आयपीएल फिक्सिंग : पैशाची हाव कुठवर?

Submitted by नंदिनी on 16 May, 2013 - 23:18

स्पॉट फिक्सिंगच्या आरोपामधे श्रीशांत आणि अजून दोन खेळाडूंना अटक झाली आहे. यावरून काल वृत्तवाहिन्यांमधे कालपासून गरमागरम चर्चा चालू आहेत. आयपीएल बंदच करावे अशी एक टोकाची मागणीदेखील समोर येत आहे. फेसबूक, ट्विटरवर्देखील या चर्चा रंगात आलेल्या आहेत. (मग मायबोलीने का मागे रहावे?)

पण लक्षात घेण्यासारखा मुद्दा हा आहे की: या खेळाडूंनी फिक्सिंग केले तरी नक्की कशासाठी? आयपीएल व त्यामधून मिळणार्‍या जाहिरातींमधून कितीतरी उत्पन्न खेळाडूंना राजरोस मिळत आहे. त्याखेरीज वर्षभर इतर टूर्नामेंट्स चालूच असतात. तरीदेखील अजून पैशाच्या लोभाने हे असे फिक्सिंग करावेसे का वाटले असेल? आपण जो खेळ खेळतो त्या खेळाची प्रतारणा, ज्या संघासाठी खेळतो त्याच्याशी प्रतारणा शिवाय कायद्याने गुन्हा ठरणारी गोष्ट जर कुणी करत असेल तर ते नेमके कशासाठी? नुसती पैशाची हाव की अजून काही?? बीसीसीआयच्या खेळाडूंना आता काऊन्सिलीन्ग द्यायची वेळ आली आहे का? बीसीसीआय, खेळाडू, संघ अशा सर्वांनीच आता याचा मुळापासून विचार करायला हवा.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, स्पॉट फिक्सिंग होते ते मुळात बूकीज आणि क्रिकेटवरून चालणार्‍या सट्ट्यामधे. या व्यवहारामधे बूकीज स्वतःचा फायदा करून घेताना जर खेळाडूला साठ लाख रूपये एका ओव्हरला लावायला तयार असतील तर मुळात किती जण क्रिकेटच्या सट्ट्यावर पैसे लावतात? तेदेखील किती करोडो रूपये? भारतामधे हा जुगार इतका का फोफावत चालला आहे? हीदेखील एक प्रकारे पैशाची हावच म्हणायला हवी ना. आपल्याला ईझी मनी मिळवायची इतकी हौस का असते? कायदाम नैतिकता, मूल्ये यामधे कुठेही न बसणारी अशी ही हौस माणसामधे निर्माण का होत असावी? अशा अनेक प्रश्नांचा इथे उहापोह व्हावा ही आशा.

कृपया, वैयक्तिक ताशेरे, टीकाटिप्पणी करू नका. आपली मते सभ्य भाषेत मांडा. धन्यवाद.

(अवांतर: त्या श्रीशांतला इन्डियन टीममधे स्वत:ची जागा फिक्स करता येत नाही. स्पॉट फिक्सिंग कसलं डोंबलाचं करतोय?)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फिक्सिंग ' ही वृत्ती आहे
>>>>
चोरी ही सुद्धा वृत्ती आहे, पण कोणी देशाची गोपनीय कागदपत्रे चोरून शत्रूराष्ट्राला देत असेल तर त्याची तुलना आपण या धाग्यात उल्लेख केलेल्या चोर्‍यांशी तर नाही ना करू शकत?

माझ्या वाईट सवयी १ - चोरी - https://www.maayboli.com/node/56756

*तर त्याची तुलना आपण या धाग्यात उल्लेख केलेल्या चोर्‍यांशी तर नाही ना करू शकत?* - लांडीलबाडी इतर कुठल्याही क्षेत्रात निषिध्दच पण कमी अधिक प्रमाणात ती असतेच ( व तिला आळा घालायला कायदे असतातच. ). म्हणूनच तर त्याशिवायही गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी विशेषतः मुलं व तरूणांना मिळावी यासाठी क्रिडाक्षेत्र निर्माण झालं. आतां तिथंही लांडीलबाडी क्षम्य समजणं ह्याचा जो अर्थ मला उमजला, त्यानुसार माझं मत मीं मांडलंय. ' क्रिडा ' ( sports) या संज्ञेत बसणारया सर्वच खेळाना तें लागू होतं.

