एक असतो बनारसी पंडित. त्याचा मुलगा एका मुस्लिम मुलीच्या प्रेमात वेडा होतो. त्या मुलाच्या कहाणीवर एक होतकरू दिग्दर्शक चित्रपट काढायचं ठरवतो. त्या चित्रपटातून एक तमिळ सुपरस्टार हिंदीत आगमन करणार असतो. त्याच्या हिंदी उच्चारांवर मेहनत घेऊन त्याचा आणि स्वत:चा अजून एखाद्या चित्रपटासाठीचा वेळ वाया घालविण्यापेक्षा रोलच जरासा 'अॅडजस्ट' करू या की, असं ठरवलं जातं आणि कहाणी अशी बनते की - 'एक असतो 'तमिळ' पंडित. तो बनारसला 'प्रॅक्टिस' करत असतो. त्याचा मुलगा एका मुस्लिम मुलीच्या प्रेमात वेडा होतो आणि वगैरे वगैरे'
'बऱ्याच दिवसात मार्केटमध्ये नवा देव आला नाहीये', असा काहीसा संवाद 'OMG' मध्ये आहे. तो ऐकून दिग्दर्शकाची ट्युब पेटली असावी आणि जाणवलं असावं की बऱ्याच दिवसात मार्केटमध्ये नवा 'मजनू' आला नाहीये ! दोन-तीन चांगल्या दर्जाची ठिगळं जोडून एक कहाणी विणली गेली असावी. ही कहाणी ठिगळ बाय ठिगळ उलगडत जाते. सुरुवात होते बनारसमध्ये. तमिळनाडूतून येऊन बनारसमध्ये स्थिरस्थावर झालेल्या एका पंडिताचा द्वाड मुलगा 'कुंदन' (धनुष), बालपणापासूनच 'झोया' (सोनम कपूर)च्या प्रेमात असतो. बालवयातल्या ह्या प्रेमाला स्वत: कुंदन आणि झोयाच्या घरचे फारच सिरिअसली घेतात आणि शोप्याची रवानगी बनारसहून अलिगढ आणि नंतर पुढिल शिक्षणासाठी तिथून दिल्लीला होते.
८-९ वर्षांनी परतलेली झोया बदललेली असते. ती 'अक्रम' (अभय देओल) ची दीवानी झालेली असते. पण कुंदन बदललेला नसतो. तो अजूनही तिच्याच प्रेमात असतोच. मस्त प्रेमत्रिकोण बनतो. पण इतकी कहाणी उलगडते तरी अजून मध्यंतरसुद्धा झालेलं नसतं. आजपर्यंत किती प्रेमत्रिकोण आपण पाहिलेत, ह्याची गणतीसुद्धा अशक्य आहे. पण ही कहाणी केवळ प्रेमत्रिकोण नाहीये. पुढचं एक ठिगळ ह्या कहाणीला एक अनपेक्षित वळण देतं आणि चित्रपटाच्या शेवटापर्यंत ती 'कुठच्या कुठे' जाऊन पोहोचते !
पुढची दोन ठिगळं काय आहेत, हे चित्रपट बघूनच समजून घ्यावं. त्यासाठी फक्त सोनम कपूरला आणि मध्यंतरानंतरच्या धीम्या गतीने भरकटण्याला सहन करावं लागतं. बाकी तसं ह्या चित्रपटात काहीच 'असह्य' नक्कीच नाही.

कुंदनचा मित्र 'मुरारी' (अभिनेत्याचं नाव माहित नाही) जबरदस्त आहे. त्याचे वन लायनर्स हुकमी टाळ्या घेतात, हशा पिकवतात. त्याव्यतिरिक्तही संवाद बऱ्यापैकी खुसखुशीत आहेत. सगळ्याच सपोर्ट कास्टचं काम चोख झालं आहे. अभय देओलला तसं कमी काम असलं तरी त्याचा पडद्यावरचा वावर छाप सोडतोच आणि मुळात मुख्य भूमिकेतील 'धनुष' अगदीच पाप्याचं पितर असल्याने अभय लक्षात राहतो.
