मदनमोहन एक संमोहन ....

Submitted by मी मी on 1 July, 2013 - 13:16

संगीत हि कला नाही ती जादू आहे किंवा मग चमत्कार…. संगीत माणूस इथे येउन शिकत नाही ती उपजत एखाद्यात भिनलेली असायला लागते…. शिकणारे गाणी गायला शिकतात … गातातही… पण संगीतप्रेमींच्या काळजाला काही त्यांना हात घालता येतोच असे नाही … ज्यांच्या ज्यांच्या जवळ हि अशी काळजापर्यंत पोचायची जादू होती ती माणसं खरच अनेकांच्या मनापर्यंत आपसूक पोचती झाली …. …. याची अनेक उदाहरणे देता येतील …. पण एखादा जादुगार नुसती जादू करत नाही तर त्याच्या कलेच्या माध्यमाने तुमच्या मनावरच राज्य करू लागतो……

'रस्मे उल्फत को निभाये तो निभाये कैसे ' ......
'आपकी नज़रों ने समझा प्यार के काबिल मुझे ...'

या अश्या बहारदार गीतांना स्वतःचा संगीतमय स्पर्श करून मदन मोहन यांनी अमर केले … यांच संगीत म्हणजे संमोहनच जणू …. एक दोन नाही अनेक सदाबहार गीते आपल्या साठी देऊ करून आजही आपल्यात ते नेहेमीसाठी संगीत रूपाने वावरत असतात….

'तू जहा जहा चलेगा मेरा साया साथ होगा' असू दे नाहीतर 'लग जा गले' …. 'नैनों में बदरा छाये' …. 'अगर मुझसे मोहोब्बत है' … 'यूँ हसरतों के दाग' किंवा मग स्वतःच्या तालावर आपल्यालाही ठुमकायला लावणारे 'झुमका गिरा रे ' असू दे 'मदनमोहन' या सर्व गीतांमधून संगीती दुनियेत अन तुमच्यात आमच्यात आजही भिनलेले आहेत …

जिवंतपणी यांनी दिलेला खजिना कमी होता कि काय तर निघून गेल्यानंतरही यांच्या संगीतमय धुनी यश चोपडा सारख्या कलेच्या पारख्याने मदनमोहन यांच्या जादूच्या पिटारीतून बाहेर काढल्या अन त्या आजही मनांवर जादू करण्यास चुकू शकल्या नाहीत … हल्ली हल्ली आलेल्या 'विर-जारा' सिनेमातून मदनमोहन यांच्या गुपित ठेवलेल्या संगीताचा गोडवा आपण चाखला….

काही लोकं कळत नकळत अनेकांच्या जीविताचे, जगण्याचे साधन बनून जातात, गरजेचा मोठा साठा सोडून जातात कधीही न संपणारा …'मदनमोहन' त्यापैकीच एक होते……

मदनमोहन यांचे मला आवडणारे काही गीत :-

* आपके पहेलु आकर रो दिए दिए
* जो हमने दास्ताँ अपनी सुनाई
* आपकी नज़रों ने समझा
*अये दिल मुझे बता दे
* तेरे पास आके मेरा वक्त गुजर जाता है
* रस्मे उल्फत को निभाये तो निभाये कैसे
* रुके रुके से कदम
* मीलों ना तुम तो दिल घबराये
* मेरा साया साथ होगा
* लग जा गले के फिर ये
* हुस्न हाजिर है मोहोब्बत की सजा
* एक हसीं शाम को दिल मेरा खो गया
* एक लड़की भोली भाली सी
* है तेरे साथ मेरी वफ़ा .... मै नहीं तो क्या

आणखी बरेचसे ............

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

(यात मला मदनमोहन यांचे वर्जन जास्त आवडते).>>>> मनस्मि १८, अगदे अगदी. लतापेक्षाही मदनमोहन यांच्या आवाजात दर्द आहे.

खूप छान लेख. प्रतिसादही मस्तं आहेत. सगळ्यांनी प्रतिसादानमधे इतकी सुंदर गाणी दिलीच आहेत ती सगळी आवडतात. हकिकत, मेरा साया मधली गाणी. मला वाटतं संजीव कुमार च्या मौसम मधेहि ही मदन मोहन यांचेच संगीत होतं नं. त्यातली दिल ढूँढता है फिर वही- ऑल टाइम फेवरेट.

मदनमोहनजींचे 'माई रें' ह्या 'चिरंतन' गाण्याबद्दल मायबोलीवर कुणीतरी एक अतिशय सुंदर प्रस्तावना लिहिली होती. मी बरीच शोधली पण सापडली नाही.
कुणी मदत करू शकेल काय?
आगावू (advance!!) धन्यवाद!!

नीटसं डीसायफर झालं नाही. प्रतिसाद काढून का टाकला इतकं कळलं. पुढे साधारण "तो ठेवता आला असता, नाही का?" असे असावे कदाचित. प्रतिसाद भलत्या जागी/धाग्यावर पडला होता.
प्र भ जा प हो Bw

माई री मै कासे कहुं पीर अपने जिया की..
http://www.youtube.com/watch?v=abpFlf-wiYI
(यात मला मदनमोहन यांचे वर्जन जास्त आवडते).
>>>
मी पण हेच लिहायला आले होते.

मेरी आवाज सूनो, मेरा सायाची गाणी, लग जा गले किती गाण्यांविषयी लिहावं.

वाह वा! वा वा!! वावे भौ!!
अगदी अगदी हेच हवे होते!! लाख-करोड- अब्ज धन्यवाद!
विशाल कुलकर्णीजींन्नी भावना अतिशय सुरेख शब्दबद्ध केल्या आहेत!
ते गाणं मंत्रमुग्ध करणारे आहेच पण कुलकर्णीजींन्नी शब्दरचना त्याचा अनुभव देणारी आहे!
हा खजिना शोधून दिल्यबद्दल धन्यवाद! हे सापडत नसल्याने - लहान मुलसरखे अस्वस्थ होतो. आता पुन्हा वाचले! अप्रतीम! दोन्हिही!

णे लेख लिहून तुम्ही एका विशिष्ट गोत्राच्या लोकाना एकत्र आणलेत. छान लेख.
मदन स्वतः एक उत्तम Cook होते असे मागे वाचनात आले होते.

त्यांची गाणी आपले वरवरचे मन भेदून आंतरमनाला स्पर्श करतात ....किंवा वेदना देतात !
यूं हसरतों के दाग हे माझं सर्वात आवडते गाणे

Pages