मदनमोहन एक संमोहन ....

Submitted by मी मी on 1 July, 2013 - 13:16

संगीत हि कला नाही ती जादू आहे किंवा मग चमत्कार…. संगीत माणूस इथे येउन शिकत नाही ती उपजत एखाद्यात भिनलेली असायला लागते…. शिकणारे गाणी गायला शिकतात … गातातही… पण संगीतप्रेमींच्या काळजाला काही त्यांना हात घालता येतोच असे नाही … ज्यांच्या ज्यांच्या जवळ हि अशी काळजापर्यंत पोचायची जादू होती ती माणसं खरच अनेकांच्या मनापर्यंत आपसूक पोचती झाली …. …. याची अनेक उदाहरणे देता येतील …. पण एखादा जादुगार नुसती जादू करत नाही तर त्याच्या कलेच्या माध्यमाने तुमच्या मनावरच राज्य करू लागतो……

'रस्मे उल्फत को निभाये तो निभाये कैसे ' ......
'आपकी नज़रों ने समझा प्यार के काबिल मुझे ...'

या अश्या बहारदार गीतांना स्वतःचा संगीतमय स्पर्श करून मदन मोहन यांनी अमर केले … यांच संगीत म्हणजे संमोहनच जणू …. एक दोन नाही अनेक सदाबहार गीते आपल्या साठी देऊ करून आजही आपल्यात ते नेहेमीसाठी संगीत रूपाने वावरत असतात….

'तू जहा जहा चलेगा मेरा साया साथ होगा' असू दे नाहीतर 'लग जा गले' …. 'नैनों में बदरा छाये' …. 'अगर मुझसे मोहोब्बत है' … 'यूँ हसरतों के दाग' किंवा मग स्वतःच्या तालावर आपल्यालाही ठुमकायला लावणारे 'झुमका गिरा रे ' असू दे 'मदनमोहन' या सर्व गीतांमधून संगीती दुनियेत अन तुमच्यात आमच्यात आजही भिनलेले आहेत …

जिवंतपणी यांनी दिलेला खजिना कमी होता कि काय तर निघून गेल्यानंतरही यांच्या संगीतमय धुनी यश चोपडा सारख्या कलेच्या पारख्याने मदनमोहन यांच्या जादूच्या पिटारीतून बाहेर काढल्या अन त्या आजही मनांवर जादू करण्यास चुकू शकल्या नाहीत … हल्ली हल्ली आलेल्या 'विर-जारा' सिनेमातून मदनमोहन यांच्या गुपित ठेवलेल्या संगीताचा गोडवा आपण चाखला….

काही लोकं कळत नकळत अनेकांच्या जीविताचे, जगण्याचे साधन बनून जातात, गरजेचा मोठा साठा सोडून जातात कधीही न संपणारा …'मदनमोहन' त्यापैकीच एक होते……

मदनमोहन यांचे मला आवडणारे काही गीत :-

* आपके पहेलु आकर रो दिए दिए
* जो हमने दास्ताँ अपनी सुनाई
* आपकी नज़रों ने समझा
*अये दिल मुझे बता दे
* तेरे पास आके मेरा वक्त गुजर जाता है
* रस्मे उल्फत को निभाये तो निभाये कैसे
* रुके रुके से कदम
* मीलों ना तुम तो दिल घबराये
* मेरा साया साथ होगा
* लग जा गले के फिर ये
* हुस्न हाजिर है मोहोब्बत की सजा
* एक हसीं शाम को दिल मेरा खो गया
* एक लड़की भोली भाली सी
* है तेरे साथ मेरी वफ़ा .... मै नहीं तो क्या

आणखी बरेचसे ............

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मदन मोहन माझाही सगळ्यात आवडता संगीतकार आहे... खरोखर अवीट गोडीची गाणी दिली या माणसाने Happy

माझ्या काही आवडत्या गाण्यांपैकी:
हम प्यारमे जलनेवालोंको चैन कहा
फिर वोही श्याम वोही गम वोही तनहाई है
वो चुप रहे तो मेरे दिल के दाग जलते है
युं हसरतोंके दाग
जरासी आहट होती है

मदनमोहन हा एक अवलिया होता,

मदनच्या वडीलांना त्याला आर्मी मध्ये पाठवायचे होते. वडिलांच्या मताला मान देत, मदन ब्रिटिश आर्मी
मध्ये १९४३ साली आर्टिलरी ऑफिसर म्हणुन भरती झाला. ते थे ही त्यातला कलाकार जागाच राहीला.
आर्मित असताना ही तो छोटे मोटे शोज करीत असे.

