साधारण. ५०-६० % च्या आसपास मार्क्स असतात. पुढील शिक्षणासाठी खर्चाची काहीही तरतूद केलेली नाही.
६. रमेशची मुलगी - १३ वर्षे, आठवीत शिकते.शालेय प्रगती साधारण. ५०-६० % च्या आसपास मार्क्स असतात.
पुढील शिक्षणासाठी खर्चाची काहीही तरतूद केलेली नाही.
७. सुरेश - ४३ वर्षे, सिगारेट, गुटखा, दारू सगळी व्यसनं आहेत. दारूडा म्हणण्याइतकी स्थिती नसली तरी आजकाल रोजच दारू पिण्याची सवय लागली आहे. एकदा हार्ट अटॅक येऊन गेला आहे. बीपीचा त्रास आहे. विमा नाही. बचत रक्कम नाही. नोकरी करत नाहीत. त्यांच्या नावाने एक प्लॉट आहे. साधारण किंमत १०-१२ लाख.
८. सुरेशची बायको- २३ वर्षे, सध्या प्रेग्नंट.नोकरी करत नाही.बचत रक्कम नाही. थोडंफार सोनं बँकेत गहाण आहे.
९. सुरेशची मुलगी - २ वर्षे, व्यवस्थित पोषण न झाल्याने सतत आजारी.

रमेश आणि सुरेश दोघे मिळून शेती करतात. पण गेल्या दहा वर्षांत त्यातून ठोस नफा झाल्याचं माझ्या ऐकण्यात नाही. २० एकर शेती आहे. ऊस, कापूस, तंबाखू, फ्लॉवर, सोयाबीन अशी पिके घेतात. पण हवे तितके कष्ट न घेतल्याने किंवा इतर कारणांनी शेतीसाठी होणारा खर्च वजा जाता वर्षाअखेरीस हातात फारसं लागत नाही.

आम्ही दोघे नोकरी करतो. नवर्‍याच्या नावाने एलाआयसी वगैरेचे इन्शुरन्स आहेत. पण माझ्या नावे अजून काही नाही. मुलाच्या शिक्षणासाठी अजून काही बचत करायला सुरूवात केलेली नाही. आम्हाला दोघांना मिळून महिना एक लाखापर्यंत कमाई होते.

गेल्या वर्षीपर्यंत आम्ही घरी महिना ३० ते ५० हजारच्या दरम्यान रक्कम पाठवत होतो. पण असं किती दिवस चालू राहणार म्हणून आम्ही सर्वांना एकत्र बसवून चर्चा केली. आम्ही असा प्लॅन सुचवला.

मोठा प्लॉट विकून सगळं कर्ज फेडून टाकावं आणि उरलेली रक्कम विभागून रमेश, सुरेश आणि त्यांच्या बायका ह्यांच्या नावावर ठेवावी. शेती दुसर्‍या कुणाला तरी कसायला द्यावी. दोन्ही कुटुंबांनी वेगवेगळं रहावं. चौघांनीही काहीतरी छोटे-मोठे उद्योग सुरू करून किंवा नोकरी करून स्टेडी मिळकत सुरू करावी. त्यांचं बस्तान बसेपर्यंत दोन्ही कुटुंबांना गरजेपुरती आर्थिक मदत आम्ही करत राहू.

पण ह्या प्लॅनला सासर्‍यांची आणि दोन्ही भावांची तयारी नाही. त्यांना मोठा प्लॉट विकायचं पटत नाही. अजून दहा वर्षांनी त्याची किंमत डबल होईल असं त्यांचं म्हणणं आहे. ह्या वयात नवीन काही उद्योग करण्ं जमणार नाही असं त्यांना वाटतं. नोकरी करणं त्यांना कमीपणाचं वाटतं (एकेकाळचं सावकार घराणं आहे !) बायकांना घराबाहेर पडू द्यायची तयारी नाही. "बायका म्हणजे पायातली चप्पल" अशा विचारांची पुरूषप्रधान संस्कृती @$@$ Angry आहे. शिवाय वेगळं राहणं जमेल असा विश्वास त्यांना वाटत नाही.

आम्ही काहीही बोलायला गेलो तर "तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही तुमच्यापुरतं बघा" असं उत्तर मिळतं. पण गेल्याच महिन्यात सुरेशच्या ऑपरेशनसाठी १ लाख रूपये आम्ही पाठवले. आम्ही नसते पाठवले तर कुठूनतरी महिना ३ % व्याजदराने घेतले असते (अशा व्याजाची पण काही रक्कम कर्ज आहे)
रमेशच्या मुलाच्या होस्टेल खर्चासाठी दरमहा १० हजार रूपये आम्ही पाठवतो. आता दोन्ही मुलांची कॉलेज शिक्षणं चालू होतील. वर लिहिल्याप्रमाणे ह्यासाठी काहीच तरतूद नसल्याने ही जबाबदारी आम्हीच घेतली आहे.

