वाचूच न शकलेली पुस्तकं

Submitted by हर्ट on 6 November, 2008 - 22:25

वाचकहो, नमस्कार आणि सुस्वागतम!

पुस्तक प्रेमी मनुष्य अनेक पुस्तकं गोळा करतो. त्यासाठी परिश्रम घेतो. वेळात वेळ काढून पुस्तकं वाचायला सुरवात करतो. पण कधी कधी असं होतं की ते पुस्तकं शेवटी आपण वाचूच शकत नाही इतकं आपल्यासाठी रटाळ वा दुर्बोध वा वेळखाऊ होऊन जातं की शेवटी ते पुस्तक खाली ठेवाव लागतं. माझ्या वाचनात अशी अनेक पुस्तकं आलीत जी मी वाचूच शकलो नाही. त्यात आपल्या आवडत्या लेखकाचे वा लेखिकाचे पण पुस्तकं असतात. कधी कधी आपले वय.. आपले अनुभव हे पुस्तकाशी सुंसंगत नसतात आणि मग जे पुस्तकं आपल्या अनेक मित्र मैत्रीणींना आवडलं ते आपल्याला मात्र आवडलं नाही म्हणून वाईटही वाटतं. असं वाटतं की कदाचित आपली पुस्तक ग्रहण करण्याशी शक्तीच संपली की काय. होतय ना असं कधीकधी.. लिहा तर मग तुमचे या विषयाशी अनुसरुन अनुभव.

मी गौरी देशपांडेंचा चाहता आहे. भारतातून भाच्याला अर्धा दिवस रजा टाकून 'तेरुओ' मागवून घेतलं. जसं ते पुस्तकं आलं त्यादिवशी संध्याकाळी फक्त खिचडी शिजायला टाकली नी ते पुस्तकं वाचायला घेतलं. आता आपले काही दिवस मस्त ऐटीत जातील असं वाटलं होत. पण ही नशा अवध्या दोन तीन तासातच उतरली. पुस्तकं अतिशय वरवर वाटलं. कुठेच वास्तविक जगण्याचा अनुभव येत नव्हता. अपरिपक्व वाटलं.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि खोटं सांगेन - उर्मिला देशपांडे. >> हे बहुतेक पॅक ऑफ लाइज पुस्तकाचं भाषांतर असावं. इथे इतकी चर्चा झालेली त्यावर अन तरिही तुम्ही वाचलंत Wink तीच तुमची शिक्षा ..
http://www.maayboli.com/node/15805?page=1

बॅड पेरेंटिंग पेक्षा आपल्या चुकांची जबाबदारी न घेता आई वडिलांना , इतरांना दोष देणे ही एक थीम अन दुसरी आपल्या लफड्यांना ग्लोरिफाय करणे ही दुसरी थीम. इंग्रजी पुस्तकात तरी भाषेवर प्रभुत्व, चांगले डायलॉग, असं काही नाही. शोभा डेची जी भाषा आहे तशीच अगदी सुमार भाषा आहे उर्मिलाची.

मी स्वतः गौरीच्या पुस्तकांनी सुद्धा कधी भारून गेले नाही पण त्यांची निदान एकदा तरी वाचून पहाण्यासारखी आहेत. पॅकॉफ्लाइज हे मात्र न वाचताच टॅलाहासीच्या समुद्रात बुडवण्याच्या लायकीचे आहे यावर बर्‍याच पार्ल्याक्कांचे एकमत झाले होते .

>>पॅकॉफ्लाइज हे मात्र न वाचताच टॅलाहासीच्या समुद्रात बुडवण्याच्या लायकीचे आहे यावर बर्‍याच पार्ल्याक्कांचे एकमत झाले होते .
Lol हा कुठला नवा समुद्र? तालाहासीला समुद्र नाही. अ‍ॅपलाची बेमधे बुडवा. Proud

रॅन्डी पाअ‍ॅश यांच ' लास्ट लेक्चर'. म्रुत्यू शय्येवर पडलेल्या एका वडीलाच आपल्या मुलांसाठी लिहून ठेवलेले काही उपदेशापर बोल आहेत हे. मी ह्या पुस्तका बद्दल फार एकलेल आणि जेव्हा वाचायला घेतला तेव्हा मुळीच आवडल नाही.