भारता स्वतंत्र झाल्यावर तो मुंबईत आला संगितकार म्हणुनच.

लता मंगेशकरनी गायलेली सर्वात सुंदर गाणी मदनमोहननेच संगीतबद्द् केलेली आहेत.

मदनमोहन माझा अतिशय आवडता संगीतकार. त्याची आवडणारी गाणी सवडीने लिहीनच.
१) कदर जाने ना..
२) वो भूली दास्ताँ
३) आज सोचा तो..
४) बेताब दिल की..
५) तुम जो मिल गये हो..
६) दिल ढूंढता है...
या मदनमोहनच्या काही अप्रतिम गाण्यांना विसरुच शकत नाही.

ज्यांच्या ज्यांच्या जवळ हि अशी काळजापर्यंत पोचायची जादू होती ती माणसं खरच अनेकांच्या मनापर्यंत आपसूक पोचती झाली …. …. >>>>> खरंच आहे मदन मोहन काळजात पार खोल रुतून गेलेले नाव - कितीही जन्म गेले तरी ती जादू तशीच राहील इतक्या अवीट गोडीची गाणी दिली आहेत या सुरांच्या जादूगाराने .....

या लेखाकरता मनापासून धन्यवाद ...

मला जुने संगीतकार ऐकुन माहिती आहेत.
पण हे गाण ह्यांच अशी डिटेल अचुक माहिती नसतेच.

वर उल्लेखलेली बरीच गाणी आवडतात.
वीर झारा मधली दोन गाणी खुपच आवडलेली.

झकासराव :- पूर्वी मी सुद्धा फार लक्ष देत नसत पण हळू हळू लक्षात यायला लागले आपल्याला आवडणारी खास गाणी हि कुण्या एका विशिष्ट संगीतकारांची असतात किंवा मग विशिष्ट गायकाने गायलेले असतात ….

मला बालसुब्रामन्यम यांनी गायलेली सगळीच गाणी खूप आवडतात …. यशुदास यांचे जुने गाणे
तसेच जयदेव, मदनमोहन, (शेखर विशाल किंवा आणखी बरेच) यांचे काम्पोजिशन …. गझल म्हंटले कि जगजीत सिंगच …. असे काही खास कोम्बो आपसूक मनात तयार होतात ….

मयी, लेख थोडा विस्तृत व्हायला हवा होता Happy

मदन मोहन यांची मला अत्यंत आवडणारी गाणी -

१) लग जा गले की फिर ये हसीं रात हो ना हो
२) तुझे क्या सुनाऊं ए दिलरुबा, तेरे सामने मेरा हाल है
३) आज सोचा तो आँसू भर आए
४) है इसी मे प्यार की आबरु
५) तू मेरे सामने है, तेरी जुल्फे है खुली... मै भला होश मे कैसे रहू
६) होके मजबूर मुझे उसने बुलाया होगा
७) जिया ले गयो जी मोरा सावरिया
८) कर चले हम फिदा जान-ओ-तन साथियों
९) नैनोंमे बदरा छाए
१०) बैया ना धरो बलमा
११) मै तो तुम संग नैन मिलाके हार गयी सजना
१२) यूं हसरतों के दाग
१३) नगमा ओ शेर की सौगात किसे पेश करु
१४) कौन आया मेरे मनके द्वारे, पायल की झनकार लिये
१५) फिर वही शाम वही गम वही तनहाई है
१६) रस्म-ए-उल्फत को निभाए तो निभाए कैसे
१७) तेरी आँखों के सिवा दुनिया मे रखा क्या है
१८) दिल ढूंढता है फिर वही
१९) तुम जो मिल गये हो, तो ये लगता है... के जहा मिल गया
२०) तू जहा जहा चलेगा, मेरा साया साथ होगा
२१) हमसे आया ना गया, तुमसे बुलाया ना गया
२२) तू प्यार करे या ठुकराए, हम तो है तेरे दिवानोंमे
२३) उनको ये शिकायत है के हम कुछ नही कहते
२४) वो चुप रहे तो मेरे दिलके दाग जलते है
२५) मेरी आवाज सुनो, प्यार का राज सुनो
२६) जरा सी आहट होती है तो दिल सोचता है
२७) बेताब दिल की तमन्ना यही है

बापरे.. बघता बघता २७ झाली. अजून आठवली की लिहिते. ही माझी लिस्ट आवडीच्या उतरत्या भाजणीप्रमाणे नाहिये. जी आवडतात ती आठवतील तशी लिहिली आहेत.

