" " म्हणजे नेमके काय हो?

Submitted by विजय दिनकर पाटील on 26 March, 2013 - 06:38

नमस्कार,

"गझलियत"

उभा, आडवा, तिरपा मराठीत सर्रास वापरला जाणारा शब्द! जितका गूढ तितकाच मुबलकपणे वापरल्या गेलेला.

इतका की आजकाल गझलेवर प्रतिसाद द्यायचा म्हटले की "गझलियत" आढळली इतकेच म्हणायचे. म्हणजे प्रतिसाद देणार्‍याला काय आवडले ते सांगायला लागत नाही आणि लिहीणार्‍याला हा शब्द वाचून इतका हर्ष झालेला असतो की काय आवडले असे विचारायची गरज भासत नाही.

पण गझलियत म्हणजे नेमके काय हो?

काही मित्रांशी चर्चा केल्यानंतर असे कळले की, असा शब्द मराठीत अस्तित्वात नाही. अगदी अलिकडे हा शब्द उगाचच प्रचलित केला गेलेला आहे. उर्दूत काही पुस्तकांमधे "तगज्जुल" हा शब्द वाचायला मिळाला. वाचताना ह्या शब्दाचा अर्थ "काव्यात्मकता" असा आहे असे सारखे वाटत राहिले. मला वैयक्तिकरीत्या उर्दूतल्या तगज्जुलचे "गझलियत" असे मराठी रुप आहे की काय असे बर्‍याचदा वाटले पण काही उर्दू जाणणार्‍या मित्रांच्या मते तगज्जुल हाही अनावश्यकरीत्या प्रचलित करण्यात आलेला शब्द आहे.

उर्दूत शब्दांचे अनेकवचन करताना "आ" असा प्रत्यय लावतात

उदा. शेर - अशआर, लफ्ज - अलफाज, रुबाई - रुबाईआ(या)त

असे काही कनेक्शन घेऊन मराठीकरण करताना अर्थाचा अनर्थ तर झालेला नाही ना?

काहीतरी बेसिक क्न्फूजन आहे हे नक्की. खरे खोटे निदान मला तरी माहीत नाही. वेळ मिळेल तसे मी हे शोधण्याचा प्रयत्न मात्र करणार आहे. मात्र त्या दरम्यान इथे ह्या शब्दाच्या उत्पत्ती, वापर आणि अर्थावर चर्चा का करू नये असे मनात आले म्हणूनच हा चर्चाप्रस्ताव मांडीत आहे.

सर्व रसिकजनांनी खुल्या दिलाने भाग घ्यावात असे नम्र आवाहन!

धन्यवाद!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा प्रश्न काही वर्षांपूर्वी मी अनंतला विचारला होता.
हसत-हसत तो म्हटला की बहुतेक मीरलाच विचारायला हवे.
नंतरच्या संवादातून माझ्या समजाप्रमाणे एकच पुढे आले.
प्रत्येक form (जसे गझल, अभंग इ.) चा एक intrinsic गुण असतो ज्यामुळे तो इतर form पासून वेगळा ठरतो.
गझलेतील असा गुण म्हणजे गझलियत.

म्हणजे प्रतिसाद देणार्‍याला काय आवडले ते सांगायला लागत नाही आणि लिहीणार्‍याला हा शब्द वाचून इतका हर्ष झालेला असतो की काय आवडले असे विचारायची गरज भासत नाही.
>> या वाक्याशी कडकडून सहमत
Lol

म्हणजे प्रतिसाद देणार्‍याला काय आवडले ते सांगायला लागत नाही आणि लिहीणार्‍याला हा शब्द वाचून इतका हर्ष झालेला असतो की काय आवडले असे विचारायची गरज भासत नाही.
>> या वाक्याशी कडकडून सहमत
Happy
मलाही मनापासून पटलं हे वाक्य Happy

ह्यातलं फार कळत नसलं तरी एक जे कळलंय असं वाटलं ते म्हणजे गझलियत कवितेत शोधतात किंवा सापडू शकते. गझलेत ती असावीच लागते असा माझा समज आहे. थोडक्यात गझलियत म्हणजे लघु गुरुची परफेक्ट सांभाळलेली लय.

