आयते मिळालेले इडली पीठ
मुगाचे पीठ (आख्ख्या मुगाचे, जरा हिरवट दिसते)
आले-मिरची-कोथिंबीर
मीठ
तेल
ऐच्छिक - कांदा, काकडी/लाल ढबू/गाजर बारीक चिरुन
त्याचं असं झालं की वीकेन्डला एका मैत्रीणीकडे गेले होते. तिच्याकडे पाहुणे होते म्हणून त्यांच्यासाठी तिनं हेss एवढे इडलीचं पीठ करुन आंबवायला ठेवलं होतं म्हणे. पण ते फरमेन्ट झालंच नाही. (अमेरिकेत होतं असं, या दिवसात थंडी असते ना..) मग त्या पाहुण्यांसाठी इडल्या केल्याच नाहीत. (दुसरं काय केलं कुणास ठाऊक! मी विचारलं नाही, तिनं सांगितलं नाही. मी पाहुण्यांनाही विचारलं नाही). मग आता त्या एवढ्या पिठाचं करायचं काय? पाहुणे तर दुसर्या दिवशी जाणार होते. मग त्यातले तिने मला दिले. तर हे ते "आयते" पीठ.
मी या पिठाचे आप्पे करणार आहे असे एका माबोकर मैत्रिणीला सांगितले जी सध्या अमेरिकेत आली आहे (म्हणे) तेव्हा ती म्हणाली की आप्पे केल्यावर रेसिपी इथे नाही टाकली तर काय अर्थय? (म्हणजे "काहीच अर्थ नाही" या अर्थाने)
अलिकडे अनेक आप्पे रेसिप्या बघून मलाही खरंतर मलाही एक आप्पे रेसिपी टाकावी वाटत होती. पण एव्हाना बाकीच्यांनी सगळी पिठं वापरुन झाली होती. मग आप्पे कशाचे करायचे. काही "शहाण्या" लोकांशी गप्पा मारताना कुळीथ पीठ हा ऑप्शनसुद्धा मिळाला..ते फारसे कश्यात वापरले जात नाही तर ते आप्प्यात ढकलावे असाही विचार आला. पण मग हे "आयते" पीठ मिळाल्याने सगळे जमून आले. आत्तापर्यंत याची रेसिपी कुणी दिलेली नाही.
आयत्या इडलीच्या २ कप पीठात २-३ टेबलस्पून मुगाचे पीठ मिसळायचे, लागल्यास थोडे पाणी घालून सरसरीत करुन घ्यायचे. मग चवीनुसार मीठ आणि बाकी जिन्नस घालून आप्पे करायचे. ते कसे करायचे हे आत्तापर्यंत वाचून तुम्हाला माहीतच असेल. आप्पेपात्र असले म्हणजे झाले!
आप्पे तयार झाले की चटणीबरोबर गरम गरम खायचे. आयते पीठ असल्याने अक्षरशः पंधरा मिनिटात होतात! काहीच कटकट नाही, आयते आणि फुकट - doesn't get any better..
पांढरट आप्पे न आवडणार्यांना हे आवडतील, कारण मुगाच्या पिठामुळे वेगळा रंग येतो.
हा पहा फोटो-
नवीन ट्रेन्डप्रमाणे ही रेसिपी लिहायचा प्रयत्न केला आहे. नुसतं आपलं साहित्य, कृती इ. बोअरिन्ग वाटतं म्हणे ते! फोटो असला तर जरा बरं. आजकाल अशी श्टोरी लिहायची फॅशन आहे. काही लोकांना ते आवडत नाही, "रेसिपीच्या नावाखाली काय वाट्टेल ते लिहीतात" असं काही लोक म्हणतात. ते खरंच आहे, पण जे काय लिहीतात त्यात थोडी रेसिपी असल्याशी कारण.
मुक्त'पीठाचे' आप्पे ही एक
मुक्त'पीठाचे' आप्पे ही एक रेसिपी राहीली आहे अजून
मुक्त'पीठाचे' आप्पे ही एक
मुक्त'पीठाचे' आप्पे ही एक रेसिपी राहीली आहे अजून>> ह्ह! हे मुफ्त'पीठाचे' आहेत
(No subject)
भारी आहे मुफ्तपीठ
भारी आहे मुफ्तपीठ
मुफ्तपीठ ..... आप्प्यांचं
मुफ्तपीठ .....
आप्प्यांचं दळण चालूच आहे का अजून?
(No subject)
'मुफ्त'पीठ इज टू मच
'मुफ्त'पीठ इज टू मच
>>नाहीतर लवंगी मिर्चीची धुरी
>>नाहीतर लवंगी मिर्चीची धुरी देता>><<
अंजली, तुम्हाला चांगलच माहितीय..(स्वानुभव काय?)
मुफ्तपीठ
मुफ्तपीठ
(No subject)
आप्पे छान ---- आप्पेप्रेमी
आप्पे छान
---- आप्पेप्रेमी आप्पाचे इंडियन
गुंडपंगलाच्या एवढ्या रेसिपीज
गुंडपंगलाच्या एवढ्या रेसिपीज बघून मन कसं भरून आलंय. आमच्याकडे आठवड्यातून दोनदा गुंडपंगला उर्फ आप्पे बनवले जातातच. पण आमच्याकडे काय वाटेल ते होइल पण पीठ फर्मेंट झाले नाही असे होणार नाही. त्यामुळे ही रेसिपी करून बघता येणार नाही. त्याबद्दल क्षमस्व.
प्राजक्ता मस्त नाव आहे, हे
प्राजक्ता
मस्त नाव आहे, हे अॅड करु का? मुफ्तपीठीय गुंडपंगला
आप्प्यांचा फोटो छान
आप्प्यांचा फोटो छान आहे.
आजकाल माबो वर पाकृ बाकी एकदम वाचनीय येत आहेत
मस्त नाव आहे, हे अॅड करु का?
मस्त नाव आहे, हे अॅड करु का? मुफ्तपीठीय गुंडपंगला>> हो हो!
आप्पे शंभरी गाठणार बहुतेक!
आप्पे शंभरी गाठणार बहुतेक!
लोला धन्यवाद स्वीकारले आहेत.
लोला धन्यवाद स्वीकारले आहेत. शुम्पी धूत नाही थूतच. बरोबर आहे तुमच. मिष्टीक दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद
इतके प्रतिसाद पाहून मला आता
इतके प्रतिसाद पाहून मला आता शंका यायला लागली आहे की ही पाकृ आहे की ललित?
मस्त आहे रेसिपी एकदम.
मस्त आहे रेसिपी एकदम. लिहिली पण एकदम सही शैलीत !
सर्व जिन्नस घरी आहेत, लगेच करणार. फोटू आवडलाच !
प्राजक्ता लोला, नाव बदलून
प्राजक्ता
लोला, नाव बदलून उर्फ मुफ्तपिठ आप्पे करुन टाक!
Pages