वाचूच न शकलेली पुस्तकं

Submitted by हर्ट on 6 November, 2008 - 22:25

वाचकहो, नमस्कार आणि सुस्वागतम!

पुस्तक प्रेमी मनुष्य अनेक पुस्तकं गोळा करतो. त्यासाठी परिश्रम घेतो. वेळात वेळ काढून पुस्तकं वाचायला सुरवात करतो. पण कधी कधी असं होतं की ते पुस्तकं शेवटी आपण वाचूच शकत नाही इतकं आपल्यासाठी रटाळ वा दुर्बोध वा वेळखाऊ होऊन जातं की शेवटी ते पुस्तक खाली ठेवाव लागतं. माझ्या वाचनात अशी अनेक पुस्तकं आलीत जी मी वाचूच शकलो नाही. त्यात आपल्या आवडत्या लेखकाचे वा लेखिकाचे पण पुस्तकं असतात. कधी कधी आपले वय.. आपले अनुभव हे पुस्तकाशी सुंसंगत नसतात आणि मग जे पुस्तकं आपल्या अनेक मित्र मैत्रीणींना आवडलं ते आपल्याला मात्र आवडलं नाही म्हणून वाईटही वाटतं. असं वाटतं की कदाचित आपली पुस्तक ग्रहण करण्याशी शक्तीच संपली की काय. होतय ना असं कधीकधी.. लिहा तर मग तुमचे या विषयाशी अनुसरुन अनुभव.

मी गौरी देशपांडेंचा चाहता आहे. भारतातून भाच्याला अर्धा दिवस रजा टाकून 'तेरुओ' मागवून घेतलं. जसं ते पुस्तकं आलं त्यादिवशी संध्याकाळी फक्त खिचडी शिजायला टाकली नी ते पुस्तकं वाचायला घेतलं. आता आपले काही दिवस मस्त ऐटीत जातील असं वाटलं होत. पण ही नशा अवध्या दोन तीन तासातच उतरली. पुस्तकं अतिशय वरवर वाटलं. कुठेच वास्तविक जगण्याचा अनुभव येत नव्हता. अपरिपक्व वाटलं.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माणसा मी ही कॉमर्सचाच आहे.
Options, Futures & Other Derivatives -- जर तू ऐकदम ऑप्श्नस वर जात असशील तर नक्कीच बोअर वाटनार कारण विषय तसाच आहे, पण नेट लावून वाच, दोन तिनदा वाचल्यावर नविन दुनीयेत पाय ठेवशील.

ऍना करेनिना बाबत होत मात्र अस. पहिले काही पान रटाळ वाटतात. ऍनाच नाही तर वॉर ऍन्ड पिस बाबतीत पण हे होत, कारण टॉलस्टॉय पहिल्या १०० ऐक पानात फक्त कॅरक्टरच मांडतो, कथा नंतर उलगडायला सुरु होते, ३०० च्या पुढे त्याची पुस्तक वाचायला जबरी वाटायला लागतात आणि ८०० नंतर पुस्तक संपुच नये असे होते. लहानपणी टॉलस्टॉय ची पेटीतला माणूस ही कथा वाचली होती, मला अजुनही माहीत नाही की तो कोणत्या कथेचा अनुवाद आहे. कोणी सांगेल का?

इल्युजन्स आणि जोनाथन लिविन्गस्टन सीगल >> तत्वज्ञान असल्यामूळे बोअर झाली असतील पण बी, लेका वाच ती पुस्तक परत ऐकदा. ऐकदम छोटेखानीतर आहेत.

तलस्तोय वाचताना वही-पेन घेउन बसावे असं ऐकलय.. नवीन पात्राची त्रोटक नोंद/माहिती टिपुन ठेवावी.. >>> अगदी. फक्त मी वहि पेन घेऊन बसायच्या ऐवजी पुस्तक सुरु होताना ती पात्र आणि त्यांचे नातेसंबध ह्याची ऐक जंत्री असते, ती झेरॉक्स करुन घेतो, म्हणजे लगेच खाली नजर टाकून कोणाचा कोण हे कळते.

