Submitted by धनंजय वैद्य on 19 April, 2013 - 02:07
मला व माझ्या मित्राला साधारण 30-35 हजार पर्यँत बजेट असणारा लॅपटॉप घ्यायचा आहे. पण याविषयी आम्हाला कुठलिच माहिती नाही , त्यासाठी हा धागा .( किँमत ,कुठे मिळेल , सुविधा , आपले अनुभव अपेक्षित ! ) मी एक भावी शिक्षक आहे, त्याद्रुष्टीने पण, तसेच फोटो/व्हिडीओ इडिटीँग , इंटरनेट वापरासाठी . पिक्चर क्वॉलिटी पण सर्वोत्तम हवी !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आपल्यालाही विनंती करतो की आपण
आपल्यालाही विनंती करतो की आपण इथे येऊन आपली सोपी इंटरनेट व संगणकाची माहिती सोप्या भाषेत द्यावी, व मायबोलीचा वापर आपल्या ब्लॉगचा ट्यार्पी वाढविण्यासाठी करू नये
हो भ्रमर. तुम्ही
हो भ्रमर. तुम्ही सांगितल्याप्रमाणेच. खरं म्हणजे वर उल्लेख करायला हवा होता. राहून गेला.
आय ३ प्रोसेसर आणि आय ५
आय ३ प्रोसेसर आणि आय ५ प्रोसेसर यामुळे नक्की काय फरक पडतो?
आय ५ लेटेस्ट असल्याने, प्रोसेसिंग फास्ट होत असावे, पण याव्यतिरिक्त काही अजून फायदे आहेत का?
मी ACER E15 लॅपटॉप घेतला
मी ACER E15 लॅपटॉप घेतला विंडोज ८ सकट २२००० ला पडला. सिनेमे बघायला, गेम खेळायला आणी जालावर जाण्यासाठी मस्त वाटला आणि स्वस्त पण. स्क्रीन पण १५.५ इंच आहे. क्वाड प्रोसेसर आहे.
आता कसा चालतो ते बघु.
Dell inspiron 3542 madhe wifi
Dell inspiron 3542
madhe wifi kse on karave?
aani bluetooth discover ka hot nahiye..
अक्षय.... बहुधा fn+f2 असे
अक्षय.... बहुधा fn+f2 असे काँबेनेशन आहे वायफाय + ब्लुटुथ सुरु करण्यासाठी.
चैतन्य, processing power मध्ये फरक आहे. ईंटेल च्या साईटवर जाऊन पहा.
आय ३ आणि आय ५ च्या प्रोसेसिंग
आय ३ आणि आय ५ च्या प्रोसेसिंग मध्ये तर फरक आहेच पण कॅश मेमरी अन थ्रेडिंग मध्ये सुद्धा फरक पडतोच. आता आय ५ लेटेस्ट जनरेशन चा घेणे जास्त चांगलं राहील + रॅमही कमीतकमी ४ जीबी पहा.
नवीन लॅपटॉप घ्यायचा
नवीन लॅपटॉप घ्यायचा आहे.त्याच्यामधे मला Oracle application R12, oracle database server 10/11g, oracle development tools with dual operating system like windows and Linux हे एवढे टाकायचे असेल तर त्याचे configuration काय असावे? कोणी चांगला सुचवू शकेल का?
धन्यवाद!!
कोअर आय ५ (२०१४ एडिशन),
कोअर आय ५ (२०१४ एडिशन), कमीतकमी ४ जीबी रॅम, १ टीबी हार्ड-ड्राईव एवढं बेस कॉन्फिग पाहा. याउपर जसं बजेट असेल तसं कमी जास्त करता येईल.
मी ही खरेदी करायचं ठरवत आहे.
मी ही खरेदी करायचं ठरवत आहे. सध्याच्या उपलब्ध प्रॉडक्ट्समधे हे बरं वाटलं. कुणाच्या काही सजेशन्स असतील तर कृपया सांगा.
आधीच्या लेनोव्हो नोटबुकने छान साथ दिली पण आता किबोर्ड, बॅटरी सगळ्यांनीच माना टाकल्या. नवी बॅटरी घालायचा खर्च आणि किती चालेल गॅरन्टी नाही त्यामुळे हा घ्यायचा ठरवत आहे. नोटबुकवर माझा वापर फक्त वर्ड प्रोसेसर आणि बेसिक इंटरनेट इतकाच मर्यादित आहे.
HP 15-g049AU Notebook (APU Quad Core A8/ 4GB/ 500GB/ Win8.1) (K5B45PA)
http://www.flipkart.com/hp-15-g049au-notebook-apu-quad-core-a8-4gb-500gb...
कस्टमर रिव्ह्यूजमधे कीज
कस्टमर रिव्ह्यूजमधे कीज चांगल्या नाहीत या प्रॉडक्टच्या आणि त्याकरता वॉरन्टीही नाही असं लिहिलं आहे. माझा मॅक्झिमम वापर लिहिण्याकरता असतो.
