आयपीएल फिक्सिंग : पैशाची हाव कुठवर?

Submitted by नंदिनी on 16 May, 2013 - 23:18

स्पॉट फिक्सिंगच्या आरोपामधे श्रीशांत आणि अजून दोन खेळाडूंना अटक झाली आहे. यावरून काल वृत्तवाहिन्यांमधे कालपासून गरमागरम चर्चा चालू आहेत. आयपीएल बंदच करावे अशी एक टोकाची मागणीदेखील समोर येत आहे. फेसबूक, ट्विटरवर्देखील या चर्चा रंगात आलेल्या आहेत. (मग मायबोलीने का मागे रहावे?)

पण लक्षात घेण्यासारखा मुद्दा हा आहे की: या खेळाडूंनी फिक्सिंग केले तरी नक्की कशासाठी? आयपीएल व त्यामधून मिळणार्‍या जाहिरातींमधून कितीतरी उत्पन्न खेळाडूंना राजरोस मिळत आहे. त्याखेरीज वर्षभर इतर टूर्नामेंट्स चालूच असतात. तरीदेखील अजून पैशाच्या लोभाने हे असे फिक्सिंग करावेसे का वाटले असेल? आपण जो खेळ खेळतो त्या खेळाची प्रतारणा, ज्या संघासाठी खेळतो त्याच्याशी प्रतारणा शिवाय कायद्याने गुन्हा ठरणारी गोष्ट जर कुणी करत असेल तर ते नेमके कशासाठी? नुसती पैशाची हाव की अजून काही?? बीसीसीआयच्या खेळाडूंना आता काऊन्सिलीन्ग द्यायची वेळ आली आहे का? बीसीसीआय, खेळाडू, संघ अशा सर्वांनीच आता याचा मुळापासून विचार करायला हवा.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, स्पॉट फिक्सिंग होते ते मुळात बूकीज आणि क्रिकेटवरून चालणार्‍या सट्ट्यामधे. या व्यवहारामधे बूकीज स्वतःचा फायदा करून घेताना जर खेळाडूला साठ लाख रूपये एका ओव्हरला लावायला तयार असतील तर मुळात किती जण क्रिकेटच्या सट्ट्यावर पैसे लावतात? तेदेखील किती करोडो रूपये? भारतामधे हा जुगार इतका का फोफावत चालला आहे? हीदेखील एक प्रकारे पैशाची हावच म्हणायला हवी ना. आपल्याला ईझी मनी मिळवायची इतकी हौस का असते? कायदाम नैतिकता, मूल्ये यामधे कुठेही न बसणारी अशी ही हौस माणसामधे निर्माण का होत असावी? अशा अनेक प्रश्नांचा इथे उहापोह व्हावा ही आशा.

कृपया, वैयक्तिक ताशेरे, टीकाटिप्पणी करू नका. आपली मते सभ्य भाषेत मांडा. धन्यवाद.

(अवांतर: त्या श्रीशांतला इन्डियन टीममधे स्वत:ची जागा फिक्स करता येत नाही. स्पॉट फिक्सिंग कसलं डोंबलाचं करतोय?)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

घ्या! आता गुरुनाथ मैयप्पन चेन्नई सुपर किंग्जचा मालक नाहीये असा दावा केला जाऊ लागलाय : http://www.espncricinfo.com/indian-premier-league-2013/content/story/637...

काही तरी करून रविवारी चेसुकिंला खेळवायचा मनसुबा स्पष्ट आहे. नाहीतर त्यावर लावलेला सट्टा वसूल कसा होणार!

-गा.पै.

उदयन.. | 24 May, 2013 - 01:01>>>>>> हसावे का रडावे समजत नाहि. सचिनचे केवढे कौतुक ! वा ! वा!

फिकिसंग होते ते माहित असुनहि त्याने मैच जिंकुन दिली! छान छान. पण पोलिसांना नाहि सांगितले.
उद्या एखादा माणुस काहितरी वस्तु ठेउन गुपचुप सोडुन जाताना दिसला, तर पाळा सचिनचा आदर्श! स्फोट झाल्यावर, शेकडो माणसे मेल्यावर मग जाउन भेटा पोलिसांना!

