लॅपटॉप कुठला घ्यावा ?

Submitted by धनंजय वैद्य on 19 April, 2013 - 02:07

मला व माझ्या मित्राला साधारण 30-35 हजार पर्यँत बजेट असणारा लॅपटॉप घ्यायचा आहे. पण याविषयी आम्हाला कुठलिच माहिती नाही , त्यासाठी हा धागा .( किँमत ,कुठे मिळेल , सुविधा , आपले अनुभव अपेक्षित ! ) मी एक भावी शिक्षक आहे, त्याद्रुष्टीने पण, तसेच फोटो/व्हिडीओ इडिटीँग , इंटरनेट वापरासाठी . पिक्चर क्वॉलिटी पण सर्वोत्तम हवी !

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा त्रास मला लेनोव्होच्या मशिनवर खूप झालाय.

मला पण घ्यायचाय लॅपटॉप. सेकेंडरी म्हणून. नेट, वर्ड, एक्सेल (एक्सेलमधल्या खूप मोठ्या, हेवी फाइल्स), पॉवरपॉइंट, १-२ स्टॅटेस्टिकल अ‍ॅनालिसिसची सॉफ्टवेअर्स, थोडा टिपी करणे. प्रोसेसर स्पीड कमी असू नये. हेवी फाइल्स वापरताना स्पीड कमी झाली की खूप इरिटेटिंग होतं.

बजेट जितकं कमी असेल तितकं चांगलं. Proud

वरदा, नवर्‍याचा पण सेम आहे, २ वर्ष होत आलीत. सध्या मीच ताबडवतेय.

माझा पण डेलचा ७ वर्ष जुना लॅपी अजूनही कधीमधी वापरला जातोय. (बॅटरी गेलीये, स्क्रीन डुगडुगल्यामूळे कधीकधी हार्मोनियमचा फिल येतो असले मायनर प्रॉब्लेम सोडले तर अजूनही स्पीड वैगरे मस्त. Happy ) हा मात्र घरात सगळ्यांनीच खूप ताबडवला.

हो मला पण उंदरानेच जमेल. शिवाय मला डेस्कटॉपच्या दणदणीत किबोर्डाची सवय आहे. लॅपटॉप गुळगुळीत वाटतो इन दॅट कंपॅरिझन.
पण माझ्या घरी डेस्क्टॉप आणायचा म्हणजे जागेची वानवा आहे म्हणून लॅप.

कुठे न्यायचा नाहीये तर डेस्कटॊप केव्हाही बेस्ट लॆपी पेक्षा. कमी खर्चात भरपूर काम.
आणि पाठ, मान वगैरे दृष्टीने डेस्कटॊपला तोड नाही.

नी, एसरचे मिनी लॅपटॉप येतात टॅबसारखे. त्याला डीव्हीडी रीड्/रायटर नसतात.
डेलचे वोस्ट्रो प्रोफेशनल युसेजसाठी (डोमेन वर) मस्त आहेत. स्टर्डी आहेत आणि हेव्ही पण नाहीत जास्त. पण त्यातच लॅटिट्युड घेत असाल तर स्क्रीन १५.६" येते आणि लॅपटॉप अवजड होऊन जातो.

सोनीचे व्हायो सगळेच लाईटवेट आहेत (१.८किपासुन) त्यांचे रंगीबेरंगी कीपॅड कव्हर्स आणि माऊस पण मिळतात बरोबर.
http://www.sony.co.in/productcategory/vaio-laptop इथे चेक करा. तुम्हाला हवे तसे कॉंबीनेशन टाकुन सर्च करु शकता.

मी पर्सनली डेस्कटॉप प्रेपर करते विथ वायर्ड इन्टर्नेट. बाहेर पर्याय नसेल तरच लॅपटॉप. Happy पण ज्यांचे कामाचे स्वरुपच बाहेर फिरण्याचे असेल तिथे पर्याय नाही लॅपटॉपला.

पिक्चर क्वॉलिटी पण सर्वोत्तम हवी !
<<
पिक्चर क्वालीटीसाठी सीआरटी मॉनिटरला पर्याय नाही असे ऐकून आहे. लॅपटॉपवर 'विसिविग' होत नाही म्हणे (WYSIWYG : what you see is what you get)

शुभांगी, मार्केटात अजूनही एक्स्पी मिळतं! येस!
कुणी अल्ट्राबुकचा पर्याय का नाही पहात? बजेट मात्र वाढत त्यात...

घरीच ठेवायचा असेल तर डेटॉ. मस्त >>> +१००१
गेल्या सहा महिन्यांपास्न आयमॅक वापरतोय... नो प्रॉब्लेम अ‍ॅट ऑल... Happy

लेनोव्हो उत्तम आहे... गेली ५ वर्ष पादडतोय.. आणि नवीन दुसरा पण तोच घेतलाय..