सगळा विचार केला तर खूप चिडचिड होते. पुढे सगळाच अंधार दिसतो. बरं सगळ्यांशी पूर्ण संबंध तोडून टाकून फक्त आपल्यापुरतं बघावं असा विचार जरी मनात आला तरी अपराध्यासारखं वाटतं.
पण असंच चालू ठेवावं तर स्वतःच्या भवितव्याविषयी टेन्शन येतं. विचार करकरून आजकाल खूप उदास वाटायला लागलं आहे. नुकतंच माझं बीपी सुद्धा वाढल्याचं आढळलं. आजकाल सतत डोकं दुखत असतं.रात्री झोप लागत नाही.
सुदैवाने आमच्या दोघांमध्ये ह्या विषयावर काही मतभेद नाहीत. पण दोघंही हतबुद्ध झालो आहोत. मार्ग सुचत नाहीये. जीवनात रसच वाटेनासा झालाय.
फार मोठं गुर्‍हाळ लिहिलंय. कदाचित जरा असंबद्धही झालं असेल. त्याबद्दल सॉरी. पण आज विचारांचा कडेलोट झाला. रात्रीची उठून कीबोर्ड बडवत बसलेय. प्लीज मार्गदर्शन करा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकत्र कुटुंबाचे काही फायदे आहेत तसे तोटेही आहेत. प्रतिकूल परिस्थितीतून वर येण्यासाठी एकाने खस्ता खायच्या आणि इतरांना सेटल करणे ही व्यवस्था ब-याच ठिकाणी मान्य असते. थोरल्या किंवा कर्तबगार मुलाची कर्तव्ये यामधे त्याचं चरकातलं पिळून निघणं मान्य आहे. पुढे धाकट्या भावांचं (काकांचं ) चांगलं बस्तान बसलं तर त्यांनी स्वतःहून कृतज्ञतेने परतफेड करावी हे अपेक्षित असतं. पण दुर्दैवाने ते कायमच लहान राहतात. त्यांच्या बायकांनी जबाबदा-या स्विकारण्यास नकार दिला तर त्यांना कुणीच बोल लावत नाही. अशा वेळी ज्याने खस्ता खाल्ल्या त्याच्या पदरी निराशेशिवाय काहीच पडत नाही. पण थोरलेपणामधे करून विसरून जायचं हे सर्वांनीच गृहीत धरलेलं असतं. काही ठिकाणी मोठे किंवा कर्तबगार भाऊ शेतीची कामं करून इतर भावांचं शिक्षण करून त्यांना शहरात सेटल करताना पाहीलेत. या व्यवस्थेत त्या मोठ्या भावांच्या पुढील आयुष्याचं काहीच प्लानिंग नसतं. इतरांसाठी जे काही केलं तोच विमा समजायचा. (त्या इतरांना जाणीव असल्यास परतावा मिळू शकतो).

प्रत्येक ठिकाणचा त्या त्या कुटुंबातला असा अलिखित करार असतो. ज्याने खस्ता खाल्ल्या त्याने विसरून जायचं हे थांबायला हवं. त्याने आपल्या कुटुंबाची भविष्यातली तरतूद करता कामा नये हे ही थांबायला हवं. काही न करता आयतं बसून खाणं हे ही थांबायला हवं. त्यासाठी प्रसंगी कठोर होता यायला हवं. तुमच्या परिस्थितीत सुरुवातीपासून तुम्हीच सर्व भार उचलत आलेला आहात असं वाटतंय. अशा परिस्थितीत काही दिवस तरी घरच्यांना परिस्थितीची जाणिव होऊन देण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी तुम्हाला कठोर पावलं उचलणं भाग आहे. त्यासाठी भावकीतल्या त्रयस्थ लोकांबरोबर बैठक घेणे गरजेचे असेल तर ते ही करावे. सुरुवातीपासून तुम्हीच सर्वांचं करत आल्याने काही गोष्टी ऐकवण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला आहेच. तुम्ही तुमच्या गरजेच्या गोष्टींचं नियोजन करून आणिबाणीच्या वेळी थोडीफार मदत करू शकताच.

