Submitted by मामी on 4 April, 2013 - 00:16
निर्सगाच्या गप्पा (भाग १३) या धाग्यावर दिनेशदा, हीरा, नंदिनी यांनी मुंबईबद्दल काही माहिती दिली. अशी या शहराबद्दलची छान, उपयोगी माहिती एकत्रित असावी म्हणून हा धागा.
कोणाकडे जुने फोटो, जुन्या आठवणी असल्यास सगळ्यांनाच त्यांचा लाभ घेता येईल. एखादी खास वैशिष्ट्यपूर्ण जागा असेल तर इथे नोंदवता येईल. इथे प्रकाशचित्रे टाकताना प्रताधिकाराचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन टाका.
मुंबईतले सार्वजनिक कार्यक्रम, मुंबईतली खाऊ-पिऊची ठिकाणं यांकरता वेगळे धागे आहेत. त्यामुळे त्यासंदर्भातली माहिती योग्य धाग्यांवरच टाकावी.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लोकहो, >> त्यात इंग्रजी
लोकहो,
>> त्यात इंग्रजी सरकारने त्यावेळच्या भारताच्या रुपयाला वधारण्या साठी पाठवलेले सोने होते
हे कशासाठी? दोन्ही सरकारे ब्रिटीश होती. मग सोने इकडून तिकडे न्यायचे कशाला? कोणी हे समजावून सांगेल का?
आ.न.,
-गा.पै.
>> अजून एक संस्मरण - >>
>> अजून एक संस्मरण -
>> शनिवार १६ एप्रिल १८५३ रोजी भारतातली पहिली रेल्वे विक्टोरिया टर्मिनस ते ठाणे अशी २१ मैल धावली.
आठवणीबद्दल धन्यवाद sulu!
मुंबई-ठाणे पहिली रेलवे म्हंटलं की हा फोटो दाखवतात. मात्र त्यातला पूल कळव्याच्या खाडीवरचा आहे. तर ही रेलवे ठाण्याच्याही पुढे आली होती का?
आ.न.,
-गा.पै.
हो हो भाऊ बरोबर वरळी सीफेस
हो हो भाऊ बरोबर वरळी सीफेस वरचीच. त्यांच्या बोलण्यात नेहमी वरळी सीफेस उल्लेख येतो.
'त्या' स्फोटाबद्दल माझी ऐकीव
'त्या' स्फोटाबद्दल माझी ऐकीव माहिती ->>>
ह्या स्फोटासंबंधीत एक लेखमाला सुरु झाली आहे मिसळपाव वर.
आजचे गूगल डूडलदेखील या
आजचे गूगल डूडलदेखील या रेल्वेसाठीचं आहे
चेंबूर कॉलनीला एक आशिष नावाचे
चेंबूर कॉलनीला एक आशिष नावाचे थिएटर होते>>>>>>>>>>आहे ते अजुन...पण दर्जा खुप खालावलाय...
माझ्या आई कडुन ऐकलेली
माझ्या आई कडुन ऐकलेली गोष्ट.
फर फार पुर्वी पार्ला (पु) दिनानाथ नाट्यगृह ते श्यामकमल बिल्डिंग हा परिसर मोर बंगला म्हणुन परिचित होता. १९६०-६५ पर्यंत तिथे मोर आढळत होते, फार पुर्वी तिथे एक राजवाडा / बंगला होते, असे काहीतरी गोष्ट आहे. १९८०-८५ पर्यंत आमच्या बोलण्यात मोर बंगला असेच येत होते.
एअरपोर्ट जवळ असल्या कारणाने १९६०-६५ च्या दरम्यान शिकाऊ वैमानिकांचे विमाने इतके खालतुन उडत होते कि विमानावर लिहलेले अक्षर (मॉडेल नं) स्पष्ट वाचता येई.
लहाणपणी विविध देशांचे स्टँप जमा करण्याचे हौस होते, दिनानाथ समोर एक दुकान होते प्रभा जनरल स्टोर्स म्हणुन, त्या दुकानात एक चॉकलेट मिळत होते, चॉकलेट चे पॅकिंग उघडले कि त्यात स्टॅंप असायचे.
.