जाणकार प्रकाशझोत टाकतीलच.

'गझलियत'च्या उत्पत्तीबाबत कल्पना नाही. पण साधारणपणे 'तबीयत' / 'फितरत' या अर्थी वापरला गेलेला पाहिला आहे अलीकडे.

पुढचा परिच्छेद हे संपूर्णपणे वैयक्तिक वाचनावर, निरीक्षणावर आणि आवडीनिवडीवर आधारित वैयक्तिक मत :

वर समीर म्हणाले त्याप्रमाणे आकृतीबंधाबरोबरच स्वभाव हेही गझलेचं व्यवच्छेदक लक्षण असतं. गझलतंत्रात लिहिलेली गीतं/कविता आणि गझलेचे शेर यात नेमका तोच फरक असतो. ती sassy आहे. शालीन आहे, पण (माझं आवडीचं उदाहरण द्यायचं तर) 'मैं तुलसी तेरे आँगन की'छाप सोज्ज्वळ नाही. 'इस शहरमें तुम जैसे दीवाने हजारों हैं' असं अभिमानाने ठणकावणारी रूपगर्विता आहे. तिच्यात गोडी आहे, पण त्यापेक्षा खोडी जास्त आहे. थोडी मस्करी, थोडा कांगावा हा तिच्या संभाषणचातुर्याचा भाग आहे. तिची 'फितरत आशकाना' खरी, पण दुनियाभरकी खबरें ठेवून आहे ती. सामाजिकतेचं लेबल न लावताही रोजमर्राच्या जिंदगीवर सहज एखादं मार्मिक भाष्य करण्याइतकी माहिती आणि हुशारी तिच्यात आहे. शी इज चार्मिंग, बट मोअर दॅन दॅट शी इज अ चार्मर. Happy

अवांतर :
१. तुम्ही म्हणता तो 'तगज्झुल' शब्द इथे सापडला.

३. 'गझलियात' (गझलियत नव्हे) हे तुम्ही म्हटल्याप्रमाणे अनेकवचन होईल असं वाटतं. (Gazaliyat गूगल केल्यास काही 'दीवानां'चे संदर्भही दिसतात.)

३. सद्ध्याच्या 'ट्रेन्ड'बद्दल वाचून मजा वाटली. पूर्वी 'वृत्तांतात्मक' या विशेषणाची चलती होती असं आठवतंय. Happy

'गझलियत' हे काही समजायला इतके अवघड प्रकरण आहे असे वाटत नाही. विशेषतः ज्यांच्या अनेक शेरांत ती आढळते, अशा गझलकारासाठी.

व्यवहारात आपण अनेकदा म्हणतो ना, एखाद्या गावचे 'पाणी' असते, एखाद्या जमातीचा काहीएक गुणविशेष असतो, एखाद्या प्रांताचे काही वैशिष्ठ्य असते, तसे गझल या काव्यप्रकाराचा तो एक विशेष आहे.
वर समीर चव्हाण आणि स्वातीताईंनी मते मांडली आहेतच, तेवढी पुरेशी वाटतात.

गझल हा एक कवितेचा/काव्याचा सशक्त, सोवळा व कर्मठ आकृतिबंध आहे!
गझलेचे सोवळे-ओवळे फार कडक असते!
गझलेच्या बहिरंगाचे व अंतरंगाचे काही गुणविशेष असतात!
ज्या काव्यरचनेत हे गुणविशेष जितके जास्त जोपासले गेले असतील तितका तिच्यातील 'गझलपणा' जास्त!
किंवा तितके तिच्यातील 'गझलत्व' जास्त!
'गझलियत' शब्द कदाचित 'गझलत्व' किंवा 'गझलपणा' या अर्थी वापरणारे वापरत असावेत!
टीप: आम्हास स्वत:ला गझलियत शब्द कधीच भावला नाही!
'गझलत्व' हा शब्द जास्त संयुक्तिक वाटतो!

