आयत्या पिठाचे आप्पे

Submitted by लोला on 8 April, 2013 - 21:55
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

आयते मिळालेले इडली पीठ
मुगाचे पीठ (आख्ख्या मुगाचे, जरा हिरवट दिसते)
आले-मिरची-कोथिंबीर
मीठ
तेल
ऐच्छिक - कांदा, काकडी/लाल ढबू/गाजर बारीक चिरुन

त्याचं असं झालं की वीकेन्डला एका मैत्रीणीकडे गेले होते. तिच्याकडे पाहुणे होते म्हणून त्यांच्यासाठी तिनं हेss एवढे इडलीचं पीठ करुन आंबवायला ठेवलं होतं म्हणे. पण ते फरमेन्ट झालंच नाही. (अमेरिकेत होतं असं, या दिवसात थंडी असते ना..) मग त्या पाहुण्यांसाठी इडल्या केल्याच नाहीत. (दुसरं काय केलं कुणास ठाऊक! मी विचारलं नाही, तिनं सांगितलं नाही. मी पाहुण्यांनाही विचारलं नाही). मग आता त्या एवढ्या पिठाचं करायचं काय? पाहुणे तर दुसर्‍या दिवशी जाणार होते. मग त्यातले तिने मला दिले. तर हे ते "आयते" पीठ.

मी या पिठाचे आप्पे करणार आहे असे एका माबोकर मैत्रिणीला सांगितले जी सध्या अमेरिकेत आली आहे (म्हणे) तेव्हा ती म्हणाली की आप्पे केल्यावर रेसिपी इथे नाही टाकली तर काय अर्थय? (म्हणजे "काहीच अर्थ नाही" या अर्थाने)
अलिकडे अनेक आप्पे रेसिप्या बघून मलाही खरंतर मलाही एक आप्पे रेसिपी टाकावी वाटत होती. पण एव्हाना बाकीच्यांनी सगळी पिठं वापरुन झाली होती. मग आप्पे कशाचे करायचे. काही "शहाण्या" लोकांशी गप्पा मारताना कुळीथ पीठ हा ऑप्शनसुद्धा मिळाला..ते फारसे कश्यात वापरले जात नाही तर ते आप्प्यात ढकलावे असाही विचार आला. पण मग हे "आयते" पीठ मिळाल्याने सगळे जमून आले. आत्तापर्यंत याची रेसिपी कुणी दिलेली नाही.

क्रमवार पाककृती: 

आयत्या इडलीच्या २ कप पीठात २-३ टेबलस्पून मुगाचे पीठ मिसळायचे, लागल्यास थोडे पाणी घालून सरसरीत करुन घ्यायचे. मग चवीनुसार मीठ आणि बाकी जिन्नस घालून आप्पे करायचे. ते कसे करायचे हे आत्तापर्यंत वाचून तुम्हाला माहीतच असेल. आप्पेपात्र असले म्हणजे झाले!

आप्पे तयार झाले की चटणीबरोबर गरम गरम खायचे. आयते पीठ असल्याने अक्षरशः पंधरा मिनिटात होतात! काहीच कटकट नाही, आयते आणि फुकट - doesn't get any better..

पांढरट आप्पे न आवडणार्‍यांना हे आवडतील, कारण मुगाच्या पिठामुळे वेगळा रंग येतो.

हा पहा फोटो-

aappa1.jpgappa2.jpg

वाढणी/प्रमाण: 
महत्त्वाचे नाही
अधिक टिपा: 

नवीन ट्रेन्डप्रमाणे ही रेसिपी लिहायचा प्रयत्न केला आहे. नुसतं आपलं साहित्य, कृती इ. बोअरिन्ग वाटतं म्हणे ते! फोटो असला तर जरा बरं. आजकाल अशी श्टोरी लिहायची फॅशन आहे. काही लोकांना ते आवडत नाही, "रेसिपीच्या नावाखाली काय वाट्टेल ते लिहीतात" असं काही लोक म्हणतात. ते खरंच आहे, पण जे काय लिहीतात त्यात थोडी रेसिपी असल्याशी कारण. Wink

माहितीचा स्रोत: 
ते नेहमीचंच, म्हणजे पारंपारिक रेसिपी आणि मी केलेले बदल!
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुंडपंगलाच्या एवढ्या रेसिपीज बघून मन कसं भरून आलंय. आमच्याकडे आठवड्यातून दोनदा गुंडपंगला उर्फ आप्पे बनवले जातातच. पण आमच्याकडे काय वाटेल ते होइल पण पीठ फर्मेंट झाले नाही असे होणार नाही. त्यामुळे ही रेसिपी करून बघता येणार नाही. त्याबद्दल क्षमस्व. Proud

आप्प्यांचा फोटो छान आहे.
आजकाल माबो वर पाकृ बाकी एकदम वाचनीय येत आहेत Happy

मस्त आहे रेसिपी एकदम. Happy लिहिली पण एकदम सही शैलीत !
सर्व जिन्नस घरी आहेत, लगेच करणार. फोटू आवडलाच !

Pages