" " म्हणजे नेमके काय हो?

Submitted by विजय दिनकर पाटील on 26 March, 2013 - 06:38

नमस्कार,

"गझलियत"

उभा, आडवा, तिरपा मराठीत सर्रास वापरला जाणारा शब्द! जितका गूढ तितकाच मुबलकपणे वापरल्या गेलेला.

इतका की आजकाल गझलेवर प्रतिसाद द्यायचा म्हटले की "गझलियत" आढळली इतकेच म्हणायचे. म्हणजे प्रतिसाद देणार्‍याला काय आवडले ते सांगायला लागत नाही आणि लिहीणार्‍याला हा शब्द वाचून इतका हर्ष झालेला असतो की काय आवडले असे विचारायची गरज भासत नाही.

पण गझलियत म्हणजे नेमके काय हो?

काही मित्रांशी चर्चा केल्यानंतर असे कळले की, असा शब्द मराठीत अस्तित्वात नाही. अगदी अलिकडे हा शब्द उगाचच प्रचलित केला गेलेला आहे. उर्दूत काही पुस्तकांमधे "तगज्जुल" हा शब्द वाचायला मिळाला. वाचताना ह्या शब्दाचा अर्थ "काव्यात्मकता" असा आहे असे सारखे वाटत राहिले. मला वैयक्तिकरीत्या उर्दूतल्या तगज्जुलचे "गझलियत" असे मराठी रुप आहे की काय असे बर्‍याचदा वाटले पण काही उर्दू जाणणार्‍या मित्रांच्या मते तगज्जुल हाही अनावश्यकरीत्या प्रचलित करण्यात आलेला शब्द आहे.

उर्दूत शब्दांचे अनेकवचन करताना "आ" असा प्रत्यय लावतात

उदा. शेर - अशआर, लफ्ज - अलफाज, रुबाई - रुबाईआ(या)त

असे काही कनेक्शन घेऊन मराठीकरण करताना अर्थाचा अनर्थ तर झालेला नाही ना?

काहीतरी बेसिक क्न्फूजन आहे हे नक्की. खरे खोटे निदान मला तरी माहीत नाही. वेळ मिळेल तसे मी हे शोधण्याचा प्रयत्न मात्र करणार आहे. मात्र त्या दरम्यान इथे ह्या शब्दाच्या उत्पत्ती, वापर आणि अर्थावर चर्चा का करू नये असे मनात आले म्हणूनच हा चर्चाप्रस्ताव मांडीत आहे.

सर्व रसिकजनांनी खुल्या दिलाने भाग घ्यावात असे नम्र आवाहन!

धन्यवाद!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेरांतील गझलियत समजून घेण्याकरता शेराचे निखळ व व्यक्तिनिरपेक्ष सौंदर्य विश्लेषण करणे हे आवश्यक असावे!
उदाहरणांशिवाय यावर कितीही चर्चा केली तरी फारसे काही हाती लागणार नाही असे आमचे स्पष्ट मत आहे!
हापूस आंब्याचे कितीही रसाळ वर्णन केले तरी जोवर आपण प्रत्यक्ष तो चाखत नाही तोवर त्याची खरी गोडी कळणारच नाही, नुसत्या वर्णनाने!

गझलेचा आव, झूल, सोंग, आभास वेगळा व गझलत्व असलेली गझल वेगळी!
जसे खरा वाघ वेगळा व भुसा भरलेला वाघ वेगळाच असतो! तसेच आहे गझलेचे!
...........इति गझलप्रेमी

शेरातील गझलियत देखिल विविध गुणधर्मांमुळे डोळ्यांमधे भरते!

विचारातील सौंदर्यामुळे, शब्दांच्या चमत्कृतीमुळे, सशक्त बोलक्या अभिव्यक्तीमुळे,अंगभूत अर्थाच्या व्यामिश्रतेमुळे, शब्दकळेमुळे, चपखल प्रतिकांमुळे वा त्यांच्या कलात्मक गुंफणीमुळे, अंतीम सत्याच्या जवळ जाण्यामुळे, नादमयतेमुळे, गोटीबंद रचनाकौशल्यामुळे, इत्यादी (ही यादी अजून बरीच वाढवता यावी)

............इति गझलप्रेमी

शेरांमधील गझलियत समजून घेण्याकरता जर आपण इच्छुकांनी आपले कोणतेही पाच शेर(मतले असतील वा नसतील) जर या धाग्यावर टाकले व त्यातील गझलत्वाचे पृथ:करण करवून घेतले तर? आपण आपले अहंकार बाजूस ठेवून केवळ एक गम्मत म्हणून हे करू यात का ? हवे तर शेरांना एक गझलत्वाची श्रेणीही बहाल करू यात म्हणजे त्यात गुणात्मकतेबरोबर संख्यात्मकताही यावी!

असे केल्याने नेमके काय म्हणजे गझलत्व हे स्थूलरित्या शायरांना स्पष्ट व्हावे!

इथे शेर अनेकांचे व अनेक विषयांव,र अनेक मूडचे, अनेक शैलींचे असल्याने गझलत्वाची निर्माण होणारी जाणीव ही समृद्ध, संपन्न व व्यामिश्र व्हावी! व नुसताच हवेत गोळीबारही टळेल!

ज्यांना हे खिलाडूवृत्तीने चालणार आहे त्यांनी यात सहभागी व्हावे!
इच्छुकांनी आपली नावे या धाग्यावर टाकावीत, व अनुक्रमाने एकेका शायराच्या ५ शेरांच्या गझलत्वाचे स्पष्टीकरणासकट श्रेणी देऊन मूल्यांकन करून घ्यावे!

आता शेरांच्या गझलत्वाचे स्पष्टीकरणासकट पृथ:करण व मूल्यांकन या धाग्यावर कुणीही करू शकतो! त्यातही विविधता आपणास दिसून येईल, ज्यावरून गझलत्वाची व्यामिश्रताही शिकायला मिळेल!

..............इति गझलप्रेमी

झाला बट्य्ट्याबोळ घ्या आता बोंबला
देवसर शस्त्रे तासून बसलेत अगदी आता काssही एक खरे नाही मायबोलीच्या मराठी गझल विश्वाचे

झाला बट्य्ट्याबोळ घ्या आता बोंबला
देवसर शस्त्रे तासून बसलेत अगदी आता काssही एक खरे नाही मायबोलीच्या मराठी गझलविश्वाचे

ज्यांना हे खिलाडूवृत्तीने चालणार आहे त्यांनी यात सहभागी व्हावे!

आपण असे करूया- मीर, गालिब, अशांच्या गझला टाकाव्या, त्यातील शेरांचा अर्थ, त्यांची खोली, लांबी, रुंदी वगैरे चर्चा करू, त्यावर पर्यायी शेर सुचतात का पाहू.
मीर आणि गालिब सर्व पर्यायी खिलाडूवृत्तीने घेतील अवाक्षरही काढणार नाहीत याची गैरेंटी मी घेतो

Pages