लॅपटॉप घेताना सर्वात महत्त्वाचे महणजे सर्व्हिसिंग करायची वेळ आलीच तर सहज उपलब्ध होऊ शकेल अश्या कंपनीचा घ्या... डेलची सर्व्हिस पुण्यात तरी अगदीच बंडल आहे.

बजेट थोडं वाढवा आणि सरळ मॅक-बुक/एअर घ्या >>> का बरं मॅकबुक मध्ये पैसे घालवायचे जर इतर चांगले आणि स्वस्त ऑप्शन्स उपलब्ध असतील तर ?

योगेश ते टेक सेव्ही साठी ठीक आहे पण वर धनंजयला त्याची गरज नसावी.
आमच्यासारख्यांना त्याचं खरचं काही अप्रुप वाटत नाही , माझा आयपॅड तर धुळ खात पडलाय.

टेकसॅवी ठीक, पण मला अजूनही नाही वाटत की आयडिवायसेस च्या डीझाईन + क्वालीटी चे तोड करंट मार्केटात आहेत त्या प्राईस रेंज मधे! मावैम... बाकी Light 1 घ्याच!

ईब्लीसदा: Lol

ते टेक सेव्ही साठी ठीक आहे पण..
<
ओ अजोबा,
मॅक टेकसॅव्ही लोकांसाठी आहे अन बाकी सग्ळे बिन्डोक जनरल पब्लिक साठी, असे इम्प्लाय होते आहे तुमच्या वाक्यातून. जरा यक्षप्लेन कर्ता का>?

बरेच जण म्हणतात की डेलचा आयडियाज किँ 40000/- घे म्हणुन. मी तर या क्षेत्रात अगदी नवखा आहे . श्रीँनी अजुन मार्गदर्शन करावे .

HP 1000-1204TU हा नवीन लॅपटॉप घेतलाय गेल्या आठवड्यात. मला एक शंका आहे त्यात..त्याचे जे टचपॅड आहे ना त्यामधे डाव्या वरच्या कोपर्‍यात एक खळगा आहे गोल आकाराचा. त्याचा उपयोग कसा करतात ते माहीत नाही. कोणी सांगू शकेल का?

धनंजय - वर तुम्ही जे स्पेक्क्स विचारताय त्यानुसार, मी तरी तुम्हाला सोनी व्हायो सजेस्ट करेन.
लॅपी घेतांना जनरल स्पेक्स खालीलप्रमाणे पहा -
१. कोअर आय ३ वा ५ प्रोसेसर. (आय ५ ला बजेट जाईल पण जरा वर)
२. २००-३०० वा ५०० जीबी हार्डड्राईव
३. ग्राफिक्स प्रोसेसर्स - ऑनबोर्ड की डेडीकेटेड (उदा. एनविडीया वा रेडॉन) (यातही बजेट आहेच)
४. डिस्प्ले क्वालिटी, तुम्ही दिलेल्या बजेट मधे, सोनी वा डेल एवढी चांगली डिस्प्ले मी तरी नाही पाहिलेले अजून.
५. रीसेल वॅल्यू चा विचार आहे का?
६. तुमचं करंट लोकेशन - हे आफ्टर सेल्स सर्वीस करता...
जनरली या किंमतीत लॅपी च येतो त्यामुळे डीवीडी बर्नर शक्यतो मिळतोच...

हे पहा -
एग्झॅक्ट ३३के मधे - http://www.sony.co.in/product/vpceh35en
त्याच किमतीत डेल विथ विंडोज ८ पण काही गोष्टी नाहीत - एचडीडी कमी आहे, ग्राफिक्स पण कमी - http://configure.ap.dell.com/dellstore/config.aspx?oc=w540114in8&model_i...

अजून शोध्तोय...

तुम्हाला प्रोफेशनली हाय एण्ड ग्राफिक्स, एडिटींग असे करायचे असेल तर मॅकसारखा मित्र नाही.
पण पर्सनल वापरासाठी, युझर फ्रेंडली म्हणून मला तरी विंडोज जास्त प्रीफरेबल वाटते.
जगभर खूप जास्त वापरले जात असल्याने असेल पण अनेक छोटीमोठी सॉफ्टवेअर्स ही जास्त विंडोज फ्रेंडली आहेत असा कोणे एकेकाळचा अनुभव होता.