परिस्थिती गंभीर आहे.
पण हाताशी जमीन आहे हा अतिशय चांगला भाग या सर्वात आहे.
शिवाय सर्व भाऊ एकत्र आहेत ही पण जमेची बाजू धरत येईल.
त्याचा उपयोग कसा करायचा यावरच डोके लावले पाहिजे.

जोडधंदा(/दे) उभा करणे व तो चांगला चालण्यासाठी नियम बसवून देणे हा मला सुचलेला उपाय आहे.
कारण अशा परिस्थितीत बोलून उपयोग होत नाही! पण दुकान किंवा दूधाच्या रतीबाचा पैसा हाती पडायला लागला की लगेच विचारधारा पालटते.
असे काही घडले/ घडवले तर परिस्थिती पालटेल असा विश्वास मला वाटतो.

दारूच्या बाबतीत 'क ड क' धोरण स्विकारणे. या बाबतीत संबंध तुटले तरी चालतील. पण अजिबात ऐकुन घेऊ नका. कडक धोरणाने दारू सुटली तर खुपच चांगले! त्या भावाच्या बायकोलाही यात सामील करता आले तर उत्तम. वडीलांनाही लक्ष घालायला सांगणे.

तुम्ही उद्याचा विचार करत आहात ही उत्तम गोष्ट आहे. पण त्याचा आता ताण होतो आहे.
या विचारातून बाहेर या बरं!
तुम्हाला तुमच्या साठी जी बचत आवश्यक आहे ती करायला लागा. अगदी १०० रु. महिना अशी नॉमिनल सुरुवात केली तरी हरकत नाही.

मग डोक्यातला ताणाचा स्वीच बंद होईल आणि विचार परत स्पष्ट होऊ लागतील.
दीर्घ श्वसनाचा आधार घेतला आहे का?

बरं सगळ्यांशी पूर्ण संबंध तोडून टाकून फक्त आपल्यापुरतं बघावं असा विचार जरी मनात आला तरी अपराध्यासारखं वाटतं.>>> मग सम्बन्ध न तोडता आपल्यापुरते बघा.

मिताली, आधी स्वतःच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि तुमच्या म्हातारपणासाठी बचत करायला सुरूवात करा. त्यातून पैसे राहिलेच तर गावी पाठवा.

दर महिन्याला तीस पस्तीस हजार घरी पाठवता हे ऐकल्यावर आश्चर्यच वाटतंय मला. त्यांचे त्यांना कमावू द्या आणि खाऊ द्या. ४० आणि ४५ वयं झाली, दोन मुलं झाली तरी पैसे कमवायची अक्कल येत नाही म्हणजे काय? संबंध तोडायचे नाहीत हे म्हणायला ठिक आहे, पण तुमच्या दोघांच्या पगारावर तुम्ही अजून तीन संसार (सासूसासरे, दोन दीर-जाऊ) असे संसार का ओढताय? सासूसासर्‍यांपुरते त्यांच्या औषधपाण्यापुरते पैसे पाठवणं योग्य, काही तातडीची वैद्यकीय मदत हवी असेल तर अथवा पुतण्यांच्या शिक्षणासाठी पैसे पाठवणं योग्य, पण दरमहा असे आणि इतके पैसे पाठवणे मला तरी योग्य वाटत नाही.

जमिनीचा प्लॉट विकत असतील तर ठिक, नसतील विकत तर तसाच राहू द्या त्यांच्यासाठी. तुम्ही दोघं कमावती आहात, मुलगा अजून लहान आहे तुमचा. त्याच्यासाठी आणी स्वतःच्या संसारासाठी पैसे जोडायला सुरूवात करा. एकत्र कुटुंब म्हणजे सर्व कुटुंबाने एकत्र येऊन राहणं. एकाने कमावणं आणी दुसर्‍याने चैन करणं नव्हे...

आमच्या गांवच्या अशाच एका कुटूंबाने मुंबईच्या तुमच्यासारख्या भावाला गांवी अधिक पैसे पाठवण्यासाठी भाग पाडायला मला मध्यस्थी करायला सांगितलं होतं. " ठीक आहे; आतांपर्यंत त्याने जे पैसे पाठवले व त्यावरचं व्याज धरून मी त्याला एक वाजवी असा मासिक हप्ता ठरवायला सांगतो. तुमच्या इथल्या बागायतीच्या उत्पनातून यापुढे त्या हप्त्यानुसार तुम्ही ते पैसे त्याला परत करायला लागा !", ह्या माझ्या सल्ल्याने तिथं आकांडतांडव झालंच. पण असे पैसे मागतच रहाण्याचा आपला जन्मसिद्ध हक्कच आहे या त्यांच्या ठाम समजाला तडा तरी गेला.
तुम्ही आतांपर्यंत घरीं पाठवलेले पैसे कित्येक लाखात असावेत. एकदां तो हिशेब मांडून तुमच्या घरच्याना त्याची स्पष्ट जाणीव करून दिल्यास तुम्ही सुचवलेला पर्याय त्यांच्या गळीं उतरवणं शक्य होईल. निदान प्रयत्न तरी करून पहा. शुभेच्छा.

