बिना साबुदाण्याची खिचडी

Submitted by प्रभा on 12 April, 2013 - 09:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मुरमुरे, दाण्याचा कुट, तिखट, मिठ, मिरची तुप, जिरे,

क्रमवार पाककृती: 

२-३ वाट्या मुरमुरे थोड पाणी लावुन घ्यावे. त्यात अर्धी वाटी दाण्याचा कुट, आवडीनुसार तिखट मिठ,साखरेची चव घालून मिसळून घ्याव. [साबुदाण्यात घालतो तसे] कढ-इत तुप, जिरे, मिरचीचे तुकडे घालून फोडणी करावी व मुरमुरे मिक्स त्यात घालून छान वाफ आणावी.. खिचडी तयार.लिंबु किंवा दही यासोबत खाता येते.छान लागते चव.

वाढणी/प्रमाण: 
१-२
अधिक टिपा: 

मध्यंतरी साबुदाण्या बद्दल वाचल. म्हणून मुद्दाम क्यलरी कोंशस लोकासाठी रेसीपी देते आहे.

माहितीचा स्रोत: 
मैत्रीणीची आइ
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रभाजी माफ करा या कृतीला सुशला / सुशिला असे म्हणतात

हा प्रकार कर्नाटकात सोलापूर जिल्ह्यात फार फेमस आहे
हा प्रकार जवळ्जवळ पोह्यासारखा पोह्याचा सर्व मालमसाला कांदा टोंमॅटो हळद हिंग घालून याहीपेक्षा छान लागतो यात फक्त दाण्याच्या कुटा ऐवजी सोबतीला फुटाण्याची दाळ कुटूनही घालतात काहीजण

मी कितीतरी वेळा हा पदार्थ बनवला व खाल्ला आहे पण तुम्ही म्हणताय तो फक्त साबुदाणा खिचडीचे जिन्नस घालून एकदा ट्राय नक्कीच करीन

यात चुरमुरे व्यवस्थित भिजवणे ही एक कलाच आहे जणू Happy

खिचडीवरून हास्यगझलेचा माझा एक् शेर आठवला

मूगदाळीचीच तू केलीस होय् Sad
साबुदाणा शोधतोय् खिचडीत मी Happy

नाही. मुरमुरे चांगले ओले करुन घ्यावे. व चांगली वाफ आली की छान होते नरम. गरम ज्यास्त चांगली लागते.

मी अशीच केलेली खाल्ली. मला आवड्ली. म्हनु न येथे रेसीपी देते आहे. मी कर्नाटकातील पाहीली नाही. क्षमस्व.

धन्यवाद स्वाती; सुशीलेची रेसीपी दिल्याबद्दल. मी मात्र प्रथमच या रेसीपीबद्दल ऐकल. मुरमुर्याची खिचडी पण एकदाच खाल्ली. मैत्रीणीकडे. ती आवड्ली. आणि साबुदाण्या बद्दल काल वाचल. म्हनुन येथे दिली. यामुळे सुशीलेच दर्शन झाल. हेही नसे थोड के; आता करुन बघेल.

सुशला / सुशिला>>>>>>>. मी खाल्ला आहे ह पदार्थ माझ्या बॉस च्या बायकोने दिलेला त्यांच्या गावची खासियत म्हणुन.....हा पदार्थ मला खिचडी पेक्शा कांदे पोहे टाईप जास्त वाटतो......

अगदी पहिल्यांदाच ऐकला 'सुशीला'
खाल्लेला पचेल..पण 'तो सुशीला' म्हणणं मात्र पचनी पडत नाहिये !

ए मी काल केला पदार्थ आणि सगळ्यांना खूप आवडेश Happy
आता करत राहणार Happy
तहे दिल से शुक्रिया Happy
पण "सुशीला" हे नाव पुल्लिंगी वापरायला कसंसंच होतं Wink

हा प्रकार कर्नाटकात सोलापूर जिल्ह्यात फार फेमस आहे>
सोलापूर कर्नाटकात कधीपासून गेले?>>>>>>>

क्षमस्व भरत जी..... टायपो !! एक काँमा राहिला चुकून

हा प्रकार कर्नाटकात , सोलापूर जिल्ह्यात फार फेमस आहे !!!

आता बरोबर ना !! Happy
______________________________

पण ते मुर्मुरे भडंग चे अस्ले पाहिजेत न थोडे जाडे...>>>>>>
चालतील तेही पण खास्करून साधे चुरमु़रे जे आमच्याकडे पंढरपुरात ( तिकडच्या भागात सगळ्याच गावांमधे ..सोलापूर साईड ) तेच सुशल्यासाठी सर्वोत्तम !! तसा सुशला कुठल्याच चुरमुर्‍याचा होत नाही

मी या groupchi नवीन सभासद आहे .
मला कोनी सान्गेल कि चुरमुरे उपवासाला चालतात काय?
नाहितर उपवासाला नेहामी प्रमाने शाबुदाना खीचडी करावि लागेल.