" " म्हणजे नेमके काय हो?

Submitted by विजय दिनकर पाटील on 26 March, 2013 - 06:38

नमस्कार,

"गझलियत"

उभा, आडवा, तिरपा मराठीत सर्रास वापरला जाणारा शब्द! जितका गूढ तितकाच मुबलकपणे वापरल्या गेलेला.

इतका की आजकाल गझलेवर प्रतिसाद द्यायचा म्हटले की "गझलियत" आढळली इतकेच म्हणायचे. म्हणजे प्रतिसाद देणार्‍याला काय आवडले ते सांगायला लागत नाही आणि लिहीणार्‍याला हा शब्द वाचून इतका हर्ष झालेला असतो की काय आवडले असे विचारायची गरज भासत नाही.

पण गझलियत म्हणजे नेमके काय हो?

काही मित्रांशी चर्चा केल्यानंतर असे कळले की, असा शब्द मराठीत अस्तित्वात नाही. अगदी अलिकडे हा शब्द उगाचच प्रचलित केला गेलेला आहे. उर्दूत काही पुस्तकांमधे "तगज्जुल" हा शब्द वाचायला मिळाला. वाचताना ह्या शब्दाचा अर्थ "काव्यात्मकता" असा आहे असे सारखे वाटत राहिले. मला वैयक्तिकरीत्या उर्दूतल्या तगज्जुलचे "गझलियत" असे मराठी रुप आहे की काय असे बर्‍याचदा वाटले पण काही उर्दू जाणणार्‍या मित्रांच्या मते तगज्जुल हाही अनावश्यकरीत्या प्रचलित करण्यात आलेला शब्द आहे.

उर्दूत शब्दांचे अनेकवचन करताना "आ" असा प्रत्यय लावतात

उदा. शेर - अशआर, लफ्ज - अलफाज, रुबाई - रुबाईआ(या)त

असे काही कनेक्शन घेऊन मराठीकरण करताना अर्थाचा अनर्थ तर झालेला नाही ना?

काहीतरी बेसिक क्न्फूजन आहे हे नक्की. खरे खोटे निदान मला तरी माहीत नाही. वेळ मिळेल तसे मी हे शोधण्याचा प्रयत्न मात्र करणार आहे. मात्र त्या दरम्यान इथे ह्या शब्दाच्या उत्पत्ती, वापर आणि अर्थावर चर्चा का करू नये असे मनात आले म्हणूनच हा चर्चाप्रस्ताव मांडीत आहे.

सर्व रसिकजनांनी खुल्या दिलाने भाग घ्यावात असे नम्र आवाहन!

धन्यवाद!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गझलियात/गझलत्व केवळ गझलेमध्येच आवश्यक असते असे नाही;

- देवामध्ये देवत्व आवश्यक असते.
- कवीतेमध्ये काव्य आवश्यक असते.
- अभंगामध्ये अभंगत्व आवश्यक असते.
- माणसामध्ये माणूसकी आवश्यक असते.
- मानवामध्ये मानवता आवश्यक असते.
- चोरामध्ये चोरटेपणा आवश्यक असते.

आणि हे सर्वांनाच मान्य असते.
पण; ते स्वत्व कसे असावे, त्याच्या प्रॉपरटीज कशा असाव्यात याविषयी व्यक्तिनिहाय वेगवेगळे पण ठाम मत असते.
मग एक व्यक्ती स्वतःला या विषयातला पारंगत/तज्ज्ञ समजून आपले मत दुसर्‍यावर लादायचा प्रयत्न करतो.
आणि मग खरी येथूनच वादंगाला सुरूवात होते.

म्हणून अशा विषयावर कधीही सर्वमान्य एकमत होत नाही.

<<< एक आपलं कुतुहल. आता विदिपांनी चर्चेला आलेल्या प्रत्येकाचा शाल-श्रीफळ देऊन सन्मान करायचा आहे की काय? >>>>

ही गोष्ट चांगली आहे पण तसा आपण कुठेही उल्लेख केला नाही हे खटकले!
या वाक्यातून तरी तेच ध्वनीत होते.

चित्तरंजनचा आवर्जून केलेला उल्लेख आवडला व पोचला!<<<<<<
अर्थ त्यांच्यापर्यंत पोचला देखिल या वाक्याचा! ज्यांच्या डोक्यावरून तो जात असेल त्यने तो सोडून दिलेले बरे, भाबडे प्रश्न पुसण्यापेक्षा!

<<< अर्थ त्यांच्यापर्यंत पोचला देखिल या वाक्याचा! >>>>

मग ते वाक्य

चित्तरंजनचा आवर्जून केलेला उल्लेख आवडला व मी त्यांच्यापर्यंत पोहचवला!

असे मराठी भाषेत लिहिले असते तर माझ्या सारख्याला समजायला सोपे नसते का गेले? Happy

तथ्यहीन भाषा गंगाधर मुटेंना आवडत नाही. Uhoh

---------------------------------------------------------------------
माझ्या वरील ओळीवर ग्यानबाने मला दिलेला प्रतिसाद खालीलप्रमाणे,

"लेका, गंगाधर मुट्या! तुला काय येते काय, नाही येत; काय आवडते, काय नाही आवडत; याच्याशी जमान्याले काय देणंघेणं लागत रे? तू असा कोण लागून गेला रे, की जमान्याने तुझ्या आवडी-निवडीच्या तमा बाळगाव्या? च्यायला तीन गझला काय लिवल्या स्वतःला गझलसम्राट म्हणवायला लागला! "
----------------------------------------------------------------------
मग मला माझीच एक कविता आठवली.

नाकानं कांदे सोलतोस किती?

