वाचूच न शकलेली पुस्तकं

Submitted by हर्ट on 6 November, 2008 - 22:25

वाचकहो, नमस्कार आणि सुस्वागतम!

पुस्तक प्रेमी मनुष्य अनेक पुस्तकं गोळा करतो. त्यासाठी परिश्रम घेतो. वेळात वेळ काढून पुस्तकं वाचायला सुरवात करतो. पण कधी कधी असं होतं की ते पुस्तकं शेवटी आपण वाचूच शकत नाही इतकं आपल्यासाठी रटाळ वा दुर्बोध वा वेळखाऊ होऊन जातं की शेवटी ते पुस्तक खाली ठेवाव लागतं. माझ्या वाचनात अशी अनेक पुस्तकं आलीत जी मी वाचूच शकलो नाही. त्यात आपल्या आवडत्या लेखकाचे वा लेखिकाचे पण पुस्तकं असतात. कधी कधी आपले वय.. आपले अनुभव हे पुस्तकाशी सुंसंगत नसतात आणि मग जे पुस्तकं आपल्या अनेक मित्र मैत्रीणींना आवडलं ते आपल्याला मात्र आवडलं नाही म्हणून वाईटही वाटतं. असं वाटतं की कदाचित आपली पुस्तक ग्रहण करण्याशी शक्तीच संपली की काय. होतय ना असं कधीकधी.. लिहा तर मग तुमचे या विषयाशी अनुसरुन अनुभव.

मी गौरी देशपांडेंचा चाहता आहे. भारतातून भाच्याला अर्धा दिवस रजा टाकून 'तेरुओ' मागवून घेतलं. जसं ते पुस्तकं आलं त्यादिवशी संध्याकाळी फक्त खिचडी शिजायला टाकली नी ते पुस्तकं वाचायला घेतलं. आता आपले काही दिवस मस्त ऐटीत जातील असं वाटलं होत. पण ही नशा अवध्या दोन तीन तासातच उतरली. पुस्तकं अतिशय वरवर वाटलं. कुठेच वास्तविक जगण्याचा अनुभव येत नव्हता. अपरिपक्व वाटलं.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मॅनेजमेन्टच्या पुस्तकांबद्दल मला असं वाटत नाही. पुस्तके वाचुन आयुष्य मॅनेज करता आले असते तर मग काय........हे मात्र १००% खरं, पण 'Business Management' मधे पुस्तकांमधुन 'Common Factors Identify' करता येतात. पाश्चात्य वातावरणदेखील नमुने असतातच (The Office सिरीयल हे उत्तम उदाहरण आहे). आपल्याकडे अजुनही बर्‍याचदा 'carrot' किंवा 'stick' उपयोगी पडते. 'Personal space' ही अजुन lifestyle झाली नाहीय याचा आपण फायदा घेऊ शकतो.

मृत्युंजय वाचायला घेतली, पण का माहिती नाही, गोष्टीनी पकडच घेतली नाही. इतकं ऐकलंय या कादंबरीबद्दल की परत प्रयत्न करावासा वाटतो, पण पुस्तक सुरू केल्याच लगेच कंटाळ येतो!

पु. लंच "एका कोळियाने"...
का कोण जाणे.. पण खूप प्रयत्न करूनही वाचवलेच नाही...
माझ्या देवाला (पु.लं.) माझी दृष्ट लागू नये म्हणून त्यांच्याकडून असं काहीतरी लिहिलं गेलं असावं... Happy

'एका मारवाड्याची गोष्ट' : गिरिश जाखोटीयांचे पुस्तक.
मुखपॄष्ट बघुन वाचावेसे वाटते पण नंतर अजिबात वाचु शकले नाही मी. कोणी वाचलं आहे का?
पेपर मधे त्याचं फार छान असं परिक्षण आलं होतं म्हणुन वाचायचा प्रयत्न केला पण काही जमलं नाही.

पॅपिलॉन म्हणून एक पुस्तक आहे. मूळ लेखकाचे नाव आठवत नाहीये. मराठीतला अनुवाद रविंद्र गुर्जरांचा आहे. मराठीतही त्याच नावाने पुस्तक आहे. (पॅपिलॉन हा बहुदा जर्मन किंवा रशियन शब्द असून त्याचा अर्थ फुलपाखरू असा आहे).
फारच कंटाळवाणे पुस्तक आहे. पहिली काही पाने वाचून ठेवून दिले.