इतर उपाय तुम्हाला अनुभवी मायबोलीकर सुचवतीलच. पण त्याचबरोबर मला वाटतं की तुम्ही महिना कमीत कमी २ हजार रु. तुमच्या मुलाच्या नावाने बचत करण्यास सुरुवात करावी. दर महिना जमेल तसे वाढवत न्या. आणि यात स्वतःला अपराधी मानण्यासारखं काही नाही. तुमच्या मुलाचा तो हक्कच आहे. मुलगा ७ वर्षांचा आहे सध्या. उत्तम शिक्षण आजकाल खुप महाग झाले आहे आणि पैशांच्या कमतरतेमुळे मुलाच्या शिक्षणाशी तडजोड करावी लागल्यास तुम्ही स्वतःस कधीच माफ करु शकणार नाहीत.

तुमचे सासूसासरे आणि दिर यांच्याकडून एक रुपयाचीही अपेक्षा ठेऊ नका. तुमचा संसार फक्त तुम्हा दोघांनाच मार्गी लावायचा आहे हे नेहमी लक्षात असू द्या. आर्थिक, भावनिक किंवा इतर कोणत्याही प्रकारची अपेक्षा कुणाकडूनही ठेवू नका,कारण अपेक्षाभंगाचे दु:ख हे फार वाईट.

बरं सगळ्यांशी पूर्ण संबंध तोडून टाकून फक्त आपल्यापुरतं बघावं असा विचार जरी मनात आला तरी अपराध्यासारखं वाटतं.>>> संबंध पूर्ण तोडले जरी नाहीत, तरी आपलाही विचार करणं यात अपराधी वाटण्यासारखं काही नाही हे आधी मनापासून स्विकारा. हे तुम्ही एकदा स्विकारलेत की तुमचं टेन्शन आणि उदासी नक्की दूर होईल आणि पुढचा मार्ग तुम्हाला स्वतःलाच दिसायला लागेल.

तुम्ही दोघंही एकमेकांच्या भावना आणि टेन्शन्स एकमेकांशी नियमितपणे बोलत रहा. निराशेमुळे आपल्या 'जीवनसाथी'बरोबर संवाद हरवू नका. एकमेकांच्या आधाराच्या आणि विश्वासाच्या भक्कम पर्वतापूढे मोठमोठी संकटंसुद्धा जमीनदोस्त होतात हे मी स्वानुभवावरुन तुम्हाला नक्कीच सांगू शकतो.

तुम्हा दोघांनाही माझ्या मनापासून शुभेच्छा!

नंदिनीच्या पोस्टला अनुमोदन.

लग्न झाल्यानंतर माझ्या मते तरी आपली जबाबदारी आपण घेण योग्यच.
दुसर्‍याच्या जीवावर आपण नाही जगु शकत.

सासूसासर्‍यांपुरते त्यांच्या औषधपाण्यापुरते पैसे पाठवणं योग्य, काही तातडीची वैद्यकीय मदत हवी असेल तर अथवा पुतण्यांच्या शिक्षणासाठी पैसे पाठवणं योग्य, पण दरमहा असे आणि इतके पैसे पाठवणे मला तरी योग्य वाटत नाही. <<<
+१००००००००००००

दोन दोन भाऊ असताना निदान घरखर्च तरी त्यांचा त्यांनीच निभावला पाहिजे. लग्न होऊन दोन मुले झाल्यानंतर निदान तेवढे तरी जमायलाच हवे.

खाली इंग्लिश्मध्ये लिहिले आहे त्याबद्दल सॉरी

If you don't have a flat already then purchase a flat, possibly ready to move in.You can go for flat EMI as high as your monthly take home. Ready to move in should immediately stop your rent payment per month that you can start investing in Recurring Deposit, Gold RD (please go for those gold scheme where at the maturity, they give you piece of gold and not jewellery), some medical insurance if not already provided by your employer. Open RD in the name of your son and hubby as well. Start with annual RD's at the end of year you can invest those RD maturity amount in FD. For now please don't start with MF, shares etc if you don't have substantial other non-risky investments. If you already own a flat then please look for bigger flat.