धनुषला पाहिल्यावर सुपरस्टार बनण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात, हे समजतं -
१. एखाद्या लार्जर दॅन लाईफ सुपरस्टारला मुलगी असली पाहिजे.
२. तिच्याशी तुमचं लग्न झालं पाहिजे.
बास्स ! झालात तुम्ही सुपरस्टार आणि त्यात हे प्रकरण दाक्षिणात्य असेल तर तुमचं येत्या काही दिवसांत सासऱ्याच्या बाजूला, रामासोबत हनुमानाचं असावं तसं मंदिरही बनू शकेल.
कारण, बाकी कुठलंही, सुपरस्टारच काय पडद्यावर झळकायच्या लायकीचंही लक्षण 'धनुष'मध्ये नाही. त्याची अंगकाठी इतकी बारकी आहे की राजपाल यादवची पर्सनालिटी भारी वाटावी. पंधरा थपडा मारणारी सोनम कपूरच होती म्हणून ठीक, बिपाशासारख्या भक्कम हिरविणीची एक थप्पडही ह्याचा डावा गाल उजवीकडे नेऊ शकेल, असं त्याला पाहून वाटतं. अभिनय म्हणावा, तर 'कुंदन'च्या व्यक्तीरेखेतच दम आहे. त्यात त्याने काही विशेष जीव ओतलाय, अश्यातला भागच नाही. त्याच्याकडे स्टाईल नाही, चेहरा नाही, अंगकाठी नाही, नृत्यकौशल्य नाही; तरी तो हीरो बनला आहे, ही गोष्ट अनेक सडकछाप रोमिओंचं मनोबल निश्चितच उंचावू शकेल.
शोसाठी घरून निघताना, जरासा वेळ होता म्हणून सहज टीव्ही लावला होता तर एका वाहिनीवर दिग्दर्शक आनंद रायची छोटीशी मुलाखत चालू होती. तो सतत 'धनुष सर, धनुष सर' म्हणत होता. दया आली.
'जब तक हैं जान' नंतर नैराश्याच्या गर्तेत गेलेल्या रहमानच्या चाहत्यांना रहमान जरासा(च) दिलासा 'रांझणा'तून देतो. 'तुम तक' ही कव्वाली तर मस्तच बनली आहे.
एकंदरीत एकदा(च) पाहण्यास हरकत नसावी, असा हा चित्रपट मी आजपर्यंत पाहिलेल्या सगळ्यात मरतुकड्या सुपरस्टारला हिंदीत आणतो आहे. इथल्या बलदंड बैलांच्या गर्दीत, हे कुपोषित कोकरू टिकेल का हे काळच सांगेल !!
रेटिंग - * * १/२
http://www.ranjeetparadkar.com/2013/06/raanjhnaa-movie-review.html
घेतात की. लक च्या प्रोमोशनला
घेतात की. लक च्या प्रोमोशनला घेत होते ना. आता लक फक्त आगाऊनेच बघितलाय, इतरान्नी पाहिलाच नाही
श्रुतीला हिन्दीमधे जास्त भाव अद्याप तरी मिळालेला नाही.
ही आहे सारिकाची मुलगी
ही आहे सारिकाची मुलगी
सारिका मराठी आहे ना?
सारिका मराठी आहे ना?
सिनेमा बघितला नाहीये.
सिनेमा बघितला नाहीये. त्यामुळे त्याबद्दल मौन.
धनुषचे दोन तमिळ सिनेमे बघितलेत आणि जबरी आवडलेत. त्याला अभिनय करता येतो हे माझं मत. तामिळ सिनेम्यात जिथे हिरो हिरॉईनची वजनाची कॉम्पिटीशन असतेय तिथे हा काटकोळा माणूस हिरो म्हणुन गाजतो हे खायचं काम नक्कीच नाही.
त्यांना सारिकाचं नाव नाही का
त्यांना सारिकाचं नाव नाही का घेता येत >> एकूणच जेव्हा जोडपे सिनेमात असते तेव्हा वडिलांचे नाव घेतले जाते. सुरज काय झरिना वाहबचा काका का? पण दर वेळी उल्लेख आदित्य'ज सन असा दिसतो.
