आयपीएल फिक्सिंग : पैशाची हाव कुठवर?

Submitted by नंदिनी on 16 May, 2013 - 23:18

स्पॉट फिक्सिंगच्या आरोपामधे श्रीशांत आणि अजून दोन खेळाडूंना अटक झाली आहे. यावरून काल वृत्तवाहिन्यांमधे कालपासून गरमागरम चर्चा चालू आहेत. आयपीएल बंदच करावे अशी एक टोकाची मागणीदेखील समोर येत आहे. फेसबूक, ट्विटरवर्देखील या चर्चा रंगात आलेल्या आहेत. (मग मायबोलीने का मागे रहावे?)

पण लक्षात घेण्यासारखा मुद्दा हा आहे की: या खेळाडूंनी फिक्सिंग केले तरी नक्की कशासाठी? आयपीएल व त्यामधून मिळणार्‍या जाहिरातींमधून कितीतरी उत्पन्न खेळाडूंना राजरोस मिळत आहे. त्याखेरीज वर्षभर इतर टूर्नामेंट्स चालूच असतात. तरीदेखील अजून पैशाच्या लोभाने हे असे फिक्सिंग करावेसे का वाटले असेल? आपण जो खेळ खेळतो त्या खेळाची प्रतारणा, ज्या संघासाठी खेळतो त्याच्याशी प्रतारणा शिवाय कायद्याने गुन्हा ठरणारी गोष्ट जर कुणी करत असेल तर ते नेमके कशासाठी? नुसती पैशाची हाव की अजून काही?? बीसीसीआयच्या खेळाडूंना आता काऊन्सिलीन्ग द्यायची वेळ आली आहे का? बीसीसीआय, खेळाडू, संघ अशा सर्वांनीच आता याचा मुळापासून विचार करायला हवा.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, स्पॉट फिक्सिंग होते ते मुळात बूकीज आणि क्रिकेटवरून चालणार्‍या सट्ट्यामधे. या व्यवहारामधे बूकीज स्वतःचा फायदा करून घेताना जर खेळाडूला साठ लाख रूपये एका ओव्हरला लावायला तयार असतील तर मुळात किती जण क्रिकेटच्या सट्ट्यावर पैसे लावतात? तेदेखील किती करोडो रूपये? भारतामधे हा जुगार इतका का फोफावत चालला आहे? हीदेखील एक प्रकारे पैशाची हावच म्हणायला हवी ना. आपल्याला ईझी मनी मिळवायची इतकी हौस का असते? कायदाम नैतिकता, मूल्ये यामधे कुठेही न बसणारी अशी ही हौस माणसामधे निर्माण का होत असावी? अशा अनेक प्रश्नांचा इथे उहापोह व्हावा ही आशा.

कृपया, वैयक्तिक ताशेरे, टीकाटिप्पणी करू नका. आपली मते सभ्य भाषेत मांडा. धन्यवाद.

(अवांतर: त्या श्रीशांतला इन्डियन टीममधे स्वत:ची जागा फिक्स करता येत नाही. स्पॉट फिक्सिंग कसलं डोंबलाचं करतोय?)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@वैद्यबुवा | 17 May, 2013 - 18:06
मॅच फिक्सिंग खुपच गंभीर आहे त्यापेक्षा. ज्यांच्या जीवावर हे सगळं चालतं त्या मायबाप प्रेक्षकाची धडधडीत फसवणूक आहे मॅच फिक्सिंग.
<<

अगणित अशा मूर्ख क्रिकेटवेड्या भारतीयांच्या भरवशावरच या आय्पीएल-तमाशाचा डोलारा उभा आहे आणि तो असाच चालू राहाणार आहे
.हे मायबाप प्रेक्षकच 'मला फसवा' मला फसवा म्हणून त्यांच्या मागे पहाडासारखे उभे आहेत.
हा असला प्रकार चालू असणार हे कुणाही 'डोके गहाण न ठेवणार्‍या' सामान्य माणसाच्याही लक्षात यायला हवे होते.
.
बिचारा श्रिशांत! सापडला बिचारा!
इतर अनेक अजून तरी सुदैवी दिसतात.

