स्वतःचे नावही....

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

स्वतःचे नावही नाही, मनाचा ठावही नाही
विसरले भान मी माझे, तुला ना समजले काही

सुखाचा मुखवटा ल्याले, लपवला हुंदका ओठी
मनाला टोचलेले पण, कधी ना बोलले काही

कितीही वाटले मजला, असे व्हावे तसे व्हावे
कधी थांबून मन माझे, कसे तू जाणले नाही

जशी ही संथ पाण्यावर तरंगत राहती वलये
मनाच्या अंतरंगीही, कशी ती दाटती पाही

नको तू पेटवू वणवा, असे मी जीर्ण पाचोळा
जळू लागेल ही काया, तनाची होतसे लाही

असा का अडवसी वेड्या, कवडसा एक आशेचा
अरे तू सूर्य हो माझा, उजळना अन् दिशा दाही …

सुधीर

प्रकार: 

व्वा. खुप छान... आवडली.. शेवटचा तर अप्रतिम...

"अतुल" ...जय महाराष्ट्र

वाहवा ! फारच छान !!!

व्वा, छान
शेवटचे २ मस्त

मंदार

प्रतिसादाबद्दल धन्यवाद

सुधीर

मनाला स्पर्श करते रे कविता. कुठ्तरी नात जुळतय.

सागर आढाव.