आयत्या पिठाचे आप्पे

Submitted by लोला on 8 April, 2013 - 21:55
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

आयते मिळालेले इडली पीठ
मुगाचे पीठ (आख्ख्या मुगाचे, जरा हिरवट दिसते)
आले-मिरची-कोथिंबीर
मीठ
तेल
ऐच्छिक - कांदा, काकडी/लाल ढबू/गाजर बारीक चिरुन

त्याचं असं झालं की वीकेन्डला एका मैत्रीणीकडे गेले होते. तिच्याकडे पाहुणे होते म्हणून त्यांच्यासाठी तिनं हेss एवढे इडलीचं पीठ करुन आंबवायला ठेवलं होतं म्हणे. पण ते फरमेन्ट झालंच नाही. (अमेरिकेत होतं असं, या दिवसात थंडी असते ना..) मग त्या पाहुण्यांसाठी इडल्या केल्याच नाहीत. (दुसरं काय केलं कुणास ठाऊक! मी विचारलं नाही, तिनं सांगितलं नाही. मी पाहुण्यांनाही विचारलं नाही). मग आता त्या एवढ्या पिठाचं करायचं काय? पाहुणे तर दुसर्‍या दिवशी जाणार होते. मग त्यातले तिने मला दिले. तर हे ते "आयते" पीठ.

मी या पिठाचे आप्पे करणार आहे असे एका माबोकर मैत्रिणीला सांगितले जी सध्या अमेरिकेत आली आहे (म्हणे) तेव्हा ती म्हणाली की आप्पे केल्यावर रेसिपी इथे नाही टाकली तर काय अर्थय? (म्हणजे "काहीच अर्थ नाही" या अर्थाने)
अलिकडे अनेक आप्पे रेसिप्या बघून मलाही खरंतर मलाही एक आप्पे रेसिपी टाकावी वाटत होती. पण एव्हाना बाकीच्यांनी सगळी पिठं वापरुन झाली होती. मग आप्पे कशाचे करायचे. काही "शहाण्या" लोकांशी गप्पा मारताना कुळीथ पीठ हा ऑप्शनसुद्धा मिळाला..ते फारसे कश्यात वापरले जात नाही तर ते आप्प्यात ढकलावे असाही विचार आला. पण मग हे "आयते" पीठ मिळाल्याने सगळे जमून आले. आत्तापर्यंत याची रेसिपी कुणी दिलेली नाही.

क्रमवार पाककृती: 

आयत्या इडलीच्या २ कप पीठात २-३ टेबलस्पून मुगाचे पीठ मिसळायचे, लागल्यास थोडे पाणी घालून सरसरीत करुन घ्यायचे. मग चवीनुसार मीठ आणि बाकी जिन्नस घालून आप्पे करायचे. ते कसे करायचे हे आत्तापर्यंत वाचून तुम्हाला माहीतच असेल. आप्पेपात्र असले म्हणजे झाले!

आप्पे तयार झाले की चटणीबरोबर गरम गरम खायचे. आयते पीठ असल्याने अक्षरशः पंधरा मिनिटात होतात! काहीच कटकट नाही, आयते आणि फुकट - doesn't get any better..

पांढरट आप्पे न आवडणार्‍यांना हे आवडतील, कारण मुगाच्या पिठामुळे वेगळा रंग येतो.

हा पहा फोटो-

aappa1.jpgappa2.jpg

वाढणी/प्रमाण: 
महत्त्वाचे नाही
अधिक टिपा: 

नवीन ट्रेन्डप्रमाणे ही रेसिपी लिहायचा प्रयत्न केला आहे. नुसतं आपलं साहित्य, कृती इ. बोअरिन्ग वाटतं म्हणे ते! फोटो असला तर जरा बरं. आजकाल अशी श्टोरी लिहायची फॅशन आहे. काही लोकांना ते आवडत नाही, "रेसिपीच्या नावाखाली काय वाट्टेल ते लिहीतात" असं काही लोक म्हणतात. ते खरंच आहे, पण जे काय लिहीतात त्यात थोडी रेसिपी असल्याशी कारण. Wink

माहितीचा स्रोत: 
ते नेहमीचंच, म्हणजे पारंपारिक रेसिपी आणि मी केलेले बदल!
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तरी यात उडीद भारतात कधी आणि कुठल्या मार्गाने आले, >>>> ईबा, हे असं लिहायला लोला म्हणजे काय हृदयनाथ मंगेशकर आहे का? ( आठवा: सारेगमप ) Proud

<<तेव्हा ती म्हणाली की आप्पे केल्यावर रेसिपी इथे नाही टाकली तर काय अर्थय? >>:D
म्हणजे अगदी धूत तुझ्या जीन्घाडीवर ( थोडक्यात आयत्या पीठाचे आप्पे मायबोलीवर नाही टाकले तर जीवन व्यर्थ आहे ) Lol

शीर्षकात मजा नाही लालू, 'आयते आप्पे' वगैरे कॅची हवा किंवा गेला बाजार नव्या trend प्रमाणे दोन शब्दांमधली स्पेस वगैरे गाळून 'आयत्यापिठाचेआप्पे' असे काहि तरी हवे Lol

