खाण्यापिण्यातील चुकीचे संयोग!!!!

Submitted by हर्ट on 4 March, 2013 - 02:51

बर्‍याचदा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, कडधान्ये, मसाले एकत्रित करुन भाज्या करतो. पण असा संयोग....मिश्रण योग्य कि अयोग्य हे आपल्याला माहिती नसते.

इथे आपण अशा चुकीच्या संयोगाबद्दल...मिश्रणाबद्दल लिहिणार आहोत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेंथॉसची गोळी उदा. पोलो आणि पेप्सी व तत्सम एअरेटेड ड्रिंक्स एकत्र घेऊ नयेत. हे आधुनिक काळातले विरुद्धाहार मानले जावेत.>>> +१
ही एक मस्ट लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे.
मास्झ्या माहितीतल्या एकाने हा प्रयोग केला होता. त्यांनी सांगीतले की अक्षरशः कारंजे उडावे तसे ते ड्रींक उडते मिंट टाकल्यावर. व हे खुप रिस्की आहे.

ते पुण्यातही आवळ्यानंतर प्यायले की गोडच लागते की? >> Lol

दुध केळ हे ऐकुन माहिती आहे.
पण खाल्याने अजुन तरी मला कसला त्रास नाहि झालेला.

शेंगदाणे खाल्ले की सुद्धा पाणी पिऊ नये असे म्हणतात.>> आं??? आमच्याकडे उन्हातून आलं की आधी गुळाचा खडा व चार शेंगदाणे खाऊन मगच पाणी प्यायला देतात. ऐकावं ते नवलच!!

सोरायसीसचा त्रास असलेल्या एका नातेवाइकांना अ‍ॅलोपथीच्या डॉक्टरने पण फळे + दूध एकत्र न घेण्याबद्दल सक्त ताकिद दिली आहे. आणि तो विकार त्यांनी कह्यात आणला आहे (पथ्य शब्द इथे मुद्दामच वापरला नाहीये कारण मग तो आयुर्वेदिक उपचार वाटला असता Happy )

एखाद वेळेस विरुद्ध आहार घेतल्याने सर्वसाधारण माणसांना सहसा त्रास होत नाही. पण त्याने बर्‍याचदा अ‍ॅलर्जी ट्रीगर होऊ शकते. तेंव्हा अ‍ॅलर्जी असणार्‍यांनी आपण काय विरुद्धान्न खाल्ल्याने त्रास सुरू होतो याची नक्कीच पडताळणी करावी.

तुम्ही ऊपरोधिक आणि अहंकारी प्रतिसाद लिहून धाग्यावर लिहिणार्‍यांचा अनादर करत आहात. तुम्हाला तसे वाटत नसल्यास तुम्ही अजूनही तश्याचप्रकारचे प्रतिसाद ईथे आणि ईतरत्र लिहिण्यास मोकळे आहात.
<<
महोदय,
पहिल्या वेळी मी माझा प्रतिसाद तसा का लिहिला याचे स्पष्टीकरणासाठी लिंक दिली आहे. खरे तर तुम्हाला स्पष्टीकरण द्यायची काहीच गरज नव्हती.
तुमच्या "निरंकारी वृत्तीमुळे" तुम्हाला माझे स्पष्टीकरण वाचण्याची इच्छा नाही. वरतून चारचौघात मला अ‍ॅरोगन्ट म्हणण्याची व्यक्तिगत टीका तुम्हाला करावीशी वाटते. ते कोणत्या अधिकाराने?
या प्रकारची चर्चा तिथे आधीच झालेली आहे. लिंक वाचायची नसेल तर मी पुन्हा तेच टाईप करावे हे तुम्हाला का वाटते? तुमचा अनादर झाला असे तुम्हाला वाटत असेल, तर तसे समजण्यास तुम्ही मोकळे आहात. किंबहुना तुमचा आदर व्हावा म्हणून ती पोस्ट अजिबात लिहिलेली नाही, हे ध्यानी घेतलेत तर बरे.
मी कुठे व कसे प्रतिसाद लिहावेत याबद्दल मला समज देण्यास अ‍ॅडमिन समर्थ आहेत. मी कसे लिहावे हे तुम्ही सांगणे अजिबातच उचित नाही.
इथेही तुम्ही मला अहंकारी म्हणताच आहात तर वरील प्रतिसाद अहंकाराचा नमूना समजा. Since I have a colossal ego, मला यापेक्षाही तिरसट लिहिता येते, पण त्याची गरज नाही.

***

कोणाच्या प्रतिक्रिया वाचून इतका त्रास होत असेल, तर त्यावरही काही लोक प्रतिक्रिया लिहितातच का? हा ही प्रश्न पडतोच.

Yeah right. मद्यपानच मुळात करावे की नाही हा प्रश्न महत्त्वाचा नसून त्यानंतर कलिंगड खावे की नाही हा आहे Proud

आणि मद्यपान करणार्‍यांनी लक्षात कसे ठेवायचे की काय वाट्टेल ते झाले तरी कलिंगड खायचे नाहीये. डेसिग्नेटेड ड्रायव्हर असतो तसा पार्ट्यांमधे डेसिग्नेटेड वॉटरमेलन कंट्रोलर ठेवावा लागेल Happy

कदाचित कलिंगड मद्यात घालणे चालते, नंतर खाऊया नको.. डेसिग्नेटेड वाॅटरमेलन कंट्रोलर नसेल तर प्यायल्यावर साग्रसंगीत मेनकोर्स, फ्रूटप्लेट वगैरे न खाता सरळ डाळभात खावा. टेंशनच नाय

बी, या आठवड्यापासून ई-प्रसारण वर या विषयावर व्याख्यानमाला सुरु होत आहे.