दिनानाथ ला लागुनच क्रंची मंची म्हणुन एक हॉटेल होते, तिकडचे तर खुप आठवणी आहेत. श्यामकमल बिल्डिंग चे एक बाजु दिनानाथ ला फेसिंग आहे आणि पाठच्या बाजुला एक छोटी बाग होती, संध्याकाळी बागेत खेळुन झाल्यावर समोरच भेळपुरी वाला होता आणि त्याच्या जरा पुढे एक उसाचे रसाचे दुकान होते, बागेत खेळुन झाल्यावर तिथे छान पैकी आम्ही खाऊन पिऊन घरी जात. उसाचे रसाचे भाव होते १रु (फुल ग्लास)
आजही त्यांत बदल झालाय का, हें
आजही त्यांत बदल झालाय का, हें मात्र माहित नाही.>
डायना थीयेटर आता साफ पडत आल आहे.
१९६०-६५ पर्यंत तिथे मोर आढळत
१९६०-६५ पर्यंत तिथे मोर आढळत होते, <<
त्या सगळ्या किचाट परिसरात इतकं सुंदर होतं काही यावरच विश्वास ठेवणे अवघड आहे.
पण ही माहिती मस्त. १०-११ वर्ष इथे राहूनही यातली काहीच माहिती नव्हती.
श्यामकमलमधेही २ महिने राह्यलोय आम्ही.
आज नेमकी पेपर मध्ये हा फोटो
आज नेमकी पेपर मध्ये हा फोटो आला आहे
http://epaper.timesofindia.com/Daily/skins/MIRRORNEW/navigator.asp?Daily...
त्या सगळ्या किचाट परिसरात <<<
त्या सगळ्या किचाट परिसरात <<<
आजचे गूगल डूडलदेखील या
आजचे गूगल डूडलदेखील या रेल्वेसाठीचं आहे >> नंदिनी, हेच सांगायला आले मी.
आज नेमकी पेपर मध्ये हा फोटो आला आहे. >>> रीमा, आणि हे पण.
काय गंमत आहे. नेमकं इथे लिहिलं जातंय आणि तेच बातम्यांच्यात येतंय.
मी पाहिलेला पहिला एस्कलेटर कफपरेडच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर मधला. गिरगाव चौपाटीवर एस्कलेटर होता हेच माहित नव्हतं इथे वाचेपर्यंत. इतके उघड्यावर असलेले, धुळ, कचरा, वाळूच्या कचाट्यात सापडलेले एक्स्लरेटर कितपत वर्किंग कंडिशनमध्ये राहू शकतील याची शंकाच वाटते.
<< अगदी १९७० पर्यंत
<< अगदी १९७० पर्यंत सोन्याच्या १-२ विटा सापडत होत्या >> -
हे एक्झॅक्टली कुठेय?
हे एक्झॅक्टली कुठेय?
रेल्वेतून प्रवास करताना नेहमी
रेल्वेतून प्रवास करताना नेहमी एक विचार मनात येत असे तो हा की एका दिशेला जाणार्या गाड्या एकाच प्लॅटफॉर्मवर का येत नाहीत? प्रत्येक प्लॅटफॉर्मची एक बाजू वर जाणार्या गाड्यांकरता तर दुसरी बाजू खाली जाणार्या गाड्यांकरता का नेमलेली असते? लोकांचा कितीतरी त्रास वाचेल.
हे एक्झॅक्टली कुठेय? >>> आहे
हे एक्झॅक्टली कुठेय?
>>> आहे नाही, होतं, नी. आता सध्या तिथे जिना आहे. पण पुन्हा एस्क्लेटर बसवण्याचा विचार आहे.
भाऊ, तुम्हाला ____/\____.
भाऊ, तुम्हाला ____/\____. कसल्या भन्नाट कल्पना तुमच्या डोक्यात येतात.
नी मला वाटत क्रीम सेंटर,
नी मला वाटत क्रीम सेंटर, सुखसागर, कॅफे आयडीयल जवळ जो ब्रीज आहे तोच हा असावा.
ओह ओके. दक्षिण मुंबई वॉकचं
ओह ओके.
दक्षिण मुंबई वॉकचं कधी जमवताय लोक्स?