सारिका मराठी आहे ना? >> हो ती
सारिका मराठी आहे ना? >> हो ती मराठी च आहे... दिल्ली मध्ये वाढलेली.......
तिच्या आईवडलान्नी तिचे सगळे पैसे काढुन घेतले... आणि तिला त्यान्च्याशी भान्डुन कफल्लक
स्थितीत घरातुन निघावे लागले.... अश्या स्वरुपाचे काही वाचण्यात आले होते... लिन्क सापडली कि देते.
लिन्क सापडली कि देते.>> सिमि
लिन्क सापडली कि देते.>> सिमि गरेवाल "रोन्देव्यू" वर होते ते. युट्युबवर आहे.
सिमन्तिनी | 26 June, 2013 -
सिमन्तिनी | 26 June, 2013 - 09:48
त्यांना सारिकाचं नाव नाही का घेता येत >> एकूणच जेव्हा जोडपे सिनेमात असते तेव्हा वडिलांचे नाव घेतले जाते. सुरज काय झरिना वाहबचा काका का? पण दर वेळी उल्लेख आदित्य'ज सन असा दिसतो.
--> चुकीचे जनरलायझेशन आहे हे… इशा देवल - हेमामालिनी ची मुलगी म्हणूनच ओळखतात.
इशा देवल - हेमामालिनी ची
इशा देवल - हेमामालिनी ची मुलगी म्हणूनच ओळखतात. >> मान्य!!
http://www.hindustantimes.com
http://www.hindustantimes.com/News-Feed/Entertainment/Girl-Interrupted/A...
ये कहाँ आ गए हम यूंही बात
ये कहाँ आ गए हम यूंही बात करते करते?
कृपया रांझणाबद्दल बोला; परीक्षणाबद्दल बोला.
भरत मयेकर | 27 June, 2013 -
भरत मयेकर | 27 June, 2013 - 06:59 नवीन
ये कहाँ आ गए हम यूंही बात करते करते?
कृपया रांझणाबद्दल बोला; परीक्षणाबद्दल बोला.
>>

दोन्हीबद्दल बोलण्यासारखं काहीच नाहीये, भरतदा !
परवा रांझणा पाहिला. धनुष आणि
परवा रांझणा पाहिला. धनुष आणि सोनम ह्या दोघांचीही कामं मला आवडली.धनुषचं दिसणं कुठेही खटकलं नाही कारण ती कथेची मागणीच आहे. अभिनय करतोय असं वाटलंच नाही इतका त्या व्यक्तिरेखेत विरघळून गेल्यासारखा वाटला. एखाददुसर्या प्रसंगात हिंदी बोलायला कष्ट पडतायंत असं मात्र वाटलं ( काही प्रसंगांत अजिबात नाही वाटलं. तोपर्यंत हिंदी रुळलं असेल जिभेवर
) सोनम नाजूक वाटते मला नेहेमीच, अभिनयही चांगला करते. धनुषचा मित्र आणि त्यांची लहानपणची मैत्रिण ह्यांची कामंही मस्त ( ह्या स्वरा भास्करचं काम तनु वेड्स मनु मध्येही खूप आवडलं होतं. ) अभय देओलचं कामही आवडलं. तो कॉलेजकुमार वाटत नाही मात्र.
कथा नंतर नंतर प्रचंड भरकटल्यासारखी वाटते हे खरं ! ( ह्यावेळी कथेची अजिबात कल्पना नसल्यानेही बर्याच गोष्टी अनपेक्षितरित्या समोर आल्या ) पण रसप ह्यांनी लिहिल्याप्रमाणे ही एका मजनूची आणि प्रेमात वाहवत जाण्याचीच कथा असल्याने ज्या काही घटना एकापाठोपाठ घडतात त्या कथेचाच भाग आहेत हे चित्रपट संपता-संपता उमजलं.
मजनूच्या गोष्टीचा शेवट ज्या प्रकारे केलाय ते आवडलंच
गाणी मस्त आहेत. 'तुम तक' 'बनारसिया' आणि 'रांझणा'च्या सुरावटींनीही वेगळंच टेक्श्चर आलंय चित्रपटाला.