गझलप्रेमी तथा प्रा. श्री. सतीश देवपूरकर ह्यांचे चर्चेतील बहुमूल्य योगदानाबद्दल मनापासून अनेक आभार!

रच्याकने प्रोफेसर, चित्तरंजन मायबोलीवर नसतात म्हणून त्यांचे माझ्याशी झालेल्या चर्चेतील मत इथे देण्यामधे आपल्याला काय गैर दिसत आहे? माझ्याशी शब्दखेळ करू नका, "आवडला व पोचला" वगैरे सारखे.

गझलप्रेमी | 28 March, 2013 - 22:32
मोडी भाषा गझलप्रेमींना येत नाही!

गंगाधर मुटे | 28 March, 2013 - 23:20
तथ्यहीन भाषा गंगाधर मुटेंना आवडत नाही. <<<

तिलकधारी गझलीयत या विषयावर बोलण्यास गझलप्रेमी व मुटेंना (असंबद्ध चर्चा केल्यास) पुरेसे पात्र समजत नाही.

असंबद्ध चर्चा कृपया टाळा, धागा चांगला होईल.

असंबद्ध चर्चा कृपया टाळा, धागा चांगला होईल.>>>

धन्यवाद तिलकधारी. सर्वांना विषयाला धरून बोलण्याची विनंती करीत आहे.

विजयराव!
माझ्याशी शब्दखेळ करू नका, "आवडला व पोचला" वगैरे सारखे.<<<<<<<<<<,,

शब्दांशी खेळण्याची अवस्था कधीच मागे टाकली आम्ही!
प्रत्येक शब्द तोलून मापून वापरतो आम्ही, म्हणून तर गझलप्रपंच चालवतो अजून!
तेव्हा तुमच्याशीच काय कोणाशीही शब्दखेळ आम्ही करत नाही व करणारही नाही!

अवांतर: दखलपात्र किंवा उल्लेखनीय वाटले तरच माणूस उल्लेख करतो, अन्यथा तो टाळतो.....इतके साधे गणित आहे, त्यात खेळ तो कुठला?

इथे तर लोकांची मजल शालश्रीफळापर्यंत गेली!

शालश्रीफळांचेच म्हणयचे झाले तर ते आम्हास ढिगांनी मिळतात समाजामधे, परमेश्वरकृपेने! त्याकरता मायबोलीकडे डोळे लावून बसण्याची आम्हास आवश्यकता नाही!
आमच्या वाक्यात जर आपणास छद्मीपणाचा वास आला असेल तर तो चुकीचा व दुर्दैवी आहे इतकेच आम्ही म्हणू! असो!

वरील विषयावर आमच्या दृष्टीने पडदा पडला असे आम्ही समजतो!
आपणास जर काही मनस्ताप झाला असेल तर क्षमस्व!
गझलप्रेमी!

धन्यवाद तिलकधारी, अवांतर, असंबद्धावर बोट ठेवल्याबद्दल!
आम्हासही बरळायला वेळ नाही!
गझलप्रेमी आपला व्याप सांभाळून गझलप्रपंच करतात!

<<< तिलकधारी गझलीयत या विषयावर बोलण्यास गझलप्रेमी व मुटेंना (असंबद्ध चर्चा केल्यास) पुरेसे पात्र समजत नाही. >>>

अगदी मान्य.
असंबद्ध चर्चा करणार्‍याला पुरेसे पात्र समजता येणारच नाही. मग तो गंगाधर मुटे असो, गझलप्रेमी असो, तिलकधारी असो किंवा अजून आणखी कोणी असो.

चला मुद्द्याकडे वळुयात. Happy

माझी मते खालीलप्रमाणे:

१. सर्वांचीच मते पटण्यासारखी आहेत.

२. गझलीयत हा शब्द असूच नये (म्हणजे निर्माणच होऊ नये) असे मला तरी वाटत नाही.

३. गझलीयत हा शब्द गझलेसाठी (गुणात्मक वर्णनासाठी) वापरला जावा व जबाबदारीने वापरला जावा असे वाटते.

४. जबाबदारीने वापरण्यासाठी त्या शब्दाचा अभिप्रेत अर्थ शब्द वापरणार्‍यास ज्ञात असायला हवा.

५. अभिप्रेत अर्थ प्रत्येकासाठी वेगळा असणे सुरुवातीला शक्य असले तरीही चर्चेद्वारे एकमत होणे आवश्यक आहे.

६. एकमताचा आग्रह याचसाठी की निव्वळ सामाजिक रचना, टाळीबाज शेर, मैफिलीचे शेर, वाहवाचे शेर यांच्यात (च) गझलीयत असते (वगैरे) असे भ्रम पसरू नयेत. केवळ मनस्थितीदर्शक शेरही गझलीयतयुक्त असू शकतो. त्या शेराला टाळ्या मिळणार नाहीत, त्यात सामाजीक आशय नसेल, निर्भया किंवा तश्या स्वरुपाचे प्रासंगीक, नैमित्तीक उल्लेख करून काहीतरी खणखणीत म्हणण्याचा आव नसेल, जातीयवाद अथवा धर्मांधतेवर चाबूक मारलेला नसेल, राजकारण्यांची खिल्ली उडवलेली नसेल, पावित्रा नसेल, निव्वळ दुसर्‍याला प्रभावित , चकीत करण्याचा हेतू नसेल, पण त्यात अंतर्मुख करण्याची ताकद असू शकेल. परत परत ऐकावासा वाटेल अशी जादू असू शकेल.