<<...अगणित अशा मूर्ख क्रिकेटवेड्या भारतीयांच्या भरवशावरच ... >> खरंच, इथलं विशोभनीय हवेतच बॅट फिरवणं पाहिलं कीं आमची आपली आयपीएलमधली आडवी-तिडवी कां होईना पण फटकेबाजीच अधिक आवडायला लागते ! Wink

काहींना राम मंदीराच्या नावाने फसवले जाते...काहींना आयपीएल....
.
त्यातल्या त्यात.. आयपीएल बरी... ती किमान होते तरी.>>>>>> माझ्या स्मायली मी काढुन टाकल्या, पण डोके आपटुन घेणारी स्मायली इथे योग्य आहे.

राम मंदिराच्या नावे फसवणारे आणी आयपीएलच्या नावे फसवणारे एकच आहेत किंवा एकमेकांना मिळालेले आहेत.
हा असला प्रकार चालू असणार हे कुणाही 'डोके गहाण न ठेवणार्‍या' सामान्य माणसाच्याही लक्षात यायला हवे होते.

टाइम्स ऑफ इंडिया,मे १८,२०१३: पान १३
तत्कालीन सिबिआय्चे पोलीस सुपरिंटेंडेन्ट गणपती म्हणाले- २०००साली अझरुद्दीनसह ज्यांनी मॅच फिक्सिंग केले होते ते गुन्हेगारीच्या खटल्यांपासून बचावले कारण त्यांच्यात आणि बीसिसिआय मध्ये 'फेयर प्ले' चा करार नव्हता. आताच्या खेळाबाबतही त्यांच्यात आणि त्यांच्या संघाच्या मालकात झालेल्या करारातील अटींना महत्व राहील

मुळात २००० साली खेळाडू ज्या कारणासाठी सुटले असे वर म्हटले आहे तेच मुळी संशयास्पद आहे. याउपर अझरुद्दीन्ला खासदार करून कायदे करण्याचा अधिकारही देऊन मोठे प्रतिष्टित केले गेले आहे. मग श्रीसंथला मोह होईल नाही तर काय? तो सापडला, इतर कदाचित वाचवले जातील. सगळेच नासलेले उघड केले तर ही सोन्याची कोंबडीच मारली जाईल. तसे होऊ नये याची पुरेपूर काळजी घेतली जाईलच.
'क्रिकेट'चे ब्रँड नेम वापरून हा 'आयपीएल' नामक करमणुकीचा कार्यक्रम याहूनही मसालेदार होत जाईल.

या बाफ वर व एकंदरीत पोस्टीत नक्की कुणाचा आक्षेप कशावर आहे हेच कळत नाहीये.. Happy

'पैशाची हाव'- ती कुणाला चुकली आहे..? श्री ला लाखाची हाव सुटली, आपल्या महान नेत्यांना अब्जावधींची असते. काही पकडले जातात, काही पकडून सुटतात, काही कधीच पकडले जात नाहीत..
बेटींग- ज्या ज्या खेळात (क्षेत्रात) प्रचंड पैसा आहे/धंदा आहे तिथे ते चालतेच, त्यात काहीच नवल नाही. क्रिकेट मध्ये तर 'य' काळापासून चालू आहे.
काऊंसिलींग हे (फक्त) खेळाडूंनाच नव्हे तर सर्वांनाच द्यायची गरज आहे. बोर्ड, खेळाडू, प्रेक्षक, मिडीया, सर्वच..

बेफिकीर म्हणतात तसे याचा कॅनव्हास एव्हडा मोठा आहे की 'अनादी अनंत' चालेल... निष्पन्न 'शून्य' आहे.

Reality is that, today we all are still watching the game..!

btw: do feel like the 3 cricketers caught are soft/easy targets- media with due thanks to police investigation leaks, has already pronounced them 'guilty' and no matter what happens in the court, they are practically labelled as 'traitors' by now- by police, by media, by us collectively.
Wonder, in our Counctry when would we show bit more restraint in letting the law take its own course... wonder if there is NO such provision in the law which PREVENTS anyone from publically disclosing the details of any 'under investigation' act/crime.