चमन यांना अनुमोदन आणि एक फु.स. साती आणि इब्लिस यांचे प्रतिसाद कसे असतात ते सगळ्यांना ठावूक आहे. तरी अनुल्लेख करावा व इतर ज्ञानकण वेचावेत. चिखलात कमळ दिसले की आपण कमळाचे सौंदर्य निरखतो, चिखलावर लक्ष केन्द्रित करत नाही.

बी तुमचे अभिनंदन हा धागा काढल्याबद्दल. वाचन करत आहे. एक गृहिणी म्हणून मला फार माहिती मिळण्याची आशा आहे यातून.

चिखलात कमळ दिसले की आपण कमळाचे सौंदर्य निरखतो, चिखलावर लक्ष केन्द्रित करत नाही. >> Proud

ईब्लिस भाऊंचं काही माहिती नाही पण बाकीचे धन्यच आहेत, इथे तिथे जरा चांगला विषय दिसला की आले फिसकटवायला.. परवा कुठल्यातरी धाग्यावर पण चांगला विषय चाललेला या बाईंनी धुरळा उडवायचा चांगलाच प्रयत्न केला होता.

डाळी आणि कडधान्यांमध्ये तीस टक्के नत्रद्रव्ये असतात त्यांचे पचन लहान आतड्यात पित्ताने होते .परंतु जोडीला असलेले ट्रिप्सिन त्यात अडथळा आणते . (अंडी ,मासांत हे नसते) मग डाळ पचली नाही कि आणखी पित्त सोडले जाते तरीही पचली नाही कि शेवटी शरीराकडून जवळचा मार्गे उलटीने बाहेर टाकली जाते . कोणतेही कडधान्य आंबवले कि ट्रिप्सिन नष्ट होऊन पचनास 'हलके' होते . खवा आणि बासुंदि मध्ये नत्र आणि स्निग्ध असल्यामुळे पचनासाठी लहान आतड्यात बराच वेळ राहण्याची गरज असते . त्याच्या बरोबर पोळी ,श्रिखंड ,फळे असली तर त्यांचे पचन अगोदरच झाल्यामुळे ते सर्वच पुढे सरकते परंतु बासुंदि अर्धवट पचलेली असते त्याला बाहेरचा जवळच्या मार्गे खाली ढकलली जाते . ज्यांचा रक्तगट ए +टिव्ह आहे त्यांनी शक्यतो दुधाचे पदार्थ आणि कडधान्ये खाऊ नयेत .

मी गुगल क्रोम वापरतो. अनुस्वार येत नाही. जर प्रयास केला तर सगळी वाक्ये एकमेकान्ना चिकटतात>>>>>>>>ही अशी रेसिपि करु नये अस काही सुच्वायचे आहे का Lol

ईब्लिस >> मी वैयक्तिक टीका केलेली नाही. माझा तसा ऊद्देश नाही आणि नव्हता. तुमच्यावर वैयक्तिक टीका करण्यासाठी माझ्याकडे काहीही कारण नाहीये.
मी आधीही आणि आत्ताही फक्त तुमच्या प्रतिसादाबद्दल बोलत आहे. काय केल्याने माझा वैयक्तिक आदर किंवा अनादर होईल ह्याबद्दल विचार करण्यात तुम्ही वेळ घालावावा अशीही माझी ईच्छा नाही.
तुम्ही ईथे लिहिता तसेच बाकीचेही. त्यांनी लिहिलेले कितीही बाष्कळ असो वा ऊच्चं तुम्ही ते वंदा वा निंदा, पण लिखाणाचा आणि लिहिणार्‍याचा अनादर आणि बौद्धिक मूल्यमापन करू शकत नाही.
पुन्हा, ह्या धाग्यावर वर्तमानात काही जे लिहिले त्याचे स्पष्टीकरण ईतर ठिकाणी आणि तेही भूतकाळात लिहिलेले कसे असू शकते?

मी कुठे व कसे प्रतिसाद लिहावेत याबद्दल मला समज देण्यास अ‍ॅडमिन समर्थ आहेत. मी कसे लिहावे हे तुम्ही सांगणे अजिबातच उचित नाही. >>> ईब्लिस तुम्ही खरंच हा युक्तिवाद करत आहात? ह्या न्यायाने मग, कोणी काढलेला धागा आणि त्यावर लिहिणारे मठ्ठं आहेत असे तुम्हाला वाटत असले तरी ते तुम्ही सांगणे आजिबात ऊचित होणार नाही. निर्णय घेण्यास अ‍ॅडमिन समर्थ आहेत.

ईब्लिस, तुम्ही काही बेकायदेशीर किंवा डीफेमिंग लिहिले आहे आणि अ‍ॅडमिनने कारवाई करावी असे मी म्हणत नाहीये. मला तुमचा प्रतिसाद ऊपरोधिक आणि अहंकारी वाटला. तुम्हाला खात्री आहे तो तसा नाहीये तर ठीक आहे, वाद मिटला.

>>कोणाच्या प्रतिक्रिया वाचून इतका त्रास होत असेल, तर त्यावरही काही लोक प्रतिक्रिया लिहितातच का? हा ही प्रश्न पडतोच>><<

कोणाच्या प्रतिक्रियेचा वाचून त्रास होत असता तर जे लिहिले तेच अंमलात आणले नसते का? ते सर्वसामन्य निरिक्षण होत/आहे.

कोणी काढलेला धागा आणि त्यावर लिहिणारे मठ्ठं आहेत असे तुम्हाला वाटत असले तरी ते तुम्ही सांगणे आजिबात ऊचित होणार नाही. निर्णय घेण्यास अ‍ॅडमिन समर्थ आहेत.

>>

Biggrin

वेल सेड चमन

Pages