आपलं कोल्हापूर

Submitted by झकासराव on 14 October, 2008 - 22:07

मित्रहो,

कोणी जर कोल्हापुरला फिरायला जात असेल तर त्याला काय काय बघाव ह्याची
लिमिटेड लिस्ट माहिती असते. ह्यातच जर अजुन काहि भटकंती करणार्‍या लोकाना फार प्रसिद्ध नसलेल्या जागांविषयी माहिती कशी द्यावी?? किंवा मला तरी सगळ्या कोल्हापुरतील जागा माहित आहेत का??
मी प्राथमिक शाळेत असताना आमची एका दिवसाची सहल जात असे. अशा सहलीत मी कात्यायनी, खिद्रापुर अशा फारशा प्रसिद्ध नसलेल्या ठिकाणी देखील जावुन आलो आहे. ही ठिकाण बाहेरच्या (कोल्हापुरच्या बाहेरच्या लोकाना जे तिकडे पर्यटनाला येतात) कोणालाच विशेष माहिती नसतात.
मग त्याची माहिती कशी मिळेल. आपल्याकडच्या पर्यटन खात्याबद्दल काहि न बोललेलच बर. मला स्वत:ला खिद्रापुरचे मन्दीर परत पहायच आहे. कारण आता त्याची स्मृती माझ्या मेन्दुतुन जास्तच पुसली गेली आहे. असे अनेक ठिकाण आहेत जे जावीच अशी आहेत.
कालच साप्ताहिक सकाळमधील एक लेख वाचला आणि जाणवल की अरे ह्यात मला माहित असलेल्या अनेक ठिकाणांची माहिती आहे की.
उदाहरणार्थ मसाई पठार. मी पैज लावु शकतो की ह्या विषयी कोणीच फारस ऐकलं नसेल.
हे पठार आणि त्यावर असलेली पांडव लेणी ही काहि वर्षापुर्वी (म्हणजे मी हाफ पॅन्ट घालुन शाळेत जात असताना) वादाच केंद्र झाल होत. त्यावेळीच काय त्याला प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर ते प्रकरण थंड झाल.
मी ती लेणी पाहिली आहे. माझ्या मावशीच्या गावापासुन फारतर ५-६ किमी चालत गेल की मसाई पठार लागत.
मी कित्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत तिकडे गेलो आहे.
तर अशा अनेक ठिकाणांची माहिती देणारा हा लेख वाचाच. आणि ह्या ठिकाणाना देखील भेट द्या.

http://www.saptahiksakal.com/sapsakal/sapsakal/rightframe.html

(ह्या लिन्क वर गेलात की तीर्थक्षेत्र आणि कलानगरी - कोल्हापुर ह्यावर क्लिक करा.)

ह्या लेखात तरी एका किल्ल्याचा उल्लेख राहिला आहे. रांगणा किल्ला. इतिहासाच्या पुस्तकात नकाशात हे नाव पाहिल होत आणी त्यानंतर विसरुनच गेलो होतो ह्या किल्ल्याविषयी. हा फारसा प्रसिद्ध नसलेला किल्ला. ह्याची माहिती लोकसत्ता मध्ये भटकंती सदरात आली होती. गगनगडाच्या आसपास आहे हा.

तसच वरच्या लेखात << कोल्हापुरातून बाहेर पडून जुन्या पुणे-बंगळूरु मार्गावरुन कागलच्या दिशेने निघालं की लगेचच उजव्या हाताला कणेरी हे ठिकाण आहे. या ठिकाणी शिवमंदिर आणि अदृश्‍य काडसिद्धेश्‍वर महाराजांचा मठ आहे. शिवरात्रीला कणेरी मठावर मोठी यात्रा भरते. अलीकडे ग्रामसंस्कृती, ग्रामीण जीवनशैली यांची पुढच्या पिढ्यांना ओळख व्हावी म्हणून कणेरी मठातर्फे एक वेगळा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत जुन्या शैलीतील घरं व ग्रामीण शैलीचं दर्शन घडवणारं एक वेगळं गावच वसवण्यात आलं आहे>> ही माहिती आहे.
कन्हेरी मठ बघणे हे मस्ट मस्ट आणि मस्टच आहे अस माझ मत झालय.
त्यानी तेथे वसवलेल गाव पाहुन मी अचंबीत झालो. खुप कष्ट घेतल आहे त्यासाठी त्या लोकानी. हे गाव बघण्यासाठी २५ रु तिकिट आहे पण ते खुपच कमी आहे असच वाटेल तुम्हाला. तिथे फोटो काढण्यास बन्दी आहे. पण त्यानी तिथेच एक बाग केली आहे त्याचे मी फोटो काढले आहेत.
त्यातील हे काही.
हे राशी उद्यान आहे. प्रत्येक राशीची माहिती आणि त्याच चिन्ह त्यानी बनवलेल आहे. हे चिन्ह बनवताना तीच पद्धत वापरली आहे जी त्या गावातले पुतळे बनवताना वापरली आहे. खालील फोटोत मेष रास दिसत आहे.