आपिआप्पे चालेल.
पण कोणी आयतं पीठ नाही दिलं तर कसे करायचे सांगा ना.
आणि पीठ चुकून फर्मेन्ट झालं तर?
Proud

कोणी आयतं पीठ नाही दिलं तर कसे करायचे सांगा ना>> मग यातायाताप्पे करायचे
पीठ चुकून फर्मेन्ट झालं तर?>>> मग मात्र सरळ उत्तप्पे करायचे

किंवा दुसर्‍या मैत्रिणीला देऊन तिला 'आयत्या पिठाच्या इडल्या' अशी रेसिपी टाकायला सांगायची. Proud

लोलाक्का हे आताच साच्यातून काढलेले काव्याप्पे अर्पण करितो ....

उघडिता मनाचे कप्पे
आठवे तू दिलेले धप्पे
आणि कोणीच मौज करीतसे
जसे आयत्या पीठाचे आप्पे

लोला, तुझ्याकडे पीठ उरले आहे का?? असेल तर मला दे मग मी सुद्धा आप्पे रेस्पी टाकेन.
शिर्षक: लोलाच्या आयत्या पिठाचे आप्पे (मुगाचे पीठ वगळून)

धन्यवाद प्रिया, श्री, मॅक्स

@शुगोल - पीठ संपले. आप्पे उरले होते ते आत्ता संपले. तिकडे कोणी देणारे मिळेल का? ही माझी गाववाली मैत्रीण. "पाहुणे गेले - पीठ उरले, काय करु?" असे विचारत बसली नाही कुठे. नाहीतर एकेक असतात "अमूक केले ढमूक केले, अजून वेगळे काय करता येईल" विचारत बसतात, पण देणार नाहीत. चिक्कू कुठल्या!

धन्यवाद बेफिकीर, चिन्नु, रमड, वत्सला, ज्ञाती, लाजो, टोकुरिका, टोकुरिका.

@मामी, फुकट मिळतं का ते??

@पराग, बर.

धन्यवाद प्राजक्ता, रमड, सृष्टी

@मंजूडी, पीठ आणण्यापूर्वीच आंबले होते. घरी येऊन फ्रीजमध्ये ठेवले आणि दुसर्‍या दिवशी आप्पे केले. ते काय की जेव्हा इडल्या करायच्या होत्या तेव्हा नव्हते आंबले. आणि आंबले तेव्हा इडल्या करायच्या नव्हत्या.

@झंपी, इडलीच्या पिठाच्या इडल्या चांगल्या लागतात ना? मग आप्प्याला काय झाले? आप्प्यासारखे न लागता वेगळे लागतात म्हण. "चांगले लागत नाहीत" काय!

धन्यवाद इंद्रधनू.

@इब्लिस, होय. चुकीचे आहे. कोणी काढला हा नियम?

धन्यवाद प्रिती, जाई

@सायो, मुगाचे पीठ हे "मी केलेला बदल" साठी.

@स्वाती_आंबोळे, ते कशाबद्दल हवे? ही ओरिजिनल श्टोरी लिहिली आहे. कोणाची नक्कल नाही.

धन्यवाद मिनी, पारिजाता

@शूम्पी, आकार केवढा असतो तुमच्या या वड्यांचा? खड्ड्यांचा व्यास कमी असतो म्हणून विचारलं.

धन्यवाद रिया, वेका, पिहू, नानबा.

@दिनेशदा, हो.

धन्यवाद रमड, बिल्वा, सुजा, मी_पल्लवी, मृण्मयी, शूम्पी, जागू

@असामी, आप्पे आयते नाहीत, पीठ आयते आहे.

धन्यवाद राखी, मो, मॅक्स, सशल, धनश्री.

लोला, धन्यवाद. आप्पा चांगला लागेलच असे म्हणतो. (आता बंदूक उतरवा खाली) Happy

मूगाचे पीठ टाकून तुम्ही केलेला बदल खूपच कलात्मक आहे. (हो नाहीतर, 'ह्यात काय तुमची अ‍ॅडीशन?' असे प्रश्ण विचारायला जागा राहीली अस्ती. ) Proud

(प्रत्येक आयडीला एकेक स्वतंत्र धन्यु म्हणायला पोस्ट टाकली असती तर टीआरपी वाढला असता.. सगळं नवीन ट्रेंड नुसार होवु दे.) Wink

झंपे, लोलाक्का कोल्हापूरच्या आहेत. बंदूक नाही, तलवार चालवतात. नाहीतर लवंगी मिर्चीची धुरी देतात Proud
आणि कुठला 'आप्पा' चांगला लागेल म्हणताय तुम्ही?

आयते आप्पे मिळण्यासाठी काय करावं लागतं? Proud

लोला, धन्यवाद. आप्पा चांगला लागेलच असे म्हणतो. >>>>>> येव्हढे दिवस झंपीबेन समजत होते. पण म्हणतो म्हणताहेत त्यामुळे कन्फ्युजन झाले! असो. झंपी, :दिवे: लाल्वाक्का, अवांतरबद्दल माफ करा!

Pages