मार्केटमधला नवा 'मजनू' - रांझणा (Raanjhnaa - Movie Review)

Submitted by रसप on 22 June, 2013 - 02:47

एक असतो बनारसी पंडित. त्याचा मुलगा एका मुस्लिम मुलीच्या प्रेमात वेडा होतो. त्या मुलाच्या कहाणीवर एक होतकरू दिग्दर्शक चित्रपट काढायचं ठरवतो. त्या चित्रपटातून एक तमिळ सुपरस्टार हिंदीत आगमन करणार असतो. त्याच्या हिंदी उच्चारांवर मेहनत घेऊन त्याचा आणि स्वत:चा अजून एखाद्या चित्रपटासाठीचा वेळ वाया घालविण्यापेक्षा रोलच जरासा 'अ‍ॅडजस्ट' करू या की, असं ठरवलं जातं आणि कहाणी अशी बनते की - 'एक असतो 'तमिळ' पंडित. तो बनारसला 'प्रॅक्टिस' करत असतो. त्याचा मुलगा एका मुस्लिम मुलीच्या प्रेमात वेडा होतो आणि वगैरे वगैरे'

'बऱ्याच दिवसात मार्केटमध्ये नवा देव आला नाहीये', असा काहीसा संवाद 'OMG' मध्ये आहे. तो ऐकून दिग्दर्शकाची ट्युब पेटली असावी आणि जाणवलं असावं की बऱ्याच दिवसात मार्केटमध्ये नवा 'मजनू' आला नाहीये ! दोन-तीन चांगल्या दर्जाची ठिगळं जोडून एक कहाणी विणली गेली असावी. ही कहाणी ठिगळ बाय ठिगळ उलगडत जाते. सुरुवात होते बनारसमध्ये. तमिळनाडूतून येऊन बनारसमध्ये स्थिरस्थावर झालेल्या एका पंडिताचा द्वाड मुलगा 'कुंदन' (धनुष), बालपणापासूनच 'झोया' (सोनम कपूर)च्या प्रेमात असतो. बालवयातल्या ह्या प्रेमाला स्वत: कुंदन आणि झोयाच्या घरचे फारच सिरिअसली घेतात आणि शोप्याची रवानगी बनारसहून अलिगढ आणि नंतर पुढिल शिक्षणासाठी तिथून दिल्लीला होते.
८-९ वर्षांनी परतलेली झोया बदललेली असते. ती 'अक्रम' (अभय देओल) ची दीवानी झालेली असते. पण कुंदन बदललेला नसतो. तो अजूनही तिच्याच प्रेमात असतोच. मस्त प्रेमत्रिकोण बनतो. पण इतकी कहाणी उलगडते तरी अजून मध्यंतरसुद्धा झालेलं नसतं. आजपर्यंत किती प्रेमत्रिकोण आपण पाहिलेत, ह्याची गणतीसुद्धा अशक्य आहे. पण ही कहाणी केवळ प्रेमत्रिकोण नाहीये. पुढचं एक ठिगळ ह्या कहाणीला एक अनपेक्षित वळण देतं आणि चित्रपटाच्या शेवटापर्यंत ती 'कुठच्या कुठे' जाऊन पोहोचते !

पुढची दोन ठिगळं काय आहेत, हे चित्रपट बघूनच समजून घ्यावं. त्यासाठी फक्त सोनम कपूरला आणि मध्यंतरानंतरच्या धीम्या गतीने भरकटण्याला सहन करावं लागतं. बाकी तसं ह्या चित्रपटात काहीच 'असह्य' नक्कीच नाही.