If you are taking produce from the farm for your personal consumption please find market value if they stopped sending those item to you. If the debit / credit matches then you can't really stop sending money there. then it's a case of "एकमेकां साह्य करू ..."
If you are taking any other form of help from them please find its monetary value and ratify that too against payments you are making to them.

You and your hubby looks to have open communication channel. Tell him that your salary is not for spending on extended family. You want to keep your salary for own family and manage extended family payments with his salary. Ask him not to stop whatever savings / investment he is making presently.

Your husband can ask for his' name to be added तो "सात-बारा" of land if it's not already there. If there is a piece of land in his name then you can tell elders that we have to sell this piece of land so as to provide for growing needs of extended family. May be then they will understand the severity of the situation. May be they wouldn't want to let go of family land. If they are ok to sell his land then you can tell that henceforth all the money provided is on loan and you can provide for them only till that money runs out after that everybody on their own. If you are using land money to provide for them then u should get other's land as mortgage.

Help nephew to get admission in some vocational training after SSC where there is guranteed job at the end of the course. Then may be after 2-3, you will have lesser responsibility of one family. You cann't abandon hubby's parents, its against the law and by law you have to provide for them. Here atleast parents have some assets even though half of it is hypothecated.

There is a policy of LIC called "retire and enjoy" (nickname) it's basically endowment policy which starts maturing from the age of 55 till 75. Returns are moderate. It's EMI (monthly premium) can also be part of your saving-investment portfolio. That should sort your retirement and insurance needs partially.

By 5th of every month ensure that there is lot of ECS - Dr transactions to your a/c (home loan EMI, LIC premium, RD, Gold etc) if there is no money lying in a/c then from where will you have money to spare. Have only sufficient cash in hand for your regualar domestic monthly expenditure.

"बायका म्हणजे पायातली चप्पल" अशा विचारांची पुरूषप्रधान संस्कृती >>> असं असेल तर तुमच्या स्वतःच्या पगारातली पै सुद्धा तिथे पाठवू नका, त्यातल्याच पैशातून तुमच्या मुलासाठी आणि तुमच्या भविष्यासाठी तरतूद करण्याचा प्रयत्न करा. बाकी पतीच्या पगारातून वैद्यकीय मदत वगैरे पाठवणे, हे पटण्यासारखे आहे तरी तुम्ही त्यांना जी मोलाची मदत वेळोवेळी करताहात त्याची त्यांना कदर असलीच पाहिजे, असे करा. म्हणजे दारू सोडणे, शेतीचे मॅनेजमेंट नीट करणे ह्यावर पोकळ भाष्य न करता , काही ठोस पावलं उचलली जातायत का नाही हे बघणं आणि सासर्यांसोबत ह्यावर विचारमंथन करणं.

भविष्याची काळजी, मुलांच्या शिक्षणासाठीची तरतूद जर त्यांनी केली नसेल तर टेन्शन त्यांनी घ्यायला हवं. तशीच काही मोठ्या रकमेची मागणी झालिच तर आम्हाला सध्या ईतकंच शक्य आहे, असं धोरण घेता येईल, शेवटी तुम्हालाही तुमचा संसार आहेच.

आणि हो नंदिनी +१ (तुझ्या पोस्ट्स बहुतांशी पटतात)

बापरे !! जर त्यांना किंमत नसेल अन ते " तुम्ही तुमच्यापुरतं बघा " म्हणताहेत तर तुम्ही का बळंच पैसे देताय? पैशाला खास करुन फुकटच्या , कोणी कशाला नाही म्हणेल? अडल्या नडल्या वेळेस कामी येणं वेगळं अन हे वेगळं. तुमची पण कमाल ए !

उद्या तुम्हाला काही झालं तर तुमच्या भविष्याची काय तरतुद?

मिताली, तुम्ही दोघे मदत करत आहत हे चांगले आहे पण आपण जोवर करते असतो तोवर सर्व छान छान असत. आपण थकलो भागलो की आपल्याला मदत करायला कुणी धजत नाही. पैशाच्या देण्याघेण्यात अनेकांचे शेवटी कटु अनुभवच असतात. तुम्ही त्यांन्ना आपल्या पायावर उभे रहायला मदत करा. घरी गिरणी काढली की रोज दळण येत राहील. एखादे किराणा सामानाचे छोटेसे दुकान ज्यात डेली नीड्स सारख्या सगळ्या वस्तू मिळतील असे दुकान लावायला सांगा. शेत आहेत तर त्याकडे तुम्ही जातीने लक्ष द्या म्हणजे शेतीचे उत्त्पन्न वाढेल आणि तुमच्यापर्यत पैसे पोचतील.

