चिवळ भजी

Submitted by मंजूताई on 6 May, 2013 - 05:27
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पाव किलो चिवळ भाजी, दीड वाटी बेसन, लसूण दहा बारा पाकळ्या, हळद, तिखट, मीठ चवीनुसार व तेल

क्रमवार पाककृती: 

चिवळ किंवा चिऊची भाजी दोन तीनदा पाण्यातून काढून निवडून घ्यावी. भाजीची फक्त मूळं काढावीत व चिरुन घ्यावी त्यात बेसन, वाटलेला लसूण,हळद,, तिखट, मीठ, चमचा भर तेल घालून चांगलं कालवून घ्यावे. पाणी आवश्यकता वाटल्यास घालावे. भज्यांच्या पीठापेक्षा घट्ट हवे. गरम तेलात भजी तळून घ्यावी.

वाढणी/प्रमाण: 
आवडीप्रमाणे
अधिक टिपा: 

चिवळ किंवा चिऊची भाजी पीठ पेरुन केली जाते आज माझ्या भावजयीने हा प्रकार केला अप्रतिम झाला. नेहमीच्या हराभरा कबाब, मंचुरीयनला सारख्या स्टार्टरला एक उत्तम पर्याय

माहितीचा स्रोत: 
गीता
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ए या भाजीच्या आळूच्या वड्यासारख्या वड्या एकदम झ्याक लागतात
कुणाला रेसिपी माहीत आहे काय ?????

Pages