तोशिबाचा लॅपटॉप कसा आहे? किंवा इतर कोणता कोणी सुचवू शकेल का?
शर्मिला डेल पाहा... पण ऐकून
शर्मिला डेल पाहा... पण ऐकून आहे की पुण्यात सर्वीस नाही चांगली. लेनोव्हो एक बरा पर्याय आहे...
डेलची मुंबईत असेल सर्व्हिस
डेलची मुंबईत असेल सर्व्हिस चांगली. बघायला हवी. लेनोव्हो नको. त्याचेही कीज फार चांगल्या नाहीत.
हो... मुंबईत आहे सर्वीस बरी.
हो... मुंबईत आहे सर्वीस बरी. एचपी पण पाहा एकदा. पण त्यांची कन्झ्युमर डिवायसेस ची साईट मला तरी बर्यापैकी किचकट वाटली. अन नेमकं जे मॉडल आपण निवडतो ते मार्केटमध्ये नसतं!
मी स्वतः कधी घेतला नाही ऑनलाईन पण फ्लिपकार्ट अन बाकी साईट्स पाहाता येऊ शकतील.
तोशिबाचा लॅपटॉप कसा
तोशिबाचा लॅपटॉप कसा आहे?>>>>त्याची बॅटरी खुप गरम होण्याचा प्रॉब्लेम आहे असे ऐकिवात आहे.
लॅपटॉपच घेतोय मग आय थ्री
लॅपटॉपच घेतोय मग आय थ्री प्रोसेसरसाठी ८-१० हजार का जास्त मोजायचे.
एएमडी का नाही असा एक प्रश्न पडला.
अर्थात माझा घेवुन झालाय.
ज्यांना घ्यायचा आहे त्यांनी ह्या प्रश्नावर देखील विचार करा.
त्यातही तीन-चार वर्षात लॅपटॉप अपग्रेड करणार्यांनी विचार केलाच पाहिजे.
पर्सनल कामासाठी लॅपटॉप
पर्सनल कामासाठी लॅपटॉप घ्यायचाय.. मुख्य काम डेटा स्टोअर , ब्राउझिन्ग, मूव्हीज, गेम्स, थोडे फार फोटो प्रोसेंसिंग, लहान मुलांचे प्रोजे़कट बनविणे.. ऑफिस कामासाठी ऑफिस लॅपटॉप आहे...घेतल्यावर लवकर अपग्रेड करायचा प्लॅन नाही.. अशा रिक्वायरमेंट साठी काय घ्यावे i5, ४GB RAM, 1TB? कुठल्या ब्रँडचा?
मी तीन/चार महिन्यांपूर्वी
मी तीन/चार महिन्यांपूर्वी घेतला लेनोवो चा बेसिक लॅपी. रु.२४५००/- (बहुतेक; का २३ लाच पडला) पेंटीअम क्वाड्कोअर, ४ जिबी रॅम, १ टीबी एचडीडी, एचडी स्क्रीन १५ इंच. एव्हढं मिळालं. विंडोज ८.१ सुद्धा होतंच, ओईएम कॉपी. ते आता परवाला विंडोज १० ला फ्री अपग्रेड होईल.
लॅपटॉप मस्त चालतोय. कधीकधी जSSSरा स्लो वाटतो पण चलता है. तसही विंडोज ८.१ हे रीसोर्स हंग्री नाहीये त्यामुळे नेहेमीचे कामं नीट होतात. दहाव्या खिडक्या आल्या की पाहू कसा काय परफॉर्मन्स असेल तर.
धन्स योकु..पेंटीअम बघितला
धन्स योकु..पेंटीअम बघितला होता..पण स्पीड ची शंका वाटत होती.. बरे झाले कळले ते..
Dell Inspiron 15 3542
Dell Inspiron 15 3542 Notebook (Intel Celeron 2957U- 4GB RAM- 500GB HDD- 39.62cm (15.6)- DOS) (Red)
२०९००/- मधे मिळतोय स्नॅपडीलवर. कसा वाटतोय? जनरल घरगुती वापरासाठी घ्यायचे चाललेय.
ओएस कोणती टाकणार?
ओएस कोणती टाकणार?
Windows 7, Office 2007, गेम्स
Windows 7, Office 2007, गेम्स फारसे नाही (त्यासाठी ऑलरेडी मोबाईल घेतलाय
) किरकोळ ब्राऊझिंग वगैरे वगैरे.
शक्यतो नका घेऊ. नवा प्रोसेसर
शक्यतो नका घेऊ. नवा प्रोसेसर असलेलाच घ्या. पुढ्यचा ५-७ वर्षांचा विचार करता...
