मायबोली वर वाचनापेक्षा लेखन जास्त

Submitted by वरुण on 24 May, 2013 - 03:26

मायबोली वर वाचनापेक्षा लेखन जास्त होते असा माझा दावा आहे.
पण लेखकाला पुरेसे वाचक मिळणे हे गरजेचे असते.
ते वाचक त्या लेखापर्यंत पोहोचेपर्यंतच नवीन लेखन प्रसवले जाते. आणि मग नवीन लेखनावरच चर्चा चालू होते तीही थोडाच वेळ। कित्येक चांगले लेख प्रतीसादाविना पडून आहेत. ते पुन्हा वाचकांच्या नजरेस येतील या करिता काय करावेलागेल . अड्मीन काही करू शकतात का …

त्यातूनही जी मंडळी येथेच वरचेवर पडीक असतात त्यांचे अनेक लेख आणि इतर लेखन दर्जेदार असते निःसंशय ! परंतु त्यांचे ''अहो रूपं अहो ध्वनी'' चालू असते.

मग नवख्या मंडळीना कशी संधी मिळणार. जरा खुलासा करावा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मग नवख्या मंडळीना कशी संधी मिळणार. जरा खुलासा करावा.<<< आधी लिहा तरी तुम्ही Happy

मायबोलीवर मी नवीन असल्यापासूनचा अनुभव आहे. लेखन चांगले असेल तर त्याला चांगले प्रतिसाद आपोआप मिळतात; पण "मलाच सर्व लिहिता येते" अशा भावनेने इथे लिहिलेत तर इथले वाचक बरोबर जमिनीवर आणून ठेवतात.

उत्तम लेखनासाठी "प्रतिसादसंख्या" हा निकष होऊ शकत नाही. चांगले लेख लोकांकडून वाचले जातात, इतकंच काय "हे वाच" असंदेखील एकमेकांना सुचवले जाते. नवीन लेखनमधे दिसणारे बीबी म्हणजेच पूर्ण मायबोली नव्हे. Happy

कित्येक चांगले लेख प्रतीसादाविना पडून आहेत. ते पुन्हा वाचकांच्या नजरेस येतील या करिता काय करावेलागेल . अड्मीन काही करू शकतात का …
>> अ‍ॅडमीन कशाला? तुम्हिच अशा लेखांच्या लिंक देणारा एक धागा काढा की! हाकानाका!

तुम्हिच अशा लेखांच्या लिंक देणारा एक धागा काढा की! हाकानाका!<<< आनंदयात्री, परवा असाच एक धागा काढला होता. मानवजात असा एक आयडी होता त्याने. शिवाय मामींनीपण धमाल धागे असा धागा चालू केला आहेच.

नंदिनीची पहिली पोस्ट +१
इथे लिहिणारा प्रत्येकजणच कधीनाकधी नवखा होता. तो/ती इतरांना किंवा इतर त्यांना ओळखत नव्हते. तरीही ज्यांचं ज्यांचं लिखाण वेगळं, चांगलं वाटलं त्याला मायबोलीकरांनी उत्साहाने प्रतिसाद दिला, काही चुका वाटत असतील तर दाखवूनही दिल्या. क्वचित एखाददुसरे धागे शून्य प्रतिसादवाले रहातात तेव्हा तो लेखक नवखा आहे म्हणून नाही तर वाचकांना ते तितकंसं अपील झालं नसेल म्हणून असं व्हायची शक्यता असते.

राहिता राहिला तुमचा 'अहो रूपम् अहो ध्वनी..' चा आक्षेप. हा कंपूबाजीचा आक्षेपही नवा नाही. पण एखाद्याचे लेखन आवडणारे चाहते, त्यांचा गट, सारख्या आवडी/विचार असणार्‍यांचा गट असे तयार होणं खूप स्वाभाविक असतं. आणि ते त्यांच्यात्यांच्या आवडीनुसार प्रतिसाद देत असतात. मला नाही वाटत त्याला कंपूबाजी म्हणता येईल. उदा: मला स्वतःला फारेण्ड या सदस्याचे लेखन अगदी मनापासून आवडते त्यामुळे त्याच्या लेखावर मी सतत छान अशीच प्रतिक्रिया लिहिली तर तो लगेच कंपू होणार का? कैच्याकै

आनंदयात्री, परवा असाच एक धागा काढला होता. मानवजात असा एक आयडी होता त्याने. शिवाय मामींनीपण धमाल धागे असा धागा चालू केला आहेच.
>> हो माहित आहे.

