वाचकहो, नमस्कार आणि सुस्वागतम!
पुस्तक प्रेमी मनुष्य अनेक पुस्तकं गोळा करतो. त्यासाठी परिश्रम घेतो. वेळात वेळ काढून पुस्तकं वाचायला सुरवात करतो. पण कधी कधी असं होतं की ते पुस्तकं शेवटी आपण वाचूच शकत नाही इतकं आपल्यासाठी रटाळ वा दुर्बोध वा वेळखाऊ होऊन जातं की शेवटी ते पुस्तक खाली ठेवाव लागतं. माझ्या वाचनात अशी अनेक पुस्तकं आलीत जी मी वाचूच शकलो नाही. त्यात आपल्या आवडत्या लेखकाचे वा लेखिकाचे पण पुस्तकं असतात. कधी कधी आपले वय.. आपले अनुभव हे पुस्तकाशी सुंसंगत नसतात आणि मग जे पुस्तकं आपल्या अनेक मित्र मैत्रीणींना आवडलं ते आपल्याला मात्र आवडलं नाही म्हणून वाईटही वाटतं. असं वाटतं की कदाचित आपली पुस्तक ग्रहण करण्याशी शक्तीच संपली की काय. होतय ना असं कधीकधी.. लिहा तर मग तुमचे या विषयाशी अनुसरुन अनुभव.
मी गौरी देशपांडेंचा चाहता आहे. भारतातून भाच्याला अर्धा दिवस रजा टाकून 'तेरुओ' मागवून घेतलं. जसं ते पुस्तकं आलं त्यादिवशी संध्याकाळी फक्त खिचडी शिजायला टाकली नी ते पुस्तकं वाचायला घेतलं. आता आपले काही दिवस मस्त ऐटीत जातील असं वाटलं होत. पण ही नशा अवध्या दोन तीन तासातच उतरली. पुस्तकं अतिशय वरवर वाटलं. कुठेच वास्तविक जगण्याचा अनुभव येत नव्हता. अपरिपक्व वाटलं.
हो वाचले पण ते सध्या अॅक्टीव
हो वाचले पण ते सध्या अॅक्टीव दिसत नाहीत....
मयेकरांनी दिलेली लिंक ओपन करा
मयेकरांनी दिलेली लिंक ओपन करा
सगळा बाफ वाचून काढला. रोचक
सगळा बाफ वाचून काढला. रोचक आहे!
मी अर्धवट सोडून दिलेली पुस्तक
Catch 22
American Gods
The Prestige
Circe
यातले कोणतेही आवडेना म्हणून सोडलेलं नाही. दरवेळी काही ना काही वेगळी कारणं होती. परत वाचायला घेईनच.
या यादीत आणखी काही पु
या यादीत आणखी काही पु स्तकांची भर पडली आहे. पण ती सगळी अनुवादित आहेत. अनुवाद झे पला नाही म्हणून सोडली.
ब्लड टेलिग्राम्स, विज्ञानाचे तत्त्वज्ञान ही नावं आता आठवताहेत.
शिवाजी सावंत यांचं युगंधर.
शिवाजी सावंत यांचं युगंधर.
मृत्युंजय प्रचंड आवडलं होतं म्हणून वरील पुस्तकही उत्साहाने वाचायला घेतले पण भयंकर कंटाळा आला. कसंबसं वाचून संपवलं.
तसंच विश्वास पाटील यांचं संभाजी.
पानिपत खूप आवडलं होतं पण हे तेवढसं भावलं नाही.
@ ॲमी American Gods सिरीज चा
धीरूभाईच "पॉलीस्टर प्रिन्स" वाचायचं राहिलंय . या दोन दिवसात उडवतोच आता
@ ॲमी American Gods सिरीज चा दुसरा सीजन चालू झालाय आता. पहिला सीजन निम्मा अर्धा नमनालाच खाल्ला त्यांनी
स्टीफन किंग चं टॉमीनॉकर्स।
स्टीफन किंग चं टॉमीनॉकर्स।
एरवी चांगलं लिहिणाऱ्या दादांनी इथे फार म्हणजे फार पाल्हाळ लावला आहे.
कधी परत वाचायला घेईन असं वाटत नाही.
अरे किंगकाकाना मी विसरलेच
अरे किंगकाकाना मी विसरलेच होते! रडतखडत कसेबसे Doctor Sleep पूर्ण केले, पण It मात्र अजिबात झेपेना झाल्याने अर्धे वाचून सोडून दिले. आता परत किंगकाकाच्या भयकथा जॉन्रच्या वाटेला जाणार नाही. कानाला खडा

आणिएक आठवले
सुप्रसिद्ध LOTR अर्धेच वाचून सोडून दिले. The Hobbit कसेबसे संपवले होते.