नावाप्रमाणेच त्यांच्या सर्वच रचनांमध्ये मदन व मोहन होते- थोडक्यात सौंदर्य व थेट मनाला भिडणारी मोहकता. मदनमोहन हा बॉलीवूडमधला पहिला 'मेलडी मेकर' होता असे म्हटले तर वावगे ठरू नये.

स्वरूप +१,

मदन मोहन मलाही आवडतो.. सुंदर चाली दिल्या त्यानं. पण त्यानं एकाच ढंगाची गाणी जास्त दिली असं वाटतं. मला त्यामुळे तो वन डायमेन्शनल वाटतो.

१०० टक्के सहमत मयी,
केश्विनीची लिस्टही मस्तच.
त्यांच्या सगळ्याच रचना अभिजात.

ही गाणी तशी बरीच नंतरची आहेत. लताकडून त्याने अप्रतिम गाणी गाऊन घेतली आहेत.
कुणाला शक्य असल्यास शास्त्रीय गायिका अलका देव मारुलकर यांनी सादर केलेला संगीत सरीता ऐकाच.
त्यात त्यांनी मदनमोहन यांच्या रचनातील राग उलगडून दाखवले होते. त्या स्वतः तर श्रेष्ठ गायिका आहेतच पण मूळ लताची रचना आणि त्यांचे सादरीकरण याद डावे - उजवे करताच येत नाही. त्या कार्यक्रमात दोन्ही गाणी ऐकवली आहेत.

माई री मै कासे कहुं पीर अपने जिया की..
http://www.youtube.com/watch?v=abpFlf-wiYI
(यात मला मदनमोहन यांचे वर्जन जास्त आवडते).

होके मजबुर मुझे उस ने भुलाया होगा
कर चले हम फिदा..
हमसे आया न गया..

वीर झारा च्या डबल सीडी पॅकमधे एक सीडी त्यांच्या आवाजात त्यातील गाण्यांबद्दल त्यांच्या कॉमेंट्स आहेत. मिळाल्यास जरुर ऐका.

मदनमोहन ,सर्व कविकुळाच्या "दिल का टुकडा" आहे .ज्या ताकदीने ते शब्द पोहचवतात,ते फार कमी लोकांना जमते .

कुणाला शक्य असल्यास शास्त्रीय गायिका अलका देव मारुलकर यांनी सादर केलेला संगीत सरीता ऐकाच.त्यात त्यांनी मदनमोहन यांच्या रचनातील राग उलगडून दाखवले होते. >>>> दिनेशदा, मी ऐकल आहे हे. संगीत सरीता न चुकता रोज ऐकण्याचा फायदा Happy खुप छान वाटल होत.

मयी
माझा आवडता संगीतकार!
अश्विनी के
तुमची लिस्ट मस्तच!

मदनमोहन......खरंच संमोहन!
माझा प्रचंड आवडता संगीतकार .
सर्वांना धन्यवाद गाण्यांच्या लिस्टांबद्दल आणि लिंकांबद्द्दल!
मनस्मी१८ माईरी बद्दल +१००

मयी, काय लिहावे ? सुंदर विषय निवडलास.
केश्वीचं लिस्टही आवडलं.

आयुष्याला अर्थ देणारी माणसे ही. यांच्यामुळे जगणे सुंदर झाले.
खरेच मदन आणि मोहन, दोन्हींचा संगम त्या प्रतिभेत. नतमस्तक.

विक्रांत >>मदनमोहन ,सर्व कविकुळाच्या "दिल का टुकडा" आहे >> अगदी खरे, तसे तर सर्वच रसिकांच्याही.
संगीतातून मेलडी हद्दपार होण्याच्या काळात संदर्भहीन जगत रहाण्याआधीच या राजा माणसाने एक्झिट घेतली.

Pages