Submitted by मंजूताई on 6 May, 2013 - 05:27
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
पाव किलो चिवळ भाजी, दीड वाटी बेसन, लसूण दहा बारा पाकळ्या, हळद, तिखट, मीठ चवीनुसार व तेल
क्रमवार पाककृती:
चिवळ किंवा चिऊची भाजी दोन तीनदा पाण्यातून काढून निवडून घ्यावी. भाजीची फक्त मूळं काढावीत व चिरुन घ्यावी त्यात बेसन, वाटलेला लसूण,हळद,, तिखट, मीठ, चमचा भर तेल घालून चांगलं कालवून घ्यावे. पाणी आवश्यकता वाटल्यास घालावे. भज्यांच्या पीठापेक्षा घट्ट हवे. गरम तेलात भजी तळून घ्यावी.
वाढणी/प्रमाण:
आवडीप्रमाणे
अधिक टिपा:
चिवळ किंवा चिऊची भाजी पीठ पेरुन केली जाते आज माझ्या भावजयीने हा प्रकार केला अप्रतिम झाला. नेहमीच्या हराभरा कबाब, मंचुरीयनला सारख्या स्टार्टरला एक उत्तम पर्याय
माहितीचा स्रोत:
गीता
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान दिसत आहे.. करून बघीन..
छान दिसत आहे..
करून बघीन..
अरे व्व्वा !!! मस्तच दिसतात.
अरे व्व्वा !!! मस्तच दिसतात. भाजीपेक्षा भजीच बरी खायला.
छान आहे. ही भाजी फक्त याच
छान आहे. ही भाजी फक्त याच दिवसात मिळते का ?
आणि चिरल्यावर चिकट होते का ?
फोटो टाकला आहे का ???? चिवळ
फोटो टाकला आहे का ????
चिवळ भाजी... >>> दुसर काही नाव आहे का ह्याला ????
जयंत किशोर दिनेशदा धन्यवाद!
जयंत किशोर दिनेशदा धन्यवाद! दिनेशदा - हो ह्याच दिवसात मिळते आणि चिरल्यावर चिकट होत नाही चवीला आंबूस असते. ही भाजी घोळच्या जातकुळीतली.
अंकु - फोटो टाकलाय. चिवळ
अंकु - फोटो टाकलाय. चिवळ किंवा चिऊ म्हणतात,
वा मस्तच.
वा मस्तच.
चिवळीच्या भाजीची भजी... भारी
चिवळीच्या भाजीची भजी... भारी आहे पाककृती.
फोटो दिसत नाही यात चिवळीचा
फोटो दिसत नाही
यात चिवळीचा पाला नाही का वापरायचा?
हीलाच 'घोळ्'ची भाजी म्हणतात
हीलाच 'घोळ्'ची भाजी म्हणतात ना?
पीठ पेरुन मस्त लागते ही भाजी. पण ही भाजी निवडायला फार वेळ लागतो.
भजी करुन बघणेत येइल.
माझी आवडती भाजी!! कित्येक
माझी आवडती भाजी!! कित्येक वर्षात खाल्ली नाही!
भजी मात्र कधीच खाल्ल्ली नाहीत.
फोटो दिसत नाही>>> +१
फोटो दिसत नाही>>> +१
माझी आवडती भाजी! ह्याच भाजीत
माझी आवडती भाजी!
ह्याच भाजीत हिमोग्लोबीन ज्यास्त असतें म्हणे ! खरें कां?
यक्ष तुम्हाला आयर्न म्हणायचंय
यक्ष तुम्हाला आयर्न म्हणायचंय का?
मस्तं दिस्ताहेत भजी. पाककृती
मस्तं दिस्ताहेत भजी. पाककृती योग्य वेळी आली.
हायला, मला तर ही भाजी माहीत
हायला, मला तर ही भाजी माहीत (नावावरुन.... फोटो दिसत नाहीयेत) पण नाही
भजी छान दिसताएत. पण चिवळ
भजी छान दिसताएत. पण चिवळ म्हणजे काय ?
>>पण चिवळ म्हणजे काय? इथे
>>पण चिवळ म्हणजे काय?
इथे बघ.
ओके. धन्यवाद
ओके. धन्यवाद
मंजू, मागे बी ने सविस्तर
मंजू, मागे बी ने सविस्तर लिहिले होते या भाजीबद्दल. लहान मुलाना उन्हाचा त्रास होत असेल तर या भाजीच्या पोत्यावर झोपवतात असे पण लिहिले होते त्याने.
मुंबईत घोळच मिळते आणि त्यात पण साधी घोळ आणि राजघोळ असे दोन प्रकार दिसतात.
अरे मला सांगा ना... चिवळीचा
अरे मला सांगा ना... चिवळीचा पाला नाही का वापरायचा? नुसती मूळंच वापरायची का भज्यांमधे?
हं........ मस्तच! याची भाजीही
हं........ मस्तच! याची भाजीही छान होते. पण अगदी कोवळी व ताजी मिळाली पाहिजे.
मंजूडी............अगं मला
मंजूडी............अगं मला वाटतं की मुळं तेवढी काढून टाकावी. बाकी फार काही निवडून फेकू नका.(फक्त मुळंच फेका) असं म्हटलंय मंजूने!(हसणारी बाहुली!!!!)
छान दिसताहेत. कोणी करुन
छान दिसताहेत. कोणी करुन बघितल्यास खाऊन बघेन
मानुषी, ओके! वर मृणने लिंक
मानुषी, ओके!
वर मृणने लिंक दिली आहे ती वाचली. त्यात लिहिलंय सविस्तर.
मस्त याला गावच्या भाषेत
मस्त
याला गावच्या भाषेत चिव्वय असे म्हणतात, बागेतही पेरतात काही जण.
मुंबईत सुद्धा हि मिळते पार्ल्यात, पण फार नाशीवंत असते.
हीलाच 'घोळ्'ची भाजी म्हणतात
हीलाच 'घोळ्'ची भाजी म्हणतात ना? >>> आर्याताई घोळ वेगळी गं, घोळीचा देठ जाड असतो, पानही मोठी असतात साधारण मेथीच्या पाना सारखी. चिऊ ची पान चिमणी म्हणजे छोट्या टिकलीच्या आकाराची असतात. दोन्ही भाज्या आवडीच्या पण पुण्यात घोळ दिसली नाही कधी
मानुषी - अगदी बरोब्बर
मानुषी - अगदी बरोब्बर
दिनेशदा - ही भाजी थंड असते हे माहीत होते पण उपचार माहीत नव्हता
बागुलबुवा - केली - खाल्ली मगच पाकृ टाकली म्हणजेच ट्राईड अन टेस्टेड रेसिपी
आशु२९ - मी पण मागच्या आठवड्यात पार्ल्यात बघितली होती ही काल औरंगाबादेत खाल्ली
स्निग्धा - ही भाजी घोळ भाजीचं मिनिच्युअर !
नक्की करुन पहा अगदी सोप्पी अन टेस्टी, हेल्थी रेसिपी! अगदी कमी तेलात तळली जातात....
येस मंजू. आणि हा घोळीचा फोटो
येस मंजू. आणि हा घोळीचा फोटो
अर्थात गुगल वरुन
घोळुची भजी.. वा! मस्तच. माझी
घोळुची भजी.. वा! मस्तच. माझी अत्यंत आवडती भाजी.
Pages