कार्यशाळा निकाल

Submitted by kaaryashaaLaa on 20 October, 2008 - 01:56

आता जाहीर करत आहोत कार्यशाळा निकाल...

तृतीय पारितोषिक विजेती प्रवेशिका आहे...

प्रवेशिका - २३ आणि ह्या रचनेचे गझलकार आहेत पुलस्ति.

द्वितीय पारितोषिक विजेती प्रवेशिका आहे...

प्रवेशिका - ३१ आणि ह्या रचनेच्या गझलकार आहेत संघमित्रा.

आणि मायबोली मराठी गझल कार्यशाळा २००८ ची प्रथम पारितोषिक विजेती प्रवेशिका आहे....

प्रवेशिका - २४ आणि ह्या रचनेचे गझलकार आहेत प्रसाद मोकाशी.

मायबोलीवरील प्रथम कार्यशाळेनंतर नियमीतपणे उत्तमोत्तम गझल लिहिणारे अभिजीत दाते ( प्रवेशिका - २८ )ह्यांचा विशेष उल्लेख केल्याशिवाय ह्या कार्यशाळेचा निकाल पूर्ण होणार नाही.

तसेच आवर्जून उल्लेख करायला हवा ITgirl, zelam आणि ashwini_k ह्यांचा. ह्या सहाध्यायींचा गझल लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता, आणि त्यांनी त्यासाठी ज्या चिकाटीने आपण होऊन प्रयत्न केले ते कौतुकास्पद आहे.

मायबोली प्रातिनिधिक गझल संग्रहासाठी खालील रचना निवडल्या आहेतः

प्रवेशिका - १ ITgirl
प्रवेशिका - ६ jayavi
प्रवेशिका - १० aaftaab
प्रवेशिका - ११ jo_s
प्रवेशिका - १३ sumedhap
प्रवेशिका - १५ prasad_shir
प्रवेशिका - १९ mrunmayee
प्रवेशिका - २१ zaad
प्रवेशिका - २२ zelam
प्रवेशिका - २३ pulasti
प्रवेशिका - २४ prasad mokashi
प्रवेशिका - २६ shyamali
प्रवेशिका - २७ psg
प्रवेशिका - २८ mi_abhijeet
प्रवेशिका - २९ jlo
प्रवेशिका - ३१ sanghamitra
प्रवेशिका - ३४ daad
प्रवेशिका - ३५ mi_anandayatree
प्रवेशिका - ४० ashwini_k
प्रवेशिका - ४२ satish.waghmare

सर्व विजेत्यांचे व सहाध्यायींचे हार्दिक अभिनंदन!!!!

ही तर केवळ सुरुवात आहे. "मराठी गझल" विभाग वाट पाहतो आहे. Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
आणि संयोजकांना धन्यवाद...

या निमित्ताने खूप काही शिकायला मिळाले...

मित्रहो,
खूप खूप धन्यवाद!

कार्यशाळेतल्या सर्वच गझला आज वाचल्या. अगदी एकापेक्षा एक आहेत. "क्या बात है!" असं ओठांवर येईल असा प्रत्येक गझलेत किमान एक शेर तरी आहेच. शेरातल्या कल्पना पण वेगवेगळ्या, नाविन्यपूर्ण आणि ताज्या.
सर्व गझलकारांचे अभिनंदन आणि पुढील लिखाणासाठी शुभेच्छा!

शेवटच्या दिवसापर्यंत मला काहीच सुचलं नव्हतं. नचिकेत रोज विचारायचा "काही लिहिलस का?" आणि माझं "नाही" ठरलेलं.
असो, या कार्यशाळेच्या निमित्ताने बर्‍याच महिन्यांनंतर माझ्याकडून काहीतरी लिहिलं गेलं.
पण पहिलं पारितोषिक मिळेल असे काही वाटलं नव्हतं.

सर्वांचे मनापासून आभार!

इतके दिवसं इथे का. शा. सुरु होती पण अजून बर्‍याच मायबोलिकरांना नक्की गजल म्हणाव की गझल म्हणावं, गझली/गजली म्हणावं की गजला/गझला म्हणावं समजलेलं नाही. हाय!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

मनःपूर्वक अभिनंदन -- प्रसाद, संघमित्रा आणि पुलस्ति Happy
अजून सुरेख गझल लिहीत रहा !
तसेच प्रातिनिधीक संग्रहासाठी निवडलेल्या गझलांच्या रचनाकारांचेही अभिनंदन Happy

विजेत्यांचे अभिनंदन..!
गझलची खुप छान ओळख झाली या निमीत्ताने... कार्यशाळेच्या संयोजकांचे आभार..!!!

प्रसाद, संघमित्रा आणि पुलस्ति सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन!
गझल लिहिण किती अवघड आहे ते कार्यशाळेत भाग घेतल्याने समजले.
त्यामुळे तर फारच कौतुक वाटते आहे.

सर्वांचे अभिनंदन आणि मनापासून धन्यवाद! बरंच शिकायला मिळालं आणि उत्तम भरघोस वाचायला मिळालं...
प्रसाद आणि संघमित्रा - अजान, सोशिक, उदबत्ती, दु:ख - फार फार आवडल्या तुमच्या गझला! विशेष अभिनंदन!!

सर्वांचे अभिनंदन आणि मनापासून धन्यवाद! मला गझल लिहीण्यासाठी नचिकेतनी खुप मददत केली त्याबद्द्ल नचिकेतचा मी आभारी आहे..

प्रसाद, संघमित्रा, पुलस्ति ... मनापासून अभिनंदन !

बी, अरे मग सांगायचंस की तू... काय म्हणावं ते... हाय हाय कशाला करत बसला आहेस नुसता. बाय द वे, तुला बरंच कळलं की पण कार्यशाळेतून. हे ही नसे थोडके.

~~~~~~~~~
~~~~~~~~~
Happy

Pages