७. आता गंमत म्हणजे क्रमांक सहामध्ये जी यादी दिलेली आहे (हे नसेल, ते नसेल, याची यादी) तश्या स्वरुपाच्या शेरांमध्येही गझलीयत असू शकतेच हे नाकारता येत नाही.

८. ही विधाने परस्पर विरोधी ठरत असल्यामुळे व यावर ठाम निष्कर्ष अवघड वाटल्यामुळे या विषयावर बोलणारा सहजच उदाहरणे देण्याचा पर्याय स्वीकारतो, कारण त्यातून त्याला नेमके काय म्हणायचे आहे हे मांडता येते. मात्र अश्या उदाहरणे देण्यामुळेच लोक (सगळेच काही प्रमाणात) फसतात कारण असे वाटू लागते की या उदाहरणांमध्ये आलेले उल्लेख, खयाल, लहजा, अ‍ॅटिट्यूड हीच गझलीयतची लक्षणे आहेत आणि ती आपल्या गझलेत असायला हवीत. येथे गोंधळ सुरू होऊ शकतो. अनुकरण सुरू होऊ शकते. त्या त्या शेराच्या शायराची सर्वच शायरी गझलीयतयुक्त आहे असा समज पसरू शकतो. यातून गुरूशिष्य परंपरेची (बरेचदा अनावश्यकच असलेली) बीजे पेरली जाऊ शकतात. गझल म्हणजे नेमके काय हे आम्हीच सांगू शकतो अशी एक वृत्ती फोफावू लागू शकते.

९. त्यामुळे एकाही शेराचे उदाहरण न देता निव्वळ गझलीयत या (कदाचित उगीचच निर्माण झालेल्या / केलेल्या) शब्दावर बोलणे हे जिकीरीचे वाटत असले तरीही आवश्यक ठरते. थोडक्यात, 'गझलीयत म्हणजे साधारण हे असे असे' अश्या प्रकारचे काहीतरी नोंदवले जाणे व ते बहुतेकांना मान्य होणे हे आवश्यक आहे. उदाहरणांच हा आसरा घेतला की ते समजावून सांगणे कितीही सहज शक्य होत असले तरी त्याची तुलना एखाद्या पेस्ट्रीशी होऊ शकेल. पेस्ट्री दिसायला व चवीला सुंदर असते. पण ती अनेक पदार्थांनी बनलेली असते. कोणताही एक पदार्थ रद्द केला तर चव अथवा सुस्वरुपता बदलू शकते. नुसती पेस्ट्री पाहून अथवा चाखून आपणही अशीच पेस्ट्री करावी म्हणून तेच घटक पदार्थ व रंग वापरले की झाले असे वाटू शकेल. हा उदाहरण देण्याचा घातक परिणाम होय. यामुळे, पेस्ट्रीतले नक्की काय आवडले किंवा नक्की 'काय काय एकत्र येणे' आवडले हे निदान सुरुवातीला बाळबोध रीतीने तरी लिहून नोंदवणे आवश्यक वाटते.

१०. यामुळे, गझलीयत म्हणजे काय याचे नि:संदिग्ध उत्तर देण्याचा प्रयत्न करणे हे जाणकार गझलकारांची जबाबदारी आहे असे मला वाटते. आता लगेच 'आम्ही कसले जाणकार, आम्ही अजून शिकत आहोत' असला मानभावी पावित्रा घेऊन दोन दिवसांनी एकमेकांच्या गझलेवर धूळफेक करणार्‍यांनी येथे किंचित गंभीर व्हावे अशी अपेक्षा हा पामर ठेवू शकतो काय? सगळेच तसे जाणकार आहेत, अनेक गझला रोज येत आहेत. उगाचच, 'आम्हाला तितकेसे समजत नाही' असे म्हणून मजा पाहणे व निगर्वी वगैरे ठरण्यापेक्षा सहभागी होणे (मला तरी) उत्तम वाटते.

इतपत माझी मते असल्यामुळे पुढील प्रतिसादात (जर हा प्रतिसाद मान्य होत असेल तर) 'गझलीयत म्हणजे काय समजले जावे' याबद्दल माझी मते द्यायचा प्रयत्न करेन.

चु भु द्या घ्या

धन्यवाद

-'बेफिकीर'!

शेर वाचणार्‍याला वाचताक्षणीच,

"मला हेच म्हणायचे होते पण नेमके शब्द सापडत नव्हते, शायराने किती सहजरीत्या माझ्या मनातील भावना मांडली आहे"

ह्या अनुभूतीला गझलियत ह्या असणार्‍या/नसणार्‍या संकल्पनेशी कितपत जोडता येईल?

बेफिजी,
वाचत आहे. जवळजवळ सर्वच मुद्दे पटण्यासारखेच आहेत.

<<< 'आम्हाला तितकेसे समजत नाही' असे म्हणून मजा पाहणे व निगर्वी वगैरे ठरण्यापेक्षा सहभागी होणे (मला तरी) उत्तम वाटते>>

अगदी बरोबर. सर्वांनी सहभाग नोंदवायलाच हवा. पण काही चुकल्यास प्रतिसादकांना सांभाळून घ्यायचे कौशल्य अशा प्रसंगी महत्वाचे असते. किमान अशा बाफवर तरी प्रत्येकाने तसे औदार्य दाखविणे महत्वाचे ठरते. आपल्यावर कोणीतरी तुटून पडेल, आपल्या मताची खिल्ली उडवली जाईल, अशी भिती निर्माण झाल्यास इच्छा असूनही बरेच प्रतिसादक मत नोंदवायचे टाळतात.