IPL is 'entertainment at its best,'- no doubt about it. We all 'pay' for the costs for such entertainment. We are part of this ecosystem and therefore its collective failure when it comes to betting/fixing. Making an example of 'soft targets' is fooling ourseleves and basically satsifying our ego. In that sense, this overnight hue and cry about the whole thing is confusing. It is beyond my understanding as, how to begin with a BCCI official himself can be allowed to be an IPL Team Owner? Wikipidea can update their definition of 'conflict of interest' for sure! If any of the CSK players were involved, I wonder what happens to this official then-? We all know the answer to that I guess, and may not need separate BB to discuss Happy
The word 'scandal' is fast losing its appeal and glam in our India.

रच्याकने:
>>कृपया, वैयक्तिक ताशेरे, टीकाटिप्पणी करू नका. आपली मते सभ्य भाषेत मांडा. धन्यवाद.

>>(अवांतर: त्या श्रीशांतला इन्डियन टीममधे स्वत:ची जागा फिक्स करता येत नाही. स्पॉट फिक्सिंग कसलं डोंबलाचं करतोय?)

दुसरे विधान पहिल्याच्या विरोधी वाटते.. moreover comment about Shree's abilities is in bad taste. He was in the Indian Team due to his caliber- give him the credit/respect he deserves.
On the contrary, those who have followed criekct like 'religion' would agree that it is much more difficult to secure place in the Indian Team, but may be way too easy to spot fix in something like 'IPL' .

बाकी चालू द्या..

करीयर मध्ये पुढे काय होणार ह्याची शाश्वतीच नसल्याने जितके कमवता येतील तितके कमवा...
आणि क्विक मनी कोणाला नकोय... फक्त संधी मिळत नसते. ती मिळाली की "कोणीही" उडी मारणारच ना?

मला IPL कधीच आवडले नाही.

मला वाटते जेंव्हापासून शरद पवार नावाचा मनुष्य भारतीय क्रिकेट मध्ये घुसला. तेंव्हापासूनच ही भ्रष्टाचाराची कीड भारतीय क्रिकेटला लागलेय.

do feel like the 3 cricketers caught are soft/easy targets- media with due thanks to police investigation leaks, has already pronounced them 'guilty' and no matter what happens in the court, they are practically labelled as 'traitors' by now- by police, by media, by us collectively.
Wonder, in our Counctry when would we show bit more restraint in letting the law take its own course... wonder if there is NO such provision in the law which PREVENTS anyone from publically disclosing the details of any 'under investigation' act/crime. >>>

याला अनुमोदन. परवा हिंदूमधे आरूषी मर्डर केसवरती एक लेख होता, त्याचा रोख देखील मीडीया आणि पोलिसांच्या याच वागणूकीवर होता. लिंक मिळाल्यास इथे देईन.

माझा मुद्दा इथे आयपीएलमधे बेटिंग इतकाच नव्हता. आयपीएलमधे पैशाचे किती झोल आहेत, आणि ते कसे निस्तरले गेले आहेत ते सविस्तररीत्या माहित आहे. आयपीएलमधल्या काही संघांनी संघ विकत घेतल्यापासूनच तिथे झोलाझोली सुरू झाली आहे. ललित मोदीला हाकलवून लावणे हे तर अगदी ठरवून केलेले कारस्थान होते. ललित मोदीला घालवला, तरी बीसीसीआयला या पैशावर कंट्रोल ठेवणे अद्याप जमलेले नाही. त्यामुळे हा राक्षस मोकाट सुटत चाललेला आहे. मुळात आयपीएल सारखा बिझनेस चालवायला त्या तोडीचे बिझनेसमन तिथे हवेत. सध्या तर आय्याराम गयाराम करेंगे देखेंगे बादमे सोचेंगे हेच चालू आहे.

श्रीशांत असो वा सापडलेले अजून दोन खेळाडू असो, मला पडलेला प्रश्न असा की या लोकांना आपण नियमांविरूद्ध वागत आहोत हे कधी समजलेच नाही का? 'जर' आपण पकडले गेलो तर आपले करीअर संपून जाईल अशी भिती त्यांना वाटली नाही का? श्रीशांत भारतीय टीममधून खेळलेला खेळाडू आहे. त्याला बेटिंगसारखी गोष्ट करून नक्की काय साध्य करायचे असेल? साठ लाख तो आज ना उद्या कमावेल... सध्या मीडीयाप्रस्थामुळे निखिल चोप्रा सारखे लोकदेखील एक्स्पर्ट म्हणून काम करव्त आहेत. (निखिल चोप्रा लोकांना खेळाडू म्हणून किती जणांना आठवेल?)

