बिनभाजणीच्या क्वीक चकल्या

Submitted by सीमा on 17 April, 2013 - 22:51
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तांदळाचे पीठ ३ कप
मैदा १ कप
तेल/बटर १ कप
चविनुसारः
मीठ
तीळ
हिंग
लाल तिखट
जीर्‍या धन्याची पावडर
तळायला तेल

क्रमवार पाककृती: 

मैदा, तांदळाचे पीठ ,इतर मसाला घालून एकत्र करावे. त्यात गरम करुन तेल घालून मिक्स करुन घ्यावे. हळु हळु पाणी घालून , घट्ट मळुन चकल्या तयार कराव्यात. मंद आचेवर तळुन घ्याव्यात.
गार झाल्यावर खा.

वाढणी/प्रमाण: 
कायपण विचारतात
अधिक टिपा: 

चकली करताना छोट्या झार्‍यावर करावी. आणि मग झारा तेलात सोडुन द्यावा. दोन झारे वापरले तर खुप पटकन , एकसारख्या आकाराच्या सुरेख चकल्या होतात.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सह्हीच!!!

सीमा फुल फार्मात परत आलीय<< अगदी अगदी Happy दोन्ही बाळं अगदी गुणची आहेत हं.. आईला त्रास नाही देत याचा अर्थ Happy

mast !

सीमा मस्त दिसतायत! या चकल्या जरा कडक होतात का भाजणिच्या चकल्यांपेक्शा कि तशाच खुसखुशित होतात? माझ्या मुलाला चकल्या खुप आवडतात.त्याला ईंडियन स्टोअर मधुन आणुन देते पण त्या खुप कडक असतात. आता घरि एकदा ट्राय करुन बघेन.

भारी दिसतायंत. झार्‍याची टिप पण मस्त. फोटो तोंपासु >>> अगो +१
पण चकल्या प्रकाराला माझा पास. >>> अगो +१००००००००००००००००००००००००००००

चकल्यांची चळत मात्र भारीच आवडलीये हां.

सही!!!!
साऊथ इंडियन लोक तांदळाच्या चकल्या (मुरुक्कु?)करतात तशा लागतात का ह्या पण?

प्रिया, वत्सला नाही. मुरुक्कु सारख्या कडक नाही होत.
अतिशय खुसखुशित होतात. तेलाच प्रमाण थोड कमीच वापरते मी. तरी सुद्धा अगदी खमंग ,खुसखुशित होतात.
माझ्या आईच्या भाजणीच्या चकल्याला world famous आहेत. तरी सुद्धा तीला ही रेसीपी आवडते म्हणजे बघा. Happy

प्रिया , चकल्या विकत आणायची आता गरज नाही पडणार.