ही त्याच बागेतील बसण्याची व्यवस्था.

अजुन काहि फोटो पहायचे असतील तर ते खालील लिन्क वर आहेत.
http://picasaweb.google.com/zakasrao/KanheriMath?authkey=ZQsGxI7GWbU#

मग येणार ना कोल्हापुरला?? आणि हे सगळ पाहणार ना??
ह्यातील एखाद्या ठिकाणाची माहिती हवी असेल तर बिन्धास्त विचारा मी देइनच.
नक्की या Happy

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान रे झकास. मस्तच.

झकास चांगली माहिती. वर्षातुन एकदा कोल्हापुर वारी ठरलेली आहे, ह्या माहितिचा उपयोग होईल.

साहेब, नरसोबावाडी र्‍हायलं की !

झकास, चांगलं हिरवेगार दिसतय कोल्हापुर.एकद दोनदा गोव्याहुन वाट वाकडी करण्याचा बेत झाला होता
अन तो बेतच राहीला.

इकडची माहिती नको देउस मला... डायरेक्ट घेउन चल.. Happy

-::- -::- -::--::--::--::--::-
Yo Rocks !! तुम्ही म्हणाल जसं..
-::- -::- -::--::--::--::--::-

ही राशी बाग नवीन आहे का?
मी मागच्यावर्षी गेले होते कण्हेरी मठात तेव्हा तेथे वसवलेल गाव पाहिले होते. तेव्हा त्या गावासमोरच नविन बान्धकाम सुरु होते. खरच खुप छान आहे ते गाव.

थन्क्स झकासराव ....सध्या कोल्हापूर वारी २ वर्शानी होते.....कन्हेरी मठ पाहिलाय पुर्वी. पण ह्या गावाबद्द्दल माहिती नव्हते . यावेळी गेले की नक्की जाइन.....
फुलरानी

Mi Janhavi
Maaze maaher aahe kolhapur. Mala mazya gavabaddal barach abhimaan aahe.
pan zalay kay mi kolhpurkar asun dekhil mala tikadchya prekshaniy sthali bheet deta aali naahi.
Mhnataat na kakhet kalsa ni gaavala valsa.

mai jaanar aahe aata May madhe kolhapurla.

Dhanyvaad.

आणि हो कोल्हापुरात गेले की पेठेतला दावणगीरी लोणी डोसा नक्की खावा लय भारी असतोय

हं होते असे... आंबाबाई ला गेले की आत जाऊन दर्शन न होता उगाच बहेरच चकरा होतात Wink


कोल्हापूर- नाद नाही करायचा...

रस्त्यावर पडलं कुणी चुकून तर अजुनही लोक उचलायला धावतात,
आणि आपली कितीही सुंदर असली तरी आम्हाला महाद्वारच्याच पोरी भावतात ॥

मर्दानी शस्त्र आणि मर्दानी खेळ घराघरात जपले जातात,
अरे चौकातुन तर सोडाच पण महापालिकेतही त्याची प्रात्यक्षिके होतात ॥

'गोकुळ' कितीही स्वस्त झालं तरी 'कट्यावरच' गर्दी असेल,
आणि तांबड्या पांढ-या रश्श्यावरती पिळदार मिशी तुटून पडेल ॥

'थेम्स' च्या काठी बसलो तरी 'रंकाळ्याचीच' आठवण असेल,
'रॅप' कितीही ऐकले तरी 'लावणी' ऐकुनच मान डुलेल ॥

'केक- पेस्ट्रीज'कितीही खा, त्याला इथल्या गुळाची चव नाही,
आणि 'आडिडास' च्या शूजला इथल्या 'पायताणाची' सर नाही ॥

अरे कितीही मोठे झालो तरी तोंडात झणझणीत शिवी असेल,
आणि फाडफाड इंग्रजी बोललो तरी रांगडी कोल्हापुरीच हवी असेल ॥

'क्रिकेट- फुटबोल' काहीही येवो 'कुस्तीचा' मान त्याला नाही,
आणि इंग्लंडच्या लंडनलाही 'कोल्हापूर'ची शान नाही ॥

[---कवी अज्ञात---]

कवड्या एकदम फिदा... नाद खुळा!!!

झकासराव पन्हाळा ते विशालगड पदभ्रमण मोहीमे दरम्यान म्हसईच्या पठारावर गेलो होतो... त्यावेळी ऐकल होतं पांडव लेणी बद्दल...