'पानीपत' का कोणजाणे पण रटाळ वाटलं होतं २५ वर्षांपूर्वी. >> पानिपत वाचुन frustration येतं त्यामुळे वाचवत नाही आता... Sad

पानिपत वाचुन frustration येतं त्यामुळे वाचवत नाही आता. >> अनुमोदन !!!

असेच मी 'ययाती' कधिच नाही वाचु शकले. >> अनुमोदन !!!

एलिझाबेथ गिल्बर्टचं 'ईट, प्रे, लव्ह' काही मी वाचू शकले नाही. >> अनुमोदन !!! Happy

शोनू, या वेळेसच्या दीपावली च्या अंकामधे अनिल अवचटांचा थोरो वर लेख आहे. कालच वाचला, आणि इम्प्रेस होऊन वॉल्डेन वाचायचं असं ठरवलं.. Happy
अवचटांचा अनुवाद, लिखाणाच्या स्टाईलमुळे मला ती पुस्तकाची ओळख फार आवडली.. प्रत्यक्ष पुस्तक कसं आहे?

टण्या नक्कीच वाचणार आहे शांताराम परत. महीनाभर पडून होतं म्हणून परत केलं. आता आणते परत.

पुनम, शोभा डे चे सिलेक्टीव्ह मेमरी, स्पीडपोस्ट वाचताना असेच होते.. तिची शैली छान आहे, त्यामुळे वाचवेसे वाटते. पण कंटेंट महान असतो! एरवी फक्त जोक्स मधे ऐकलेला, माझी २,तुझी २ आणि आपली २ मुलं हा प्रकार, आणि त्यांच्याबद्दलचे तिचे विचार, तसंच सिलेक्टीव्ह मेमरी मधले शेवटच्या अर्ध्या भागात असलेले फक्त बाकीच्या लोकांच्या कागाळ्या!
उगीच वाचतोय असं वाटतं! :|

शेवटच्या अर्ध्या भागात असलेले फक्त बाकीच्या लोकांच्या कागाळ्या! >> hmm interesting ... Lol

द अल्केमिस्ट हे मला असंच बोर झालं होतं.....खूपजणांकडून त्याचं कौतुक ऐकलं म्हणून वाचायला घेतलं.... नंतर नंतर हा मनुष्य (लेखक) पाल्हाळ न लावता पटपट गोष्ट संपवत का नाहिये असं वाटायला लागलं.... मग पुष्कळशी फिलॉसॉफीची पानं गाळून एकदाचं संपवलं ते... Happy

शेवटच्या अर्ध्या भागात असलेले फक्त बाकीच्या लोकांच्या कागाळ्या >>>> अगदी त्यातही हिच्या घरी गेल्यावर अमिताभ बच्चनने RM वापरली वगैरे अगदी खालच्या थरातले वाटले मला तर Uhoh

सिंडरेला, God of small things आणि Life of Pi - अनुमोदन! Happy
ययाति मी पूर्ण केलं, पण त्याला ज्ञानपीठ का मिळालं असेल ते कारण 'आत्ता सापडेल, मग सापडेल..' असं म्हणत केलं! Happy

At last shrugged Lol

'आत्ता सापडेल, मग सापडेल' >>>> अगदी अगदी Happy

ययाती -अगदी अगदी. इतर भाषांमधली ज्ञानपीठ प्राप्त पुस्तकं एक दोन वाचली त्यानंतर तर ययाती बद्दल अजूनही मोठं प्रश्नचिन्ह Happy

ते 'ययाती' नसून 'ययाति' आहे

<<'डॉन क्विक्झोट' (मूळ इंग्रजीत) आठवीत अर्धवट वाचलं >>

quixote चा उच्चार 'कीहोट' असा आहे... ते 'डॉन कीहोट' आहे....

बदललं. Happy

God of Small Things न वाचता खाली ठेवणार्‍यांना मी एवढंच म्हणेन - This book is one you MUST read before you die! Happy शाब्दिक सौंदर्य म्हणजे काय ते हे पुस्तक वाचल्याने जसे कळेल तसे इतरत्र कळणे नाही. Happy

God of Small Things हे फक्त त्याच्या भाषेसाठी वाचण्यासारखे आहे. चाफ्याला अनुमोदन. अनुवादामधे तो लहेजा येणे शक्यच नाही.