फुकट खाऊ लोकांना मग ते जवळचे का असेना मदत करुच नये.

<<<गेल्या वर्षीपर्यंत आम्ही घरी महिना ३० ते ५० हजारच्या दरम्यान रक्कम पाठवत होत>>

गावात राहण्यासाठी इतकी रक्कम? तुम्ही सगळं पाहताय तर त्या लोकांना काय वेड लागलंय आरामाचं जीवन सोडुन काम करायला? मी तर पहील्यांदाच हे सगळं पाहतोय की कुणी इतकं राब राब राबतंय ते ही दुस-यांसाठी, खुप मोठेपणा आहे पण ह्यामुळेच तर त्या लोकांना काहीही न करता फुकटचं गिळायची सवय लागलेली आहे.

आणि तुम्ही तर वेगळेच राहत आहात तर एकत्र कुटुंब कसं म्हणता? त्यांचा प्रश्न त्यांनाच सोडवु द्या. तुम्ही इतकं करुनही ती लोकं केव्हाही म्हणणार नाहीत की तुमच्यामुळे त्यांचा संसार चालतोय आणि तुमच्यामुळे त्यांची मुले शिकली.

मिताली,
अवघड दुखणं आहे. वर सगळ्यांनी सल्ले दिले आहेतच. सावरा स्वतःला. पहिल्यांदा मुलाच्या शिक्षणासाठी आणि स्वतःच्या निवृत्तीसाठीही पैसे साठवायला लागा. तुमच्या स्वतःच्या नावावर नावावर पॉलिसी हव्यातच.
फारतर कर्तव्य म्हणून मिळकतीच्या १०% रक्कम त्यांच्यासाठी बाजूला काढुन ठेवा थंड डोक्याने आणि त्याही विमा वगैरेच. किंवा त्यांच्या मुलांच्या नावे रिकरिंग डिपॉझिट.

इथे लिहुन बरे वाटतेय का? तुम्हाला मार्ग शोधण्यास शुभेच्छा.

बापरे !! जर त्यांना किंमत नसेल अन ते " तुम्ही तुमच्यापुरतं बघा " म्हणताहेत तर तुम्ही का बळंच पैसे देताय? पैशाला खास करुन फुकटच्या , कोणी कशाला नाही म्हणेल? अडल्या नडल्या वेळेस कामी येणं वेगळं अन हे वेगळं. तुमची पण कमाल ए ! >>> Happy Happy अगदी!!!!!

मी तर पहील्यांदाच हे सगळं पाहतोय की कुणी इतकं राब राब राबतंय ते ही दुस-यांसाठी, >>> एकटा मुलगा खेड्यातून जाऊन कमवायला लागलेल्या 'घर घर की कहानी' आहे ही Sad

माझा व्यक्तिगत अनुभव...' कोणी नसे रे कोणाचा, जो तो स्वतःचा स्वतःचा' वेळीच सावध व्हा ! व्यवहारी निर्णय घेणे अपरीहार्यच असते ब-याचदा.

मिताली,
तुम्ही त्यांना आयतं बसून खाण्याची सवय लावली आहे असं नाही का वाटत तुम्हाला?

तुमच्या मनाला पटत नसलं तरी, जस्ट फॉर द सेक ऑफ इट, १-२ महिने पैसे पाठवू नका. महागाई वाढली आहे, तंगी आहे - अशी कारणं सांगा हवं तर. (ती तशीही थोडीफार खरी आहेतच.)
किंवा, ती कारणं सांगून, 'यापुढे दर महिन्याला पैसे पाठवायला जमतीलच असं नाही' अशी पूर्वसूचना देऊन मग पैसे पाठवणं थांबवा.
सासू-सासर्‍यांच्या औषधोपचारांसाठी मेडीक्लेमसारखी काहीतरी तजवीज करून ठेवा.

दर महिन्याला असे बेहिशेबी रोख पैसे पाठवणं ताबडतोब थांबवा.

<<<मी तर पहील्यांदाच हे सगळं पाहतोय की कुणी इतकं राब राब राबतंय ते ही दुस-यांसाठी, >>> एकटा मुलगा खेड्यातून जाऊन कमवायला लागलेल्या 'घर घर की कहानी' आहे ही >>>>>.>>>>>

पण दुसरे दोन भाउ काय फुकटचं खायला आहेत का? आणि महिना ३० ते ५० हजार काय छोटी रक्कम आहे?