............गझलप्रेमी

सर्वांचे सहभागाबद्दल खूप आभार!

बरेच मुद्दे चर्चेस आले हे पाहून समाधान वाटले. फक्त शीर्षकातला 'नेमके' हा जाणीवपूर्वक वापरलेला शब्द चर्चेत दुर्लक्षिला गेलाय की काय असे वाटले.

उदा.

गझलेतील असा गुण म्हणजे गझलियत. - समीर - 'असा' म्हणजे कसा ह्यावर चर्चा होऊ शकेल का?

स्वातीताईंनी गझलेचे रसभरीत वर्णन केलेले आहे ते खूप आवडले. पण 'गझलियत' म्हणजे हेच सगळे का? ह्याचा बोध झाला नाही.

तगज्जुलचा दिलेला अर्थ आणि गझलचा दिलेला अर्थ(ह्याच दुव्यावर - सेम आहे, त्यामुळे गोंधळ झाला) - तिथे दिलेला अर्थ फ्लर्ट असा आहे.

'गझलियात' शी सहमत स्वातीताई. गूगलून पाहिल्यास ते अनेकवचन ह्याच अर्थाने वापरले गेल्याचे निदर्शनास आले.

गझलियत असा शब्द मोल्सवर्थ मधे उपलब्ध नाही.

ज्ञानेश - आपल्या प्रतिसादावरून 'गझलियत' ही जाणून घेण्याची नसून अनुभवायची(ये जानने की नही महसूस करने की चीज है वगैरे.....) गोष्ट आहे असे प्रतित झाले. ते तसे खरेच आहे का ते सांगाल का?

अधिकाधिक खुलासा सर्वांकडूनच होईल तर बरे होईल.

पुन्हा एकदा धन्यवाद!

मस्त चर्चा सर्वांचे आभार

मी एक सांगू का की व्याख्या केलीच तर समीरजी, स्वातीताई, देवसर बरोबरच सांगताय्त असे वाटते

पण अशी शेरांची अनेक उदाहरणेही असतील ,जिथे हे गुणविशेष न आढळताही त्य दिलेल्या ओळी शेर / गझल वाटू शकतात असे मला वाटते
मग व्याख्येत किंवा "काय काय म्हणजे गझलियत" या लिस्ट मधे भर आपल्याला घालत बसावी लागेल काळानुरूप ...हे हनुमानाची शेपटी किती लांब आहे हे मोजण्यासारखेच आहे

माझे मत एकच आहे की आकृतीबंध हा मुद्दा सोडून दिला (जो बंदिस्त असतो)तर बाकीची गझल सर्वव्यापक आहे
जर नसेल तर तीने तसे व्ह्यायला हवे अशी माझी तिच्याकडे मागणी आहे

_________________________________________________________________
गझल म्हणजे ठराविक आकृतीबंधात केली गेलेली कविता / कविता(शेर ) समूह गझलियत म्हणून जे काही मोजले जाते ते व्यक्तिसापेक्ष अधिक आहे (म्हणजे देवसराना त्यात सोवळे कर्मठपणा दिसतो मला मला ती जस्ट अ कमिटमेन्ट वाटते जी पाळायचा शायराने जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे हे ठरवले असते स्वतः कडून ...