>>>quixote चा उच्चार 'कीहोट' असा आहे... ते 'डॉन कीहोट' आहे....
मूळ उच्चार असेल. पण वेबस्टरप्रमाणे इंग्रजीत kwik-sot' ik असा उच्चार आहे. quixote वरून होणार्‍या शब्दाचा.

मला Life of Pi आणि Inheritance of Loss ही दोन्ही पण आवडली होती. Happy या तिन्ही (तिसरं God of Small Things) पुस्तकांबद्दल मी जुन्या मायबोलीत "मी वाचलेले पुस्तक" मधे लिहिल्याचं आठवतंय. Wink देसाईंचे Inheritance.. आवडले म्हणून मग त्यांचे Hullabaloo in Guava Orchard वाचले होते. तेही आवडले होते.

असाम्या, God of... ची भाषा तर आहेच आहे रे... पण मांडणी? ती कशी विसरून चालेल? हे पुस्तक खाली ठेवण्याचे मुख्य कारण कथेची मांडणी हे असावे. पण एकदा ती मांडणी कळली की जी मजा येते तिची बातही कुछ और है! आणि ती इथे उलगडून सांगून उपयोग नाही, स्वतःच त्याचा आस्वाद घ्यायचा. Happy

जोनाथन वाचलं आहे मी. प्रचंड आवडलं. पण Illuisions बोजडं वाटलं.

God of small things वाचण्याचा कितीदा मी प्रयत्न केला. मला काहीच कळतं नव्हतं की मी काय वाचतो आहे नेमकं.

ययाति सारखे पुस्तकं वया/अनुभवाचा परिपक्वपणा आला की नाही आवडतं. मी १० वर्षापुर्वी हे पुस्तकं आनंदानी वाचून घेतलं. आता मुळीच वाचू शकणार नाही.