1363584324a21cd.jpg

कुंदनचा मित्र 'मुरारी' (अभिनेत्याचं नाव माहित नाही) जबरदस्त आहे. त्याचे वन लायनर्स हुकमी टाळ्या घेतात, हशा पिकवतात. त्याव्यतिरिक्तही संवाद बऱ्यापैकी खुसखुशीत आहेत. सगळ्याच सपोर्ट कास्टचं काम चोख झालं आहे. अभय देओलला तसं कमी काम असलं तरी त्याचा पडद्यावरचा वावर छाप सोडतोच आणि मुळात मुख्य भूमिकेतील 'धनुष' अगदीच पाप्याचं पितर असल्याने अभय लक्षात राहतो.
धनुषला पाहिल्यावर सुपरस्टार बनण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात, हे समजतं -
१. एखाद्या लार्जर दॅन लाईफ सुपरस्टारला मुलगी असली पाहिजे.
२. तिच्याशी तुमचं लग्न झालं पाहिजे.
बास्स ! झालात तुम्ही सुपरस्टार आणि त्यात हे प्रकरण दाक्षिणात्य असेल तर तुमचं येत्या काही दिवसांत सासऱ्याच्या बाजूला, रामासोबत हनुमानाचं असावं तसं मंदिरही बनू शकेल.
कारण, बाकी कुठलंही, सुपरस्टारच काय पडद्यावर झळकायच्या लायकीचंही लक्षण 'धनुष'मध्ये नाही. त्याची अंगकाठी इतकी बारकी आहे की राजपाल यादवची पर्सनालिटी भारी वाटावी. पंधरा थपडा मारणारी सोनम कपूरच होती म्हणून ठीक, बिपाशासारख्या भक्कम हिरविणीची एक थप्पडही ह्याचा डावा गाल उजवीकडे नेऊ शकेल, असं त्याला पाहून वाटतं. अभिनय म्हणावा, तर 'कुंदन'च्या व्यक्तीरेखेतच दम आहे. त्यात त्याने काही विशेष जीव ओतलाय, अश्यातला भागच नाही. त्याच्याकडे स्टाईल नाही, चेहरा नाही, अंगकाठी नाही, नृत्यकौशल्य नाही; तरी तो हीरो बनला आहे, ही गोष्ट अनेक सडकछाप रोमिओंचं मनोबल निश्चितच उंचावू शकेल.

शोसाठी घरून निघताना, जरासा वेळ होता म्हणून सहज टीव्ही लावला होता तर एका वाहिनीवर दिग्दर्शक आनंद रायची छोटीशी मुलाखत चालू होती. तो सतत 'धनुष सर, धनुष सर' म्हणत होता. दया आली.
'जब तक हैं जान' नंतर नैराश्याच्या गर्तेत गेलेल्या रहमानच्या चाहत्यांना रहमान जरासा(च) दिलासा 'रांझणा'तून देतो. 'तुम तक' ही कव्वाली तर मस्तच बनली आहे.

एकंदरीत एकदा(च) पाहण्यास हरकत नसावी, असा हा चित्रपट मी आजपर्यंत पाहिलेल्या सगळ्यात मरतुकड्या सुपरस्टारला हिंदीत आणतो आहे. इथल्या बलदंड बैलांच्या गर्दीत, हे कुपोषित कोकरू टिकेल का हे काळच सांगेल !!

रेटिंग - * * १/२
http://www.ranjeetparadkar.com/2013/06/raanjhnaa-movie-review.html

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>झपाटलेला रीव्ह्युमधे पण तुम्ही हा उच्चारांचा मुद्दा उपस्थित केला होतात, त्यावरून प्रश्न पडलाय की. पुस्तकी उच्चार करणे ही उत्तम अभिनयाची परीक्षा आहे की व्यक्तीरेखेला अनुसरून उच्चार करणे? <<

असा प्रश्न तुम्ही विचारलात म्हणून उत्तर दिलं, नंदिनीजी; नाही तर कुणाच्याही मनमुराद हसण्याने मला काहीही प्रॉब्लेम नाही, तुमच्याही !! Happy

रिव्ह्यू(वैयक्तिक प्रतिक्रिया यापलिकडे म्हणता येणार नाही खरंतर!) वाचून विशेषतः त्यातली महान विधाने वाचून करमणूक झाली.

नंदिनीजी; नाही तर कुणाच्याही मनमुराद हसण्याने मला काहीही प्रॉब्लेम नाही, तुमच्याही !!<< बरं झालं सांगितलेत ते. नेक्स्ट टाईम अजून जरा हसता येईल आम्हाला.

धनुष ला बघु नका.................

.
.
.
.चित्रपटाला बघा.....................;)

पुरस्कार, अगदी राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा कुणालाही 'लाईफ टाईम' सिद्ध करतात का हो? >> कदाचित नाही. पण (पुन्हा एकदा) 'ते कुणालाही मिळतात' यावरची प्रतिक्रिया आहे ती. पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती नि कलाकृती 'लाईफटाईम बाद'- अशा मतावरची प्रतिक्रिया.

फिल्म अ‍ॅप्रिसिएशन असा एक मुद्दा आलाय वरती त्या संदर्भाने...
(रसप, हे तुमच्यासारख्या अनुभवी समीक्षकांसाठी नाही!)

