लॅपटॉप कुठला घ्यावा ?

Submitted by धनंजय वैद्य on 19 April, 2013 - 02:07

मला व माझ्या मित्राला साधारण 30-35 हजार पर्यँत बजेट असणारा लॅपटॉप घ्यायचा आहे. पण याविषयी आम्हाला कुठलिच माहिती नाही , त्यासाठी हा धागा .( किँमत ,कुठे मिळेल , सुविधा , आपले अनुभव अपेक्षित ! ) मी एक भावी शिक्षक आहे, त्याद्रुष्टीने पण, तसेच फोटो/व्हिडीओ इडिटीँग , इंटरनेट वापरासाठी . पिक्चर क्वॉलिटी पण सर्वोत्तम हवी !

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि टचस्क्रिनच घ्या............ नाहीतर विन्डो ८ वैतागवाडी वाटेल

Apple MacBook Pro MD101HN/A 13-inch
ह्या लॅपटॉप विषयी जाणकारांची मते हवी आहेत.
आणि एक...
Dual OS केल्याने काही Problem होतो का?

संदीप, मॅकबुक प्रो १३" हे रीलेटिव्हली ओल्ड आहेत.
आता जर मॅकबुक प्रो हवं असेल तर १३" आणि १५" मध्ये रेटिना डिस्प्लेवाले आहेत. १३" वाल्याची किंमत १ लाखच आहे डायरेक्ट Sad

जर खूप प्रो लेव्हल चं काम पडत नसेल तर मी सजेस्ट करीन की मॅकबुक एअर १३" घ्या. स्टूडंट डिस्काऊंट मिळून बर्‍यापैकी स्वस्त पडतो.

परफॉर्मन्स वाईज कुठेही कमी नाही (वर तुम्ही दिलेल्या मॉडेलच्या तुलनेत). १२८ जीबी स्टँडर्ड फ्लॅश ड्राईव आहे. त्यामुळे मस्त परफॉर्म करतो. वर बॅटरी लाईफ १२ तास. (आणि हो, मॅकबुक एअर ला तेव्हढं मिळतं!)

ओल्ड आहेत.>>>
१३" वाल्याची किंमत १ लाखच आहे डायरेक्ट>>>
ओल्ड मध्येच रॅम वैगरे वाढ्वता येतात नवीन मध्ये नाही, (ऐकीव माहिती)
पण सध्या अ‍ॅमे़झॉन वर ६२,००० मध्ये दाखवत आहेत. म्हणून विचार केला.

Dual OS केल्याने काही Problem होतो का?

संदिप, ओल्ड मध्येच रॅम वैगरे वाढ्वता येतात नवीन मध्ये नाही, (ऐकीव माहिती) >>> बरोबर.
ओल्ड मॅकची रॅम वाढवणे हे देखिल नाजूक काम! वर त्या कंपॅटिबल रॅम मॉड्यूल्स भारतात मिळतात की नाही तेही नाही माहीती.

ऑफिसातल्या एका कलिग नी मॅकबुक एअर ५ दिवसांपूर्वी घेतला स्नॅपडिल वरून. ५५ हजारात मिळाला. त्यामुळे तिथेही एकदा चेक कर.

ओएस १० मॅवरिक्स (जी १० सप्टेंबरला फ्री अपग्रेड होईल ओएस १० योसेमिटि ला) + विंन्डोज ७ / ८ / ८.१ चालवू शकतो. पण त्याकरता एकदा पूर्व अभ्यास करावा. बर्‍याच बारीक बारीक स्टेप्स फॉलो कराव्या लागतात. मी एकदोघांना विचारून सांगतो.

धन्यवाद योगेश!

>>> बर्‍याच बारीक बारीक स्टेप्स फॉलो कराव्या लागतात. >>>
ह्याच्या डिटेल हव्याच आहेत.

मला माझ्या भाची साठी ( भारतात ) एक साधा लॅपटॉप घ्यायचा आहे. त्यात फक्त ह्या सुविधा पाहीजेत.

१. USB वर सिनेमा बघणे
२. सीडी/डीवीडी वर सिनेमा बघणे
३. व्हीडीओ चाटींग ( वेबकॅम पाहीजे )
४. थोडे फार गेमिंग, साध्या सुध्या गेम्स
५. ईंटरनेट
६. WiFi
७. ब्लुटुथ

टोचा, एवढाच वापर असेल तर उगाच एचपी, लेनोव्हो, सोनी वगैरे कंपन्यांच्या मागे जाऊ नका. एसर घ्या पैसे वाचतील. २ जीबी रॅम आणि ५०० ची हार्ड डिस्क पुरेशी आहे. प्रोसेसर्समधे तुमच्या बजेटमधे जो बसेल तो पळेल.
ऑप्टिकल ड्राइव्ह एक्स्टर्नल चालणार असेल तर बेसिक नेटबुक + ऑप्टिकल ड्राइव्ह असेही घेता येईल. मग ते लेनोव्हो वगैरेचे घेतले तरी लॅपटॉपपेक्षा स्वस्त पडेल.