अद्याप जे सापडले नाहीत पण् यामधे आहेत त्यांनी तरी यापासून धडा घेतला असेल का? मला या मनोवृत्तीचा आणि मानसिकतेचा विचार करावासा वाटत आहे. खेळामधेच नव्हे तर अगदी प्रत्येक क्षेत्रामधे हे असं कायद्या अथवा नियमाच्या विरोधात का वागावेसे वाट्ते??

या विषयावर विनोद कांबळी नामक एक्स्पर्टचे मतही विचार करण्यायोग्य आहे.
तो म्हणतो. सध्या हेजे काही तीन-चार मासे(श्रीसंत वगैरे) गळाला लागलेत ते फक्त मांदेली, बांगडे, किंव्हा फारफार तर पापलेट आहेत. मुख्य मगरी तर अजुन गळाला लागायच्या आहेत आणि त्यांना पकडायचे ध्येय पोलींसात आहे की नाही ते आता पाहचेय.

@विजय आंग्रे | 19 May, 2013 - 12:50नवीन
मुख्य मगरी तर अजुन गळाला लागायच्या आहेत आणि त्यांना पकडायचे ध्येय पोलींसात आहे की नाही ते आता पाहचेय.<<

ते मगरमच्छ अंगाला एरंडेल लावलेल्या कुस्तिगिरासारखे आहेत. त्यांना पकडण्याचा विचार देखील पोलिस मनात आणू शकणार नाही. त्यांना पकडणे तर दूरच.
भारताच्या या आय्पीएल नामक राष्ट्रीय करमणुकीचे [तमाशाचे] भवितव्य मात्र उज्वल आहे कारण त्याला अब्जावधी 'डोके गहाण ठेवणार्‍यां'चा सक्रीय आर्थिक पाठिंबा आहे.

@नंदिनी | 19 May, 2013 - 12:39नवीन
>> बीसीसीआयला या पैशावर कंट्रोल ठेवणे अद्याप जमलेले नाही. त्यामुळे हा राक्षस मोकाट सुटत चाललेला आहे. <<

अहो त्यांना पैक्याशी मतलब आहे तो मिळतो आहे तोवर राक्षसाला ते मोकाटच सोडणार, आता देखील 'सोन्याची अन्डी देणारी कोबडी मरू नये' यासाठीच धडपड केली जाईल.

>>श्रीशांत असो वा सापडलेले अजून दोन खेळाडू असो, मला पडलेला प्रश्न असा की या लोकांना आपण नियमांविरूद्ध वागत आहोत हे कधी समजलेच नाही का? 'जर' आपण पकडले गेलो तर आपले करीअर संपून जाईल अशी भिती त्यांना वाटली नाही का?<<

अझरुद्दीन आणि इतर यांचे उदाहरण समोर असेल तर भीती कशाची?

>> मला या मनोवृत्तीचा आणि मानसिकतेचा विचार करावासा वाटत आहे. खेळामधेच नव्हे तर अगदी प्रत्येक क्षेत्रामधे हे असं कायद्या अथवा नियमाच्या विरोधात का वागावेसे वाट्ते??<<

हा धागा भारताच्या आसमंतात भरून राहिलेल्या भ्रष्टाचाराकडे वळवू या का?

मला एक प्रश्न पडला आहे, या बाफ वर व एकंदरीत पोस्टीत नक्की कुणाचा आक्षेप कशावर आहे हेच कळत नाहीये>>>> आयपीएल मध्ये (यात संयोजक, टिमचे मालक , टिममधील गुलाम खेळाडु, आणी त्यांची लाथाळी पैसे मोजुन बघणारे प्रेक्षक यांचा मी समावेश करतो) जो गाढवपणा चालतो त्याला माझा नक्कीच आक्षेप नाहिये कारण गाढवाकडुन गाढवपणाचीच अपेक्षा असते. (इथे गाढव हे फक्त प्रतीक म्हणुन आहे. त्याचा अपमान करण्याचा माझा हेतु नाहि.) तर या सर्वांनी आपला तमाशा वा आपली लाथाळी जरुर चालु ठेवावी.
माझा आक्षेप फक्त माझ्यासारख्या इंकमटैक्स भरणार्यांच्या पैशाचा जो दुरुपयोग केला जात आहे त्याला आहे आणी जमेल तिथे त्याविरुद्ध आवाज उठवणे हे मी माझे कर्तव्य समजतो त्याचा उपयोग होवो अथवा न होवो.