गझलेबाबत माहिती करून घेण्यास उत्सुक असलेल्या माझ्यासारख्यांना अशा प्रकारच्या चर्चांचा उपयोग होऊ
शकेल असे वाटते. एकूण चर्चेवरून गझलियत म्हणजे नक्की काय हे समजणे तितकेसे सोपे नसावे असे वाटते.
असो ....
शेरात गझलियत असणे म्हणजे शेर आशयघन असणे आणि त्यातील खयाल वाचकाच्या मनापर्यंत पोहोचविण्याची क्षमता शेरात असणे असा अर्थ, मी सद्ध्यातरी माझ्यापुरता गृहीत धरतो. चूक्/बरोबर ..... ठाऊक नाही.

गझल कृत्रिम असते हे निर्विघ्नपणे व निर्विवादपणे मान्य व्हावे अशी एक प्रामाणिक इच्छा मनात आहे. शंभर टक्के प्रामाणिक विचार शेररुपात, म्हणजे द्विपदीत मांडतानासुद्धा जमीन, काफिया, अलामत, रदीफ ही व्यवधाने सांभाळून पुन्हा अर्थपूर्ण, थेट, तरीही किंचित छुपा अर्थ असलेला, चावून चोथा झालेला विचार नसलेला, रंगतदार व गंभीर रीतीने मांडावा लागणे हे कारागिरीने आशयावर हावी होणे आहे व ते नैसर्गीक नाही हे सर्वांना मान्य व्हावे असे खरंच वाटते. (एक नुकताच आठवणारा संदर्भ म्हणजे समीर चव्हाण व स्वाती आंबोळे यांच्या चर्चेत समीर यांनी असे म्हणणे की कविता जशी येते तशी उतरू द्यात, मग गझल होत असली तर होऊ देत, यात हाच विचार येत आहे. ) मनात निर्मीती होत असताना एखादा विचार स्वतःचा फॉर्म घेऊनच अवतरतो असे 'साधारणपणे' मानले जाते, मला व्यक्तीशः ते पटत नाही. माझ्यामते निर्मीतीच्या अवस्थेतील विचारांनी 'आम्हाला गझलच व्हायचे आहे' असे सुचवले तरी आपण त्याची कथाही करू शकतो. (यावरच माझा एक लेख 'कलाकृतीचे स्वरूप कशामुळे ठरते' हा अजुनही बराचसा दुर्लक्षितच राहिला आहे हे मला माझे दुर्दैव वाटते). पण तूर्त मान्य केले की निर्मीती अवस्थेतील विचार फॉर्म घेऊन जन्माला येतो तर गझलेच्या अनेक शेरांपैकी निदान एक खयाल, निदान एक शेर, निदान एक मिसरा तरी पूर्णपणे नैसर्गीकरीत्या मनात चमकून जातो असाच अनुभव बहुतेकांचा असावा.

आता तो असा चमकून जाण्यावरही आजवरचे गझलवाचन, चर्चा, मनाची फ्लुइड अवस्था असे अनेक घटक प्रभाव करतही असतील, पण ते बाजूला सारून 'निदान एक मिसरा तरी थेट फॉर्ममध्येच सुचतो' असे गृहीत धरूयात.

हा मिसरा आपल्याला बहकवतो, स्वतःला आपल्याकडून गुणगुणून घेतो. त्याच्या आधी किंवा नंतर कोणता मिसरा मस्त वाटेल (आपल्या वैयक्तीक मतानुसार) हे ठरवायला उद्युक्त करत राहतो. मनातल्या मनात आपले हे चाळे सुरू होतात. कोणत्यातरी क्षणी (याला काळ, स्थळ हे बंधन असू शकत नाही) मिसर्‍याचा आपल्याच मनात एक पक्का शेर बनतो जो मतलाच असेल नाही. मात्र मिसरा नैसर्गीकपणे सुचलेला असल्यामुळे इतर अनैसर्गीक मिसरे मनात जन्मेपर्यंत आपल्याला त्या नैसर्गीक मिसर्‍यातूनच मतला करावासा वाटतो, हेही कदाचित 'आम' असावे. त्यामुळे कवी अनेकदा त्या मिसर्‍यातून मतला व्हावा म्हणून स्वतःच्याच मनाला साकडे घालतो आणि मिसर्‍याची जमीनच मुळात बिकट असल्याचे जाणवू लागले तर शेवटी त्याचा शेर करण्यावर तडजोड करून मोकळा होतो. आता घोळ असा आहे की मतला तयार झाला तर पुढची गझल त्या जमीनीत बसवण्याची प्रक्रिया वेग घेते आणि शेर तयार झाला तर पुन्हा मतल्यासाठी विचारांना ताण देणे सुरू होते. मनात साचलेल्या अनुभुती उलट्यापालट्या करून त्यातून काही निष्पन्न होते आहे का हे बघितले जाते.

शेवटी कधीतरी जमीन, तीन चार पक्के व सहज , नैसर्गीक वाटणारे शेर आणि एक दोन भरतीचे किंवा यमकानुसारी पण विचारांचे उड्डाण दाखवून चकीत करणारे शेर असे एक काँबिनेशन जन्माला येते आणि ते घोळले जात जात शेवटी गझल होते. ही गझल फार तर आपल्यामधील 'गझल कशी असावी' या स्वतःच्या अटींची पूर्तता करणारी असते व ती अजुन प्रकाशित झालेली नसते.