वरूणरावांचा लेख मुद्दाम मरगळलेल्या मायबोलीत चैतन्य आणण्यासाठी लिहिलेला दिसतोय.
बर्‍याच दिवसांत तावातावात काही चर्चा झाली नाही म्हणून!
Wink

वरूणराव तुम्ही तुमचा कंपू बनवा ना. हा का ना का.

बर्‍याच दिवसांत तावातावात काही चर्चा झाली नाही म्हणून!<<< साती, बर्‍याच दिवसांनी आलीस की काय तू इथे? तावातावात चर्चा चालू आहेत अद्यापही.

वरुण, अहो लिहिलेले लेख दिसतात. वाचताना आपल्याला कोणी दिसत नाहीत. Wink
आणि प्रतिसाद फक्त लेख प्रतिसाद देण्यासारखा वाटला तरच देतात.
थोडक्यात काय लिहिणारे आणि वाचणारे आहेत .... प्रतिसाद द्यायलाच पाहिजे अशी सक्ती नाही करता येत.

आता तुमचंच बघा. हा लेख वगळता, तुम्ही फक्त तीन लेख लिहिलेत त्यातल्या दोन लेखांना कोणी प्रतिसाद नाही दिला म्हणून तुमची चिडचिड झाली. पण तुमचा सदस्य झाल्यापासूनचा कालावधी 3 वर्ष 20 आठवडे आहे आणि तुमच्या पाऊलखुणांत फक्त ७ लेख दिसताहेत. त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय?

वाचनापेक्षा लेखन जास्त >> हा प्रश्न / प्रॉब्लेम नसून चांगली गोष्ट आहे. खूप लोक एखाद्या ठिकाणी लिहित आहेत- ही लिहिणार्‍यांच्या मानसिक गरजेच्या, तसेच एकंदरच भाषेच्या आरोग्या-संवर्धनासाठी फारच चांगली गोष्ट आहे. आतापर्यंत शेकडो वर्षे लेखक थोडे नि वाचक फार अशी गंमत होती. आता वाढत्या संसाधनांनी का होईना, जरा उलटे होतेय हे सुचिन्ह आहे.

बाकी वाचन, त्यातला आनंद नि त्यातली अभिरुची हे ज्याचे तो बघून घेईल. आपण आपल्या लिहिण्यातल्या आनंदाकडे बघून घ्यावे. Happy

>>>> लेखन चांगले असेल तर त्याला चांगले प्रतिसाद आपोआप मिळतात; <<<<<
>>>>> उत्तम लेखनासाठी "प्रतिसादसंख्या" हा निकष होऊ शकत नाही. चांगले लेख लोकांकडून वाचले जातात <<<<<
अगदी अगदी! Happy
माझा तर अनुभव असाहे की प्रतिसाद असेल वा नसेल, तुमचे लेखन चान्गले असेल तर वाचले जातेच जाते.
[तर तर, अगदी माझा शत्रूकम्पु देखिल माझे लेखन वाचतो, भले नाके मुरडत प्रतिसाद देत नसेनाका, Proud ]

>>>>>>>> वाचनापेक्षा लेखन जास्त >> हा प्रश्न / प्रॉब्लेम नसून चांगली गोष्ट आहे. खूप लोक एखाद्या ठिकाणी लिहित आहेत- ही लिहिणार्‍यांच्या मानसिक गरजेच्या, तसेच एकंदरच भाषेच्या आरोग्या-संवर्धनासाठी फारच चांगली गोष्ट आहे. <<<<<<, प्रचंड अनुमोदन Happy
बहुतेकवेळा मी लिहीतो, ते वाचकांकरता वा त्यान्च्या प्रतिसादाकरता नसून, तसे लिहीणे / लिखाणातून माझ्याच समोर मीच व्यक्त होणे ही माझीच गरज असते. वाचकान्चा प्रतिसाद लाभलाच, तर मग दुधात साखर असे म्हणावे लागेल. Happy