श्रीसंत ने जे केले ते चुकिचे आहे पण त्याला मोका लावणे म्हणजे फार झाले. शेवटी तो एक मालक आणी नोकर यांच्यात झालेला करार आहे. त्याम्नी कुणाचा खून बीन नाही केला. त्याला भा दं वि पुरेसे आहे. मोका सारखे कडक कायदे फक्त अपवादास्पद परिस्थितीतच वापरले जावेत. इन्फोसिस मधल्या एखद्याने टी सी एस कडून पैसे घेतले आणी कामात दिरंगाई केली तर त्याला मोका लावणार का? प्रियंका चोप्राने सिनेमात अभिनय नीट केला नाही तर तिला मोका लावणार ? शिवाय त्यांना तोंडावर काळे कपडे पांघरून मीडिया समोर पेश करणे अनावश्यक होते. ज्या उत्साहाने दिल्ली पोलिसांनी देशभर धाडी टाकल्या तितकाच उत्साह बेकायदा बसेस वर कारवाई करताना दाखवला असता तर ...

>>ज्या उत्साहाने दिल्ली पोलिसांनी देशभर धाडी टाकल्या तितकाच उत्साह बेकायदा बसेस वर कारवाई करताना दाखवला असता तर ...
Thats the crux! The law is not same for all in the country and that is what is more painful than any sreeshant or xyz bookies. 'soft targets'.. बळीचे बकरे आहेत ते, वाचले तर सुदैवी म्हणायचे.

हा खरच एवढे ३ दिवस प्राईमटाईमला मीडीयाने आणी इतरत्रही चालू ठेवावा हा मुद्दा आहे ?
ते चुकले हे मान्य आहे , त्याचा सगळ्यात जास्त राग आमच्यासारख्या कडव्या क्रिकेटप्रेमीनाच आहे .
पण त्यांचा गुन्हा हा अगदी समाजाला घातक ठरावा असा आहे ?
ज्याना आयपीएल मध्ये Interest नाही त्यांच्यासाठी एका Private League मध्ये झालेल spot fixing आहे हे , आणी कितीही त्याचे आकडे फुगवले तरी एखाद्या चिल्लर राजकीय घोटाळ्याच्या मानाने ते काहीच नाहीत .
आणी तत्त्वांच म्हणाल तर वर मी लिहिल्याप्रमाणे फिक्सींग हे कुठल्याही देशाला वा खेळाला नवीन नाही .
दिल्ली रेप केसेस वरून जनतेचे लक्ष हटव्ण्यासाठी दिल्ली पोलीस याला हवा देतायत आणी आपल्याला तोंडी लावायला एक विषय लागतो Happy

माझा आक्षेप फक्त माझ्यासारख्या इंकमटैक्स भरणार्यांच्या पैशाचा जो दुरुपयोग केला जात आहे त्याला आहे >> IPL आयकरातून येण्यार्‍या पैशातून चालते?

@vijaykulkarni | 19 May, 2013 - 17:33नवीन
श्रीसंत ने जे केले ते चुकिचे आहे पण त्याला मोका लावणे म्हणजे फार झाले.
<<
सहमत. आधी डोळ्यावर कातडे ओढून बसावयाचे आणि आता अगदी अंगाशी येइल असे दिसताच असे टोकाचे नाटक करावयाचे!

>>ज्या उत्साहाने दिल्ली पोलिसांनी देशभर धाडी टाकल्या तितकाच उत्साह बेकायदा बसेस वर कारवाई करताना दाखवला असता तर .<<

इतके जीव ओतून यात लक्ष घालण्यामागे सर्वच लाभधारकांचे कांहीतरी तसेच लाभदायक कारण असावे. दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्था या त्यांच्या प्रमुख कामांचे काय? .तिकडे तर सगळीच १००% बोंब आहे.