कायपण आदर्श आणी काय पण सपोर्ट देणारे माणसे. जो माणुस भारतीय संघात आहे, ज्याला फोन आला, ज्याला समजले की काहितरी पाणी मुरत आहे त्याने (जर खरोखर त्याला काहि लाज असेल तर) लगेच पोलिसांना फोन केला असता! ज्याला फोन आला त्याने हि माहिती पोलिसांना द्यायला पाहिजे होती का माबोवर कोणीतरी १० वर्षापुर्वीची काहितरी पोस्ट केली म्हणुन ती वाचणाराने ती माहिती द्यायची ! कायपण लोजिक!

<<अजून एक बाफ लवकरच धारातिर्थी पडणार. >>

हा हा! अजुन थोडी धुगधुगी बाकि आहे... Happy

बादवे, फिक्सिंग्/नो फिक्सिंग आयपीएल (एकेए टी-२०) ने जरार्जर अवस्थेतल्या क्रिकेटला नविन उभारी दिलेली आहे. या मुध्यावर कोणाचंहि दुमत नसावं. Happy

ज्याला फोन आला त्याने हि माहिती पोलिसांना द्यायला पाहिजे होती का माबोवर कोणीतरी १० वर्षापुर्वीची काहितरी पोस्ट केली म्हणुन ती वाचणाराने ती माहिती द्यायची ! कायपण लोजिक!>> आणी लेलेंनी कुठल्यातरी चॅनेलवर सांगितले हे लॉजिक फार जबरदस्त आहे असे का वाटते तुम्हाला ?

आणी लेलेंनी कुठल्यातरी चॅनेलवर सांगितले हे लॉजिक फार जबरदस्त आहे असे का वाटते तुम्हाला ?>>>>>> असे वाटले असे कोठे म्हणले मी ???? पण लेलेंना डोक्यावर घेणारी पोस्ट आहे का इथे ? तशी पोस्ट टाका, मग त्यांच्याबद्दलही लिहितो!

माणसा.... तु रडच...तेच येते तुला... Happy
.
मी फक्त माहीती दिलेली आणि नंतर तुमच्या सारख्या पुळका आलेल्यांना मार्ग दाखवला..;)
.
बडबड करण्यापेक्शा क्रुती करा...
.
बघा जमते का... :हाहा:.

ज्या फोनवरून तुम्ही इतरांनी हे केले पाहिजे, ते करायला हवे होते म्हणताय तो कोणाचा आहे हे पहा म्हणजे प्रश्न का विचारला ते लक्षात येईल.

भारतीय क्रिकेट मंडळाचे (BCCI) अध्यक्ष श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मय्यप्पन यांना मुंबई पोलिसांनी आज मध्यरात्री अटक केली. हा तर चेन्नई टिमचा मालक (CEO) होता (नन्तर ते नाकारले... केवळ सन्चालक बोर्डात आहे)...

http://www.rediff.com/cricket/report/ipl-csk-owner-meiyappan-arrested-in...

आता श्रीनिवासन जाणार (आणि जेटली येणार?).

अरे वा, नंदिनी हा तर भारीच हॅपनिंग धागा! Happy

पण यातलं काही मला कळत नसल्याने आणि क्रिकेटविषयी तर्‍ काहिही कळत नसल्याने माझ्याकडून पास.

मी फक्त माहीती दिलेली आणि नंतर तुमच्या सारख्या पुळका आलेल्यांना मार्ग दाखवला>>>>>>
ज्या फोनवरून तुम्ही इतरांनी हे केले पाहिजे, ते करायला हवे होते म्हणताय तो कोणाचा आहे हे>>>>>>>
माहिती कसली दिलीस तु ? एक प्रतिसाद टाकला म्हणजे माहिती दिलीस का ? मला पुरावे दे , कोणत्या पेपरमध्ये बातमी आली ते दे, नाहितर लेल्यांना नाहितर सचिनला घेउन ये, मग जातो मी पोलिसांकडे.