चोरी ही सुद्धा वृत्ती आहे, पण कोणी देशाची गोपनीय कागदपत्रे चोरून शत्रूराष्ट्राला देत असेल तर त्याची तुलना आपण या धाग्यात उल्लेख केलेल्या चोर्‍यांशी तर नाही ना करू शकत? >> (सिद्ध झालेला) गुन्हा हा गुन्हाच असतो - छोटा असो वा मोठा. शिक्षा स्वरुपानुसार कमी जास्त होणे समजू शकतो. त्यामूळे भाऊंना अनुमोदन. "लांडीलबाडी इतर कुठल्याही क्षेत्रात निषिध्दच" एव्हढेच नाही तर 'इतरांवर सतत ठपका ठेवत राहणे नि कसलाही पुरावा न देता, केवळ मला वाटते म्हणून असे म्हणत त्यांच्या इंटीग्रिटिवर शंका घेत राहणे' हे सुद्धा निषिध्दच असावे.

चोरी करायची व ती पचवायची ज्याला सवय झालीय त्याला उद्या देशाची गुपिते विकताना काहीही वाटणार नाही. जो आयपीएलसाठी फिक्सइंग करतोय तो उद्या देशासाठी खेळताना का नाही करणार?? एकदा धंद्यात पडले की कुठलाही धंदा कितीही गंदा असला तरी तो धंदाच असतो. दाऊद इब्राहिमचा पहिला गुन्हा सामान्य फुटकळच होता....

>>'इतरांवर सतत ठपका ठेवत राहणे नि कसलाही पुरावा न देता, केवळ मला वाटते म्हणून असे म्हणत त्यांच्या इंटीग्रिटिवर शंका घेत राहणे' हे सुद्धा निषिध्दच असावे.

अगदी खरय!
आयपीएलच्या मॅचेस जरा घासून झाल्या की लगेच असल्या चर्चांना उधाण येते आणि इंटरेस्ट घेऊन आयपीएल बघणाऱ्यांकडे बघून तु.क. टाकले जातात

इतरांवर सतत ठपका ठेवत राहणे नि कसलाही पुरावा न देता, केवळ मला वाटते म्हणून असे म्हणत त्यांच्या इंटीग्रिटिवर शंका घेत राहणे' हे सुद्धा निषिध्दच असावे.
>>>>>>>>

जाणकारांच्या माहितीसाठी म्हणून हे वाक्य मी आयपीएलच्या संशयास्पद सामन्यांवर संशय घेतल्यामुळे आले आहे हे नमूद करतो Happy

असामी, तुम्ही कधी राजकारणाच्या धाग्यावर चक्कर टाकली आहे का? तिथे केवळ हे आणि हेच चालू असते Happy आणि ते देखील एकाच राजकीय पक्षाची बाजू घेऊन कसलेही पुरावे सादर न करता समोरच्या पक्षातील राजकारण्यांवर आरोप चालू असतात. मी क्रिकेट आणि देशाची बाजू घेऊन संशयास्पद सामन्यांकडे बोट दाखवतो. आणि काही राजा हरिश्चद्राच्या परीवाराकडे बोट दाखवत नाहीये तर क्रिकेट आणि त्याहीपेक्षा आयपीएलमध्ये फिक्सिंग चालते हे जगजाहीर आहे. पकडले गेलेत लोकं. म्हणून हा धागा आहे. आणि आता कोणी पकडले जात नसेल तर आयपीएलमधील फिक्सिंग आणि बेटींग संपुष्टात आलीय हा भाबडा समज आहे. जेव्हा अझर जडेजा यांचे नावही फिक्सर म्हणून नव्हते तेव्हा आमच्याकडे धेमड्या पोरालाही ठाऊक होते की हे दोघे फिक्सर आहेत. शून्य धक्का बसला त्यामुळे जेव्हा यांची नावे उजेडात आली Happy

चोरी करायची व ती पचवायची ज्याला सवय झालीय त्याला उद्या देशाची गुपिते विकताना काहीही वाटणार नाही
>>>