१) अकूपार : ध्रुव भट : अनुवाद : अंजली नरवणे
काठियावाडी बोलीचा, त्यातल्या वेगळ्या उच्चारांचा अनुवाद किंवा जे काही करायचा प्रयत्न केलाय ततो सहन करीत पुस्तकाचा आनंद घेणं शक्य झालं नाही. एक मासला या पानावरचा.
http://www.bookganga.com/Preview/Preview.aspx?BookId=4859515755147103162...
२) जीबनेर जलसाघरे : मन्ना डेंच्या आत्मचरित्राचा अनुवाद. प्रचंड पाल्हाळ.
३) चौघीजणी . ज्या वयात वाचायचे तेव्हा वाचले नाही म्हणून असेल.
भैरप्पांचं मंद्र कंटाळा येत असूनही नेट लावून पूर्ण वाचलं. अर्ध्यात सोडलं असतं तर बरं झालं असतं.

१) अकूपार : ध्रुव भट : अनुवाद : अंजली नरवणे >>>> माझं ध्रुव भटांच्या तत्त्वमसि बद्दल असं झालं होतं.
अगदी वाचूच नाही शकलो वगैरे असं काही नाही. पण बर्‍यापैकी रटाळ वाटल.. अनुवाद अजिबातच चांगला नाहीये.

हा बाफ पूर्ण वाचून काढला ..
तृप्तीनी selective मेमरी बद्दल जे लिहिले आहे त्याला +1000
अतिशय कंटाळवाण पुस्तक.

<शोभा डे चं एक पुस्तक मी पण असेच ठेउन दिले आहे. "कुठलेतरी" डेज असं नाव आहे का ? इथे आहे, काढुन बघितलं पाहिजे. सुरुवातीला आत्मचरित्रपर आणि बेधडक वाटणारे हे पुस्तक नंतर अमिताभ बच्चन वगैरे पासून सर्वांच्याच कागाळ्या करायला लागतं. एकदम तिडिक आली नी ठेउन दिलं.>

हे पहिल्या पानावर तृप्ती आवटींनी लिहिलंय.

'कुठलेतरी डेज' हे सल्ट्री डेज . कादंबरी. मलाही नाही वाचवली. त्यांच्या तोवरच्या कादंबर्‍यांचं एक जाडजूड संकलन होतं.त्यातली हीच एक सोडली. कॉलेजाकाळात चळवळीत काम करणारा क्रांतीकारक विचार टाइप मुलगा आणि त्याने भारावलेली नायिका/निवेदिका ; पुढे तिचा भ्रमनिरास होतो असे काहीसे होते.

सिलेक्टिव्ह मेमरीज ठीकठाक वाटलं. संजीवकुमारबद्दलचा एक उल्लेख वाचताना उगाच ओरखडा आला. जसा तो तुम्हाला अमिताभबद्दल आला.

३) चौघीजणी . ज्या वयात वाचायचे तेव्हा वाचले नाही म्हणून असेल. > लिटिल विमेन वर आधारित शांता शेळकेंच का ? मला प्रचंड आवडलं होतं !

मला अकूपार आणि तत्त्वमसि दोन्ही पुस्तकं भोळसट वाटली. भारतीय संस्कृती तेवढी महान वगैरे संदर्भ फार डोक्यात जात होते. ज्या आदिवासींना बेसिक सोयीसुविधा देऊ शकलो नाही त्यांचा निसर्गाशी एकरूप असण्याचे गोडवे आपण गायचे म्हणजे मला तरी दांभिकपणा वाटतो.

सिलेक्टिव्ह मेमरी मला आवड्ल नाहि. आता शोभा डे ची पुस्तक वाचणार नाही मुद्दाम वेळ काढून. फारस काही हाती लागत नाही.

हाती काही लागण्यासाठी ती पुस्तकं वाचायची नसतातच. कधी बिन्डोक करमणूक हवी असेल तेव्हा वाचायला ठीक आहेत. पण कधी कधी त्या बाई ग्यान देण्याचा आव आणतात तेव्हा झटकून टाकायचं.

त्यांची पुस्तकं वाचल्यालाही दहा वर्षांहून अधिक झाली. त्यामुळे या काळात आलेलं त्यांचं काही वाचलेलं नाही. वाचेन असं नाही. स्पीडपोस्टसकट.