अतिशय छान, मनकवडा. सर्व अगदी खरं आहे.
खरंच, नाद खुळा!!!

झकास, माझ्याकडे त्या "वसवलेल्या गावाचे" फोटो आहेत. मी विकत घेतलेले तीथुन. स्कॅन करुन टाकता येतात का बघते. फार अप्रतिम आहे ते ठिकाण. एकदा बघुन समाधान होत नाही.
मनकवडा खर आहे एकदम.

Kavita layach bhari..

Marathi tayaping chi bomb haye, mapi aasavi..

झ कास्रराव,

य क द म झ क्कास्स ब ग्गा..

मसाईच पठार म्हयती नसायला काय जाल्ल? लय भारी हाय.. आमी बी पन्हाळा इशाळ्गड केल्ता २ वर्सा पूर्र्वी.. पुन्याच्या यकान थथ हाटील चालू केलया, मी फक्सत आइकुन हाय.

झकास... यावेळी घरी आलो कि हे बघाया पाहीजे !!

मनकवड्या ती कविता, त्वा लिवलीस ? .......लइ भारी मर्दा !! लै भारी !!

~ प्रकाश ~

राहुल, हळूहळू लिहिता येईल मराठीत नीट्..पण लिहीत जा..

>> कविता, त्वा लिवलीस ?
नाय रे, मला कुठल इतक येतय... कवी अज्ञात आहे...थांब लगेच एडिटून टाकतो कवी अज्ञात म्हणून Happy

मनकवडा,

>>हं होते असे... आंबाबाई ला गेले की आत जाऊन दर्शन न होता उगाच बहेरच चकरा होतात

आंबाबाईला जाऊन बाहेर चकरा कोणासाठी मारताय? Wink म्हणजे 'तस' काही असेल तर आम्हाला पण कळू दे !! Happy (दिवे घ्या :-))

----------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/

>>आम्हाला पण कळू दे !!
नाही रे तसे काहीही नाही...लगेच सांगितले असते... तू म्हणजे एकदम मोकाट च सुटल्लाय्स सध्या Proud

आणि मला नको रे देऊ दिवे...ते माझ्याकडे कायम असतात Happy

Happy

कोल्हापुरला असताना अंबाबाईला नेहमी जात नव्हतो....आता मात्र घरी गेलो की हमखास चक्कर असते माझी Wink
बाकी देवींचे पण दर्शन घेणे महत्वाचे आहे..!

----------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/

हो रे माझे पण असेच होते हल्ली....
आधी कधी जायचो नाही पण आता गेलो की गरूडमंडपातून का होईना पण दर्शन घेतो..

काय पण म्हणा, पण कोल्हापुरात गेले की मस्त वाटत यारं!!!

होय्..मी दर महिन्याला एकदा तरी घरी जायचा प्रयत्न करतो...

खुप दिवस झाले पन्हाळ्याला गेलो नाही..:-(
कॉलेज मध्ये असताना हुक्की आली की फक्त सनसेट बघायला पुसाटीला जायचो आणि लगेच परत यायचो! Happy
बर्कीच्या धबधब्याला गेला आहात काय पावसाळ्यात कधी? मस्त वाटते तिथेपण..

----------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/

मी जातो दर महिन्याला Happy
ह्म्म बर्की.... नको रे आठवण करून देऊ

जिक्लाय्स भावा.. लय भारी लिहिलाय्स.
आणि फोटो दिलेस ते अजुन भारि...
आमची पण एक दिवसीय सहल याच ठिकाणी जायची बघ..
पी.एच.एस्.के. ला होतो मी.....

रुयाम
("वाटलं तसं" : @ watla-tasa.blogspot.com)

चला जाउ कोल्हापुरी, पंचगंगा नदीतीरी,
कोल्हापुरी राजधानी मावळ्याची.....

कोल्हापुरी फेटा बांधुन कोल्हापुरी पायताण
पैलवान छाती काढुन चाल पुढती.....

राजवाडा नवा जुना, साठमारी शिकारखाना
राजा हुता तवा तिथं हाथी झुलती.....

आता राजं गेलं हाथी गेलं,
?????? ?????????
पाकोळ्यांची झाली गरदी.....

हा खरंतर पोवाडा आहे. माझ्या वडिलांकडुन ऐकलेला. पोवाड्याच्या चालीत म्हणता येते का पहा. नाहितर यु ट्युब वर टाकतो. ????? हे कोणाला माहित असेल तर टाका.

सगळेच निवांत झाले की कित्ती मज्जा येइल ना.....

हल्ली रन्काळाही स्वच्छ केला अाहे...

Pages