@ वरुन मायबोली वर वाचनापेक्षा लेखन जास्त होते असा माझा दावा आहे.---

(लिहीण सोप कि वाचण हे स्वतःला विचाराव सर्व साधारण माणसांना वाचणच सोप असाव)
मामींना अनुमोदन मी स्वतः माबोचा निरंतर वाचक आहे,तुम्हीही व्हा आणि तुमचे लिखाणावर खूप प्रतिक्रिया याव्या अस तुम्हाला वाटत असेल तर-
१) चांगले लिखाण करा
२) इतरांचे लिखाण आवडल्यास अवश्य प्रतिक्रिया द्या
३) इतरांची विपू करुन मित्र वाढवा (त्यासाठी माबोकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन होतच असते

Uhoh
Light 1

लिखाणातून एकमेकांशी संवाद साधला जातो हे काय कमी आहे,
प्रतिसाद मिळाले नाही म्हणजे लिखाण कोणी वाचल नाही अस अजिबात नाही
माबोवर आयडी नसलेले बरेचसे लोक वाचन करत असतात .

त्यातूनही जी मंडळी येथेच वरचेवर पडीक असतात त्यांचे अनेक लेख आणि इतर लेखन दर्जेदार असते निःसंशय ! परंतु त्यांचे ''अहो रूपं अहो ध्वनी'' चालू असते.>>>>>>>>> +१०००००००००००००००००००००००

वरुण माबोवर चांगले लिखाण , वाइट लिखाण असे काहिहि नसते. तुम्हि एक आठवडा फक्त माबोवर वाचन करीत जा. लेख वाचला नाहि तरी चालेल, कोणी लिहिला आहे ते बघा, प्रतिसाद मात्र वाचत जा आणी तो कोणी लिहिला आहे ते बघत जा. दुसर्या आठवड्यात प्रतिसाद देण्याला सुरवात करा. काहिच सुचले नाहि तर +१ , +१०० असे टाकुन द्या, अधुन मधुन स्मायली टाका. ज्यांन +१ , +१०० असे दिले ती मंडळी तुम्हालाही मग +१ देतील. अशा पद्धतीने तुम्हि कंपु जमवालात की मग तुमच्या लिखाणाला प्रतिसादच प्रतिसाद मग तुम्हि काहिहि वाटेल ते लिहिले तरी लोक रुमाल टाकतील, अनुमोदन देतील, बोल्ड मध्ये लिहुन देखील अनुमोदन देतील, तुमच्या लिखाणाला कोणी नावे ठेवली तर त्याचावर सर्वजण हल्ला चढवतील. Proud

>>>> काहिच सुचले नाहि तर +१ , +१०० असे टाकुन द्या, अधुन मधुन स्मायली टाका. ज्यांन +१ , +१०० <<<<
अरेच्च्या, माणसा, मग तुझ्या पोस्ट मधिल हे "+१००००००००००००००००००००००" कशाचे द्योतक समजायचे? तूला काहीच न सूचण्याचे हे सध्याचे वाढता वाढता वाढे परिमाण आहे का? Wink Proud ग्रेट.

तूला काहीच न सूचण्याचे हे सध्याचे वाढता वाढता वाढे परिमाण आहे का? >>>>>>> अहो हे तुमच्या पोस्ट पाहुनच शिकलो मी राव! तुम्हि माझा +१ चा सल्ला वाचला पण पहिला आठवडा फक्त वाचत जा हे नाहि वाचले. Biggrin
कोणत्याच धाग्यावर नीट वाचत नाहि राव तुम्हि Proud Proud

...

मला वाटते लेखाच्या खाली इतकी-इतकी वाचने किंव्हा किती जणानी धागा उघडला ती संख्या लेखकाला/सर्वांना दिसेल अशी काही सोय करता येऊ शकते का?

Pages