लॅपटॉप कुठला घ्यावा ?

Submitted by धनंजय वैद्य on 19 April, 2013 - 02:07

मला व माझ्या मित्राला साधारण 30-35 हजार पर्यँत बजेट असणारा लॅपटॉप घ्यायचा आहे. पण याविषयी आम्हाला कुठलिच माहिती नाही , त्यासाठी हा धागा .( किँमत ,कुठे मिळेल , सुविधा , आपले अनुभव अपेक्षित ! ) मी एक भावी शिक्षक आहे, त्याद्रुष्टीने पण, तसेच फोटो/व्हिडीओ इडिटीँग , इंटरनेट वापरासाठी . पिक्चर क्वॉलिटी पण सर्वोत्तम हवी !

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मॅकबुक वर युनिकोड देवनागरी टायपिंगची मायबोली किंवा निदान बरहा इतकी तरी सोपी पद्धत काय आहे?
मायबोली/मिपा/ऐसी च्या प्रतिसाद विंडोमधे टाइप करायचं आणि मग जिकडे गरज असेल तिकडे कॉपी पेस्ट करायचं ही पद्धत ऑनलाइन असताना वापरायला उत्तम आहे पण जिथे नेट अ‍ॅक्सेस नसेल अश्या ठिकाणी पूर्वी बरहा कामाला यायचे. बरहा मॅक कंपॅटिबल नाही.
देवनागरी कीबोर्ड, हिंदी ट्रान्सलिटरेशन वगैरे जे जे विविध ठिकाणी वाचून शोधलंय ते जाम कटकटीचं आहे. हवे ते शब्दांचे पर्यायच उपलब्ध नाहीत, जोडाक्षरे, अनुस्वार वगैरे हवे तिथे पडतीलच याची खात्री नाही. मोठे शब्द असले की हे सगळे बोंबलणार वगैरे चाललंय.
ऑफलाइन मधे बरहा इतके उत्तम असे मॅक साठी काय आहे?

>>ऑफलाइन मधे बरहा इतके उत्तम असे मॅक साठी काय आहे?<<

हिंदी (देवनागरी) किबोर्ड अ‍ॅड करुन बघा.
सिस्टम प्रेफरंसेस --> किबोर्ड --> इन्पुट रिसोर्सेस आणि त्यानंतर "+" कि दाबुन हिंदी किबोर्ड अ‍ॅड करा. मेनुबारच्या किबोर्ड आय्कॉनवर क्लिक करुन किबोर्ड ऑन-द-फ्लाय बदलु शकता...

ते पाह्यले.
त्यात ळ नाहीये.
मॅक लिहायला गेले तर मैक येते.
जोडाक्षरे गंडतात.
र्‍या मिळत नाही
अनुस्वार हवे तिथे मिळत नाहीत.

श्री लिपी म्हणून फॉण्ट किंवा पूर्ण सॉफ्टवेअर आहे. ते मॅक वर आहे का विचारतोय. उद्यापर्यंत कळेल. विंडोज करता घेतले होते ते १३०० रू. ला मिळाले होते. त्यातून ऑफलाइन लिहीता येते मराठीत.

श्री लिपी १३००.. किती वर्ष झाली? मी १० वर्षांपूर्वी घेतलं पूर्ण पॅकेज तेव्हा ५००० ला होतं.
श्री लिपी मॅक १३००० च्या घरात आहे.

मी शोधतोय अजून. तात्पुरतं हे, आधी पाहिलं नसशील तर -- http://deimos3.apple.com/WebObjects/Core.woa/DownloadTrackPreview/emory-...

या पिडिएफ मध्ये वेगवेगळी जोडाक्षरं लिहायची माहीती आहे.

हा एक डिस्कशन थ्रेड - https://discussions.apple.com/thread/5280346?tstart=0
लगेच तुझ्या कामात येईल अस - shift+n gives me ळ on my OS X 10.6.8
Happy

योकु, पहिली लिंक पाह्यलीये. त्यात देवनागरी क्वेर्टीसाठी कीबोर्ड मॅप आहेत. ते जरा फोनेटिक असून कॉम्प्लिकेटेड वाटतंय टाइप करून बघितलं तेव्हा. पण हाच एकमेव पर्याय आत्तापर्यंत त्यातल्या त्यात बरा मिळालाय.
बरहा आणि माबोच्या सोपेपणाची सवय असल्यामुळे हे सगळंच किचकट वाटतंय.
दुसरी बघते.