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडून ( National Film Archives of India, Pune) दर वर्षी फिल्म अ‍ॅप्रिसिएशन कोर्स घेतला जातो. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या माणसांना हा कोर्स खुला असतो. जगभरातल्या उत्तमोत्तम फिल्म्स दाखवल्या जातात. तसेच चित्रपटक्षेत्रातले जाणकार, दिग्दर्शक, अभ्यासक असे वेगवेगळे लोक चित्रपटांबद्दल बोलण्यासाठी येतात. खूप काही शिकायला मिळते. रोजचे रोज किमान दोन पूर्ण लांबीचे चित्रपट, लेक्चर्सच्या दरम्यान अजून काही चित्रपटांमधील क्लिपिंग्ज, शॉर्ट फिल्म्स असे बरेच बघायला मिळते. मे-जून दरम्यान हा कोर्स असतो. यावर्षीचा कोर्स आज-उद्याकडे संपतोय. साधारण मार्च महिन्याच्या आसपास याची प्रवेश प्रक्रिया चालू होते. त्यांच्या वेबसाइटवर सर्व माहिती मिळू शकते.
तीन ते चार आठवडे पूर्णवेळ असे या कोर्सचे ड्युरेशन असते. चित्रपटांबद्दल आस्था असेल, सिनेमे बघायला आवडत असेल, सिनेमाच्या तंत्राबद्दल कुतूहल असेल तर आपापल्या नोकरी धंद्यांमधून एखादा महिना काढणे हे पूर्णपणे 'वर्थ इट!' वगैरे आहे.

अर्काइव्हजला अजून एक अ‍ॅक्टिव्हिटी चालते. सॅटर्डे स्क्रिनिंग्ज. दर शनिवारी संध्याकाळी एक महत्वाचा चित्रपट दाखवला जातो. यासाठी संपूर्ण वर्षाची मेंबरशिप असते. ज्या फिल्म्स बघायला मिळतात त्यांच्या तुलनेत मेंबरशिप फी काहीच नसते. अर्काइव्ह्जच्या थिएटरमधे अद्ययावत सोयी आहेत. त्या ठिकाणी, मोठ्या पडद्यावर अश्या प्रचंड महत्वाच्या फिल्म्स बघणे हा वेगळा अनुभव असतो. राशोमान किंवा आपला जुना संत तुकाराम त्या ठिकाणी बघताना आपले काय होते ते अनुभवल्याशिवाय कळणार नाही. Happy

जरूर विचार करा.
(मी अर्काइव्ह्जची पी आर नाही. Happy )

रसपचे परीक्षण आणि वाद हे समीकरणच झालय हल्ली... असो... चालू द्या!
तसाही मी या चित्रपटाच्या वाट्याला जाण्याची शक्यता कमीच होती तरीही धन्यवाद Happy

धनुषादी हीरो अगदी सामान्य दिसतात हेच तर त्यांचं वैशिष्ट्य! चित्रपट टिव्हीवर येईल तेव्हा बघेन म्हणते.
रच्याकने, मला सिनेमात हिरॉईनचं नाव रंजना असेल असं वाटलं होतं. फक्त तिच्या नावाचं स्पेलिंग संजय जुमानीला विचारून ठेवलंय असं वाटतं होतं. पण म्हणजे सिनेमात रंजना नावाचं कोणीच नाही काय?

अर्रर्रर्र... वाद झाले वाटतं, म्हणजे प्रतिक्रीया डिटेल्समध्ये वाचणं आलं. Proud

<<रॉबीनहूड | 22 June, 2013 - 04:09
रसप याना फार सिरिअस घेत जाऊ नका... >>

मायबोली वरचे लेख-प्रतिक्रिया, दोस्ती-दुश्मनी इत्यादिनांहि सिरिअस घेउ नका, असं सांगायची वेळ आली आहे... Happy

बहुतेक हिरो म्हनजे फक्त पन्जाबि असे रसप चे समिकरन आहे. त्यमुळे त्याना हा धनुश पचला नाहिए.

ह्या सिनेमाचं नाव 'रांझणा' असं आहे होय? Uhoh
मी दाक्षिणात्य लोक लिहितात त्याप्रमाणे स्पेलिंगनुसार हा सिनेमा नायिका प्रधान म्हणजेच 'रंझना' असेल असा सरळ तर्क लावला होता. (रंजनाचं रंझना)
असो... प्रोमो मधे तिच नाचताना दिसली सगळीकडे म्हणून गैरसमज झाला असेल.