बारावीपर्यन्त इंग्लिश पुस्तकांच्या बाबतीत मला स्वतःला फक्त सायन्स फिक्शन, डिटेक्टिव्ह/थ्रीलर स्टोरीज किंवा सिडने शेल्डन अगदी एम ऍन्ड बी सुद्धा वाचायचीच सवय होती. क्लासिक्स वगैरे घरात असूनही वाचताना कंटाळाच येतो म्हणून कधीही पूर्ण केली नाहीत. पण बारावीनंतरच्या सुट्टीत वाचलेल्या द फाऊंटनहेडने मला सगळ्याच बाबतीत बदलवलं. मला हे पुस्तक ज्याने दिलं आणि पेशन्स ठेऊन वाचायचा सल्ला दिला त्याचे ऋण मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. हे पुस्तक वाचताना मला अक्षरशः त्रास होत होता. काही पानं वाचून मी थांबायचे. आपल्याला हे झेपतं आहे की नाही कळायचंच नाही. काही दिवस गेले की परत ती पानं वाचून पुढे जायचे. आणि काही अशीच चाळीस पन्नास पानं झाल्यावर त्या पुस्तकाने काय पकड घेतली आहे! लख्ख उजेडात उभं राहील्यासारखं वाटलं नंतर ते पुस्तक वाचताना आणि वाचून झाल्यावरही. इतर हजारो गोष्टी दिल्या या पुस्तकाने पण एक वाचक म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट दिली ती पुस्तक समजून घ्यायचा पेशन्स आणि प्रयत्न.
खूपशी पुस्तकं विशेषतः क्लासिक्स म्हणून गणली गेली आहेत ती स्लो पेस असतात. आपल्याला पटकन पकड घेणार्‍या पुस्तकांची सवय असते.
लेखकाने मनस्वीपणे लिहिलेले असते. त्याच्या गतीने,त्याच्या मानसिकतेत शिरुन आपण शोध घेत गेलं की मगच आपल्यापर्यन्त पोचतं ते. एक वाचक म्हणून शिकत जाण्याचा, मॅच्युअर होण्याचा, पुढच्या यत्ता चढण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून आपण हे कॉन्शसली करावं लागतं. पण तरीही खूपदा आपल्याला या सर्वांसाठी वेळ देता येत नाही. मानसिक वेळ खरं तर. आणि बरेचदा वैयक्तिक आवड वरचढ ठरते टण्या म्हणाला तसं.
मात्र मला इतिहास खूप आवडूनही ऐतिहासिक 'कादंबर्‍या' अजिबातच आवडत नाहीत. मग मराठीतली बरीचशी गाजलेली पुस्तकं आवडलीच नाहीत. किंवा ती इतरांना का आवडली कळलं नाही. आधीच्या पिढीतल्या मराठी लेखकांच्या गाजलेल्या खूपशा पुस्तकांच्या बाबतीत माझं तसं झालय. विश्राम बेडेकरांच एक झाड.. वाचताना मला कंटाळा आला. वि.स.खांडेकर वगैरे सुद्धा मी वाचू नाही शकले कधी. या उलट जीए. चुकूनही कंटाळा हा शब्दच शिवत नाही त्यांच्या पुस्तकांच्या बाबतीत.
गॉन विथ द विन्ड संपवल्यावर लगेचच मी अना कॅरेनिना वाचायला घेतलं आणि ती मोठ्ठीच चूक. दोन मोठी पुस्तकं लागोपाठ वाचू नयेचा धडा शिकले मी. पुस्तकात शिरताच आलं नाही मानसिक कंटाळ्याने आणि मग नंतर कधीच वाचावं वाटेना. वेटिंग फॉर गोदो आवडलं पण लाईफ ऑफ पाय नाहीच आवडलं. प्रत्येक वेळीच पेशन्स रहात नाही लेखकाला काय म्हणायचयं हे समजून घ्यायला किंवा जे समजतय ते आपल्या आवडीच नसतं आणि मग पुस्तक पुरं होऊ शकत नाही किंवा होऊनही काहीच फरक पडत नाही.
अमिताव घोषचं हंग्री टाईड खूप आवडलं पण त्याच्या इतर पुस्तकांचा कंटाळाच आला. विशेषत: कलकत्ता क्रोमोझोम्स. कधी कधी पुस्तकावरचा सिनेमा आधी पाहीलेला असला तर पुस्तक कंटाळवाणं होतं. इंग्लिश ऑगस्ट बद्दल माझं झालं असं.
गॉड ऑफ स्मॉल थिन्ग्ज बद्दल चाफाला पूर्ण अनुमोदन. या पुस्तकातली इमेजरी, तपशिलात शिरुन केलेल्या वर्णनांमधलं शब्द सौंदर्य, अनयुज्वल फिगर ऑफ स्पीच कमाल आहे. ते पावसाच वर्णन तर अप्रतिम.

टुलिप, सुरेख पोष्ट लिहिलसं. धन्यवाद द्यायला हवं तुला.

इंग्लिश ऑगस्ट मी तीन वेगवेगळ्या वेळी थोडं थोडं करून जवळ जवळ अर्धं वाचलं. सिनेमा पाहिलाच नाहीये, पण पुस्तक अगदी रटाळ वाटलं मला दर वेळेला.

सुटेबल बॉय पण दोन तीनदा प्रयत्न करून ४०-५० पानांच्यापुढे जात नाही गाडी. गोल्डन गेट , इक्वल म्युझिक हे मात्र अगदी पुस्तक खाली न ठेवता वाचून काढली होती.

अशोक बँकर च्या रामायणाचा पहिला भाग अगदी फटाफट वाचून काढला. पण पुढचे भाग तसेच पडलेत अजूनही.

माझं असं क्वचित होतं. अगदी वपुंसारखं भंपक लिखाणही मी छळ सहन करायची आवड या बहाण्याखाली पूर्ण वाचून काढते. Happy
पण एक अभ्यासाचं पुस्तक असं होतं की जे अजूनही वाचलं गेलं नाहीये आणि इच्छा होत नाहीये आणि गरज आहे... ते म्हणजे
Aristotle' Poetics
कधीच झेपलं नाही. Theatre History च्या क्लासमधे रोजचं वाचन करून यायला लागायचं आणि त्यावर वर्गात चर्चाही व्हायची. शिकवणारा प्रॉफ Theatre History चा गाढा अभ्यासक म्हणून सर्व पाश्चात्य जगात प्रसिद्ध. पण ते Aristotle's Poetics काही माझ्या गळी उतरवू शकला नाही तो.