पूर्वी एक वाद निघायचा संगणक श्रेष्ठ की माणूस वगैरे ....फालतू वाद होता कारण माणसाने संगंणक बनवला म्हणून संगणक अस्तित्वात आला ...असाच प्रकार गझल व गझलकाराशी ...गझलकाराने केली म्हणून ती गझल ...श्रेय गझलकारालाच अधिक असते. आपण गझलेला देतो ती दाद झाली श्रेय (पाठ थोपटणे) गझलकारालाच ...पण मग अशाने हे गझलकार गझलेला एक प्रव्रुत्तीसारखी मिरवतात ..ज्याचा जो पिंड त्याला ती तशीच असल्यास अधिक आवडते नसल्यास मग जो तो दुसर्‍याशी त्या मुद्द्यावर चर्चा छेडतो अन आपआपल्याल्या बाजूला ताणत जातो हा प्रकार फकत गझलकारच जास्त करतात असे मी पाहिले आहे त्यातही मराठी गझलकार जास्तच करतात

जास्तीत्जास्त पटणारे मत म्हणजे गझलत्व हे होय कविता केली की कवित्व कथा केली की कथात्मकता तसाच गझल केली की गझलत्व म्हाणायचे आपले !!! बाकी सर्व काही आपापल्या "फॉर्म" मुळेच वगवेगळे आहेत
काळा दिसला की विठ्ठ्ल म्हणायचा पांढरा दिसला की माणूस असे आहे हे !!!

गझल झाली की नाही हे ठरवण्याचा एकमेव तरीका म्हणजे आकृतीबंध हाताळला गेलाय की नाही ते तपासणे कारण हा एकच मुद्दा असा आहे की बाकी दुनियाजहान्भरचे काहीही असो नसो आकृतीबंध नसेल तर गझल होतच नाही मग गझलियत की काय म्हणतात ती शोधत बसण्यालाही महत्त्व राहत नाही कारण ती गझल नसतेच
गझलियत कुठेही पाहता येते हे मतही मानसिक आहे एखाद्या कादंबरीतील वाक्यात गझलियत दिसली तशी एकाद्या गझलेत कथा दिसू शकते विनोद दिसू शकतो बातमीपत्र ही दिसू शकते
कुठे काय पहायचे हे ज्यच्या त्याच्यवर अवलंबून
हे असे दिसणे म्हणजे "त्या वाक्यावरून ....त्या खयालावरून वगैरे शेर बनू शकतो यची झलेली जाणीव होय !!

असो

चर्चा छान चालली आहे

माझी मते ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद !! Happy

(माझे एक अजून एक मतः खयाल हा ही माझ्यामते आकृतीबंधाचाच भाग आहे व गझलियत जी काही चर्चिली जाते ती असेलच तर या "खयाला" च्या जवळपासच कुठेतरी रहायला असावी
शरीरात आत्मा असेलच तर तो हृदयाजवळ कुठेतरी राहतो अशा धाटणीचे माझे हे मत आहे )

स्वत्व.

प्रत्येक "वस्तू"चा सर्वसाधारणपणे एक स्वाभाविक गूणविशेष असतो. याच संकंल्पनेचा थोडा विस्तार केला की आपण त्याला स्वभावगूण म्हणत असतो. आणखी थोडे पुढे सत्याचा शोध घेत गेलो की, आपल्याला गवसायला लागते त्या-त्या वस्तूचे स्वत्व.

आणि हेच त्या-त्या वस्तूचे स्वत्व. त्या वस्तूला इतरांपासून वेगळेपणा प्राप्त करून देऊन स्वतःचे अस्तित्व निर्माण करायला मदत करत असते. एखाद्या वस्तूचे अस्तित्व त्या वस्तू मधील स्वत्व ठरवत असते, असे मला वाटते.

गझलियत -

गझलियत हा शब्द ज्या कारणाने वापरला जातो, त्या मागे एखाद्या रचनेला गझल ठरवता येईल असे पात्रता निकष त्या रचनेत आहे किंवा नाही, याचा शोध घेण्यासाठी सर्वसाधारण आंतरजालावर तरी वापरला जात आहे.