थोडा सूक्ष्म विचार केला तर लक्षात येईल की आपण सर्वांनीच आयुष्यात कधी ना कधी काहीतरी चोरी नक्कीच केली असेल.
मग ती टॅक्स चोरी असो, एखाद्या बागेतील फूल तोडणे असो, पायरेटेड कॉपीवर सिनेमा बघणे असो, सॉफ्टवेअर वापरणे असो वा कॉपीराईट असलेली ईमेज वापरणे असो, वा ईतर काहीही...
याचा अर्थ आपण सर्व देशद्रोह करायला एलिजिबल आहोत Happy

आयपीएलच्या मॅचेस जरा घासून झाल्या की लगेच असल्या चर्चांना उधाण येते आणि इंटरेस्ट घेऊन आयपीएल बघणाऱ्यांकडे बघून तु.क. टाकले जातात
>>>>>>>

मी स्वतः आयपीएलमधील फिक्सिंगवर चर्चा करतो पण त्याचवेळी आयपीएल सामने ईंटरेस्ट घेऊन बघतो. किंबहुना ईतका ईटरेस्ट घेऊन अपवादानेच मायबोलीवर कोणी बघत असेल, एकूण एक बॉल बघितलाय यंदाही आयपीएलचा. आणि सतत ३-४ तास प्रत्येक सामन्याला चर्चाही केलीय व्हॉटसपग्रूपवर.

आपल्याला ईंटरेस्ट आहे ते करावे माणसाने, त्याकडे कोण तु,क, टाकतोय की थु क टाकतोय का पर्वा करावी Happy

>>आपल्याला ईंटरेस्ट आहे ते करावे माणसाने, त्याकडे कोण तु,क, टाकतोय की थु क टाकतोय का पर्वा करावी Happy

अरे मी आमच्यासारख्या सामान्य माणसांबद्दल बोलत होतो!
फिक्सिंगचा किडा वळवळत ठेवून तरीही इंटरेस्ट घेऊन सामने बघण्याइतके असामान्यत्व नाही आलेय अजुन आमच्यात Wink

असू दे आयपील फिक्स...
आता wwe ( जुने wwf) फिक्स असते तरी मजेने बघतातच की पब्लिक...
नक्की काय फिक्स आहे हे माहीत नसेल तर आपल्यासारख्या प्रेक्षकांना तर मजा तितकीच येणार आहे...

*अकरावीत....मोठा हृदयभंग झाला होता माझा त्या क्षणी.* -
पुढील कसोटीसाठी योग्य वेळी हृदयभंगाची नेट प्रॅक्टीस मिळाली म्हणायची ! Wink

फिक्सिंगचा किडा वळवळत ठेवून तरीही इंटरेस्ट घेऊन सामने बघण्याइतके असामान्यत्व नाही आलेय अजुन आमच्यात
>>>
आयपीएलमध्ये फिक्सिंग चालते हे जगाला ठाऊक आहे. पण सगळंच फिक्स नसते, ते शक्यही नाही. त्यामुळे काय फिक्स आणि काय नाही हे आपल्या मनाने वेचता आले की झाले. मग ईंटरेस्ट कायम राहतो.
उलट काहीच फिक्स नाही असा विश्वास बाळगून आयपीएल बघणारे खरे असामान्य म्हणायला हवे. हा निरागसपणा ऊपजत असतो. त्याचा आव आणता येत नाही. मी अश्यांचा हेवाच करतो. यात कसलाही टोमणा नाही. आई मीन ईट Happy

ते डबल्यू डबल्यू एफ मला तर चौथी पाचवी जेव्हा केव्हा ते पहिल्यांदा पाहिले तेव्हाच ती नाटके कळली होती. कोणी तो अंडरढेकर मरतो आणि पुन्हा जिवंत होतो, आणि सारे फायटर सर्कसच्या जोकरसारखे फॅन्सी कपडे घालून फिरतात, सोबत बायका बाळगतात, त्या पण मारामारी करतात, मारायची स्टाईलही किती नकली हे सहज समजून येते. मार खाल्लेला अचानक हिंदी पिक्चरसारखा ऊठतो आणि जल्लोष करणार्‍याला अचानक बुकलतो, पब्लिक उगाच चेकाळत राहते, जसे ते खोटे लाफ्टर टाकून हसवायला बघतात, वगैरे पैतरे वापरून परीपुर्ण केलेली स्क्रिप्टेड मारामारी समजायला किती सोपे होते. कधीच स्वतःहून ते बघितले नाही. पण आमच्याईकडची एक्स वाई झेड पोरं वाई झेड सारखे ते बघत बसायचे त्यामुळे त्यांच्यासोबत ग्रूपमध्ये असताना नाईलाजाने बघावे लागायचे, जसे घरी आईमुळे मराठी मालिका बघाव्या लागतात.