हा आणि अजून एक आहे... बेस्टसेलर आहे.. Perfume या नावाचं. आहे खरंतर इन्टरेस्टिंग पण अजून पूर्णच होत नाहीये. जुलै पासून प्रयत्न करतेय पूर्ण करायचा..
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

>>>माझं असं क्वचित होतं. अगदी वपुंसारखं भंपक लिखाणही मी छळ सहन करायची आवड या बहाण्याखाली पूर्ण वाचून काढते.>>>
अगदी सेम,व.पु.तर कधीकधी हे अजुन किती फालतु लिहु शकतात ह्या उत्सुकतेपोटी वाचलं आहे.
अजीबात विनोदी न वाटल्यामुळे सोडून दिलेली काही पुस्तकं मात्र जरुर आहेत,उदा-गाडगीळांच्या बंडूकथा.
बाकी ह्या विषयासाठी बी चे स्पेशल धन्यवाद.
*************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

व.पु.तर कधीकधी हे अजुन किती फालतु लिहु शकतात ह्या उत्सुकतेपोटी वाचलं आहे.>>. बापरे असेही वाचक आहेत जगात Happy

वि. स. खांडेकरांचं 'ययाति' मी पूर्ण वाचलं. पण त्यांची दुसरी पुस्तकं वाचताना, थोडंसं वाचल्यावर आता घेतलंय वाचायला तर पुरे करू असं व्हायचं.

ट्यू, मस्त पोस्ट. मुद्द्याशी सहमत. तपशिलात एकच मतभेद - Fountainhead ने पहिल्या वाक्यापासून (Howard Roark laughed.) माझा असा काही ताबा घेतला की ज्याचं नाव ते!! Happy
उलट मग Atlas Shrugged वाचतानाच एकेकदा वाटलं की 'हे झालंय की हिचं म्हणून already!' अर्थात, तरीही ते पूर्ण वाचायला compel करतंच तुम्हाला.

स्वाती Atlas Shrugged मध्ये तिने Fountainhead मुळे वाचकांना पडलेल्या प्रश्नांचे उत्तर देन्याच्या प्रयत्न केला आहे त्यामूळे बरेचशे तात्विक मुद्दे परत परत आले. डॅग्नी टॅगर्ट जर खरच असती तर तिने नक्कीच ह्या ७०० बि च्या बेल आउट पॅकेज ला विरोध केला असता. Happy

केदार, अगदी अगदी! Happy
(बाकी ते 'Hi Slug' आणि 'Hi Frisco' त्या काळात भलतंच म्हणजे भल्तंच romantic वाटलं होतं - आणि Rand ने लिहिल्यामुळे आणखीनच!) Happy

Atlas Shrugged मध्ये तिने Fountainhead मुळे वाचकांना पडलेल्या प्रश्नांचे उत्तर देन्याच्या प्रयत्न केला आहे त्यामूळे बरेचशे तात्विक मुद्दे परत परत आले. >> मी हेच लिहिणार होतो केदार. परत एकदा FH वाचायचा प्रय्त्न केला होता मागे नि बात कुछ जमी नही.

चाफ्या मी फक्त भाषेसाठी God of the ... वाचावे म्हटले ते "भाषा एव्हढी अप्रतिम आहे कि तिच्या पुढे जाववत नाही" अशा अर्थाने रे Happy

एक न वाचता सोडुन दिलेले- नाच गं घुमा. ते सगळे खरे किंवा खोटे हा मुद्दा निराळा पण वीट आला देसाईंची बुराई वाचून. आणि त्यानंतर देसाईंनी त्यांच्या पुस्तकांत रंगविलेले नवरा-बायको/प्रियकर-प्रेयसी इत्यादी मधील लाडीक/प्रेमळ जे काय असेल ते प्रसंग/संवाद वाचताना प्रत्येक वेळी फराफरा पाने उलटली. एकदम भंपकपणा वाटला तो.

बरोबर - 'नाथ हा माझा'पण असंच भंपक आणि थिल्लर वाटलं होतं मला. Sad

Pages