प्रकाशित करण्याचा निर्णय घेताना प्रभावप्रक्रियेला मेंदूचे दार उघडण्यात येते. मी असा असा शेर केलेला पाहून हा हा काय म्हणेल, तो यात काही चूक काढेल का, ही असे म्हणेल का की त्या ह्यांचा ह्यांचा एक शेर असाच आहे, तो असे म्हणेल का की चावून चोथा झालेला विषय आहे, कोणी असे म्हणेल का की या ऐवजी असे लिहिता आले असते, कोणी सामान्य गझल म्हणेल का, इत्यादी! आपल्यापेक्षा आपण ज्यांना श्रेष्ठ किंवा तोलामोलाचे समजतो त्यांचे मत काय असेल हाही एक प्रभाव पाडणारा घटक असू शकतो. असे होण्याचे कारण हे असते की कोणतीही गझल कधीच पूर्णपणे व सर्वानुमते परफेक्ट नसते, तिच्यात काही ना काही बदल सुचवले जाऊ शकतातच. याची कवीला स्वतःलाच जाणीव असल्यामुळे तो इतरांचे अपेक्षित अभिप्राय हे आधी स्वतःच मनात पडताळून पाहतो.

आपल्या स्वतःचे निकष कितीही उत्तम असले तरी गझलतंत्र या बाबीमुळे 'इतरांचे निकष' हीसुद्धा एक महत्वाची बाब ठरते, प्रकाशन करण्याचा निर्णय घेताना! हे मुक्तछंदात अथवा ओवी, अष्टाक्षरीत होण्याचा संभव कमी असावा.

यामुळे प्रकाशित केलेली गझल ही नैसर्गीक उर्मीसोबतच इतरही अनेक प्रभाव घेऊन येते व मुळातच 'एक नैसर्गीक मिसरा ते एकच नैसर्गीक मिसरा असलेली पाच शेरांची कृत्रिम गझल' येथपर्यंत प्रवास झालेली गझल आता पुढचाही प्रवास म्हणजे 'जाणकारांनाही आवडेल अशी रचण्यात आलेली गझल' हा पार करते. हा टप्पा प्रत्येकाच्या बाबतीत कमी जास्त महत्वाचा असू शकतो. सरावाने तर मुळातच एकच मिसरा नैसर्गीक असणे याही टप्प्यापासून पुढे जाऊन गझलकाराला त्या जमीनीत मिसरेच्या मिसरे आपोआप सुचू लागतात. एकंदरीत, कृत्रिमता व नैसर्गीकता यांचे शेरागणिक, मिसर्‍यागणिक बदलत जाणारे प्रमाण गझलेत सर्वत्र आढळते आणि याचमुळे कोणीही दुसर्‍याच्या कोणत्याही गझलेला 'खोटी, नुसतीच पावित्रेबाज, टाळीबाज, मंचीय, इंप्रेस करण्यासाठी रचलेली गझल' असे म्हणू शकत नाही वा असे म्हणण्याचा कोणालाही अधिकार नाही. ही टीका करणार्‍यांनी स्वतःची गझल अशीच सर्व व्यवधाने सांभाळून रचलेली असते. तसेच, गझलेची संख्या कमी असली कीच ती गझल सच्ची असते हेही चुकीचे ठरते. मुळात सच्ची गझल अस्तित्वातच असू शकत नाही. शेरातील काही अंश सत्य असणे हे शक्य असते.

====================

जे मुळातच कारागिरीने नटलेले आहे, ते 'गझलीयत'युक्त आहे असे भासवण्यासाठी नटवणे यात कोणता साहित्यीक गुन्हा झाला बुवा?

मग गझलीयतयुक्त म्हणजे काय? किंवा गझलीयत म्हणजे काय?

गझलीयत ही एक व्यक्तीनिरपेक्ष (अ‍ॅबसोल्यूट) व अभिरुचीनिरपेक्ष अशी (मात्र मनस्थितीसापेक्ष) 'आस्वाद्य' बाब आहे. (मनस्थितीसापेक्ष म्हणजे एखाद्या दु:खात असलेल्या माणसाला एखादा रंजक, मिश्कील पण उत्तम शेर ऐकवला तर त्या शेरात गझलीयत असूनही तो रसिक त्याला योग्य ती दाद देऊ शकणार नाही).

शेर कोणाचा आहे, ज्या गझलेतील तो शेर आहे त्या गझलेतील इतर शेर कसे आहेत, त्या शायराचे बाकीचे काव्य कसे आहे, तो किती अनुभवी अथवा अननुभवी शायर आहे, रसिकाची काव्यबोधक्षमता काय आहे (वय लहान असणे सोडून), रसिकाचे गझलेबाबतचे वाचन, चिंतन किती आहे, रसिक किती अनुभवी गझलरसिक आहे या कोणत्याही घटकाशी काहीही संबंध नसलेली अशी एक आस्वाद्य बाब किंवा एक 'चव'! एक 'स्वाद'! हा शेर कोणत्या प्रभावातून आल्यासारखा वाटला, किती वेळा कानावर पडला वगैरे घटकही नगण्य ठरतात.

ही चव त्या शेरात असली तर तो शेर गझलीयतयुक्त आहे असे मला समजावेसे व म्हणावेसे वाटते.

ही चव अनेक घटकांमुळे 'अ‍ॅचिव्ह' केली जात असल्यामुळे व शेरागणिक ती स्वतःच बदलत असल्यामुळे त्या चवीचा 'फॉर्म्युला' लिहिता येत नाही. कधी सात्विक थाळी आवडते तर कधी मटन मसाला, कधी घरगुती साधेवरण भात आवडतो तर कधी हॉटेलमधील पुलाव! याचप्रमाणे रसिकाची व कवीची अभिरुची, त्या त्या वेळची मनस्थिती, 'त्या' चवीसाठी घातलेल्या घटकांचे प्रमाण व काँबिनेशन हे सगळे हरक्षणी वेगवेगळे असते.