परिक्षण नंतर वाचेन.

कोलावरी Dनुष माहित नाही अजुन कसा परफॉर्म करतो पण सोनम कपुर आणि अभय देओल आवडतात मला.
रेहमान ची गाणी नेहेमी प्रमाणे आधी इतकी अपिल नाही झाली पण अता भयंकर आवडायला लागलीयेत.. डोक्यात भिनणारी गाणी आहेत .. , त्यातला वाद्यवृन्दात सतार घुंगरु वगैरे अफाट आहे !!
बनारसीया आणि ' तुम तक 'कमाल जमलीयेत .

धनुषला पाहिल्यावर सुपरस्टार बनण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात, हे समजतं -
१. एखाद्या लार्जर दॅन लाईफ सुपरस्टारला मुलगी असली पाहिजे.
२. तिच्याशी तुमचं लग्न झालं पाहिजे.

>>

हं परिक्षणात पिक्चर सोडून वैयक्तीक टिप्पनी आली की त्या व्यक्ती बरोबरचा आपलाच बायस उघडा पडतो.
बाकी बर्‍याच लुझ गोष्टी तुम्ही लिहिल्या आहेत पण त्यावर उगाच टंकत बसायचा कंटाळा येतो आहे.

धनुष हिंदीत चांगला आहे की कसे ते काळच ठरवेल पण रांझनातील सिंम्पल, भिकार हिरो म्हणून आवडला. तिथे पिळदार यष्टीचा सलमान किंवा प्रेमळ चित्रपटांचा बादशहा शाहरूख चालला नसता.

आता मी धनुषचे जुने तामिळ पिक्चरही पाहणार आहे.

पिक्चर मध्यंतराआधी चांगला आहे. नंतर थोडा धिम्या गतीचा होता पण शेवट मला आवड्ला.

बाकी चित्रपटाचा खरा रिव्हू उदयन यांचा . "या कथेचा बाजच असा होता की त्यात .." ह्या पॅरा मध्ये आला आहे.

हिरो आणी अभिनेता यातील फरक न कळणार्यांनी रसप याच्या एका वाक्यावरुन मारलेल्या माकडउड्या वाचुन करमणुक झाली.

रसप तुम्हाला सल्ला आहे- नंदिनी यांचे जे मत असते ते माबोवर बरोबरच असते. एकतर त्यांच्या मताचा उदोउदो करा नाहितर माबोतुन बैन व्हायची तयारी ठेवा.

>>>>>ढ. | 23 June, 2013 - 03:17

रसप तुम्हाला सल्ला आहे- नंदिनी यांचे जे मत असते ते माबोवर बरोबरच असते. एकतर त्यांच्या मताचा उदोउदो करा नाहितर माबोतुन बैन व्हायची तयारी ठेवा <<<<<<<<<

क्या बात है!!!!!! तुम्हि अगदी अचूक बोललात की हो राव ! मी पण खुप दिवसांपासुन पाहात आहे हे इकडे.... असो तुमचे चालु द्या.

पडोसनमधला मेहमूद जे बोलतो त्याला तमिळ उच्चार म्हणत नाहीत. (इथे अजून एक नुकतंच उदाहरण आठवलं पण फ्यान्स परत चिडाबिडायचे!!) चेन्नई एक्स्प्रेसमधे दीपिका पदुकोण हे बोलते ते तमिळ उच्चार. >>>>>>> हे वाचलेच नव्हते. धन्य वाटले. आता माबोवर मेहमुदला पण ऐक्टिंग आणी उच्चार दिपिका कडुन शिकायची वेळ आली.

रसप तुम्हाला सल्ला आहे- नंदिनी यांचे जे मत असते ते माबोवर बरोबरच असते. एकतर त्यांच्या मताचा उदोउदो करा नाहितर माबोतुन बैन व्हायची तयारी ठेवा <<<<<<<<<

क्या बात है!!!!!! तुम्हि अगदी अचूक बोललात की हो राव ! मी पण खुप दिवसांपासुन पाहात आहे हे इकडे.... असो तुमचे चालु द्या.<<<<<<+111111111111111111111

नी..

वरील माहिती बद्दल धन्यवाद. असाच काही उपक्रम मुंबईत पण चालतो का ? असेल तर विपू मधे लिंक दे....

बाकी वरील परिक्षण आणि प्रतिक्रिया दोन्ही धन्य...... लोकांकडे रिकाम वेळ आहे हेच खरे.....