आणी ज्या लोकांना सचिनने पोलिसांना सांगितले नाहि हे बरोबर वाटते आहे त्यांनी भारतात राहु नये. पाकड्यात निघुन जावे. हवेतर सचिनला घेउन निघुन जावे. आयपील मरु देत. जर भारतीय संघ represent करणारी मैच असेल आणी फिकिसंग होत आहे हे माहित असताना पोलिसांना कळवले नसेल आणी ते कळवले नाहि हे ज्यांना बरोबर वाटत असेल ते देशद्रोहि आहेत. त्यांनी भारतात राहु नये.

लेल्यांनी सांगितलेल्या माहितीचा तपशीलच चुकीचा असल्याने ही गोष्ट खरंच झाली होती की लेले फेकतायत येथपासूनच सुरवात आहे. तसा तर काय कोणीही तोंडाला येईल ते बोलेल.

लै लै मजा सुरुय.
फक्त धाग्यातच नव्हे तर सगळीकडेच.
६ महिने वर्षाने सर्व सुरळीत होइल.

आणी ज्या लोकांना सचिनने पोलिसांना सांगितले नाहि हे बरोबर वाटते आहे त्यांनी भारतात राहु नये. पाकड्यात निघुन जावे. हवेतर सचिनला घेउन निघुन जावे. आयपील मरु देत. जर भारतीय संघ represent करणारी मैच असेल आणी फिकिसंग होत आहे हे माहित असताना पोलिसांना कळवले नसेल आणी ते कळवले नाहि हे ज्यांना बरोबर वाटत असेल ते देशद्रोहि आहेत. त्यांनी भारतात राहु नये. > :)) :)) :))

पण यातलं काही मला कळत नसल्याने आणि क्रिकेटविषयी तर्‍ काहिही कळत नसल्याने माझ्याकडून पास.
>> असं कसं? विषय समजत असलं तरच बोलायचं म्हटलं तर मग तो धागा कसला डोंबलाचा हॅपनिंग. लिहिलंच पाहिजे ब्वा... Wink

जर भारतीय संघ represent करणारी मैच असेल आणी फिकिसंग होत आहे हे माहित असताना पोलिसांना कळवले नसेल आणी ते कळवले नाहि हे ज्यांना बरोबर वाटत असेल ते देशद्रोहि आहेत. त्यांनी भारतात राहु नये.>>>> Lol

हा तर चेन्नई टिमचा मालक (CEO) होता (नन्तर ते नाकारले... केवळ सन्चालक बोर्डात आहे)...
<<< उदय, इतके दिवस त्याचा उदो उदो चालू होता आणि आता त्याला disown करायची किती ती घाई!! श्रीनिवासन विरूद्ध ती एक Conflict of interest म्हणून कंप्लेंट केली होती तेव्हा "मी नव्हे हा गुरूनाथ मालक आहे टीमचा" अशी भूमिका घेतली होती आणि आता त्याचा टीमशी काहीही संबंध नाही म्हणे. मग इतके दिवस डग आऊटमधे बसलेला दिसत होता आनी गळ्यामधे टीम ओनरचा बॅज होता ते कसे काय म्हणे??

श्रीनिवासन जाणार आणि मोदी येणार. Proud

भास्कराचार्य | 25 May, 2013 - 08:43 नवीन

लेल्यांनी सांगितलेल्या माहितीचा तपशीलच चुकीचा असल्याने ही गोष्ट खरंच झाली होती की लेले फेकतायत येथपासूनच सुरवात आहे. तसा तर काय कोणीही तोंडाला येईल ते बोलेल.<<< Lol Lol