@माणुस
माझा आक्षेप फक्त माझ्यासारख्या इंकमटैक्स भरणार्यांच्या पैशाचा जो दुरुपयोग केला जात आहे त्याला आहे आणी जमेल तिथे त्याविरुद्ध आवाज उठवणे हे मी माझे कर्तव्य समजतो त्याचा उपयोग होवो अथवा न होवो.<<

हा आक्षेप तर ऩ़क्कीच आहे.
शिवाय क्रिकेटच्या नावाखाली किशोर वयीन तरूण पोरे हा करमणुकीचा तमाशा पाहात, त्यावर चर्चा करीत तासन तास, आठवडेच्या आठव्वडे बर्बाद करतात. असल्या करमणूकीकरता इतका वेळ बर्बाद करायला आपण प्रोत्साहन देणे योग्य आहे का? हाही एक महत्वाचा मुद्दा आहे असे मला वाटते.
जे मिळवते लोक आता आपण हून डोके गहाण टाकायला तयार आहेत त्यांच्याकरता हा आक्रोश नाही आहे.
@केदार जाधव | 19 May, 2013 - 19:51नवीन
दिल्ली रेप केसेस वरून जनतेचे लक्ष हटव्ण्यासाठी दिल्ली पोलीस याला हवा देतायत
>>
एकूणच कायदा आणी सुव्यवस्थेचे जे तीन तेरा झाले आहेत त्यावरून लक्ष हटविण्यासाठी कमिशनरच मिडियाला जवळ करताहेत असे दिसते आहे.

दिल्ली रेप केसेस वरून जनतेचे लक्ष हटव्ण्यासाठी दिल्ली पोलीस याला हवा देतायत आणी आपल्याला तोंडी लावायला एक विषय लागतो>>> +१

माझा आक्षेप फक्त माझ्यासारख्या इंकमटैक्स भरणार्यांच्या पैशाचा जो दुरुपयोग केला जात आहे त्याला आहे >> IPL आयकरातून येण्यार्‍या पैशातून चालते? >>> तुम्हाला माहित नाहि ? गम्मत आहे.

>>त्यावर चर्चा करीत तासन तास, आठवडेच्या आठव्वडे बर्बाद करतात. असल्या करमणूकीकरता इतका वेळ बर्बाद करायला आपण प्रोत्साहन देणे योग्य आहे का?

आणि तुम्ही काय करताय २-४ दिवस इकडे? एखाददुसरे रचनात्मक कार्य झाले असते एव्हढ्यात Wink

नंदिनी ताई कशाला असला धागा काढलास. ज्यांना सामने बघायचे ते बघतील ज्यांना नाही ते नाही. आता साऱ्यांना कळलाय खेळाडू फिक्सिंग करतात तरीही सामने बघायचे कोणी सोडताय का.एक दोन खेळाडू फिक्सर असले म्हणून खेळाला बदनाम करू नका:P Proud :असे क्रिकेट प्रेमींचे म्हणणे असते.एकाद्या दारुड्याला दारूचे व्यसन असते त्याला ठावूक असते कि आपण जे करतोय ते चुकीचे आहे पण त्याचा नाईलाज असतो.तसेच काही आपल्या ह्या बिचाऱ्या क्रिकेट प्रेमींचे झालेय त्यांना कळतेय सामने फिक्स आहेत आपली फसवणूक चाललीय पण त्यांचाही नाईलाजहोतो.क्रिकेटचे व्यसन काही सुटत नाही:( Sad :एक मात्र खरे ह्या आयपीएल चालवणाऱ्या सट्टेबाजानी पूल देशपांडेंचे एक वाक्य आत्मसात केलेले दिसतेय 'बेमट्या कुंभार हो जगात गाढवांचा काही तोटा नाही Biggrin :

आज सकाळी बातम्यात पाहील विन्दु दारा नी २८ लाखांचा घोळ घातला आणि त्याच्या एका स्पॉट वरुन पैशांची पुडकी मिळाले पण ती पुडकी बघता कोटिंच्या घरात होती. लाखात मुळीच नव्हती.....
मिळातच मला आयपीएल पटलेल नाही. सिनेमात बायकांना जसे बोली लावुन विकले जाते तसेच क्रीकेटपटुंचे झाले आहे. निदान माझ्यासाठी तरी त्यांची गिनती त्या बोली लावल्या जाणार्‍या बायकांसारखीच आहे.
त्यामुळे क्रीकेटप्रेमी असुनसुद्धा मी आयपीएल कधीच बघत नाही. वर्ल्डकपला दुप्पट पगार कापला जावुन सुद्धा सुट्टी घेणारी मी एक दिवसही आयपीएल मॅच पुर्ण पाहीलेली आठवत नाही.