क्रीम सेंटर, सुखसागर, कॅफे
क्रीम सेंटर, सुखसागर, कॅफे आयडीयल <<
रीमा, हे मला माहित असेल याबद्दल काय कॉन्फिडन्ट आहेस तू...
अगं मी मुंबईकर नाही मुळातली त्यामुळे या अनेक गोष्टी माहित नाहीत मला. म्हणजे मी कामाच्या निमित्ताने तिथून गेलेही असेन पण हेच ते असं माहित असेलच असं नाही.
चकाला, अंधेरी (पु) ला संगम
चकाला, अंधेरी (पु) ला संगम सिनेमागृहात सर्वात पहिले सरकते जिने आलेत असे ऐकल्याचे स्मरते. खरे खोटे माहित नाही.
<< कॅफे आयडीयल जवळ जो ब्रीज
<< कॅफे आयडीयल जवळ जो ब्रीज आहे तोच हा असावा.>> खरंय. मला आठवतं त्यानुसार केवळ " एक्स्लरेटर" ही कल्पना रुजवण्याकरतां मुख्यतः 'शो पीस' म्हणून हा प्रकल्प राबवला गेला होता. त्यांत लोकांच्या सोईचाच विचार असता तर तो इतक्या लवकर बंदही पडला नसता ! [ वयामुळें मीं जरा 'सीनीक' होतोय, असं खरंच वाटतं का ?
]
मस्त... वर थियेटरांबद्दल
मस्त... वर थियेटरांबद्दल घाऊक माणसे सोडण्याबद्दल जे लिहिलेय ते सेम रुप टॉकीज या सांताक्रुझच्या टॉकीजलाही लागु होते. आम्ही फक्त ५० पैशात आणि नंतर १ रुपयात कितीतरी जुने चित्रपट तिथे पाहिले. चित्रपट चालु असताना तिथल्या पडद्यावरुन अधुन पाली फिरायच्या, सिटखालुन उंदीर धावायचे, पण तरिही आम्ही जायचो, भाजी आणायला आईबरोबर जाताना कुठला चित्रपट लागलाय हे बघायचे आणि दुस-या दिवशी दुपारी १२ च्या शोला रांगेत सगळ्यात पुढे उभे राहण्यासाठी धडपड करायची...
जुहूच्या विमानवाल्या बागेत कधी जायला मिळाले की अक्षरक्षः हाती स्वर्ग लागल्याचा भास व्हायचा.
मुंबईतल्या पहिल्या सरकत्या
मुंबईतल्या पहिल्या सरकत्या जिन्यावरुन मीही सरकले आहे. काय आकर्षण होते तेव्हा त्याचे!!! लोक त्यावरुन चक्क पडायचे. खुप थोड्या दिवसातच बंद केला तो. नक्की लोकेशन मलाही सांगता येणार नाही. खुप लहान होते तेव्हा.
लोक त्यावरुन चक्क पडायचे. खुप
लोक त्यावरुन चक्क पडायचे. खुप थोड्या दिवसातच बंद केला तो <<< +१
ते सोईचं नव्हतं का? मला खरंच
ते सोईचं नव्हतं का?
मला खरंच माहिती नाही म्हणून विचारतेय हां भाऊ काका.
लोक त्यावरुन चक्क पडायचे.
लोक त्यावरुन चक्क पडायचे. <<
का?
लोक त्यावरुन चक्क पडायचे.
लोक त्यावरुन चक्क पडायचे. <<
का?
<<<< सरकते जिने हा प्रकार मुंबईत नविनच होता, बॅलेंस करायला जमत नसेल बहुधा. आत्ता ही कित्येक मॉल्स मध्ये हे दुश्य कॉमन आहे, चडु कि नको अश्या संभ्रमात असता लोकं
हा पहिला सरकता जीना मी खुप
हा पहिला सरकता जीना मी खुप लहानपणी पाहिलेला आठवतो. तेव्हा तो चालत होता की नाही हे मात्र आठवत नाही.
खरच पण इतक्या उघड्यावर त्याचा टिकाव कसा लागेल कोण जाणे.
कित्येक वेळास महिला वर्गाचे
कित्येक वेळास महिला वर्गाचे साडी त्यात अडकायचे आणि नंतर भंबेरी उडायची व ते पडत
Pages