<पिलॉन हा बहुदा जर्मन किंवा रशियन शब्द असून त्याचा अर्थ फुलपाखरू असा आहे)>

पापियाँ हा फ्रेंच शब्द आहे.

ओक. चिनूक्स. खूप पूर्वी वाचायला घेतले होते ते पुस्तक. त्यामुळे लक्षात राहिले नव्हते. फ्रेंच राज्यकैदीच्या पलायनाची कथा आहे ना ती? सुरस असेल असे वाटले म्हणून पुस्तक वाचायला घेतले. पण खूप बोर झाले. Sad

पॅपिलोण चांगलं इंटरेस्टिंग पुस्तक आहे की. मला तरी आवडलं होतं.

जेफ्री आर्चरचं ओन्ली टाईम विल टेल हे पुस्तक वाचायला घेतलं. इतकं फालतू आणि बेकार कादंबरी आजवर कधी वाचली नव्हती. मूळ कथेमधे इतक्या गोची आहेत की बास...

'राजा रवि वर्मा' - देसाई
आजवरचं एकमेव पुस्तक जे मी वाचुच शकले नाही. माबोवरच्याच शर्मिला फडके यांचा चिन्ह मधला वह कौन थी लेख वाचल्यावर तर खूप बरं वाटलं पुस्तक पूर्ण न केल्याचं.

.

असामी +१.
मुळात गुर्जर भाषांतर करताना कुठल्याही पुस्तकाचा चोथा करतात. पण लहानपणी इंग्लिश पुस्तकांचा बहुदा एकमेव अ‍ॅक्सेस पॉईंट असल्याने वाचून काढले होते. Happy

पण लहानपणी इंग्लिश पुस्तकांचा बहुदा एकमेव अ‍ॅक्सेस पॉईंट असल्याने वाचून काढले होते. >> Happy

भाषांतर करावीत तर विजय देवधर आणि भा रा भागवतांनी.

हो, पण ते बेस्टसेलर पल्प फिक्शन थ्रिलर्सची फारशी भाषांतरं करत नसत ना Proud
देवधर बरे आहेत. भागवत लाजवाब. Happy

ह्या धाग्यावर खूप पुस्तकांवर उलट सुलट मतं आणि अभिप्राय आले. बरं वाटलं. आपण आवडलेल्या पुस्तकांबद्दल नेहमीच बोलतो / लिहितो. न आवडलेल्या पुस्तकांविढयी काही बोलणं नेहमीच अवघड अस्तं. बहुदा,'आपल्याला वाचनप्रेमी वेड्यात तर काढणार नाहीत ना?' अशी शंका वाटत असावी. पण इतक्या जणांनी बिनधास्तपणे आपली नावड नोंदवली आहे हेच मला जास्त आवडलं.
नाझा अनुभव भालचंद्र नेमाड्यांच्या 'हिंदु' चा आहे. मोठा गाजावाजा करून ते पुस्तक प्रसिद्ध झालं होतं. लगोलग माझ्या एका मित्रवर्यांनी मोठ्या प्रेमानं मला हे पुस्तक भेट पाठवलं. त्यामुळे मी मोठ्या उत्सुकतेनं ते वाचायला घेतलं. Empires of the Indus [Alicia Alignon] हे पुस्तक मला अफाट आवडलं होतं आणि जो भेटेल त्याच्याकडे मी त्या पुस्तकाची तारीफ करत होतो, कदाचित त्यामुळेच मला 'हिंदु' ची भेट आली असावी. मी ते वाचायला घेतलं खरं पण लवकरच तो एक वेट-लिफ्टिंगचा व्यायाम वाटायला लागला! मी त्या पुस्तक-नगावर चढाईचे अनेक [अयशस्वी] प्रयत्न केले. दर वेळी ते बाजूला टाकताना मला वाईट वाटायचं पण ते नेमाड्यांपेक्षा माझ्या मित्राबद्दल! माझ्या दुसर्‍या एका मित्रानं प्रकाशन-पूर्व सवलतीत ते विकत घेतलं होत! हे समजल्यावर आम्ही भेटलो की एकमेकांना क्षेमकुशल विचारत होतो! त्याचेही आटोकाट प्रयत्न सुरू होते. शेवटी त्याने पाचव्या-सहाव्या प्रयत्नांनंतर पराभव मान्य केला.त्यावेळी त्याचा स्कोर १३५ पानं असा होता. मी मात्र विक्रमादित्य राजाप्रमणे न थकता पुन:पुन्हा त्या वेताळाला माझ्या पाठुंगळी घेत होतो. शेवटी , २२१ वर मीही पराभव मान्य करून टाकला आणि माझ्या उपकारकर्त्या मित्राची माफी मागून मोकळा झालो. माझ्या परिचयात तरी २२९ पानं हा एक उच्चांक अबाधित राहिला आहे, हे एकमेव समाधान. By the way, मी Empires of the Indus ची मात्र जोरदार शिफारस नोंदवतो.
-बापू.