त्यांना महिना घरखर्चासाठी देणे इतपत ठीक पण बाकी सगळंच पाहणे म्हणजे स्वतःच्याच पायावर कु-हाड मारुन घेण्यासारखं आहे कारण भाउ हातापायाने व्यवस्थित आहेत व काहिही कष्ट करायला तयार नाहीत. इतकं करुन " तुम्ही तुमच्यापुरतं बघा " म्हणताहेत आता तरी ओळखा त्यांना.

मी ही माझ्या भावंडांसाठी करतो परंतु ते स्वतः ही कष्ट करतात, त्यांच्या तुटपुंज्या कमाईत त्यांना काही कमी पडले तर मी मदत करतो.

इतके दिवस पैसे पाठवून तुम्ही मोठी चुक केली आहे. दुसर्‍याला दोष देण्यात अर्थ नाही.

चुक सुधारायची असेल तर पैसे पाठवणे कायमचे बंद करा.

संबध तोडुन टाका पुर्णपणे. नातेवाईक पाहिजे असतील तर मित्र आणि शेजार्‍यांना नातेवाईक माना.

तुमच्या नवर्‍याचे काय म्हणणे आहे यावर? त्याला स्वतःच्या निवृत्तीची तरतूद, मुलाचे भविष्य याची काही पडलीये की नाही?

आम्ही काहीही बोलायला गेलो तर "तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही तुमच्यापुरतं बघा" असं उत्तर मिळतं. <<
असं असेल तर याचा आधार घेऊन दरमहा पैसे पाठवणं बंद करून टाका.

तुम्ही इतक करूनही त्यांना त्याची जाणीव नाही अस दिसतयं.

तुमच्या मनाला पटत नसलं तरी, जस्ट फॉर द सेक ऑफ इट, १-२ महिने पैसे पाठवू नका. महागाई वाढली आहे, तंगी आहे - अशी कारणं सांगा हवं तर. (ती तशीही थोडीफार खरी आहेतच.)
किंवा, ती कारणं सांगून, 'यापुढे दर महिन्याला पैसे पाठवायला जमतीलच असं नाही' अशी पूर्वसूचना देऊन मग पैसे पाठवणं थांबवा.
>>>>>> असच आणि हेच करा.

अजुन वेळ गेलेली नाही, नंतर पश्चाताप करण्याशिवाय हातात काहीच राहणार नाही.

जरा वेगळे लिहीत आहे म्हणून माफ करा. चुकतही असेल माझे. पण माझा खरोखरच या कहाणीवर विश्वास बसत नाही आहे. तुमचे पती याबाबत काय म्हणतात? तुमच्या जावा त्यांच्या नवर्‍यांना याबाबत काय म्हणत असाव्यात याबाबत तुम्हाला काही फीडबॅक आहे का? तुम्ही दोघे एका महिन्याला एक लाख कमवून अगदी तीस ते पस्तीस हजार गावाकडे पाठवतही असलात तरी उरलेल्या पैशात तुमच्या पतीचे एल आय सी सोडले तर तुमचे काहीच सेव्हिंग का होत नसेल, की मी काहीतरी चुकीचे वाचले आहे?

त्या जमीनीवरचे हक्क कायमस्वरुपी सोडत आहे असे तुमच्या पतीने लिहून व नोटराईझ करून तुमच्या सासर्‍यांना तुम्ही दिलेत आणि सांगितलेत की आता यापुढे आम्ही आर्थिक मदत करणार नाही तर तुमच्या दोन्ही दिरांना ते पटू व रुचू शकेल का? तुमच्या पतींना ते पटू शकेल का?

धन्यवाद

मिताली,

>> बरं सगळ्यांशी पूर्ण संबंध तोडून टाकून फक्त आपल्यापुरतं बघावं असा विचार जरी मनात आला तरी
>> अपराध्यासारखं वाटतं.

असं वाटणं साहजिक आहे. मात्र दरमहा तीस ते पन्नास हजार फुकटात मिळाल्याने घरच्यांच्या क्षमतेचा पूर्ण विकास होत नसावा. पाण्यात पडले की आपसूक पोहायला शिकतील.

मला वाटतं ते खाली लिहितो.

१. विमान हवेत असतांना जर काही कारणाने प्रवाशांना हवा कमी पडली तर प्राणवायूचे मुखवटे देतात. ते लावतांना आधी स्वत:ला लावून मगच इतरांना मदत करायची असते. इथे तुमच्या बाबतीत पैसा हा प्राणवायू आहे. त्यामुळे सर्वप्रथम तुमच्या स्वत:च्या भवितव्याचा विचार करावा लागेल. नंतर बाकीच्यांचा. हेच सर्वार्थाने योग्य आहे. तुमच्या मुलाचं शिक्षण आणि तुमच्या म्हातारपणीचा पैसा या प्रमुख गुंतवणूकी आहेत. त्यानंतर येतं ते स्थावर (रियल इस्टेट). तुमचं स्वत:चं घर आहे का? असल्यास उत्तम. नसल्यास घेण्याच्या मागे लागा. तुमचा स्वत:चा पैसा तुमच्या स्वत:च्या कामास जुंपला गेला पाहिजे.

