चटपटीत शेवग्याच्या शेंगा.

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 14 June, 2013 - 02:25
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चारपाच शेवग्याच्या शेंगा
फोडणी करीता राई, जिर, हिंग, हळद
१ चमचा मसाला अथवा अर्धा चमचा लाल तिखट
चवीनुसार मिठ
चिंच लिंबाएवढी
गुळ चिंचेपेक्षा थोडा जास्त
फोडणीपुरते तेल

क्रमवार पाककृती: 

१) शेवग्याच्या शेंगांचे साधारण २ इंचाचे तुकडे करुन घ्या. जर शेंगा मोहाच्या असतील तर जास्त साले काढण्याची गरज नसते पण नेहमीच्या असतील तर जरा सोलून घ्या.

(ह्या मोहाच्य आहेत म्हणजे ह्या लवकर शिजतात तसेच आतला गर मऊ लागतो)

२) ह्या शेंगा थोडे मिठ घालून उकडून घ्या.

२) चिंचेचा कोळ करून घ्यात त्यातच गुळ चिरुन खुळा.

३) भांड्यात तेल चांगले गरम करुन त्यात राई, जिर, हिंग, हळद ची पटापट फोडणी देऊन लगेच त्यात उकडलेल्या शेंगांचे तुकडे व चिंच-गुळाचा कोळ घाला. आता मसाला आणि चिंच गुळाच्या कोळेला लागेल एवढेच मिठ घाला कारण आधी शेंगांमध्ये घातले आहे.

४) आता वरील मिश्रण पळीने हलक्या हाताने किंवा फडक्याने भांडे धरून खालीवर करुन एकजीव करा व ५-७ मिनीटे शिजू द्या.

५) ह्या आहेत चटपटीत शेवग्याच्या शेंगा तय्यार.

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी ५-६ तुकडे लहान मुले जास्त खातात.
अधिक टिपा: 

अजून चटपटीत बनवण्यासाठी त्यात थोडा गोडा मसाला घालू शकता. वरून थोडी कोथिंबीर पेरू शकता.
चिंच गुळाचा कोळ घट् बनवा,

ह्या शेंगा साईड डिश म्हणून वापरता येते.

माहितीचा स्रोत: 
सा.बा.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागू, सही दिसताहेत शेंगा. मला अशा शेंगा खायला फार आवडतं, शेंगा उकडून घ्यायला मी मावे वापरते. मावेमुळे शेंगा जास्त उकडून फुटत वगैरे नाहीत.

आमच्याकडे ह्याच पध्दतीने,फक्त जिर्‍याऐवजी ४-५ मेथीदाणे घालून कांदा-खोबर्‍याचे बारीक वाटण घालून

शेवग्याच्या शेंगांची आमटी बनवतात.

खुपच छान. करायलाच हव्यात. बघुनच तो. पा सु. तुम्ही खुपच वेगवेगळ्या पाकक्रुती करत असता. छान वाटत तुमचा उत्साह पाहुन. मी पण नक्की करेल या पद्ध्तीने. नेहमी आमटीच बनवते. शेंगाची.

वैभव, केदार, झकासराव, सुरुची, जाई, अनुराग, शोभा, अतृप्त आत्मा, सृष्टी, प्रभा धन्यवाद.

येळेकर हो तशी आमटीही आम्ही करतो छान लागते.

दिनेशदा रस आटवायला गेल्यावर शेंगा सगळ्या सुट्ट्या होतील जास्त शिजून.

स्वाती सा.बा चिंचगुळातल्या शेंगाच म्हणतात ह्याला.

करून बघणार !

<<चिंचेचा कोळ करून घ्यात त्यातच गुळ चिरुन खुळा.>>

खुळणे म्हणजे काय? कालवणे/विरघळवणे का ?