बाकी मला त्याच्यावरचे ट्रंप कार्ड खेळायला मजा यायची, चेस्ट बाईस्केप वेट हाईट फाईट फॉट वोन रँक वगैरे.... त्यात मी चॅम्पियन होतो. चिटींग करून जिंकायचो नेहमीच.

ही सगळी दुनिया फिक्स आहे. आपण प्रोग्राम केलेले इंटिटीज आहोत. जे घडणार आहे ते घडणारच. त्यामुळे फिक्स आहे की यावर जास्त डोकं न चालवता आहे त्याचा आनंद घ्यायचा.

*फिक्स आहे की यावर जास्त डोकं न चालवता आहे त्याचा आनंद घ्यायचा.* - वा:, नुसतच असं कसं ! शिवाय, कोणी , कसं व किती सफाईने फिक्सिंग केलं, त्याला नेमकं क्राॅस फिक्सिंग कसं झालं इ.चं विश्लेषण करायलाही काॅमेंट्री बाॅक्समधे व इथल्या धाग्यांवर 'फिक्सिंग तज्ञ'ही ्या्वे लागतीलच ना ! Wink

भाऊ!!
एक खुमासदार व्यंगचित्र येऊद्या Happy

*एक खुमासदार व्यंगचित्र येऊद्या* - केवळ आपकी फर्माईश , म्हणून ( 'खुमासदार'ची गॅरंटी अजिबात नाहीं) - Wink

बघताय ना आजुबाजूला प्रेमविवाहांचं ! आपलं टिकलंय इतकीं वर्ष, केवळ तें फिक्सिंग होतं म्हणूनच !!!
20200107_094448.jpg

भाऊ व्यंगचित्र Proud

कसं व किती सफाईने फिक्सिंग केलं, त्याला नेमकं क्राॅस फिक्सिंग कसं झालं इ.चं विश्लेषण करायलाही ....
>>>>>
आम्ही व्हॉटसपग्रूपवर करतो याचीही चर्चा. क्रिकेटच्या तांत्रिक बाबी, डावपेच,चालू मॅचची स्थिती या सगळ्यासोबत जे जे क्रिकेटशी संबंधित आहे त्या सर्व पैलूंची चर्चा करतो. ऑफ द फिल्ड क्रिकेटमधील राजकारणाचीही करतो.
क्रिकेटर्सच्या पर्सनल लाईफबद्दल मात्र अवाक्षरही कोणी काढत नाही. तसा नियमच आहे. पण फिक्सिंग वा संघनिवडीतले राजकारण ज्याचा खेळावर प्रभाव पडतो ते अस्तित्वातच नाही समजून क्रिकेट बघणे हे मांजरासारखे डोळे मिटून दूध पिण्यासारखे झाले. एखाद्याची वैयक्तिक आवड तशी असेल तर ठिक आहे पण पुर्ण ग्रूप वा सारेच क्रिकेटप्रेमी असे करू लागले तर ते खेळासाठीच कमालीचे घातक ठरेल. एक क्रिकेटप्रेमी म्हणून मी खेळाचा असा र्हास बघू शकत नाही.

माझ्याकडे यकोझुना आणि मिस्टर जायंट असायचे, जिंकणे सोपे व्हायचे...
>>>>
मी हातातले कार्डस बेमालूमपणे वरखाली करायचो.
पत्यातले कित्येक खेळ डोके चालवायचा भाग अत्यल्प वा शून्य आणि लक वरच मोठ्या प्रमाणात अवलंबून असायचे. मग अश्यावेळी डोके किंवा स्किल कुठे वापरायचे? तर ते चिटींग करायला. कारण नुसते नशीबाच्या जीवावर चालणारे खेळ खेळायला बोअर होते. खेळात बुद्धी आणि कौशल्याचा वापर असेल तरच त्या खेळाला अर्थ आहे.