२. गावाकडची जमीन तुमच्या ताब्यात येईल असे बघा. जमल्यास ३५ लाखांचं कर्ज प्रामुख्याने फेडा आणि त्या बदल्यात जमिनीचा अधिकाधिक हिस्सा तुमच्या ताब्यात येईल असे बघा. याची शक्याशक्यता पडताळून पाहण्यासाठी तत्ज्ञ व्यक्तीची मदत घ्या. (मला अशा व्यवहारांची फारशी माहीती नाही). हातात जमीन असणं महत्त्वाचं. अर्थात, जमिनीवर घुसखोरी होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.

३. घरच्यांच्या बाजूला आर्थिक नियोजनाचा एकंदरीत खडखडाट दिसतो. तुम्ही त्यांना दरमहा ठराविक रकमेच्या (उदा. रू. १००००) वर एक पैसाही देणार नाही हे स्पष्टपणे सांगा. त्यांच्या बायकांना विश्वासात घ्या. जमल्यास बायकांना शेतीच्या कामात लक्ष घालायला सांगा. अगदी कितीही @$@$ Angry पुरूष असला तरी पैसा आणि बाई (म्हणजे बायको) यांच्यासमोर कलंडतो.

४. तुम्ही पैसे देताय ना, मग तुम्हाला प्रत्येक पैचा हिशोब मागण्याचा हक्क आहे. कदाचित त्यांच्या आर्थिक नियोजनाची घडी बसवून द्यावी लागेल. हीही एक मदतच आहे. त्यामुळे तुमच्या स्वत:च्या तसेच त्यांच्याही पैश्यास कमी वाटा फुटतील.

५. सर्वांना योग्य बुद्धी मिळावी म्हणून देवाची प्रार्थना करा (तुमचा देवावर विश्वास असल्यास).

शेवटी या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी शुभेच्छा! Happy

आ.न.,
-गा.पै.

एवढ्या पटकन सर्वांनी प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. इथे लिहून खरंच बरं वाटतंय. अशा गोष्टी ओळखीत किंवा नात्यात डिस्कस करायला अवघडल्यासारखं होत होतं. गृहच्छिद्रे उघडी करू नये म्हणतात ना.

बेफिकीर, ही कहाणी नाही, सत्यपरिस्थिती आहे. एक अक्षरही वाढवून लिहिलेलं नाही. त्यामुळेच तर डोकं भणाणून गेलं आहे Sad

दिवसभरात कामातून वेळ मिळेल तसतसं इथे येऊन प्रतिसाद लिहिते. बर्‍याच मुद्द्यांवर चर्चा आणि मार्गदर्शन लागणार आहे.

पाण्यात पडले की आपसूक पोहायला शिकतील.<<<

गामा साहेब, माफ करा, पण मला वाटते आपण एक गोष्ट गृहीत धरत आहात की ज्यांना पाण्यात पाडणे / टाकणे आवश्यक आहे त्यांना ते सहजगत्या मान्य होईल. मुळात त्यांच्या घरात स्त्रीला वहाणेचा दर्जा आहे. (सहसा अश्या घरात थोरल्या भावाला अथवा वडिलांना फारच महत्वही असते). एक वेळ असे होऊ शकेल की हा लेख लिहिणार्‍या स्त्रीलाच घालवून देतील पण ते सगळे एक राहतील. (अगेन सॉरी टू से धिस).

कौटुंबिक पातळीवर हे जे अन्याय होत असतात त्याहीबाबत काही कायदे असलेला असा एक माहितीपूर्ण लेख बहुधा अरुंधती कुलकर्णींनी मध्यंतरी लिहिलेला आठवत आहे. नक्की नाही. पण हा एक ठोस प्रकारचा अन्यायच आहे आणि पैसे पाठवणे बंदच केले तरः

१. शिवीगाळ, धमक्या, मारहाण
२. संबंध सोडणे, गावभर बदनामी
३. इस्टेटिचे वाद मुद्दाम उकरून काढून त्रास देणे

इत्यादी स्वरुपाचे अनेक प्रकार गावाकडच्या घरातील निष्क्रीय 'कर्ते पुरुष' करतील यात मला शंका वाटत नाही. (पुन्हा क्षमस्व).

Pages