एकुणातच, गझलीयत ही आस्वाद्य बाब असली तरी स्वादनिश्चीती करण्याइतकी सोपी बाब असू शकत नाही. 'हे असे असे असले की गझलीयत येणारच' असे म्हणता येत नाही. मग कोणी म्हणते की शेर प्रामाणिक हवा, कोणी म्हणते सोपा हवा, कोणी म्हणते अर्थाच्या अनेक छटा हव्यात, कोणी म्हणते शक्यता हव्यात वगैरे! पण अर्थाची एकपेक्षा जास्त शक्यता नसलेले कितीतरी सोपे शेर गझलीयतयुक्त असतात, असू शकतात.

प्रोसेस ऑफ एलिमिनेशनचा वापर करून मात्र गझलीयतच्या व्याख्येपर्यंत पोचता येणार नाही. म्हणजे 'काय म्हणजे गझलीयत नाही' हे सर्व एलिमिनेट करत शेवटी 'काय म्हणजे गझलीयत' हे उत्तर मिळणार नाही. त्यासाठी खरंच कंबर कसून व्यक्तीनिरपेक्ष व्याख्या लिहिण्याचा निदान बाळबोध प्रयत्न तरी करायलाच हवा.

तर माझ्यामते गझलीयत म्हणजे:

शेरातील मूळ (मुळात स्फुरलेला) विचार, तो विचार नोंदवण्याच्या शैलीतील नावीन्य, साधेसरळपणा किंवा नाट्यमयता व विचारावर 'इतरांच्या थेट मनात घुसावा' म्हणून केलेले संस्कार यांचे असे काँबिनेशन की जे प्रामाणिक, सुलभ, थेट, नावीन्ययुक्त, रसिकाला अंतर्मुख करणारे, लगेच कळणारे आणि तरीही काहीतरी कळायचे राहिलेच आहे असे वाटणारे, 'चीप' नसलेले, दीर्घकाळ स्मरणारे असे असते.

टीप - या प्रतिसादातील मते माझी स्वतःची असून ती चुकीची असू शकतात, अपुरी असू शकतात हे पूर्णपणे मान्य आहे. (ही मते अर्धवटरीत्या वा पूर्णपणे कोठेही इतरत्र - या चर्चेचा संदर्भ न देता - छापण्यास माझा विरोध आहे व तसे झाल्यास मी त्या त्या संकेतस्थळाबाबत अथवा व्यक्तीबाबत कायदेशीर कारवाई करू इच्छित असेन). ही मतेसुद्धा अजून 'फायनल' स्वरुपाची नसून आपल्या सर्वांच्या सहभागाने, काटछाट करत करत शेवटी सर्वानुमते योग्य अशी मते निर्माण व्हायचीच आहेत. मात्र ही मते मी मायबोलीवरील मी लिहिलेल्या गझल परिचय या धाग्यांतर्गत समाविष्ट करण्यास इच्छित असू शकेन व ते करण्यास मी मुक्तही आहे.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

बेफीजी,
तुमच्या वरील पोस्टीतील बहुतांशी मताशी सहमत आहे. फक्त काही मुद्यावर संभ्रम असल्याने ते मुद्दे नीटशे समजून घेता आले नाहीत. त्यामध्ये गझलियात हा एक मुद्दा आहे.

आपण गझलियात या शब्दाला प्रथम मराठी प्रतिशब्द सुचवावा, त्यावरून तुमचे मत समजून घ्यायला मला सोपे पडेल. Happy

---------------------------------------------------------------
मराठी भाषिकांचा उर्दू/फारशी शब्दामुळे होणारा घोळ हा मुद्दा असल्याने हे अवांतर नाही.

अजूनही गझलियात शब्दाचा मला काहीही अंदाज आलेला नाही. उर्दू शब्दाचे अंदाज बांधून अर्थ काढण्याचे मी धाडस करू शकत नाही. कारण

दोन वर्षापूर्वीपर्यंत मी तशरीफ या शब्दाचा अर्थ खूर्ची असा घेत होतो. आईये, तशरीफ लाईये, बैठीये.. हे ऐकून होतो. स्वाभाविकपणे त्याचे मराठीकरण "खुर्ची घेऊन या आणि बसा'' असे असावे, असा अंदाज होता.

नंतर कळले की, तशरीफचा अर्थ वेगळा आहे. अर्थ कळला त्यावेळी घडलेला झाला किस्सा सांगण्यायोग्य नाहीये.

तात्पर्य एवढेच की, आमच्यासारख्या रिमोट एरियात राहणार्‍यांचा उर्दू/फारशी शब्दांशी दुरान्वयानेही संबंध येत नाही. त्यामूळे उर्दू/फारशी शब्द समजून घेणे अवघड जाते.
----------------------------------------------------------------

मुटे,

गझलियत हा उर्दू शब्द नाही. मराठीत वापरतात.

गझलियात हा उर्दू शब्द आहे.

गझलियात - गझलांचा समूह.

आता थोडे कन्फ्यूजन दूर व्हायला मदत व्हावी.

"वाचताक्षणीच रसिकाची मनस्थिती पालटवू शकण्याचे कवितेतील सामर्थ्य म्हणजे गझलियत"

ही व्याख्या मी सद्यातरी करीत आहे.

मनस्थिती कोणत्या दिशेने पालटवायची पाटील?

एखादा शांत बसलेला असताना शेर वाचून चवताळून उठला किंवा शीर्षासन करावेसे वाटले तर गझलियत आहे असे म्हणायचे का?

तिलकधारी कडवट बोलतो पण रास्त शंका विचारतो.