===
जिद्दू,
पुस्तक वाचून झाल्यावर मग बघेन American Gods सिरीज.
सगळा बाफ वाचून काढला. रोचक
सगळा बाफ वाचून काढला. रोचक आहे!+१
नेमाड्यांच्या ' हिंदू' बद्दल ज्यांनी कुणी लिहिलं आहे त्यांना जोरदार अनुमोदन! कितीतरी वेळा प्रयत्न केले हा डोंगर चढायचे, पण नाहीच जमलं!
भैरप्पांची सार्थ, मंद्र ही माझी आवडती पुस्तकं आहेत. एकेकाची आवड असते, हेच खरं.
विश्वास पाटील यांचं महानायक आणि शिवाजी सावंतांचं युगंधर हेही न वाचता आलेल्या यादीत.
आयन रॅन्डचे 'अॅटलास श्रग्ड'.
आयन रॅन्डचे 'अॅटलास श्रग्ड'.
>>>> जाडजूड पुस्तक आणि बारीक फाँट म्हणून वाचायचे राहिलेच.
नेमाड्यांच्या ' हिंदू' बद्दल ज्यांनी कुणी लिहिलं आहे त्यांना जोरदार अनुमोदन! कितीतरी वेळा प्रयत्न केले हा डोंगर चढायचे, पण नाहीच जमलं!>>>>>>हिंदू, पहिली काही पाने वाचताना थोडेसे रटाळ वाटले,पण नंतर खूप सुरेख वाटले.
'गोठण्यातल्या गोष्टी'
'गोठण्यातल्या गोष्टी'
हे एक नवीनच आलंय हृषीकेश गुप्तेंचं कालपरवाकडेच.
एकूण सात कथा कम् प्रकरणं कम् आत्मचरित्र कम् व्यक्तिचित्रणं आहेत. शब्दबंबाळपणा, वेळीअवेळी विषयांतरं, जोडीला तोचतोचपणा आणि शेवटी दारुण अपेक्षाभंग अशा मिश्रणाने ओतप्रोत भरलेली तब्बल २२१ पानं..!
मृत्युंजय मलाही आता वाचवत
मृत्युंजय मलाही आता वाचवत नाही. तॄटी आढळून येतात.
माझ्या बुद्धीची दिवाळखोरी
माझ्या बुद्धीची दिवाळखोरी जाहीर करतेय असं वाटेल कोणाला पण थोरो चे वॉल्डन अजिबात झेपले नाही. खूप ऐकून होते.
https://en.wikipedia.org/wiki/Walden
पहिल्यांदा वॉल्डन वाचायला
पहिल्यांदा वॉल्डन वाचायला सुरूवात केली होती सुरुवातीची ५०-६० पानंच कशीबशी रेटली होती.
मग नंतर एकदा वाचायला घेतली तेव्हा आवडत गेली.. पुढची प्रकरणं विशेषत: कॉन्कार्डला रहायला गेल्यानंतची, रात्रीच्या एकांतातली वॉल्डनच्या तळ्यासोबतची वर्णनं, त्याच्या भटकंतीची टिपणं, तिथल्या माणसांची, प्राणी शेजाऱ्यांबदद्लची निरीक्षणं फारच सुंदर वाटली
परत वाचेन बहुतेक पी डी एफ
परत वाचेन बहुतेक पी डी एफ सापडुन जावी.
ऋषिकेश गुप्ते दंशकाल
ऋषिकेश गुप्ते दंशकाल
(बऱ्याच जणांना खूप आवडलं.पण त्यात जे सगळ्याचं डिटेलिंग केलंय ते फार यक झालं.)
बहुतेक मी 'हॉररच पाहिजे' या अपेक्षेने वाचत असल्याने निराशा झाली.ते हॉरर,कोकण,कौटुंबिक, मानसिक,सामाजिक असं सगळं काही मिश्रण आहे.
अच्युत गोडबोलेंचं ' मुसाफिर '
अच्युत गोडबोलेंचं ' मुसाफिर ' . सुरुवात केल्यापासून कंटाळवाणं वाटत होतं. तरीसुद्धा कसंतरी नेटाने वाचायचा प्रयत्न केला, पण अर्ध्यावर येऊन थकले. आधीच पुस्तक वाचायला वेळ नसतो. बऱ्याच दिवसांनी खास पुस्तक विकत घेतले, वाचनासाठी. पण निराशा झाली.
