१) शेवग्याच्या शेंगांचे साधारण २ इंचाचे तुकडे करुन घ्या. जर शेंगा मोहाच्या असतील तर जास्त साले काढण्याची गरज नसते पण नेहमीच्या असतील तर जरा सोलून घ्या.
(ह्या मोहाच्य आहेत म्हणजे ह्या लवकर शिजतात तसेच आतला गर मऊ लागतो)
२) ह्या शेंगा थोडे मिठ घालून उकडून घ्या.
२) चिंचेचा कोळ करून घ्यात त्यातच गुळ चिरुन खुळा.
३) भांड्यात तेल चांगले गरम करुन त्यात राई, जिर, हिंग, हळद ची पटापट फोडणी देऊन लगेच त्यात उकडलेल्या शेंगांचे तुकडे व चिंच-गुळाचा कोळ घाला. आता मसाला आणि चिंच गुळाच्या कोळेला लागेल एवढेच मिठ घाला कारण आधी शेंगांमध्ये घातले आहे.
४) आता वरील मिश्रण पळीने हलक्या हाताने किंवा फडक्याने भांडे धरून खालीवर करुन एकजीव करा व ५-७ मिनीटे शिजू द्या.
अजून चटपटीत बनवण्यासाठी त्यात थोडा गोडा मसाला घालू शकता. वरून थोडी कोथिंबीर पेरू शकता.
चिंच गुळाचा कोळ घट् बनवा,
ह्या शेंगा साईड डिश म्हणून वापरता येते.
वा मस्त गं.. मुलांना अशा
वा मस्त गं.. मुलांना अशा शेंगा उचलुन खायला खुप आवडतील.
मस्त दिसताहेत शेंगा.
मस्त दिसताहेत शेंगा.
जागू, सही दिसताहेत शेंगा. मला
जागू, सही दिसताहेत शेंगा. मला अशा शेंगा खायला फार आवडतं, शेंगा उकडून घ्यायला मी मावे वापरते. मावेमुळे शेंगा जास्त उकडून फुटत वगैरे नाहीत.
जागु तोंपासु. कसली क्रिएटिव्ह
जागु तोंपासु. कसली क्रिएटिव्ह आणि इन्नोव्हेटिव्ह आहेस ना तू?
साधना, मामी, दक्षिणा
साधना, मामी, दक्षिणा धन्स.
नंदीनी चांगली आयडीया आहे.
तुमच्या सा. बा ना आमचा सा.न
तुमच्या सा. बा ना आमचा सा.न सांगा . एकदम भन्नाट डिश आहे.
सही जागू . शेवग्याच्या शेंगा
सही जागू .
शेवग्याच्या शेंगा माझा वीक पॉईंट आहेत . कायम फक्त त्याची आमटी करून खायचो .
हे छान वाटतय .
तोंडात नळ सुरु झालेत...
तोंडात नळ सुरु झालेत...
खुपच मस्त डिश आहे. नक्कि करुन
खुपच मस्त डिश आहे. नक्कि करुन बघणार.
स्लर्रप
स्लर्रप
मी ओल्या खोब-याच वाटण घालुन
मी ओल्या खोब-याच वाटण घालुन करते. या पदधतीने नक्कि करुन बघणार.
वा! मस्त दिसतायत. करायला
वा! मस्त दिसतायत. करायला पाहिजेत आता.
(No subject)
खुपच मस्त .शेंगा.मस्त हिरव्या
खुपच मस्त .शेंगा.मस्त हिरव्या हिरव्या दिसत आहेत..
छान प्रकार आहे. आणखी जरा
छान प्रकार आहे. आणखी जरा आटवला रस, तर आठवडाभरही टिकतील.
आमच्याकडे ह्याच पध्दतीने,फक्त
आमच्याकडे ह्याच पध्दतीने,फक्त जिर्याऐवजी ४-५ मेथीदाणे घालून कांदा-खोबर्याचे बारीक वाटण घालून
शेवग्याच्या शेंगांची आमटी बनवतात.
खुपच छान. करायलाच हव्यात.
खुपच छान. करायलाच हव्यात. बघुनच तो. पा सु. तुम्ही खुपच वेगवेगळ्या पाकक्रुती करत असता. छान वाटत तुमचा उत्साह पाहुन. मी पण नक्की करेल या पद्ध्तीने. नेहमी आमटीच बनवते. शेंगाची.
चिंचगुळाची भाजीच म्हणता येईल
चिंचगुळाची भाजीच म्हणता येईल हिला. छान लागेल. आम्ही पिठल्या/आमटीत घालतो, आता असंही करून बघेन.
वैभव, केदार, झकासराव, सुरुची,
वैभव, केदार, झकासराव, सुरुची, जाई, अनुराग, शोभा, अतृप्त आत्मा, सृष्टी, प्रभा धन्यवाद.
येळेकर हो तशी आमटीही आम्ही करतो छान लागते.
दिनेशदा रस आटवायला गेल्यावर शेंगा सगळ्या सुट्ट्या होतील जास्त शिजून.
स्वाती सा.बा चिंचगुळातल्या शेंगाच म्हणतात ह्याला.
सेम माझ्या साबांची पद्धत
सेम माझ्या साबांची पद्धत
मस्त! तोंडाला पाणी सुटले. मी
मस्त! तोंडाला पाणी सुटले.
मी आमटीत घालते आणि थोडा गोडा मसाला घालते.
साक्षी.
माझा आवडता प्रकार शेवगा
माझा आवडता प्रकार शेवगा !!
तोंपासु
धन्स
करून बघणार ! <<चिंचेचा कोळ
करून बघणार !
<<चिंचेचा कोळ करून घ्यात त्यातच गुळ चिरुन खुळा.>>
खुळणे म्हणजे काय? कालवणे/विरघळवणे का ?
छान आहे हा प्रकार!
छान आहे हा प्रकार!