*खेळात बुद्धी आणि कौशल्याचा वापर असेल तरच त्या खेळाला अर्थ आहे.* - आणि ज्या खेळात यालाच भरपूर वाव व मानाचं स्थान आहे, त्या खेळात तुम्हीच वरच्या तुमच्या सर्व पोस्टमधे 'चिटींग' करणारयांचं समर्थन कसं करतां ? *...क्रिकेटप्रेमी म्हणून मी खेळाचा असा र्हास बघू शकत नाही.* क्रिकेटचा खरा र्हास ' क्रिकेट बघणे हे मांजरासारखे डोळे मिटून दूध पिण्यासारखे झाले', यांत आहे कीं 'फिकसींग 'मुळे क्रिकेट बदनाम होण्यात आहे, हा खरा कळीचा मुद्दा आहे. राजकारणाची प्रतिमा गढूळ झाली म्हणून खरे प्रतिभावान व कर्तबगार लोक त्यापासून दूर गेले. तेंच क्रिकेटच्या बाबतीत होवूं नये म्हणूनच 'फिकसींग 'बाबत निषठूर रहाणं अपरिहार्य. 'फिकसींग ' प्रत्यक्षात होतं कीं नाही किंवा तें कुणी मान्य करतं कीं नाहीं , हें दुययम .

त्या खेळात तुम्हीच वरच्या तुमच्या सर्व पोस्टमधे 'चिटींग' करणारयांचं समर्थन कसं करतां ?
>>>
मी केली? कुठे केली? माझ्या तर डोक्यात जातात फिक्सर लोकांना कॉमेंटरीला नुसते बघूनही संताप होतो.. मी तर डबल स्टॅण्डर्डबद्दल भाष्य केलेय.

*मी तर डबल स्टॅण्डर्डबद्दल भाष्य केलेय.* - काॅमेंटरी करणारया व इतर फिकसर या दोघांनाही फटकवा असं नाहीं म्हणत ना तुम्ही; त्याना काॅमेंटरी मग यांनाच शिक्षा कां, असं विचारताय. मला यात फरक जाणवतो, इतकंच. दोघेही क्रिकेटच्या अहिताला तितकेच जबाबदार आहेत, हें महत्वाचं.

दोघेही क्रिकेटच्या अहिताला तितकेच जबाबदार आहेत, हें महत्वाचं.
>>>
मला तितकेच जबाबदार हे पटत नाही. दोन्ही कमी जास्त प्रमाणात जबाबदार आहेत असे वाटते. देशासाठी खेळताना फिक्सिंग करणारे ज्येष्ठ खेळाडू जास्त जबाबदार आहेत आयपीएलमधील युवांपेक्षा. तसेच त्या ज्येष्ठांना पुन्हा संधी देणारे सुद्धा युवांना चुकीचा संदेश देत आहेत आणि ते सुद्धा जबाबदार आहेत. आणि तो चुकीचा संदेश घेऊन युवा चुकले तर त्यांना मात्र जास्त कडक शिक्षा. अजब न्याय आहे हा Happy

*मला तितकेच जबाबदार हे पटत नाही. * - असेलही ही मतभिन्नता व त्यांत गैर कांहीच नाहीं. पण क्रिकेटचं अहित होवूं नये याबाबत आपल्या दोघांच्या भावना तितक्याच तीव्र आहेत व यावर आपलं एकमत आहे , हें सर्वात महत्वाचं.

भाऊ, एक नंबर! !!!

ऋन्मेऽऽष "जेव्हा अझर जडेजा यांचे नावही फिक्सर म्हणून नव्हते तेव्हा आमच्याकडे धेमड्या पोरालाही ठाऊक होते की हे दोघे फिक्सर आहेत. शून्य धक्का बसला त्यामुळे जेव्हा यांची नावे उजेडात आली" काही दिवसांनंतर तुच क्रिकेट शोधून काढलेस नि गोर्‍यांना शिकवलेस एकोणिसाव्या शतकात असे लिहिलेस तरी मला आश्चर्य वाटणार नाही रे बाबा.

Pages