आणी ज्या लोकांना सचिनने पोलिसांना सांगितले नाहि हे बरोबर वाटते आहे त्यांनी भारतात राहु नये. पाकड्यात निघुन जावे. हवेतर सचिनला घेउन निघुन जावे. आयपील मरु देत. जर भारतीय संघ represent करणारी मैच असेल आणी फिकिसंग होत आहे हे माहित असताना पोलिसांना कळवले नसेल आणी ते कळवले नाहि हे ज्यांना बरोबर वाटत असेल ते देशद्रोहि आहेत. त्यांनी भारतात राहु नये._________>>>> +१०००००००००००

माहिती दिलीच नाही हा निष्कर्ष कशावरून? कदाचित दिलीदेखील असेल. अझर आणी जडेजा नंतर पकडले गेलेच ना? सचिन अथवा गायकवाड म्हणजे मूर्ख नव्हेत की आम्ही ही माहिती दिली म्हणून मीडीयासमोर सांगायला.>>>>>>>>>>>>>>मूर्ख ह्या शब्दा एवजी हिम्मतवान हा शब्द असता तर बरोबर वाटले असते.

हे पिंटू महाशय म्हणजे पूर्वाश्रमीचे गणू तर नव्हेत ना...???
जरा तुमचे माहेरचे नाव सांगणार का???>>>>>>>>>>>>---त्याचा ह्या चर्चेशी काय संबंध. माझी माहिती काढत बसण्यापेक्षा भावी भारतरत्न सचिन तेंडूलकर हा संघातली फिक्सिंग माहित असूनही का गप्प बसला हे एक क्रिकेटवेडा म्हणून त्याला विचारा.

>>>>>>>>>>तो स्वतः प्रामाणिक राहिला, त्याने योग्य वेळ येण्याची वाट पाहिली आणि योग्य वेळ येताच सीबीआयकडे त्याच्याकडे जी माहिती होती ती दिली Biggrin

>>http://timesofindia.indiatimes.com/sports/cricket/spot-fixing-hits-ipl-6...

आता चेन्नई वि. मुंबई अंतीम सामन्याची गरज नाही... चेन्नई संघ डिस्क्वालिफाईड करा व मुंबई ला विजयी घोषित करा Happy
[किमान अंतीम सामन्यावरील बेटींग्/फिक्सींग ला तरी आळा बसेल!]

योग, तेच आयपीएल धाग्यावर विचारलंय. कारण, गुरूनाथ हा टीम ओनर आहे हे सर्वांना माहित आहे. वेबसाईटवरून, ट्विटरवरून त्याचे नाव काढून काही फायदा होणार आहे का?

गेलला बुकीकडून महागडे गिफ्ट!
May 25, 2013, 09.15AM IST
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
thumb.jpg
आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणाने भारतीय क्रिकेट विश्वाला हादरवून सोडले असतानाच उद्योगपती विजय मल्ल्या यांच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल हा ही संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याला जयपूरमधील एका बुकीकडून साडे चार लाखांचे दागिने मिळाल्याची माहिती पुढे आली आहे.

२९ एप्रिलला जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्स आणि बेंगळुरू यांच्यात सामना झाला. या सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी शहरातील टोंक रोडवर असलेल्या मोती सन्स या शो रुममध्ये ख्रिस गेल गेला होता. जवळपास तासभर गेल शो रुममध्ये होता. यावेळीच त्याला पवन आणि संजय या दोन बुकींकडून हे महागडे गिफ्ट मिळाले. विशेष म्हणजे या दोघांच्या मालकीचा हा शो रुम असून त्यांचे सध्या अटकेत असलेला अभिनेता विंदू दारा सिंग याच्याशी असलेले संबंध आधीच उघड झालेले आहेत. विंदूनेच या दोघांना दुबईत पळून जाण्यासाठी मदत केली होती. गेल विंदूच्या सांगण्यावरुनच मोती सन्समध्ये गेल्याचा दाट संशय पोलिसांना आहे. या पार्श्वभूमीवर गेलचा फिक्सिंगशी काही संबंध आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.