फाळणी टाळणारा महापुरुष वाचतोय कित्येक महिन्यापासून.अब्राहम लिन्कनचं हे कानिटकरांचं चरित्र वाचायला घेतलं ते अमेरिकन यादवीचा सुसंगत घटनाक्रम कळावा म्हणून . इन्टरनेट सारखी व्यापक माध्यमं नसताना कष्टानं संदर्भ जमवून पुस्तक तयार केल्याबद्दल कानिटकरांचं कौतुक केलं पाहिजेच पण त्यांची शैली अजिबात रंजक नाही. सहसा कितीही मोठं पुस्तक स्टार्ट टू फिनिश वाचायची माझी पद्धत आहे पण याची प्रत्येक वेळी ४-५ पानाचे पुढे जाऊ शकत नाही. नुसती घटनांची जंत्री असल्यासारखं आहे.ब्वाळिंब्यांची नर्मविनोदी, सटायरिक शैली च्या तुलनेत हे पुस्तक फारच कंटाळवाणे वाटते आहे. कालानुक्रमही लक्षात रहात नाही हा कदाचित माबुदो असेल Happy
..

बात कुछ जमी नही.

ह्यांना छोट्या गोष्टीतला देव कळलाच नाही असं वाटलं.
>> या उठवळ बाईला लोकांनी का डोक्यावर घेतलेय कळत नाही. ही, शोभा डे असल्यांपेक्षा मी प्रोतिमा बेदीच्या चरित्राला अधिक प्रामाणिक आणि उजवे मानीन....

भैरप्पा यांचे सार्थ. अर्थातच मराठी अनुवाद वाचला उमा कुळकर्णींनी केलेला. पूर्ण मध्ययुगीन प्लॉट. त्यात नायक भारतभ्रमणासाठी निघालेला. आणि सगळ्यात किळसवाणी वर्णने म्हणजे शाक्तपंथीयांच्या वेगवेगळ्या प्रथांची. अगदी अगदी याक वाटते ते वाचताना. आता असे वाटत आहे का मी ते पुस्तक पूर्ण वाचले?

चौघीजणी माझेही आवड्ते. त्या पुस्तकापेक्षा मी ते पुस्तक ज्यावेळी वाचले त्यामुळे माझ्यासाठी ते जास्त स्पेशल असेल म्हणा. कारण ते पुस्तक मला जेव्हा वाचताही येत नव्हते त्यावेळी माझ्या काकूने मला, माझ्या दोन चुलत बहिणी एक आते बहीण अशा सगळ्यांना मिळून रोज रात्री झोपताना वाचून दाखविले आहे.तेव्हाची ती थंडी, त्या पुस्तकामधील चार बहिणी आणि आम्हीही चार घट्ट्मुटट् बहिणी या सगळ्यांमुळे चौघीजणी म्हटले की मला ते दिवसच आठवतात. माझ्या सगळ्यात लाडक्या पुस्तकांमधील ते एक आहे. पण घरी ती काकू सोडून बाकी कुणालाही ते फारसे आवडत नाही.
त्या पुस्तकातील सगळ्यात आवड्ती प्रकरणे म्हणजे त्या सगळ्या मिळून जे नाटक बसवतात आणि लॉरीची आणि त्या मुलींची मैत्री होते तो प्रसंग. मी आणि माझी एक बहीण तर त्या पुस्तकापायी इतक्या वेड्या होतो की आम्ही खेळतानाही त्या पुस्तकातील पात्रांप्रमाणे खेळायचो. बेथ कुणीही नसायची. Sad मेग, ज्यो आणि अ‍ॅमी लॉरी. नंतर नंतर तर स्वप्नरंजन चालायचे आपण मोठे झाल्यावर त्यावर एक पिच्चर काढायचा त्यात आम्ही कॅरेक्टरही शोधून ठेवले होते मेग- माधूरी दिक्षीत, ज्यो- कजोल, बेथ- करीश्मा कपूर, अ‍ॅमी- ऐश, लॉरी- ह्रितिक Happy

भरत मयेकर आज तुम्ही जिवंत केल्यामुळे हा बाफ मला सापडला. धन्यवाद. बाफ पूर्ण वाचून काढला ..
मजा आली.
फचिन>>>>द अल्केमिस्ट हे मला असंच बोर झालं होतं.....खूपजणांकडून त्याचं कौतुक ऐकलं म्हणून वाचायला घेतलं.... <<< अगदी! सगळ्या सुप्रसिद्ध लोकांच्या आवडत्या पुस्तकामध्ये ह्याचं नाव पाहिलं म्हणून मुद्दाम विकत घेऊन वाचलं पण इतकं स्टुपिड वाटलं.