काही प्रश्न
१. मॅकच्या लॅपीचा विचार करायचा तर कॉन्फिगरेशन कसं बघावं?
म्हणजे विंडोजमधे फोटोशॉप आणि कोरल ड्रॉ चालवायचे आता तर किमान ४ जीबी किंवा अधिक रॅम असेल तर फो किंवा को चालवताना बाकीचे सगळे बंद पडणे, हँग होणे होत नाही. स्मूथ चालते. वगैरे.. तशी मॅकमधे किती जीबी लागेल कमीतकमी?
प्रोसेसर कोणता?
आणि हार्ड डिस्क कपॅसिटी?

२. फोटोशॉप, कोरल ड्रॉ, अगदी बेसिक साऊंड एडिट, मूव्हि एडिट सॉफ्टवेअर्स (अडोब प्रिमियर टाइप्स!), ऑफिस इत्यादी सगळे उत्तम चालेल यासाठी काय कॉन्फिगरेशन असावे?
प्रोसेसर - i3, i5 किंवा i7 यातला काहीही चालेल
रॅम - ४ जीबी वा अधिक
हार्डडिस्क कपॅसिटी - ५०० जीबी ते १ टिबी
असे असावे असे मला वाटतेय ते बरोबर आहे का?

३. वरील सर्व गरजांबरोबरच लॅपीचे वजन २ किलो पेक्षा कमी असावे अशी गरज आहे. (थँक्स टू स्पॉण्डि... ). ते शक्य आहे का? नेटवर सर्चले असता जेमतेम १-२ पर्याय मिळतायत

४. साधारण बजेट काय ठेवू?

५. मॅकचा विचार करावा का वरील गरजांच्या दृष्टीने आणि तो कितीपर्यंत जाईल?

६. लॅपी मॅकचा आणि पिसी विंडोज अश्या कॉम्बोमुळे कितपत प्रॉब्लेम्स येतील?

नी शक्यतो मॅक ऑप्टीमम कॉन्फिगचे असतातच. मॅकमध्ये हँग होणे, फ्रीझ होणे हे प्रकार अभावानीच होतत.
तुझ्याकरता एक अजून पर्याय म्हणजे एसएसडी (Solid State HDD) आहे. यात पेनड्राईव सारखी फ्लॅश मेमरी असते. मूव्हिंग पार्टस नसतात. त्यामुळे ही ड्राईव सुप्परफास्ट असते. सेफ असते कारण डेटालॉस चे चान्सेस नसतात ऑलमोस्ट.

जर आय५, ४जीबी रॅम अन १२८/२५६ जीबी एसएसडी चा विंडोज लॅपी पहाशील तर ५०/६० के ला जाईल.
सिमिलर कॉन्फिग तुला मॅकबुक एअर ला मिळेल; ते ७०/८५ के पर्यंत. आताच स्टुडंट डिस्काऊंट मिळू शकेल सप्टेंबर मिड पयर्‍ंत. यात जवळ जवळ १५के कमी होतील. हा ऑफिशिअल डिस्काऊंट असतो.

मॅकबुक एअर ची बॅट्रीलाईफ भुरळ पाडणारी आहे. १२ तास क्लेम करतात Happy

वर दिलेली सगळी सॉफ्ट्स चालतात मॅक वर.

आताच स्टुडंट डिस्काऊंट मिळू शकेल <<<
मी कुठल्याही बाजूने स्टुडंट नाहीये रे.

मॅक एकुणातच भुरळ पाडणारे प्रकरण आहे पण लॅपटॉप हे माझे प्रायमरी मशीन नाही. प्रायमरी मशीन पिसीच आहे. गेल्याच वर्षी नवीन घेतलेला आहे तोच मी आता माझ्याकडे घेणारे. मग सेकंडरी मशीन (पुण्यात/ बाहेरगावी असताना कामे करणे, लेक्चर्सच्या इथे घेऊन जाणे वगैरे) एवढा खर्च करून घ्यायचे का हा एक प्रश्न आणि एक पिसी, एक मॅक अश्या कॉम्बोमुळे मज अडाण्याचे झोल किती बरे होतील ही दुसरी भिती असला सगळा प्रकार आहे.

तुझ्याकरता एक अजून पर्याय म्हणजे एसएसडी (Solid State HDD) आहे. यात पेनड्राईव सारखी फ्लॅश मेमरी असते. मूव्हिंग पार्टस नसतात. त्यामुळे ही ड्राईव सुप्परफास्ट असते. सेफ असते कारण डेटालॉस चे चान्सेस नसतात ऑलमोस्ट. <<
हे काहीही कळलं नाही. याचा वापर कुठे करायचा मी?