धन्यवाद नीधप. मी नेट्वर एसर चा २२००० ला ५०० जीबी वाला बघितला होता. स्वस्त वाटला म्हणुन शंका आली. एसर घ्यायला हरकत नाही आता.

अजुन एक शंका - हा असुस नावाचा ब्रँड कसा आहे?

मॅकबुक - बरेचसे softwares चालत नाहीत.
e.g. All the functions of excel don't work in mac. Creates problem for printer configuration.
१२ तासांचा दावा आहे पण प्रत्यक्षात मात्र १.५-२ तासांच्यावर बॅटरी टिकत नाही.

मागच्या वर्षी लेनोवो घेतला. रोज १२-१४ तास वापरुनपण आता ४-५ तास तरी बॅटरी उत्तम चालते.

lenovo
2 GB RAM
1 TB hard-drive
AMD A8
DVD drive
Windows 8.1
14.1 inch
33k (Without MS Office)

Office 2013 - सुंदर.

पिल्या:
माझ्या मॅकबुकची बॅटरी ५ वर्षे जुनी आहे. अजुनही चालते. आता रिप्लेस सुन म्हणुन मेसेज येतोय तरीही २-३ तास चालतेच. बाकि तुम्ही म्हणताय ते फंकशन चालत नाही असा कोणताही प्रॉब्लेम आलेला नाही.

ड्युअल ओएसः माझ्या मॅकबुकवर ड्युअल ओएस आहे. पण वापरली कधीच जात नाही. आता पर्यंत ४-५ वेळाच वापरली आहे. कारण कधी गरजच पडली नाही. व्ही एम वेअर सॉफ्टवेअर इन्स्टाल करा. जेवढा वेळ पिसीवर इन्स्टाल करायला लागतो तेवढाच वेळ लागतो.

नविनचे माहित नाहे पण जुन्या मॅकबुक वर रॅम इन्स्टॉल करणे खुप सोपे आहे. फक्त बॅटरी काढुन एक पट्टी काढली कि एक लिव्हर प्रेस करुन रॅम बाहेर येतात. या रॅम भारतात पण मिळतात.

आसुसचा टॅब धूळ खात पडलाय, एक तर प्रोप्रायटरी कनेक्शन्स , केबल्स वगरे. ब्याटरी अडाप्टरही प्रोप्रायटरी कहर म्हणजे आख्ख्या मुम्बैत कोठेही मिळत नाही 'मागवावी'लागते. सर्विस सेन्टरच्या जागा सारख्या बदलतात. हा टॅब ब्यागेत ठवलाकी आपोआप जागा होतो अन ब्याटरी खायला लागतो. कामाच्या वेळी ऑन केला की ब्याटरी सम्पलेली असते. हा प्रॉब्लेम नेटवर अनेक फोरम मध्ये मांडलेला आहे जगभरच्या लोकानी पण तो सोडवायला अजून टेक्निशियन जन्माला यायचाय. त्याचा जन्म होइपर्यन्त तूर्त ठेवून दिलाय. गम्मत म्हणजे सर्विस सेन्टरला हा प्रश्न कोणाला कळतच नाहीये...
ह्या आसूसचा खप कमी असल्याने डुप्लिकेट असेसरीजही बाजारात येत नाही जसे की डाटा केबल, चार्जिंग अडाप्टर इ. चार्जिंग अडाप्टर किम्मत २२०० रुपये वगैरे !

प्रसिद्ध ब्रॅन्डचे प्रॉडक्ट घेण्यात एक फायदा असतो की तो कोणीही रिपेर करू शकतो आणि त्याचे डुप्लिकेट का होईना पार्ट्स मिळतात

Excel मधील बरेचसे add-ins. Data Analysis, Solver. XLMiner install होत नाही. बर्याच वेळा graphs काढायला problem येतो.

SPSS, PERMAP सारखे softwares install नाही होत.

आणि हे pro, air दोन्हीमध्येपण सेमच.

That is MicroSoft's fault man! मायक्रोसॉफ्टवाल्यांची लायकीच नै मॅकवर चालतील असे प्रोग्राम लिहायची! Wink

-FANBOi

हम्म! पण MS चे जे software नाहीत त्यांनाही तसाच problem येतो.

आणि दुर्दैवानी apple कडे MS Office ला replace करु शकणारं software नाहीये.

माझ्या वडिलांना excel पॉवरपॉईंट आणि नेट सर्फिंग साथी एक 30 हजाराच्या आतला लॅपटॉप हवा होता.
INR 23,440/-मध्ये आम्हाला खूप चांगली डील मिळाली.

lenovo G50-30
4 th generation Pentium Quad Core
Hard Disk : 1 TB
RAM : 2 GB

http://www.snapdeal.com/product/lenovo-g4030-80g00018in-laptop-4th/66452912

Pages