आयपीएल ---अतिश्रीमंत फिक्स करतात, श्रीमंत खेळतात, गरीब नि मध्यमवर्गीय बिचारे कामधाम सोडून बघत बसतात.

>>http://timesofindia.indiatimes.com/sports/cricket/spot-fixing-hits-ipl-6...

आता खरा 'शोध' सुरू झाला म्हणायचे.. कुठवर जातात ब कुठे थांबतात हे लवकरच कळेल. शेवटी 'सत्यमेव जयते' हे सत्तेच्या चरणाशी असल्याने काही दिवस हा(ही) तमाशा चालू राहील, अंगाशी आले की सगळे पुन्हा कृष्णविवरामध्ये गायब होईल!

काही काळाने, श्री च्या क्रिकेट कारकिर्दीची इतीश्री झाली की त्याच्या राजकीय कारकिर्दीची अथश्री होईल..
पुणे सहाराच्या जागी दुसरी टीम येईल..
लंकावाद संपून पुन्हा लंकेच्या खेळाडूंना चेन्नई मध्ये खेळायला मुभा मिळेल..
पाक बोर्डाच्या विनंतीस मान देऊन पाक खेळाडूंना आयपिल-७ मध्ये घेण्यात येईल..
माबो वर आयपिल-७ चा धागा ऊघडेल..
पुन्हा सामने/चर्चा होतील..
आणि हो- सचिन [पुन्हा] आयपिल मधून खेळेल.. Happy

तेव्हा पुढील काही दु:खाचे दिवस काढले की सर्व सुरळीत होईल.. चिंता नसावी.

रच्याकने:
>>मला या मनोवृत्तीचा आणि मानसिकतेचा विचार करावासा वाटत आहे. खेळामधेच नव्हे तर अगदी प्रत्येक क्षेत्रामधे हे असं कायद्या अथवा नियमाच्या विरोधात का वागावेसे वाट्ते??
हम्म्म्म्म्म्म..........

आयपीएल ---अतिश्रीमंत फिक्स करतात, श्रीमंत खेळतात, गरीब नि मध्यमवर्गीय बिचारे कामधाम सोडून बघत बसतात.>>>>> +१

मटा मधिल बातमी:--

आयपीएल मॅच फिक्सिंगच्या प्रकरणात वस्तुस्थितीचा विपर्यास करणाऱ्या आणि हे प्रकरण तिखट-मीठ लावून न्यायालयापुढे मांडणाऱ्या पोलिसांना बुधवारी न्यायालयाने झापले. 'चौकार-षटकार कसे फिक्स होऊ शकतात,' असा सवाल न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या मुंबई पोलिसांना केला.

सट्टेबाज आणि मॅच फिक्सिंग प्रकरणातील आरोपींना बुधवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली. त्यास विरोध करताना बचाव पक्षाच्या वकिलांनी पोलीस हे प्रकरण गरजेपेक्षा जास्त ताणत असल्याचा आरोप केला. या आरोपांत तथ्य आढळल्याने न्यायालयाने पोलिसांना फटकारले. 'कोणत्याही प्रकरणाला गरजेपेक्षा जास्त ताणणे चुकीचे आहे. चौकार-षटकार फिक्स झाल्याच्या पोलिसांच्या आरोपांत अर्थ नाही. चौकार-षटकार कसे फिक्स होऊ शकतात, असा सवाल करत आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणीही न्यायालयाने फेटाळून लावली.

>>>>>

इथेच मी काही विचारणा केलेली की सामने फिक्स होउ शकतात स्पॉट फिक्सिंग देखील होउ शकते परंतु
इतकेच एवढेच रन्स देणे हे एकाच्याच हातात नसते समोरचा बॅटस्मन देखील सामिल असावा लागतो...
कारण गोलंदाजाने बॉल स्लो टाकला आणि फोर किंवा सिक्सच हवा आहे अश्या वेळी त्या खेळपट्टीवर शॉट मारला तर रन्स येण्या ऐवजी आउट होईल तो बॅट्स्मन...............म्हणजे नुकसानच ...एक तर हवे तेव्हढे रन्स दिले नाही त्याच बरोबर त्या बॅट्समन वर सट्टा लागलेला असेल ते सुध्दा नुकसानच ...

