हे करून बघा........

Submitted by मी मी on 25 June, 2013 - 12:16

मित्रांनो या पावसाळ्यात तुमच्या छोटुल्या मुलांबरोबर मिळून एक सुंदरसा प्रयोग आणि त्यासोबत धम्माल मस्ती नक्की करून बघा......

आपण रोज घरी खात असलेली फळे...भाज्या यांच्या बिया रोज फेकून न देता गोळा करून ठेवायच्या...किंवा तुमच्या मुलांना त्या नीट गोळा करून ठेवायला सांगायच्या......आणि आठवड्यातल्या एखाद्या सुट्टीच्या दिवशी या बिया आणि मुलांना घेऊन बाहेर पडायचं....घराच्या आसपास, एखाद्या बागेत, रस्त्याच्या कडेला, एखाद्या मैदानाच्या कॉर्नरला किंवा नाहीच काहीतर तुमच्या घराच्या किंवा सोसायटीच्या काम्पौंड च्या भोवताल जिथे कुठे मातीमय मोकळी जागा मिळेल तिकडे ती गोळा केलेली सर्व बियाणे पसरवून टाकायची......बस्स

अस शक्यतोवर पावसाळा सुरु आहे तोपर्यंत दर आठवड्यात करायचे....त्यानंतर तुम्हाला फार काही करायची गरज नाही....बिया रुजल्या कि त्यांना फुटलेली कोंब रोपट्यात, झाडात रुपांतरीत होईपर्यंत काय काय काय धम्माल मज्जा येते हे मुलांना समजून सांगा आणि त्यांनाच त्यावर लक्ष ठेवायला सांगा.....आणि कोंब फुटल्या नंतर, मग पान आल्यानंतर, नंतर दोनाचे चार पान झाले म्हणून..फुल येऊ लागलीत म्हणून असे अगदी रोज रोज मुलांचा ओसंडून वाहणारा उत्साह आणि आनंद मनसोक्त अनुभवा.......

आम्ही हमखास उपयोगात आणलेले आणि यश मिळवलेले हे प्रयोग....आम्ही CSR ला असतांना सर्व गावातल्या शाळेमधल्या विद्यार्थ्यांना आठवडाभर घरी खाल्लेल्या फळ-भाज्यांच्या गोळा करून ठेवलेल्या बिया आठवड्यातल्या एके दिवशी शाळेत आणायला सांगायचो; हे विशेषतः पावसाळ्यातच...शाळेतच मुलांच्या सहाय्याने मळे फुलवायला जागा करवून घेतल्या होत्यात.....त्याच मुलांच्या हाथाने त्यांनीच आणलेल्या बिया त्यांच्याच केलेल्या जागेवर पेरायच्या...पावसाळाभर त्या आपल्या आपल्या जागेवर प्रत्येक विद्यार्थांनी लक्ष ठेवायचे त्यांची जपणूक करायची.....टाकलेल्या सर्व बिया नाही उगव्ल्यात आणि त्यातल्या काहींनी जरी कोंब धरले तरी वाईट काहीच नाही.....पावसाळ्यात हा मळा पावसावर तर त्यानंतर वर्षभर हाच मळा तिथल्या सांडपाण्यावर बहरेल अशी सोय आम्ही केली होती.....आणि हा प्रयोग त्यावेळी पूर्ण यशस्वी सुद्धा झालेला......या शाळेतल्या मुलांनी फुलवलेल्या या फळांचा, भाजींचा उपयोग यांच्या रोज मीडेय जेवणात केला जायचा....काहीतरी तरी शुध्द खाल्ल जातंय याच त्यांना आणि आम्हालाही समाधान होत......हेच प्रयोग मी या वर्षी माझ्या शाळेच्या मुलांसोबत मिळून करणार आहे ........

मुंबईला पनवेल येथे राहणारे आमचे एक परिचित..यांना सहज एकदा बोलतांना मी हे सर्व सांगून गेले...या प्रयोगाची आयडिया त्यांना खूप आवडली...त्यांच्या घरासमोर रस्ता होता आणि त्याच्या पलीकडे एक वाह्ता चांगल्या पाण्याचा नाला होता...आधी ते त्या नाल्याला कंटाळले होते...पण नंतर त्यांनी एके पावसाळ्यात हाच प्रयोग त्या नाल्याच्या कडेने लांबवर पर्यंत केला ....आणि काय आश्चर्य आज चार वर्षांनी कितीतरी झाडांनी व्यापलेला तो नाला हिरवळीने भरलेला देखनीय झाला आहे........आता कितीतरी लोक त्या नालेच्या कडेला फुललेला मळा बघायला येतात......

काही विशिष्ट वातावरण निर्माण झाले कि काही गोष्टी हमखास आठवतात.....असंच काहीस या पावसाळ्यात होतंय...आणि आपल्या मुलांसोबत धमाल करता येतील असे हे प्रयोग तुम्हा सर्वांसोबत वाटून घ्यावे असे वाटले....

खरच या पावसाळ्याची खरी मज्जा मुलांच्या चेहेऱ्यावर बघायची असेल तर या पावसाळ्यात हे करूनच बघा......

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुलांना निसर्गाच्या सान्निध्याची सवय लावण्याची हि योग्य वेळ.....आणि अनेक संस्कारांपैकी हा देखील एक संस्कार त्यांच्यावर घडायला हवा ....

उपक्रम, प्रयोग छानच आहे.

एक विनंती आहे. तुम्ही प्रत्येक लिखाण कथा कादंबरीमधे पोस्ट न करता त्या त्या लिखाणानुसार योग्य ग्रुपमधे टाकाल का? योग्य वर्गीकरण केल्याने पुढे जाऊन सापडायला सोपे पडते.

या लेखाला तुम्ही पर्यावरण या ग्रुपात टाकलेत तर त्यावर योग्य चर्चाही होऊ शकेल.

सुरेखच आहे हा उपक्रम. उन्हाळ्यात आंब्यांच्या कोयी तर कितीतरी जमवता येतील. शिवाय जांभूळ, फणस आहेतच.

छान उपक्रम. नक्कीच करता येण्यासारखा.
मात्र पावसाळा संपला की त्या रोपांना पाणी मिळत नसेल तर ती सुकणार. त्याचं ही काहीतरी करायला हवं.

घारूअण्णा दरवर्षी एक उपक्रम करतात दरवर्‍षी अशा व्वृक्षारोपणाचा. त्यांनी अनुभव लिहिले होते एका बीबीमधे.

छान उपक्रम Happy सावली, अश्या उपक्रमांसाठी साधारण कमी पाण्यावर जोपासल्या जाणार्‍या वृक्षांची निवड केली जाते. जंगलांमध्ये कुठे एरव्ही कोण पाणी घालायला जातं? पण तिथेही जी झाडे जगतात त्याच कॅटेगरीतली झाडं लावायची. किंवा स्वयंपाकाच्या सांडपाण्याचा ओलावा जिथे झिरपत जाऊ शकतो तिथवर झाडं लावायची.