नंदिनी यांचे जे मत असते ते माबोवर बरोबरच असते. <<<<<<<<<

अहो ते अश्यासाठी की नंदिनी यांनी पत्रकारितेबद्दल ऑफिशीयल ट्रेनिंग घेतलं आहे. फिल्म रिव्यू,फिल्म प्रमोशन्,इवेंट प्रमोशन यात त्यांचा दांडगा अनुभव आहे आणि त्याबद्दल त्यांनी माबोवर वेळोवेळी लिहिले आहे. बहुतांश माबोकरांनी ते वाचलेले आहे. बर्याच माबोकराना सुदैवाने अभ्यासू मत आणि 'उचलले बोट टेकवले की बोर्डला ' मत यातील फरक कळतो.
Happy

वासेपूरवरून नवाजूद्दीन आठवला. त्याच्याकडेही असंच, स्टार बनण्यासाठी काहीच नव्हतं>>>
हा मुनाभाइ एमबीबीएस मध्ये होता आठवतय का कोणाला?

बाकी लोकसत्ताचे रिव्ह्यु मी बाचतो. ते बरेच निष्पक्ष असतात.
त्यात धनुष आणि सोनमचे कौतुक केले आहे.
चित्रपट मध्यंतरानंतर रटाळ आहे असही लिहिलय..
ते बरेच निष्पक्ष असतात.
टाइम्स वै नाहीच वाचत.

मी रसपचा रिव्ह्यु वाचला नाही , कारण गरज वाटली नाही. फक्त प्रतिक्रिया वाचल्या.
पण मला धनुषचं काम आवडतं त्यामुळे त्याच्यासाठी तरी नक्कीच हा सिनेमा बघेन.

मोकिमी, मुंबई विद्यापिठात किंवा झेवियर्सला अश्या प्रकारचा काही उपक्रम असण्याची शक्यता आहे. पण मला नक्की माहित नाही. त्यांच्या वेबसाइटवर असेल इन्फो. मला काही मिळाली माहिती तर जरूर कळवेन.

असाच काही उपक्रम मुंबईत पण चालतो का ?> माझ्या माहितीनुसार पार्ले, अंधेरी आणि बांद्रा येथे काही फिल्म क्लब आहेत जिथे अशा प्रकारे विविध चित्रपट पाहून त्यावर चर्चा केली जाते. नक्की पत्ता अथवा फोन नंबर आता नाहीये माझ्याकडे. पण हवे असेल तर चौकशी करून देइन.

नी, पृथ्वी थिएटरमधे पण असा एक उपक्रम होता ना गं?

साती, कस्चं कस्चं!!! Proud

अभिनय म्हणावा, तर 'कुंदन'च्या व्यक्तीरेखेतच दम आहे. त्यात त्याने काही विशेष जीव ओतलाय, अश्यातला भागच नाही. त्याच्याकडे स्टाईल नाही, चेहरा नाही, अंगकाठी नाही, नृत्यकौशल्य नाही; तरी तो हीरो बनला आहे, ही गोष्ट अनेक सडकछाप रोमिओंचं मनोबल निश्चितच उंचावू शकेल<< या अशा विधानांचं आता खरंच मनापासून हसू येतं. नृत्यकौशल्य म्हणजे नक्की काय असतं हो? धनुष चांगला नाचतो. कॅरेक्टरची जशी गरज आहे आणि गाण्यामधे जितकं आवश्यक आहे तसा नाचतो. बनारसमधला पंडित येऊन अचानक डिस्को वगैरे करेल अशी काही अपेक्षा होती का?

धनुषचे हिंदी उच्चार अत्यंत उत्तम आहेत. बर्‍याच आंग्लाळलेल्या हीरोंच्या हिंदीपेक्षा तमिळी झाक असलेलं हिंदी परवडलं. प्राचीसारखंच मला पण डबिंग दिलंय की काय असा संशय येऊन गेलाच तरीही.

एका प्रसंगामधे धनुष जेव्हा पटकन पुढे येऊन तमिळ बोलतो, तेव्हा अख्खं थिएटर जे काही सणकून उसळलं होतं त्याला तोड नाही. आजवर असा दंगा मी फक्त दिल चाहता है च्या वेळेला पाहिला होता. पण त्याहीपेक्षा कालचा दंगा सॉल्लीड होता. मज्जा आली. हीरोच्या एंट्रीला आणि रांझणा गाण्यावेळेला पण पब्लिक म्याड झालं होतं. शिट्ट्या बिट्टया एकदम जोशात.