प्रत्येक काव्यरचनेला उदा. अभंग, भजन, दोहे, लावणी, पवाडा वगैरे. या सर्व काव्यप्रकारांना स्वतःचा एक बाज आहे, स्वतःची अशी एक लय आहे, स्वतःची अशी एक शैली आहे. आणि अशी स्वतःची एक स्वतंत्र लय, बाज, लहजा, शैली, ठेवण, घडण वगैरे असणे, म्हणजे ते त्या रचनेचे स्वत्व होय.

गझलेच्या स्वत्वाचा शोध घेणे, म्हणजे गझलियत शोधणे होय.

आणि असा गझलेच्या स्वत्वाचा शोध घेणे, व्यक्तिसापेक्ष असू शकते.

उदा.

"लिंबोणीच्या झाडा मागे" हे गीत ऐकताक्षणीच जाणवते की हे अंगाईगीत आहे.

"लकडीकी काठी " हे गीत ऐकताक्षणीच जाणवते की हे बालगीत आहे.

"वई वई तुझपे कुर्बा मेरी जान" हे गीत ऐकताक्षणीच जाणवते की ही कव्वाली आहे.

"माझे माहेर पंढरी" हे गीत ऐकताक्षणीच जाणवते की हा अभंग आहे.

या जाणवते मधील जाणिवा निर्माण करण्याचे कार्य त्या-त्या काव्यप्रकाराचे स्वत्व करत असते.

--------------------------------------------------------------------------------------------------
दोन ओळी वाचून संपवता क्षणीच वाचकाला त्या ओळी गझलचेचा शेर वाचल्याची अनुभूती मिळवून देत असेल तर त्या ओळीत "गझलियत" उतरून त्या ओळी म्हणजे गजलेचा शेर झाला आहे, असे समजावे.
--------------------------------------------------------------------------------------------------

दोन ओळी वाचून संपवता क्षणीच वाचकाला त्या ओळी गझलचेचा शेर वाचल्याची अनुभूती मिळवून देत असेल तर त्या ओळीत "गझलियत" उतरून त्या ओळी म्हणजे गजलेचा शेर झाला आहे, असे समजावे.>>>

एखादीच ओळ वाक्य वाचून असे झाले तर काय ?

गझलेचा शेर म्हणजे गझल झाली तरच =जमीन सापडली / स्पष्ट केलेली असेल तरच ना !! स्फूट शेर असेल तर काय करायचे की त्यास शेर ठरवता यावे म्हणून त्यातली / जमीन शोधायची असेच ना !! ...काफिया- रदीफ -वृत्त !!
जर या प्रकारे विचार केला नाही तर त्या ओळीना शेर का म्हणायचे दोनोळी / द्वीपदी का नाही म्हणायचे व कवित्व का नाही शोधायचे?? गझलियतच का शोधायची ??(थोडक्यात पुन्हा जमीन /आकृतीबंधाचा नकळतपणे आधार घेणे आलेच असे नाही का?)

शुश्लोक वामनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची >>> असे मोरोपंत म्हणाले ... मग मर्ढेकरांनी अभंग या वृत्ताची डीफाईन्ड वृत्ती बदलून केलेले लेखन अभंग नाही असे म्हणायचे की मर्ढेकरी अभंग म्हणायचे
अजून एक ....ओवी ज्ञानेशाची की तुकारामाची की बहीणाबाईची नेमकी कुणाची
(या सगळ्यात कवित्त्व दिसतेच मग सगळ्या "गझल फॉर्मच्या कवितांमधे" गझलियत का दिसत नाही सगळ्याना ?)

(अवांतर जिज्ञासा :तुकारामाने केलेल्या मुसल्सल ठरू शकणार्‍या ओव्यांची एकसंध रचना = अभंग अशी माझी व्याख्या असताना मोरोपंतानी अभंग अन ओवी वेगळ्या असतात असे निरीक्षण सूक्ष्मपणे दिले आहे असे मी मानावे का )

मुटेजी, प्रतिसाद आवडला.