थोडक्यात परीक्षण खूपसं पटलं नाही. प्रेमात वेड्या झालेल्या एका तरुणाच्या प्रवाहपतित आयुष्याची सुरस आणि चमत्कारिक गोष्ट असं म्हणून बघायला गेलात तर चित्रपट नक्की आवडेल असं वाटतं
नववीची विद्यार्थीनी नाही वाटत
नववीची विद्यार्थीनी नाही वाटत पण क्युट दिसते स्कुल युनिफॉर्म मधे , बारावी मधली वगैरे दिसते फार तर! <<<< तेहि ४- ५ वर्ष नापास झालेली
काल पाह्यला रांझणा.. क्या बात
काल पाह्यला रांझणा..
क्या बात है ग्रेट वगैरे झाले नाही. पण नॉट बॅड नक्कीच.
स्क्रीनप्ले अजून क्रिस्प आणि टाइट असता तर सिनेमा अजून मस्त झाला असता. स्क्रीनप्ले दुसर्या भागात जामच घरंगळलाय. शेवटाकडे एकत्र केलंय चांगलं पण मधल्या घरंगळण्यामुळे खटकतोच.
शेवटच्या व्हॉइस ओव्हरमधले संवाद फार सुरेख. एकूणच संवाद लेखन एकदम चपखल, जेवढे हवे तेवढेच.
अपेक्षेप्रमाणेच धनुष बेस्ट आहे. जसा असायला हवा तसाच. बारक्या बारक्या रिअॅक्शन्ससुद्धा काय सहजपणे काढल्यात त्याने. आता त्याच्या बाकीच्या फिल्म्स बघणार.
झिशान (मुरारी) आणि स्वरा (बिंदिया) दोघेही अफलातून.. ती स्वरा 'चलो बडी पत्तीवाली चाय बनाती हू..' पासून आवडते मला.
अभय देओलची बहिण असलेली अॅक्ट्रेस कोण आहे? तिचं कॅरेक्टर स्क्रिप्टवाइज खूपच पॅची आहे पण तिने केलंय फार छान.
सोनम या सगळ्यांच्या तुलनेत खूप कमी पडते. विशेषतः दुसर्या भागात. तिचं चिडणं, रडणं आणि इतर कुठल्याही सिरीयस इमोशन्स या खोट्या वाटतात. हात राखून अभिनय केल्यासारख्या. तिने स्वतःच्या इमेजला थोडे उतरवून ठेवले तर ती खूप जास्त चांगलं काम करू शकेल अशी शक्यता वाटते. उदाहरणार्थ ती जसजीतशी आर्ग्युमेंटस करत असतानाही ती वाक्ये पोटातून आलेली वाटत नाहीत. फक्त 'ये चीज मेरे लिये एक्झिस्टही नही करती!' वाला सीन तिने छान केलाय.
इथे कत्रिना, दिपिका वगैरे असत्या तर त्यांनी लावली असती त्यापेक्षा फार कमी वाट लावते ती यात वाद नाही.
हो नंदिनी. ती नव्हती चाची
हो नंदिनी. ती नव्हती चाची ४२०मध्ये>>>>>>>>>>> चाची ४२० संपल्यावर जे चा आ आ आ आ अ ची.......हे गाणं लागतं ना...त्यात सर्व मुलांसोबत गाताना दिसते ...लहान होती न तेव्हा ती...गुलाबी टी शर्ट आणि जीन्स मधे....
सहज
सहज -
http://www.mumbaimirror.com/columns/comment/Does-Raanjhanaa-glorify-stal...
रांझना.. काल पाहीला...
रांझना.. काल पाहीला... इंटरवलपर्यंत कॅची वाटला.. नंतर नंतर थोडे पकायला झाले.. पण चित्रपट ऑके वाटला.. धनुषचे काम आवडले.. सोनम नही जम्या !! त्यापेक्षा स्वराचे आणि धनुषच्या मित्राचे काम सॉल्लिड
शोभा डे चा रिव्यूपेक्षा प्रतिसाद भारी !!
Pages