Celeron नाका घेऊू , त्या
Celeron नाका घेऊू , त्या पेक्षा कमित कमी PDC.किवा PQC / i3. घ्या.
अजुन थोडे बजेट वाढवून आमज़ॉन वर आय ३ बघा
Dell Inspiron 3542 15.6-inch
Dell Inspiron 3542 15.6-inch Laptop (Core i3-4005U/4GB/500GB HDD/Linux/Integrated Graphics), Black २५१५०
http://www.amazon.in/Dell-Inspiron-3542-15-6-inch-Integrated/dp/B00MECLP...
भारतात एकाला CORE 7, 8gb ram,
भारतात एकाला CORE 7, 8gb ram, 1 to 2 TB memory असा हवा आहे. भारतातुनच घ्यायचा आहे. कुठुन, कोणता घ्यावा काही सुचना? मला काहीच कल्पना नाही.
मॅकबुक (एअर/प्रो वगैरे काही
मॅकबुक (एअर/प्रो वगैरे काही नक्की नाही) घ्यायचंय. युज्ड घ्यायचा विचार आहे कारण नवीनच्या किमती परवडणार नाहीयेत.
युज्ड आणि खात्रीशीर कुठे शोधावे?
प्रोसेसर - i3, i5 किंवा i7 यातला काहीही चालेल
रॅम - ४ जीबी वा अधिक
हार्डडिस्क कपॅसिटी - ५०० जीबी ते १ टिबी वा अधिक
असे साधारण कॉन्फिग चालणारे.
आयपॅड नकोय. लॅपटॉपच हवाय. मॅकच हवाय काही कारणाने.
हल्ली ऑप्टिकल ड्राइव्हज येतच नाहीत का? ती सेपरेट घ्यावी लागते का?
मदत करा लोकहो.
मी ही शोधत आहे. सध्या "प्रो"
मी ही शोधत आहे. सध्या "प्रो" च्या मार्केट मधे असलेल्या मॉडेल्स ना काहीतरी प्रॉब्लेम आहे असे वाचले होते. इथे जास्त माहिती मिळेल.
http://www.forbes.com/sites/ewanspence/2016/12/23/apple-macbook-pro-majo...
'एअर' चांगलाच आहे. 'युज्ड' बद्दल कल्पना नाही. पण प्रो घेतलास तर एक दोन वर्ष जुने मॉडेल (पण नवीन - न वापरलेला) असा मिळतोय का बघ. त्याची किंमतही कमी असेल. मात्र मॉडेल कोणतेही असेल तरी अॅपल ऑपरेटिंग सिस्टीम सध्याची सपोर्ट करेल ना हे विचार - जर तुला अॅपल ओएस स्पेसिफिक काही नवीन वापरायचे असेल तर. नाहीतर फारसा फरक पडणार नाही.
आणखी एक पर्याय म्हणजे जवळच्या एरियात कॉम्प्युटर ची छोटी दुकाने असतात त्यांच्याकडून घ्यायचा. ते लोक सहसा सर्विस चांगली देतात तेथूनच घेतला असेल तर. कोथरूड मधल्या परांजपे शाळेजवळ एक दुकान आहे. तेथील अनुभव चांगला आहे.
तू आयपॅड नको हे लिहीलेले आहेस, पण आयपॅड ला सुद्धा कीबोर्ड लावून लॅपटॉप सारखे वापरता येते. त्यामुळे "अॅप" बेस्ड चालणार असेल तर. रेग्युलर लॅपटॉप हे फाइल-अॅप्लिकेशन बेस्ड असे धरून - म्हणजे आपण सहसा फाइल्स आणि अॅप्लिकेशन्स वापरतो. टॅब मधे आपण अॅप वापरतो, फाइल्स वगैरे थेट अॅक्सेस नसतो. तुझ्या कामाला तसे चालणार असेल तर.
आणखी एक मुद्दा म्हणजे जुना घेउन खरेच किमतीत मोठा फरक पडणार असेल तर ठीक आहे. नाहीतर एकदाच चांगले मॉडेल घेउन ३-४ वर्षे पुन्हा बघावे लागणार नाही. कदाचित जास्तही.
आयपॅडवर एडिट करता येतं की
आयपॅडवर एडिट करता येतं की नाही ते माहिती नाही, आयपॅडला एचडिएमआय केबल लावून प्रोजेक्टरला आऊटपुट देता येतो का? हाय व्हॉल्युम फिल्म वगैरेसाठी?
आयपॅडवर एडिट करता येतं की
आयपॅडवर एडिट करता येतं की नाही ते माहिती नाही, आयपॅडला एचडिएमआय केबल लावून प्रोजेक्टरला आऊटपुट देता येतो का? हाय व्हॉल्युम फिल्म वगैरेसाठी?>>> नाही. आयपॅडला एचडीएमआय केबल लावायची सोय नाही.
Pages