पण गझल ही गझल आहे की नाही ह्यावर 'गझलियत' ठरवणे हे फारच मर्यादीत होतेय असे वाटत आहे. ज्या अविर्भावात हा शब्द आपण सगळे वापरतो त्या अविर्भावाला अनुसरून ही संज्ञा खूपच व्यापक आणि अधिक समजून घेण्याची आहे असे वाटत नाही का?

खूपच व्यापक>>>>>>

बरोबर आहे पटले हा व्यापकपणा गझलेला देण्याऐवजी आपण अधिक मर्यादित करत आहोत असे मला वाटते जे मला आकृतीबंधातील बंदिस्तपणा व्यतिरिक्त इतरत्र तो असू नये असे वाटते

असे वाटत असले तरीही बेफीजींचा एक शेर पुन्हा पुन्हा मनात घोळत राहतो आधिकाधिक आवडत राहतोच ........या द्विधा मनस्थितीत मीतरी अडकलो आहे

मर्यादांच्या सीमा वाढवण्यात खरी गम्मत असते
बुडबुड्यातही विस्फोटाची शान लपवलेली अहे

<<< "गझल फॉर्मच्या कवितांमधे" गझलियत का दिसत नाही>>

गझल फॉर्मच्या कविता जाऊ द्या, अगदी गद्य वाक्यांमध्येही गझलियात दिसू शकेल; पण ती रचनाच गझलेल्या तंत्रात बसत नसेल तर गझलियात असून नसून काय उपयोगाची?
ती रचनाच जर गझल नसेल तर मग अशा गझल नसलेल्या रचनात गझलियात वगैरे शोधण्याचा खटाटोप व्यर्थ ठरतो.

येस मुटे सर मीही तेच म्हणतोय
एकंदरच गझलियत म्हणजे काहीतरी फार वेगळे फार भारी असते फार आवश्यक असते अशा मताला मी तरी फाटा देवू पाहतो आहे या चर्चतून

~वैवकु Happy

वैवकू,
ज्ञानदेवांनी ओव्या, अभंग, हरिपाठ वगैरे अनेक वेगवेगळ्या प्रकारामध्ये काव्य लिहिले आहे.

अहो, संतांनी किती नानातर्‍हेचे काव्यप्रकार हाताळेत बघा. उदा. ओव्या, अभंग, हरिपाठ, गौळण, जोहार, आरती, प्रसाद, विडा, भारुड... वगैरे वगैरे. आणि हे सर्व काव्यप्रकार हाताळतांना प्रत्येक काव्यप्रकाराची स्वतंत्र शैलीही तितक्याच ताकदीने निभावली आहे. Happy

धन्स मुटे सर !!
हरिपाठ>>> हा काव्याचा वेगळा प्रकार असल्याचे माहीत नव्हते Happy

त्यानी तसे लिहिले नाही असे मी म्हणतच नसून मोरोपंत काय म्हणाले ते सांगत होतो

अशा पूर्वासुरींच्या विधानांमुळेव आपलीही तशी मते बनत जात असतील तर याला गझलियत /गझल म्हणजे काय या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधार्थ जेंव्हा आपण निघतो तेव्हा आपसूकच किती अन् कसे महत्त्व येत जाते असे मला म्हणायचे आहे

खरे पाहता मोरोपंतानी माझीच आर्या कशी प्रसिद्ध आहे हे म्हणण्यासाठी ती आर्या दिली होती म्हणे व द्यावे लागतात म्हणून ज्ञानोबा तुकोबाचे दाखले दिले पण त्यामुळे तुकारामाचा तो अभंग व ज्ञानेशाची ती ओवी असा ढोबळ फरक पडला जो रूढ झाला इतकेच

सुश्लोक वामनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची
ओवी ज्ञानेशाची किंवा आर्या मयूरपंताची ...