गझलियात म्हणजे गझलांचा समूह होत असेल तर सध्या आपली चर्चा चालली त्या विषयाचे गझलियात या शब्दाशी दुरूनही देणे-घेणे उरत नाही.

गझलियत हा उर्दू शब्द नसेल तर मग हा शब्दच अर्थहीन आहे. आपण गझलियत या शब्दाला मराठी प्रतिशब्द ज्यात काहीतरी अर्थाची सुसंगती असेल असा मराठी प्रतिशब्द दिला पाहिजे.

गझलियत या शब्दाचा वापर थांबवला पाहीजे.

गझलियत हा शब्दच अस्तित्वात नसेल तर गझलियतवर चर्चा करणे म्हणजे "एकही मुलगा नसलेल्या बापाने सून बघायला जाण्याचा रिकामटेकडा व्यवसाय" करण्यासारखे आहे.

धन्यवाद भूषणराव विस्तारपूर्वक दिलेल्या प्रतिसादाबद्दल!
गझल ही एक वृत्ती आहे, तिचाही काही धर्म असतो! तिचेही काही स्वत्व असते, तिचीही अस्मिता असते, या सर्व गोष्टींमुळे एखाद्या रचनेला गझलत्व/गझलपणा/ गझलपण प्राप्त होते जे लगेच डोळ्यात भरते कानास कळते!
याच गझलेच्या धर्मामुळे ती इतर काव्यप्रकारांहून भिन्न ठरते !
या चराचर विश्वातील प्रत्येक गोष्टीस, वस्तूस स्वत:चा धर्म, स्वत्व असते ज्यामुळे तिला एक स्वत:ची वेगळी ओळख मिळते! तसेच गझलेचे आहे!
आता याला गझलियत म्हणा, गझलत्व म्हणा, गझलपणा म्हणा वा गझलपण म्हणा! अर्थात काहीही फरक पडत नसावा!
कोणतीही कलाकृती घेतली तरी तिच्यातल्या सौंदर्याचा पण एक spectrumअसतो!
योग्य शब्द हाताशी न आल्याने इंग्रजी शब्द वापरत आहोत, त्याबद्दल क्षमस्व!
सर्वांगसुंदर गझल/कामयाब गझल ही अशी असते जिच्यात बहिरंगाचे व अंतरंगाचे सर्व धर्म पाळले गेलेले असतात!
विविध गझलांमधे विविध स्तरावर गझलत्व सांभाळले गेलेले असते! त्या त्या प्रमाणात त्या गझल कामयाब झालेल्या असतात!
गझलियतचा विचार करताना समग्र गझलेला अमुक एक लेबल कामयाबपणाचे लावणे साधारणपणे अवघड असते! कारण गझलेतील प्रत्येक शेर ही वेगळी कविता /कलाकृती असते, जी कामयाब असेल वा नसेल वा ब-यापैकी कामयाब असेल वगैरे!

आता कामयाब शेर प्रत्येकासच तितकाच भावेल असे नाही!
कारण प्रत्येकाची आवडनिवड, अभिरुची, साहित्यिक पोच, जडणघडण, आयुष्यात आलेले अनुभव वगैरे गोष्टी भिन्न असतात!
ज्या शेरात आपल्याला आपले प्रतिबिंब दिसते तो शेर आपणास भावतो!
तेव्हा एका शेरातील गझलियत/गझलत्व आजमावून त्यास श्रेणी देता यावी, मग भले तो शेर कुणाचाही असो, कोणत्याही विषयावरचा, मूडचा असो!

भूषणराव शेरांतील गझलियत समजून घेण्याकरता शेराचे निखळ व व्यक्तिनिरपेक्ष सौंदर्य विश्लेषण करणे हे आवश्यक असावे!
उदाहरणांशिवाय यावर कितीही चर्चा केली तरी फारसे काही हाती लागणार नाही असे आमचे स्पष्ट मत आहे!
हापूस आंब्याचे कितीही रसाळ वर्णन केले तरी जोवर आपण प्रत्यक्ष तो चाखत नाही तोवर त्याची खरी गोडी कळणारच नाही, नुसत्या वर्णनाने!

गझलेचा आव, झूल, सोंग, आभास वेगळा व गझलत्व असलेली गझल वेगळी!
जसे खरा वाघ वेगळा व भुसा भरलेला वाघ वेगळाच असतो! तसेच आहे गझलेचे!

शेरातील गझलियत देखिल विविध गुणधर्मांमुळे डोळ्यांमधे भरते!

विचारातील सौंदर्यामुळे, शब्दांच्या चमत्कृतीमुळे, सशक्त बोलक्या अभिव्यक्तीमुळे,अंगभूत अर्थाच्या व्यामिश्रतेमुळे, शब्दकळेमुळे, चपखल प्रतिकांमुळे वा त्यांच्या कलात्मक गुंफणीमुळे, अंतीम सत्याच्या जवळ जाण्यामुळे, नादमयतेमुळे, गोटीबंद रचनाकौशल्यामुळे, इत्यादी (ही यादी अजून बरीच वाढवता यावी)

भूषणराव एक सुचवू का आम्ही?

शेरांमधील गझलियत समजून घेण्याकरता जर आपण इच्छुकांनी आपले कोणतेही पाच शेर(मतले असतील वा नसतील) जर या धाग्यावर टाकले व त्यातील गझलत्वाचे पृथ:करण करवून घेतले तर? आपण आपले अहंकार बाजूस ठेवून केवळ एक गम्मत म्हणून हे करू यात का ? हवे तर शेरांना एक गझलत्वाची श्रेणीही बहाल करू यात म्हणजे त्यात गुणात्मकतेबरोबर संख्यात्मकताही यावी!