नीधप>>>माझं असं क्वचित होतं. अगदी वपुंसारखं भंपक लिखाणही मी छळ सहन करायची आवड या बहाण्याखाली पूर्ण वाचून काढते.<<<< माझंही! :-p त्या नादात डॉ. झिवागो वाचायचा खूप प्रयत्न केला. वाचनालयाची परत करायची तारीख जवळ आली म्हणून रात्रीचा दिवस करून वाचलं पण तरीही शेवटी सोडूनच द्यावं लागलं. बर्याच वर्षांनी सिनेमा बघितला अगदी wide screen tv वर. फार छान वाटला.

रैना>>>या मैत्रीमूळे माणसे त्रिमीत असतात हा मौलिक शोध मला लागला. Don't judge a book by its cover तसेच Don't Judge a person by what he/she reads.<<<< किती छान लिहिलंय! Happy

हिटलरचं मैन काम्फ वाचायला घेतलं पण भाषा खूप जड गेली. ३०-४० पानानंतर सध्या बाजूला ठेवलं आहे, पण वाचायचं आहे.

>>>> नंतर नंतर तर स्वप्नरंजन चालायचे आपण मोठे झाल्यावर त्यावर एक पिच्चर काढायचा त्यात आम्ही कॅरेक्टरही शोधून ठेवले होते मेग- माधूरी दिक्षीत, ज्यो- कजोल, बेथ- करीश्मा कपूर, अ‍ॅमी- ऐश, लॉरी- ह्रितिक स्मित<<< Happy खूप interesting! चौघीजणी कुणी लिहिलंय?

>>सायली | 8 August, 2014 - 03:05 नवीन
गॉड ऑफ़ स्मॉल थिंग्स -अरुंधती रॉय .>> सहमत. मेजर बोअर आणि रटाळ. आत्ता इंटरेस्टिंग होईल, मग होईल म्हणत ७०,८० पानं रेटली कशीबशी. मग बाजूलाच ठेवलं.

चौघिजणी मूळ ईंग्रजी पुस्तके लिटील वूमन आणि गूड वाईव्स यांचा अनुवाद आहे. ईंग्रजी लेखिका लुइसा मे अल्कॉट तर अनुवाद शांत शेळके. लिहिले गेले आहे साधारण १८६०-७० च्या दरम्यान. अनुवादही १९५०-६० मधे केला आहे त्यांनी.

मस्त धागा!
मराठीत माझा पेशन्स खूप आहे..पुस्तक वाचू शकत नाही म्हणून सोडून दिल्याचं फारसं आठवत नाही.
इंग्रजी मध्ये मात्र पहिल्या काही पानात रस निर्माण न झाल्याने काही पुस्तकं सोडून दिली. Life of pie, 100 years of solitude. पण काही पुस्तकं (Gone with the wind, to kill a mockingbird) अशी पण होती जी सुरू केल्यावर बोअर झाले होते पण मित्रांच्या आग्रहामुळे वाचली आणि कळले की सोडली असती तर काय मिस केलं असतं! P.G. Wodehouse यांचं pigs have wings हे मी वाचलेलं पहिलं पुस्तक. ते वाचताना पहिली ५० एक पानं आजिबात हसू येईना मग मला स्वतःवर शंका यायला लागली की आपल्याला इंग्रजी कळत नाहीये की काय! पण एका point नंतर इतकी धमाल यायला लागली की मी नुसती खुसूखुसू हसत होते वाचताना!
चौघीजणी माझेही फार आवडते पुस्तक आहे.
सध्या लोकसत्ता मध्ये प्रसिद्ध लोकांची आवडती/नावडती पुस्तके अशी यादी येते. त्यात काही पुस्तके का नावडती असावीत हे काही कळत नाही! फार सापेक्ष असावे पुस्तक आवडणे/न आवडणे!

Pages