एकूणात- कुठालाही नविन कायदा आणायची वा बेटींग कायदेशीर करायची गरज नाही. (सर्वच छोट्या मोठ्या) आरोपींना पकडा, केस चालवा, कठोर शिक्षा द्या, किमान यावेळी तरी एक 'कायमचे ऊदाहरण' घालून दिले तर भविष्यात बहुतांशी याला आळा बसेल.

[ncpने म्हणे श्रीनिवासन ला 'जराशी लाज व जबाबदारीची जाणिव असेल तर...' म्हणून राजिनामा द्यायचा सल्ला दिला.. हा या शतकातला सर्वात मोठ्ठा विनोद म्हणायचा का..? श्रीनिवासन ने भविष्यात ncp मध्ये जावे. एक पंढरा/कोरा कागद [white paper report] काढून त्याला दोषमुक्त करण्यात येईल व पुन्हा खुर्चीवर बसवले जाईल असा काही गूढ संदेश यामागे आहे का..? थोडक्यात 'अप्पा' च्या जागी 'दादा' येणार बाकी काही फार बदलेल असे दिसत नाही..]

'श्री' या अक्षराने सुरू होणार्‍या व्यक्तींच्या कुंडलीत सध्ध्या 'काळसर्प योग अथवा राहूची महादशा अथवा वक्री मंगळ..' ई. काही आहे का यावर ईथल्या जाणकार ज्योतिषशास्त्रींनी प्रकाश टाकावा.

कीडा, मुंगी ऊचल्यागत असे भराभर बुकीज, कुकीज, व खेळाडू, अधिकारी ई. ना पोलिस 'ऊचलत' आहेत हे पाहून एका अर्थाने बरे वाटले. पण २०१४ च्या निवडणुकांशी या सर्वाचा काही दूरान्वये संबंध असावा काय अशी शंका मात्र येते... कारण आपल्या देशाच्या इतीहासात क्रिकेट, बॉलिवूड, राजकारण हे एकाच घरतील तीन भावंडे असल्यागत नांदत आले आहेत- शेवटी 'सबका मालिक [मालकीण] एक' हेच खरे!

>>या पार्श्वभूमीवर गेलचा फिक्सिंगशी काही संबंध आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.

आर्थिक कंबरडे मोडलेल्या मल्ल्या व त्यांचा संघ यात सापडले तर नवल वाटायला नको.. या लोकांना क्रिकेट या खेळाशी काहिही देणे घेणे नसते. त्यांना फक्त आणि फक्त पैसा/धंदा यात रस असतो. तेव्हा खेळाडूंवर व सामन्यांवर ५० करोड घालून बेटींग्/फिक्सींग मधून १०० करोड कमावण्याचे 'बिझनेस मॉडेल' अशा लोकांनी अवलंबिले असेल तर अजीबातच नवल वाटायला नको..
[गेल स्वतः दोषी नसला तरी आता यापुढे नक्की आपण कोणा सोबत मैत्री ठेवतो याबाबत सर्वच लोक अधिक जागरूक राहतील अशी आशा आहे....]

फसवणूक झालेल्या क्रिकेटवेड्यांनी आता आयपीएल वर बहिष्कार घालावा हे उत्तम.

आयपील बघणारे गाढव आहेत हा मुद्दा आहे >> तुमचा आयपीएल वरचा राग समजू शकतो पण तुम्हाला आयपील बद्दल का एवढा राग आहे? Wink Light 1

शिवाय तुम्हाला गाढवांसमोर गीता वाचायला कोणि सांगितली आहे का? वाचायची/गायचीच असेल तर आयपीएल न बघण्यार्‍या शहाण्यांसमोर वाचा.

योग, त्या खटल्याबद्दलच विचारत होतो की ४२० या एका कलमाखाली तो खटला चालणार असेल का? की इतर कोणती कलमे लागू शकतात येथे?

हे तिघे पकडले तेव्हाही ही फक्त प्यादी आहेत असे वाटतच होते. चेसुकिवाल्यांच्या कोलांटउड्या मात्र मजेदार आहेत.

Pages