गझल लिहितो तो गझलकार, जो मुळात कवी असावा लागतो! पण यापेक्षाही अधिक म्हणजे त्याला एक तबियत/पिंड असावी/असावा लागते/लागतो! बाज असावा लागतो! डौल असावा लागतो! ऐट असावी लागते!(त्याच्या अभिव्यक्तीला)
भावगीत वा गीत लिहिणा-याची तबियत वेगळी!
तोच आशय गझलेत मांडणा-या गझलकाराची वेगळी!
गझलत्व फक्त गझलेतच असते असे नव्हे, तर कोणत्याही दोन ओळींच्या (दर्जेदार स्वयंपूर्ण कविता ठरू शकणा-या) समुच्चयामधे गझलत्व असू शकते! त्या दोन ओळी शेर होवू शकतात!
कोणताही शेर, मतला न सांगता एकटाच ऐकवला व तरी तो उत्कट व आनंददायी असेल तर त्यात गझलत्व असतेच! ती एक दोन ओळींची स्वयंपूर्ण दर्जेदार कविताच असते! तिथे गझलत्व शोधायला रदिफ, काफिया वगैरेंची भिंगे लागत नाहीत!

गझलीयत म्हणजे वाळवंटात आपल्याकडचा उरलेला शेवटचा पाण्याचा थेंब दुसर्‍याला देणे! मरणासन्न अवस्थेत असलेल्या निरुपयोगी म्हातार्‍या बापाने त्याही वयात रागवल्यावर मुलाने ते बोलणे खाली मान घालून ऐकून घेणे! देवळात आलेल्या कोणाच्याही लहान मुलाला उचलून घंटा वाजवण्यास त्याला मदत करणे! प्रेयसीने एक शब्द बोलावा म्हणून आयुष्यभर वाट पाहणे! रस्त्यात मधे येऊन गडबडलेले कुत्र्याचे छोटेसे पिल्लू उचलून रस्त्याकडेला ठेवणे!

जे शेर पेगसारखे चढतात त्यांच्यात गझलीयत असते

तिलकधारी गझलीयतवर बोलण्यास पुरा पडणार नाही.

वा तिलकधारीजी आपल्या प्रतिसादातील प्रत्येक वाक्यात मला गझलियतयुक्त खयाल दिसत आहेत
जणू बेफीजींनी खयाली तरहीसाठी ते दिले आहेत असे वाटत आहे Wink

मला खूप आवडला हा प्रतिसाद !!

जमल्यास या खयालाना घेवून आपणच एक गझल बांधावीत अशी विनंती नि:संशय उत्तम गझल बनेल !!

<<<सुश्लोक वामनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची
ओवी ज्ञानेशाची किंवा आर्या मयूरपंताची .>>>>

याचा अर्थ वामनाने रचले ते श्लोक, तुकोबाने रचले ते अभग, ज्ञानदेवाने रचल्या त्या ओव्या आणि मयूरपंताने रचली ती आर्या होय, असा खचितच होत नाही.

माझ्या मते कदाचित याचा अर्थ खालीलप्रमाणे असू शकेल.

श्लोक हा काव्यप्रकार हाताळण्यात वामनाकडे प्रभूत्व/प्राविण्य होते. अभंग हा काव्यप्रकार हाताळण्यात तुकोबाकडे प्रभूत्व/प्राविण्य होते.ओवी हा काव्यप्रकार हाताळण्यात ज्ञानदेवाकडे प्रभूत्व/प्राविण्य होते आणि आर्या हा काव्यप्रकार हाताळण्यात मयूरपंतांकडे प्रभूत्व/प्राविण्य होते, असा याचा अर्थ होतो. आणि हे खरे आहे.

