अकरावी बारावीत असताना कै. नानामामांच्या (आईचे मोठे बंधू) तोंडी पहिल्यांदा रंग और नूर की बारात किसे पेश करू ऐकलं तेव्हा मदन मोहन नावाचा एक विलक्षण संगीतकार हिंदी चित्रसृष्टीत होऊन गेला हे प्रथमच कळलं. त्यानंतर एकदा असंच आईच्या तोंडून "माई री sss, मैं कासे कहूं" ऐकलं आणि मग मात्र मदन मोहन या माणसाने पछाडून टाकलं मला. मी लिस्ट बनवली आणि मदनमोहनची गाणी रेकॉर्ड करून आणायला कॅसेटवाल्याकडे गेलो. तेव्हा कोऱ्या कॅसेट्स घेऊन त्यावर आपल्याला हवी ती गाणी रेकॉर्ड करून मिळायची. आता इंटरनेटवर हवे ते सगळे मिळते.
संगीत हि कला नाही ती जादू आहे किंवा मग चमत्कार…. संगीत माणूस इथे येउन शिकत नाही ती उपजत एखाद्यात भिनलेली असायला लागते…. शिकणारे गाणी गायला शिकतात … गातातही… पण संगीतप्रेमींच्या काळजाला काही त्यांना हात घालता येतोच असे नाही … ज्यांच्या ज्यांच्या जवळ हि अशी काळजापर्यंत पोचायची जादू होती ती माणसं खरच अनेकांच्या मनापर्यंत आपसूक पोचती झाली …. …. याची अनेक उदाहरणे देता येतील …. पण एखादा जादुगार नुसती जादू करत नाही तर त्याच्या कलेच्या माध्यमाने तुमच्या मनावरच राज्य करू लागतो……
'रस्मे उल्फत को निभाये तो निभाये कैसे ' ......
'आपकी नज़रों ने समझा प्यार के काबिल मुझे ...'