गाजराच्या किसाचे गाजर व बर्फी [ फोटोसहित]

Submitted by प्रभा on 21 March, 2013 - 08:47
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

गाजराचा किस १ वाटी, नारळाचा किस अर्धी वाटी,बीटचा किस १चमचा, दूध १ वाटी, साखर १ वाटी तूप २ चमचे , पिठी साखर२-३ चमचे, मिल्क पावडर २-३ चमचे, अंजीर ५-६ , पेढे५-६, केसर व पिस्ता सजावटीसाठी

क्रमवार पाककृती: 

प्रथम गाजराचा किस, नारळाचा किस, बीटचा किस, दूध, साखर १-२ पेढे एकत्र करुन घट्ट गोळा होइ पर्यंत शिजवुन घ्या. व थोडे थंड झाल्यावर त्यात पिठी साखर, थोडे तूप,व मिल्क पावडर घालून गोळा मळून घ्या..

एक पॉलिथिनचा कागद [५-६ इंचाचा तुकडा] घेउन त्यावर कोनाच्या बाजुने २-३ चमचे गाजराच मिश्रण घेवून त्रिकोणी आकारात पसरवुन घ्या. १ पेढ्याचा हातावर लांबट रोल करुन त्रिकोणाच्या मध्य भागी [ उभा] ठेवा.

नंतर पॉलिथिन हातावर घेवून दोनही कडा करंजी प्रमाणे जुळवुन वरच्या बाजुला अंजीर ठेवुन कोन बनवावा.

व तो १ तास फ्रीझ मधे ठेवावा. बाहेर काढुन हातावर घेवुन व्यवस्थित गाजराचा आकार द्यावा.

अंजीराच्या मधे पेढ्याची लहानशी गोळी करुन दाबावी. व त्यावर केसर व पिस्ता क्रश करुन लावावा. गाजर तयार. थोडा वेळ फ्रीझ मधे ठेवून पिसेस कापावे..क्रुत्रीम रंग न वापरता बर्फी तयार.

वाढणी/प्रमाण: 
३-४ गाजर साधारण २० पिसेस
माहितीचा स्रोत: 
मीच करून पाहीली
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमची सून --सुमेधाने अगदी छान क्रमाने फोटो टाकलेत. त्यामुळॅ समजायला सोप जाइन. तिला धन्यवाद तर देवू शकत नाही. पण कौतुक करते . अशीच पेरूची फोड पण केली आहे. आणि कलिंगडाचीही. यथावकाश क्रुती पाठवेल. गाजराच्या बर्फीचाही फोटो पाठवेल.