कैरीची आंबट गोड चटणी

Submitted by मधुरीता on 7 June, 2013 - 11:58

कैरीची आंबट गोड चटणी/ ट्क्कु/ चुंदा
लागणारा वेळः १५ मिनिटे
लागणारी कैरी: आंबट, कच्ची किंवा थोडी पिकलेली कशीही.

साहित्यः

  1. कैरी किसलेली १ वाटी
  2. गुळ अर्धा किंवा पाउण वाटी
  3. मिठ,तिखट चविनुसार
  4. मेथी दाणे चमचाभर
  5. फोडणीचे साहित्य(मोहरी, हिंग, हळद)

क्रुती:
प्रथम मंद आचेवर खोलगट कढईमध्ये थोडे तेल घालुन फोडणी करावी. फोड्णी करताना त्यात मेथीचे दाणे घालावेत. त्यात तिखट/ मिर्चीचे तुकडे घालावेत. (कैरीचा किस पिळुन रस बाजुला काढावा नाहीतर गुळ जास्त लागेल).
कैरीचा किस आणि गुळ एकत्रीतरित्या त्यात घालावे आणि गुळ विरघळे पर्यंत ढवळावे. त्यात चवीनुसार मीठ घालावे. आणि थोडा लालसर रंग येईपर्यंत किंवा ते मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळावे आणि गॅस बंद करावा.
झाली चटणी तयार.

हि चटणी बरेच दिवस टिकते. हि आंबट गोड तर लागतेच पण मेथिच्या दाण्यांमुळे थोडी कडुसरही लागते आणि भुक वाढ्ण्यास आणि तोंडाला चव येण्यास मद्त होते. शिवाय या सर्व घटकांमुळे ती पाचक आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच. बरेचदा एकट्याने घरी रहायचा प्रसंग येतो. एकट्यासाठी काही बनवायचा, आणण्याचा कंटाळा येतो. चुरमुरे, फरसण (मटकी असेल तर) अशी भेळ केल्यावर त्यात ही चटणी टाकली तर ?

चटकदार लागणार ही चटणी. चटणी थोडी पातळ होण्यासाठी मी कैरीचा रसही टाकणार.

<< भुक वाढ्ण्यास ... मद्त होते. >> मेथिच्या दाण्यांमुळे भुक वाढते का?

छान. झटपट प्रकार.

किरण, हि चटणी तर चालेलच. पण ताज्या कैरीची चव हवी असेल तर किसात ( जेवढ्यास तेवढे ) मीठ टाकून बाटलीत भरून ठेव. असा किस टिकतो. फक्त तो वापरताना, त्या पदार्थात ( भेळ वगैरे ) मीठ घालायचे नाही.

<< भुक वाढ्ण्यास ... मद्त होते. >> मेथिच्या दाण्यांमुळे भुक वाढते का?

>>>नाही पण तोंडाला मस्त चव येते आणी भुक चाळवते.

अशी भेळ केल्यावर त्यात ही चटणी टाकली तर ?>>>

हो! मस्त लागेल. मी हि भेळेत ही चटणी घालुन पाहेन. मस्त आयडीया!

चटणी थोडी पातळ होण्यासाठी मी कैरीचा रसही टाकणार. >>>>>..
हो. मला पण पातळ चटणी आवडते म्हणुन मी पण रस ठेवते.