नी. योकुचा प्रतिसाद योग्य आहे. अर्थात मॅक तुला घ्यायचा नसेल तर तुझ्यासाठी core i3 + 4 GB + 500 GB हे योग्य कॉन्फिग ठरेल. १४" की १५.६" हे तू ठरव. १५.६" घेतल्यास वजन वाढेल. वजनाने हलका लॅपटॉप घेतल्यास त्याच प्रमाणात खिसाही हलका होईल. Happy corei3 - 40K, corei5- 48K पर्यंत पडेल.

http://www.flipkart.com/asus-s56cm-xo177h-ultrabook-3rd-gen-ci3-4gb-500g... हा एक चांगला ऑप्शन वाटतोय. Croma मधे फेरफटका मारुन ये. सगळे ब्रांडस बघायला आणि हाताळायला मिळतील , मग ठरवु शकतेस.

SSD (Solid State Disk) ही हार्ड डिस्कच्या ऐवजी वापरली जाते. Mechanical Parts नसल्याने access फास्ट असतो,. पण अजुन याची किंमत बरीच जास्त असल्याने तितकासा परवडणेबल ऑप्शन नाही.

नी स्टूडंड डिस्काऊंट पदरात पाडून घ्यायला विद्यार्थी असण्याची वा दाखवण्याची गरज नाही! :p

एसेस्डी ही लॅपीला बिल्ट्च असते. Its a type of a HDD. पण आकारानी अगदीच लहान असल्यानी सगळा लॅपटॉपच हलका होतो. अर्थात वर भ्रमरानी सांगीत्ल्याप्रमाणे खिसाही Happy

मार्केटात जाउन आलो.
कन्फुजलो.
फ्लिपकार्ट आणि कुम्पनीच्या साइटच वर गेलो तर भंजाळलो.
आता इथेच मदतीचा हात मिळु शकेल.

बजेट ३०-३५ आहे.
लॅपटॉप हवाय.
सर्व्हीस प्रोव्हायडर पिम्परी चिन्चवड मध्ये असायला हवेत.
काय कॉन्फिग येवु शकेल?
कोणता ब्रॅन्ड चांगला?
डेल, एचपी की लिनोव्हो?
ग्राफिक्स कार्ड ऑन बोर्ड आणि डेडीकेटेड मध्ये काय फरक आहे?
वापर नॉर्मल राहिल.
नेट मस्त फास्ट चाललं पाहिजे.
फोटो प्रोसेसिन्ग करण्यासाठी सॉफ्टवेअर वापरेन.
३डी सॉफ्तवेअर वापरण्याची शक्यता कमीच आहे पण ३डी गेम्स वै वापरेन.
जरा मदत करा लोकहो.

झकोबा,

तुमचं काम किती तास असतं लॅपीवर?

तुमच्या बजेटमधे बसेल असा कोणताही घ्या. सर्विस चांगली व जवळ असेल अशी कोणतीही कंपनी चालेल. डेल, एचपी, लेनोव्हो यांच्यात सर्वांतच प्रोसेसर इंटेलचाच असणारे. विंडोज माय्क्रोसॉफ्टचीच असणार आहे. अँड सो ऑन. तात्पर्य, ब्र्यांडनेमसाठी लै पैसे मोजण्यात अर्थ नाही. मी एसर वापरतोय गेली ४-५ वर्षे. मस्त चालतोय अजूनही. फक्त २२ हजारात घेतला होता तेव्हा.

कार्डाबद्दल : ऑन बोर्ड कार्ड कमी पावरचे. डेडिकेटेड ग्राफिक्स कार्ड जास्त पावरचे. त्याला स्वतःची वेगळी रॅम असेल. तुमचे काम कमर्शियल ग्राफिक्स एडिटींगचे नसेल, तर ऑन बोर्ड पुरते.

हार्ड डिस्क आजकाल ५०० जीबीच्या पुढेच असतात, अन रॅम ४ जीबी तरी घ्या.

स्क्रीन साईजची काळजी करू नका, कोणत्याही एलईडी टीव्हीला जोडून मोठ्या स्क्रीनचा आनंद घेता येतो. कॉर्डलेस माऊस + कीबोर्ड स्वस्तात मिळतात आजकाल.

लॉपटॉप वजनाला लाईट, अन कीबोर्डवर हात नीट (कंफर्टेबली) फिट होताहेत का, हे बघा. दुकानातच चालू असलेल्या लॅपीजच्या व्हेंटला हात लावून कंपॅरिटिवली किती गरम होताहेत ते पाहून घ्या. शोरूम्स एसी असतात हे ध्यानात ठेवा.

नेट फास्ट म्हणजे काय? किती फास्ट चालेल ते तुमचा सर्विस प्रोवायडर प्लस तुम्ही घेतलेला डेटा प्लान याच्यावर अवलंबून असणार आहे. मुन्शीपाल्टीचा नळच मुळात, अर्धा इंची असेल, तर त्यावर १ एचपीची मोटर लावून पाणी जोरात येऊच शकत नाही.

Pages