बिचारा दोन्ही बाजुने मरेल Biggrin

स्पोट फिक्सिंग काय काय होउ शकेल..: (जितके मी क्रिकेट खेळलो आहे त्यावरुन )
(एकतर्फी फक्त बॉलर कडुन)

१) नो बॉल : कारण हे बॉलर च्या हातात असते..एक तर तो पाय बाहेर टाकेल जास्त अन्यथा मोठा बाउंसर टाकेल जेने करुन तो नोबॉल ठरवला जाईल..
२) वाईड बॉल..: हा देखील तो हवा तेव्हा टाकु शकतो लेग साईड ला...यात सुध्दा एक प्रोब्लेम असा आहे की फलंदाजाला जर तो चेंडु मारायचाच असेल तर तो मारु शकतो अथवा मारण्याच्या प्रयत्नात लेग बाय मिळु शकतो...या परिस्थितीत वाईड होणार नाही...(७० - ३०) चांस आहे यात.
३) रन्स : एखाद्या ओव्हर्स मधे इतकेच रन्स देने हे करु शकत नाही हा पण किमान ६ च्या वर रन्स देउ शकतो...जास्तित्जास्त ८ पेक्षा जास्त ....१२ रन्स या १४ रन्स साठी किमान ३ चौकार अथवा २ षटकार आवश्यक असतात.....ते ही फलंदाजावर जास्त अवलंबुन असते...अतिशय खराब बॉल टाकला आणि समोर च्याने मारला तरी फिल्डर ने फिक्स नसल्याने तो जीव तोडुन चौकार अडवण्याचा प्रयत्न तर करणारच Wink
आणि फलंदाजाने जीव तोडुन खेचुन मारला तरी बॅटीला व्यवस्तित नाही लागला तर कॅचच जाणार... परत मुख्य फलंदाजच होतो या प्रकारात ( तुम्ही कितीही खेळला असला तरी समोर च्या बॉलवर मी हमखास सिक्सच मारणार हे छातीठोक पणे कोणीच बोलु शकत नाही)

------------
वरील तीन प्रकारात फक्त नो बॉल हाच एक गोलंदाजाच्या हातात असतो कधीही टाकायचा..आणि रिझल्ट मिळवणे आणि वाईड बॉल.... तो सुध्दा ७०-३० चांस मधे आहे.....
अमुक ६ व्या ओव्हर च्या ३र्या बॉल वर सिक्सच लागेल...ही गोष्ट सुध्दा शक्य आहे परंतु तो प्रकार फारच लकी आहे... हा जर समोरचा फलंदाज सुध्दा फिक्स असेल तर त्याला आधीच सांगितले जाईल की या ओव्हर चा हा बॉल अश्या पध्दतीने येईल तु यावर आधी पासुनच तयार हो..आणि सिक्स मार... !!!!!!!!!!!!! हा प्रकार एक्दम परफेक्ट आहे...बाकी सगळे नशिबावर Happy

आयपीएल स्पॉट फिक्सींग प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेला विंदु रंधावा पूर्णपणे निर्दोष असल्याचा दावा त्याचा भाऊ अमरिक सिंग यांनी केलाय.------------->>>>>खरय आहे रे तुझ अमेरिक भाऊ तुझा भाऊ निर्दोष, खेळाडू निर्दोष. आम्ही प्रेक्षकच दोषी आहोत जे आयपीएल ला डोक्यावर घेऊन नाचतोय.

आयपीएल मॅच फिक्सिंगच्या प्रकरणात वस्तुस्थितीचा विपर्यास करणाऱ्या आणि हे प्रकरण तिखट-मीठ लावून न्यायालयापुढे मांडणाऱ्या पोलिसांना बुधवारी न्यायालयाने झापले.>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>सस्पेंड करायला पाहिजे त्या पोलिसांना लाखो क्रिकेट रसिकांच्या लाडक्या खेळाडूना अटक करतात म्हणजे काय 'उनकी ये हिम्मत'.

Pages