मारिओ पुझोचे 'द लास्ट डॉन' हे अत्यंत, भयाण बोअर पुस्तक. गॉडफादरच्या हँगओव्हरात ते वाचायला मिळालं आणि सणसणीत भ्रमनिरास झाला. त्यामुळे त्याचे 'ओमेर्टा' वाचायचे अजून धाडस केलेले नाही!!!

आयन रॅन्डचे 'द फाउन्टन्हेड' आणि 'अ‍ॅटलास श्रग्ड'.
ही दोन्ही पुस्तके मी खुप दिवसापासुन आणली आहेत. पण जाड पुस्तक आणि बारिक फॉन्ट बघुन जीव अगदी दड्पून जातो. Sad
वाचायची फार ईछ्छा आहे. कूणी टिप्स देईल का,कसं वाचता येइल?

आगाऊ,
तुम्ही मारिओ पुझो चे 'फूल्स डाय' वाचलय का?

माधवी, टीप्स म्हणून नाही. पण फाउन्टन हेड काही पाने नेटाने वाचावे लागते. जड जाते सुरुवातीला. एकदा ग्रीप आली की परत खाली ठेवणे अशक्य. मग काही महिने झपाटल्यासारखे जातात.
अर्थात, पुस्तक आवडले तर. Happy
'अ‍ॅटलास श्रग्ड' माझे पण राहिलेय. सुरुवात करुन ठेवून दिलेय.

सांगत्ये ऐका - हंसा वाडकर. आणि खोटं सांगेन - उर्मिला देशपांडे.
दोन्ही बॅड पेरेंटिंग ची खास उदाहरने आहेत. लेखन शैली बेकार. पीळ डिस्कशन्स. उर्मिला शुड नॉट राइट. फुकट पाल्हाळ लिहीले आहे. बराचसा भाग गौरींच्या पुस्तकांतून फिक्षन रूपात वाचला आहे. बरे ही म्हणते त्यामुळे काय खरे नि काय खोटे असा संभ्रम पडतो. ह्या पुस्तकातील आई कायम खूप दारू पिते पण शेव्टी आजार झाल्यावर मला वाटलंच नव्हत असं होईल असे म्हणते. म्हणजे पहिलीबरीच पाने. मी काय बाई वेगळी असं मग एकदम इमोशनल.

सांगते ऐका तर असेच दिशाहीन प्रवास. दोन्ही पालक दारुडे.

स्वाती, प्रचंड अनुमोदन! ही दोन्ही पुस्तके हळूहळू चढत जाणारी आहेत.
मी 'फूल्स डाय' नाही वाचले अजून, पण आता ते माफिया, इटली इ.इ.चाच कंटाळा आला आहे!

माधवी, तुम्ही कुठे आहात माहीत नाही, लायब्ररीत मोठ्या फाँटचे पुस्तक मिळाले तर आणून वाचा. माझे खूप आवडीचे पुस्तक आहे, पण असंच छोट्या फाँटमधले पुस्तक घेतल्याने डोळ्याला फार शीण देऊन वाचावे लागते. (आधीच मेंदूला जरा ताण द्यावाच लागतो फाउंटनहेड म्हणजे..)

बस्के
ही बरी आयडीया दिली. बघते आता.

अश्विनीमामी ,
ई बूक नाही आवडत मला वाचायला. पुस्तक वाचल्याचं फिलिंग नाही येत ई बूक वाचताना (मला तरी!)
हे ऐकुन खुप जणांनी मला वेड्यात काढलयं. Happy

शैलजा,
फूल्स डाय पण वाचायचय मला! ह्म्म्म... बरीच मोठी लिस्ट आहे!

फाउन्टन हेड काही पाने नेटाने वाचावे लागते. जड जाते सुरुवातीला. एकदा ग्रीप आली की परत खाली ठेवणे अशक्य >> अगदी.

फूल्स डाय मलापण आवडलं होतं.

Pages