असे केल्याने नेमके काय म्हणजे गझलत्व हे स्थूलरित्या शायरांना स्पष्ट व्हावे!

इथे शेर अनेकांचे व अनेक विषयांव,र अनेक मूडचे, अनेक शैलींचे असल्याने गझलत्वाची निर्माण होणारी जाणीव ही समृद्ध, संपन्न व व्यामिश्र व्हावी! व नुसताच हवेत गोळीबारही टळेल!

ज्यांना हे खिलाडूवृत्तीने चालणार आहे त्यांनी यात सहभागी व्हावे!
इच्छुकांनी आपली नावे या धाग्यावर टाकावीत, व अनुक्रमाने एकेका शायराच्या ५ शेरांच्या गझलत्वाचे स्पष्टीकरणासकट श्रेणी देऊन मूल्यांकन करून घ्यावे!

आता शेरांच्या गझलत्वाचे स्पष्टीकरणासकट पृथ:करण व मूल्यांकन या धाग्यावर कुणीही करू शकतो! त्यातही विविधता आपणास दिसून येईल, ज्यावरून गझलत्वाची व्यामिश्रताही शिकायला मिळेल!

भूषणराव कशी वाटली आपणास आमची कल्पना?

चला या गोष्टीसाठी आम्ही आमचे नाव प्रथम जाहीर करतो!

...........................गझलप्रेमी!

तिलकधारी,

आशयाला अनुसरून व्हायला हवी मनस्थिती मग ती काही काळ का होईना. ह्यात आशयाशी एकरूप होण्याइतपत कवितेची मांडणी, त्यातले गांभीर्य वगैरे असायला हवे हे आलेच.

कालच स्वातीताईंनी म्हटल्याप्रमाणे गझलेबाबतच बोलायचे झाल्यास "शालीनता" अबाधित राखून रसिकाचे मन हेलावण्याचे सामर्थ्य निदान गझलेच्या शेरात तरी असले पाहिजे.

<<< वाचताक्षणीच रसिकाची मनस्थिती पालटवू शकण्याचे कवितेतील सामर्थ्य म्हणजे गझलियत >>>

आणि असे सामर्थ्य लावणीत असते.
पोवाड्यात असते.
देशभक्ती गीतात असते.
अभंगात असते.
ओवीत असते. (सातशे आठसे वर्ष मराठी मनावर ओव्या भुरळ घालून आहेत, ते उगीच नव्हे.
कव्वालीत असते.

कशात नसते ते शोधावे लागेल.

"मेरे वतन के लोगो" या गीताने आख्ख्या देशवासियांच्या डोळ्यात अश्रू आणले होते.
आठवा
"सारे जहांसे अच्छा"
"वंदे मातरम"
.
.
अख्खा देश हालवून सोडणारी गझल तर अजून जन्मालाच यायची आहे.

मुटे,

मुघल बादशहासारखे फतवे काढू नकोस.

गझलियात म्हणजे गझलांचा समूह होत असेल तर सध्या आपली चर्चा चालली त्या विषयाचे गझलियात या शब्दाशी दुरूनही देणे-घेणे उरत नाही.<<<

तुला कोणी सांगितले सध्याच्या विषयाचे गझलियातशी काही घेणेदेणे आहे ? येथे चर्चा गझलियातवर चालली नसून गझलियतवर चालली आहे.

गझलियत हा उर्दू शब्द नसेल तर मग हा शब्दच अर्थहीन आहे.<<<

अर्थपूर्ण शब्द फक्त उर्दूत असतात हे संशोधन कोणत्या द्रव्याच्या अंमलाखाली केलेस?

आपण गझलियत या शब्दाला मराठी प्रतिशब्द ज्यात काहीतरी अर्थाची सुसंगती असेल असा मराठी प्रतिशब्द दिला पाहिजे.<<<

हिम्मत, किंमत, पाळत, सोबत असे तकारान्त शब्द चालत असतील तर गझलियतला काय प्रॉब्लेम आहे? आणि मराठीच शब्दाला मराठीच प्रतिशब्द देण्याचा अनाकलनीय फतवा किस खुषीमे?

गझलियत या शब्दाचा वापर थांबवला पाहीजे.<<<

ते काय दुष्काळात वापरले जाणारे पाणी आहे का वापर थांबवायला? सुसंगत चर्चा हवी असल्यास फतवे, फर्माने, कायदे यांची एकहाती मोगलाई टायपाची निर्मीती आटोक्यात आणायला हवी.

गझलियत हा शब्दच अस्तित्वात नसेल तर गझलियतवर चर्चा करणे म्हणजे "एकही मुलगा नसलेल्या बापाने सून बघायला जाण्याचा रिकामटेकडा व्यवसाय" करण्यासारखे आहे.<<<

या वाक्यातील 'गझलियत' हा शब्द सोडून बाकीचे जे शब्द आहेत, म्हणजे:

' हा शब्दच अस्तित्वात नसेल तर गझलियतवर चर्चा करणे म्हणजे "एकही मुलगा नसलेल्या बापाने सून बघायला जाण्याचा रिकामटेकडा व्यवसाय" करण्यासारखे आहे.'

हे सर्व शब्द, तेही कधीतरी अस्तित्वात नव्हतेच, तरीही लोकांनी नसलेल्या मुलांसाठी सुना शोधल्यामुळे आज तुला हे वाक्य लिहिता आले.

सर्वांनी भानावर राहून मुद्देसूद चर्चा करायला काय हरकत आहे?

तिलकधारीला मुटेसरांना कुठे पोचायचे होते हे कालपासूनच माहीत होते.

Pages