वाचूच शकत नव्हते तरीही पुर्ण
वाचूच शकत नव्हते तरीही पुर्ण केलेलं चालेल का, तर कोसला. अजिबात न आवडलेलं, बास आता इथे थांबुया. तरी लोकांना का आवडलं असेल विचार करत पुर्ण वाचलं आणि जाम पश्चाताप झाला, का वाचलं.
उदाहरणार्थ
उदाहरणार्थ
गोठणे नाव गुप्तेंच्या
गोठणे नाव गुप्तेंच्या हाकामारी मध्ये ऐकलंय.
The canticle for Leibowitz या अवकाळी (dystopian) कादंबरीशी बरीच झुंज दिली, पण खेदाने पराजय झाला, आणि मधूनच (३७%) सोडून द्यावी लागली. कारणे खालीलप्रमाणे-
१) अणुयुद्धानंतर अतिशय मोठा anti-intellectual वर्ग तयार झाला असतो, लोकं स्वतःला "good simpletons" अर्थात साधभोळा माणूस म्हणवून घेण्यात धन्यता मानत असतात, विज्ञान तंत्रज्ञानात काम करणाऱ्या बऱ्याच लोकांना ठार केले असते, पुस्तके जाळून टाकली असतात. पण धर्माचा प्रभाव टिकून असतो, आणि काही तंत्रद्न्य आणि इतर सद्य-तिरस्कृत लोक कॅथलिक रोमन चर्चचा आधार घेतात. खासकरून त्यातला एक असतो- लेबोवित्झ नावाचा अभियंता/शास्त्रद्न्य. त्याने एक मठ चालू केला असतो आणि तो आणि त्याचे मठसहकारी ज्ञानसंवर्धनाचे काम करत असतात. पण तो सुद्धा सिम्पलटन्स कडून ठार झाला असतो. तर त्यानंतर बर्याच काळाने, (आता लेबोविट्झ च्या पिढीचे कोणीही शिल्लक नाही, विज्ञान तंत्रज्ञान फक्त अवशेषांच्याच स्वरूपात शिल्लक आहे.) लेबोविट्झच्या मठातल्या एका व्यक्तीला खुद्द लेबोवित्झने बनवलेली कसलीशी ब्ल्यूप्रिन्ट सापडते.
ह्यानंतर सुद्धा बर्याच घटना वैगेरे घडल्या आहेत, मध्ये एक टाइम जम्प सुद्धा येऊन गेली. पण अजून सुद्धा कथा कोणत्याही पॉइंटवर नाही अली आणि वाचणे म्हणजे काम होऊन गेले. वरील प्रिमाईस हे उत्तम असल्याने काही वेळ ओढत नेली कादंबरी, पण शेवटी प्रयत्न सोडून दिला.
२. अधूनमधून बऱ्याच गोष्टी रोमन मध्ये आहेत. त्या कथेशी संबंधित आहेत नाहीत- कळायला काहीही मार्ग नाही.
त्याऐवजी हान्या यानागिहारा नावाच्या हवाईयन-अमेरिकन लेखिकेची "A little life" नावाची कादंबरी चाळू लागलो आणि कथेबद्दल काही कल्पना नसली, तरी लेबोवित्झसारखे फॅन्टसी पात्रं नसल्याने, आणि ओघवती शैली आणि भरपूर संवाद यांमुळे वाचणे सुखद वाटले.
गोठण्यातल्या गोष्टी म्हणजेच
गोठण्यातल्या गोष्टी म्हणजेच स्टोरीटेलवर मी ऐकलेलं मृत्योपनिषद तर नव्हे? पण त्यात गावाचं नाव देवमांडला आहे. चारपाच मित्रांची आत्मकथनं, शेवटी अपेक्षाभंग हे जुळतंय
पण मला रटाळ नव्हतं वाटलं ऐकायला.
कोसला एका ठरावीक वयात वाचले
कोसला एका ठरावीक वयात वाचले असते तर मला कदाचित आवडले असते .. मी पुर्ण वाचले की नाही हेही आता आठवत नाही.. खुपच नेट लावलेला मी.. पण पानागणीक रटाळपणा वाढत जातो...
मी जनरली पुस्तक हातात घेतले
मी जनरली पुस्तक हातात घेतले की खाली ठेवत नाही. पण गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज, इनहेरीटन्स ऑफ लॉस आणि नेमसेक नेटाने वाचली. त्यापैकी गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज ठीकठाक वाटले. बाकीची दोन उगीचच आता बघा कशी मी भारतिय थीम एक्झॉटिकली पेश करते आणि प्राईज मिळवते कॅटेगरीतील वाटली.