काल मी आणि माझी शेजारीण चित्रपट पाहून आल्यावर मी धनुषचा अभिनय चांगला आहे म्हटल्यावर ती म्हणाली, "हा रोल फारच सोपा होता, तू त्याचा पहिलाच पिक्चर पाहिलास का?" म्हटलं नाही. म्हणाली "जेवून झालं की ये माझ्या घरी" तिच्याकडे गेल्यावर डीव्हीडीवरती कादल कोंदेन हा त्याचा पहिलाच सिनेमा सलग बसून रात्री दीडपर्यंत पाहिला. (तमीळी माणूस सिनेमा हा विषय आला की किती भरभरून बोलतो, अथवा त्याला त्या माध्यमाविषयीच किती प्रेम आहे!! ) पहिला चित्रपट पाहिल्यावर पडलेला प्रश्न : हा माणूस पडद्यावर का झळकू नये? का तो सुपरस्टार होऊ नये? अथवा या माणसाला एखाद्या सुपरस्टारने आपली मुलगी का देऊ नये? त्या सिनेमाबद्दल नंतर लिहिणारच आहे मी. उगाच पूर्ण माहिती असल्याशिवाय "तो रजनीकांतचा जावई आहे म्हणून तो सुपरस्टार आहे" वगैरे विधाने प्रचंड हास्यास्पद ठरतात. धनुषचे वडील आणि मोठा भाऊ दोघेही दिग्दर्शकच आहेत.

असो. रांझणा सिनेमाबद्दल लिहत आहे. (परीक्षण लिहित नाही, ते आपलं काम नव्हे!! चित्रपट मला कसा वाटला ते लिहेन)

फिल्म क्लब्ज बरेच आहेत अगं पण फिल्म अ‍ॅप्रिसिएशन कोर्सेस नाहीयेत फारसे.
पृथ्वीला विकल्पची स्क्रीनिंग्ज असतात. विकल्प हा उपक्रम केवळ शॉर्टस आणि डॉक्यु साठी आहे.

परीक्षण वाचले.
यावेळी 'रसप' यांची मते पटली नाहीत. बहुसंख्य भारतीय वास्तवात जसे दिसतात, तसे पडद्यावर एखाद्याने दिसण्यात काय चूक आहे?
धनुष बाजूला ठेवा जरा वेळ. मेहमूद, जॉनी वॉकर, ओम पुरी, मनोज वाजपेयी, अमिताभ बच्चन, 'सुपरस्टार' रजनीकांत, सुशांत सिंग, नवाजुद्दिन सिद्दीकी आणि असे कितीतरी कलाकार रूढ अर्थाने 'मॅचो' नसूनही आपण त्यांना पाहिलेच ना? हॉलिवूडचे सिनेमे पाहतांना आपण अशा अटी लावतो का?
देखणा चेहरा, पिळदार शरीरयष्टी हे सिनेमात काम करण्याचे मापदंड कधी झाले? आणि या निकषावर काम केले तर मराठी सिनेमाला एकतरी हिरो मिळेल काय?
धनुषसारख्या व्यक्तिमत्वाला सिनेमात सोनम कपूरसारख्या पॅम्पर्ड स्टारकिडसोबत पेअर करणे हेच मुळात बॉलिवुडने टाकलेले पुढचे पाऊल आहे. आणि भविष्यात जेव्हा कधी मेनस्ट्रीम सिनेमाची नायिका म्हणून (झालेच तर) बार्बीडॉलसदृष्य हिरोईनींनाही अशाच साध्यासुध्या मुली रिप्लेस करतील तेव्हा आणखी एक पाऊल पुढे पडलेले असेल. त्यावेळी तर काय गहजब होईल देव जाणे ! Happy
..आणि या काळ्यासावळ्या मरतुकड्या लोकांच्या 'अभिनयाबद्दल' तर मी काही बोललेलोच नाही अजून.

फिल्म अ‍ॅप्रिसिएशन कोर्सेस नाहीयेत फारसे.
<><< हो. मास मीडीयामधे आम्हाला पण दोन तीन क्रेडिटपुरतेच होता कोर्स. पण जेवढा होता तेवढा तरी वर्थ होता. नशीबात असेल तर अर्काईव्हजचा कोर्सदेखील नक्की करेनच.

Pages