वा तिलकधारीजी आपल्या प्रतिसादातील प्रत्येक वाक्यात मला गझलियतयुक्त खयाल दिसत आहेत
जणू बेफीजींनी खयाली तरहीसाठी ते दिले आहेत असे वाटत आहे

अरे वा, वैवकु, तुला गझलियत समजू लागलेली दिसतेय! अंगी बाणू लागलेली दिसते, गद्यातील गझलियतही कळू लागलेली दिसतेय! अभिनंदन!
सदर गझलियतयुक्त खायालांची तूच गझल पूर्ण कर ना, इतरांना आग्रह करण्याचा खटाटोप करण्यापेक्षा!

काल सायंकाळी ह्या विषयावर श्री. चित्तरंजन भट ह्यांच्याशी फेसबुकावर चर्चा झाली. इथल्या चर्चेमधे इनपुट म्हणून त्यांची मते देत आहे.

१. मी काही भाषातज्ञ नाही परंतू मला जे काही जाणकार लोकांकडून समजले आहे ते मी सांगत आहे.

२. गझलियत ही पूर्णपणे मराठी संकल्पना आहे.

३. गझलियत हा शब्द ज्या अर्थाने मराठीत वापरला जातो त्या अनुषंगाने त्या भावनेला 'गझलपण' असे म्हणता येईल.

४. भाषेत नवीन शब्दांचा अंतर्भाव करणे ही खूप चांगली गोष्ट आहे परंतू अर्थाचे कंगोरे न लक्षात घेता त्याचा सरसकट वापर करणे म्हणजे 'अ‍ॅब्यूज' आहे.

५. पण हे असे सगळ्याच भाषांमधे सतत होत असते त्यामुळे हे चांगले किंवा वाईट असे ठामपणे म्हणता येत नाही.

अवांतर : उर्दूचे गाढे व्यासंगी शम्सुर्रहमान फारूकी़ ह्यांच्या मते 'तगज्झुल' ह्या शब्दाचा उदय १९ व्या शतकात झालेला आहे.

धन्यवाद!

हेच तर आम्ही सांगत होतो ना विजयराव!>>> पण हे माझे मत नाही प्रोफेसर. त्यामुळे मला सांगून काय उपयोग. रच्याकने ही चर्चा स्वतःला ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी मी छेडली आहे. मी अजून ठाम मत मांडायच्या अवस्थेत नाही.

विजयराव!
हा आपला गैरसमज आहे. आपल्या मतातून जे घ्यायचे ते घेऊन मी कधीच मो़कळा झालोय.

ही गोष्ट चांगली आहे पण तसा आपण कुठेही उल्लेख केला नाही हे खटकले!

चित्तरंजनचा आवर्जून केलेला उल्लेख आवडला व पोचला!

गझलियात = गझलपणा = गझलत्व

गझलत्व म्हणजे काय?

जसे:-

स्त्री + स्वत्व = स्त्रीत्व
अपंग + स्वत्व = अपंगत्व
कवी + स्वत्व = कवित्व
गझल + स्वत्व = गझलत्व

----------------
स्वत्व चा मी घेतलेला अर्थ

एखाद्या पदार्थाचे/वस्तूचे/व्यक्तीचे/माध्यमाचे स्वतःचे गूणवैशिष्ट्य/स्वभावगूण/गूणविशेष/properties म्हणजे त्या पदार्थाचे/वस्तूचे/व्यक्तीचे/माध्यमाचे स्वत्व होय.
--------------
स्वत्वचा प्रचलित अर्थ कुणी सांगितले तर बरे होईल. Happy

>> चित्तरंजनचा आवर्जून केलेला उल्लेख आवडला व पोचला!
चित्तरंजनचा उल्लेख यांना कसा पोचला? Uhoh
आणि पोचलाच होता तर पुरला का नाही? एक आपलं कुतुहल. आता विदिपांनी चर्चेला आलेल्या प्रत्येकाचा शाल-श्रीफळ देऊन सन्मान करायचा आहे की काय?

Pages