>>ते पाह्यले.<<

फंक्शन कि + न, ल दाबल्यावर ण, ळ पॉपप मधुन सिलेक्ट करता येतो. "र्‍या" हा नोन इशु आहे. प्रकरण थोडं कटकटीचं आहे हे मात्र खरं.. Happy

फंक्शन कि + न, ल दाबल्यावर ण, ळ पॉपप मधुन सिलेक्ट करता येतो. << ओह ओके

माबो आणि बरहा अशी सवय झाल्याने कटकट जास्त मोठी वाटतेय... Proud

लॅपटॊप घ्यायचा आहे. ऒनलाईन घ्यावा का??
त्यांची कस्टमर सर्व्हिस कोल्हापुर किंवा पुणे येथे आहे का?
फोटोशॊप आणि किरकोळ ऒफीस कामांकरिता घ्यायचा आहे. बजेट् २५०००
मदत करा.

वरचे सगळे सल्ले वाचले तरीही मला अजूनही तोच प्रश्न पड्लेला आहे. कोणता घ्यावा लॅपटॉप. बजेट २२००० ते २५००० आणि नो कॉस्ट इएमआय वर मिळणार असेल तर ३००००
बॅटरी चांगली हवी. ६
वजन कमी.
स्क्रीन १५ इन्चेस
काम : वर्ड एक्सेल पावरपॉइंट, ब्राऊझिंग, फिल्म्स बघणे गाणी ऐकणे. (नो गेमिंग)
बरेच ऑप्शन पाहिले पण वेगवेगळे सेल्समन वेगवेगळ्या गोष्टी सांगतात.

सध्या बाजारात अव्हॅलेबल असणार्‍या प्रोसेसर्स पैकी कोणता घ्यावा आणि कोणता घेऊ नये हे समजले तर लॅपटॉप निवडणे सोपे जाईल....
एएमडी, इंटेलच्या बेगवेगळ्या जनरेशन्स : कोअर, पेम्टियम, अ‍ॅट्म,

ह्या सगळ्यात मदरबोर्डबद्दल कोणिच बोलत नाही.

रॅमबद्दल पण डीडीआरचं कोणतं व्हर्जन घ्यावं.

कधी कधी वाट्तं तो ३२ जीबी वाला लॅपटॉप घ्यावा आणि त्याला एक्सटर्नल हार्डडीस्क लावावी. : पण हे किती कसं चालेल हे नाही समजत.

एक टचपॅड वाला लॅपटॉप पाहिला ३०००० ला. त्यात म्हणे जसजसे अ‍ॅप वापरू तसतशी त्याची प्रोसेसिंग कपॅसिटी वाढते. तो मस्त १.४ किलो आहे. आणि योगा व्हर्जन मधला आहे. आणि बॅटरी ९ तास... (एसर का लिनोव्हो का एचपी आठवत नाही) उसपे दिल आ गया था... पण त्याचा स्क्रीन लहान होता ...

प्लीज सजेस्ट करा

३० के परेंत एचपी/डेल मध्ये डिसेंट डील मिळायला हवं.
कोअर आय५+ प्रोसेसर्स हवेत तर बजेट वाढेल.
बाकी ३० के मध्ये ७२०पी एच् डी डिसप्ले, १टीबी हार्ड ड्राईव आणि ४ जिबी रॅम सर्वसाधारणपणे मिळेल.

MI ek college student ahe
Mala programming karnyasathi laptop ghyacha ahe
Badget 30k paryant ahe
Please suggest Kara

इन्टेल प्रोसेसरच्या सिक्युरिटी बग बद्दलचं वादळ आपोआपच शमलं की काय?>>
त्यांनी अपडेटस दिलेत ना, ऑटोइन्स्टॉल आहेत.
वरचे सगळे सल्ले वाचले तरीही मला अजूनही तोच प्रश्न पड्लेला आहे. कोणता घ्यावा लॅपटॉप. बजेट २२००० ते २५००० आणि नो कॉस्ट इएमआय वर मिळणार असेल तर ३००००>> अमेरिकेतुन कोणी येत असेल तर मागवा, १०-२० के ने स्वस्त मिळतो,

सद्य परिस्थितीत कुठला लॅपटॉप घ्यावा? मुलाला आॅनलाईन शिक्षणासाठी हवा आहे. आता तो 8 वी ला आहे. पुढेही लागेलच.
कृपया योग्य लॅपटॉप सुचवा. 25000 ते 30000 पर्यंत..!

Pages