सिद्धार्थ धनवंत संघवी आणि चित्रा दिवाकरूणी बॅनर्जी यांचे प्रत्येकी पहिले पुस्तक वाचले. गोष्ट तर सोडा, नावसुद्धा आठवत नाही इतका कंटाळा आला होता वाचताना.
कॅचर इन द राय मात्र १०-१५ पानांच्या पुढे वाचूच शकले नाही. पुन्हा हातात घेईन की नाही माहित नाही.
जॉन हलच्या बाबतीत माझा झब्बू. पण ते पुस्तक वाईट म्हणून नाही तर एकंदरीत अभ्याससदृश गोष्टींचा कंटाळा…
ग्लास पॅलेस आवडले. हाताच्या अंतरावर असलेल्या एक्झॉटिक गोष्टींचं लहानपणी मनावर झालेलं गारुड सहसा उतरत नाही म्हणून असेल. आणि अमिताव घोषची पुस्तकं मला जनरली आवडतात.
जेफ्री आर्चरची ओन्ली टाईम विल टेल ही एका सिरीजचा भाग आहे. फक्त ती वाचल्यास गंडण्याची शक्यता. पण सिरीज छान आहे.
गोठण्यातल्या गोष्टी म्हणजेच
गोठण्यातल्या गोष्टी म्हणजेच स्टोरीटेलवर मी ऐकलेलं मृत्योपनिषद तर नव्हे? >>
बहुदा नसावं. हे पुस्तक गेल्याच आठवड्यात प्रकाशित झालंय.. आणि त्यात मृत्योपनिषद चा काही उल्लेख दिसला नाही..
मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे -
मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे - माधव कोंडविलकर - आत्मकथन.
यातला वेचा ज्युनियर कॉलेजमध्ये पाठ्यपुस्तकात होता.
John Grisham वाचायला मी
John Grisham वाचायला मी उशिरानेच सुरवात केली. ९६/९७ मध्ये पेलीकन ब्रिफ वाचले आणि मग बाकी सगळी वाचायला सुरुवात केली, नवीन आले की वाचायचे.
तशात एक पुस्तक लांबच्या प्रवासात वाचायला घेतलं, नाव आठवत नाही खालील वर्णन वाचून आठवले तर सांगा कुणी.
जर्मनीत कुठे दुसरे महागात पुस्तक घेणार म्हणुन हेच वाचत रहायचा प्रयत्न केला, पण जमेना, शेवटी जरा शेवटची पाने वाचली आणि पुस्तक तिकडेच स्क्रॅप करून टाकले.
त्यात चीनने सात सॅटेलाईट्स पृथ्वी पासून सगळ्यात दूर पाठवलेले असतात, शेवटी अमेरिकेच्या इंटिलीजन्स एजन्सीचा सर्व्हर हॅक करायला फायर वॉल वर अटॅक होतो त्याची लाईव्ह कॉमेंटरी तिथला आयटी हेड करत असतो, इंटिलीजन्स एजन्सीच्या डायरेकटर्स ना. प्रत्यक्ष युद्धात एक एक तटबंदी तोडून गनिम आत शिरत आहेत त्याप्रमाणे आता पहिली फायर वॉल crack केलीय, दुसरी वर हल्ला सुरू आहे. आता त्यात बरेच आत शिरलेत, पाच मिनिटाच्या वर टिकणार नाही वगैरे वगैरे.. फारच बाष्कळ होते.
धारपांची शिवराम आणि बहुरूपी
धारपांची शिवराम आणि बहुरूपी हि दोन पुस्तके २०% वाचून थांबवली आहेत. कथा पुढे जात नाही. विशेष असे काही घडत नाही. कदाचित अपेक्षा जास्त असल्यामुळेही असेल. धारपांची शैली संवादात्मक असल्यामुळे इथपर्यंत तरी वाचता आली, नाहीतर यापूर्वीच बंद केले असते.
धारपांची चेटकीण नावाची
धारपांची चेटकीण नावाची कादंबरी वाचली तर ती भीतीदायक वैगेरे होती पण त्यात चेटकीण कुठेच नव्हती.
देवाचे गोठणे माझ्या नवऱ्याचं
देवाचे गोठणे माझ्या नवऱ्याचं आजोळ आहे, घर आहे अजून मामे सासऱ्यांचं पण रहातात पुण्यात. मीच काय नवराही कधी नाही गेला तिथे.
शिवराम मला प्युअर बोअर झाली.
शिवराम मला प्युअर बोअर झाली.
अर्थात धारपांकडून आपली असलेली नाट्यमयतेची अपेक्षा हे मुख्य कारण.त्यांचं फार विशेष काही न घडणारं माहेर सारखं कौटुंबिक लिखाणही आहेच.
Pages