खाण्यापिण्यातील चुकीचे संयोग!!!!

Submitted by हर्ट on 4 March, 2013 - 02:51

बर्‍याचदा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, कडधान्ये, मसाले एकत्रित करुन भाज्या करतो. पण असा संयोग....मिश्रण योग्य कि अयोग्य हे आपल्याला माहिती नसते.

इथे आपण अशा चुकीच्या संयोगाबद्दल...मिश्रणाबद्दल लिहिणार आहोत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सृष्टी, मेथी आणि तूरडाळ दोन्ही भयंकर पित्त होणार्‍या गोष्टी आहेत. >>>> हो मला पण तसेच वाटते...

शिक्रण खाऊ नये असे आयुर्वेदामधे म्हटले आहे असे वाचल्याचे स्मरते.

दूध + गूळ
दूध + भात + मीठ
दूध + फळे
दूध + मध
दूध व नंतर लगेच मांसाहार
जेवणाआधी व नंतर २ तास फळांचा रस
घेऊ नये असे म्हणतात.

आयुर्वेदामध्ये समान प्रकृती धर्म असलेले पदार्थ वर्ज आहेत जसे दूध + गूळ, दूध + फळे, दूध + मांसाहार उष्ण प्रकृती असते... असे वाचल्याचे स्मरते. BAMS अभ्यासक्रमात हे डिटेल मध्ये दिलंय... जाणकारांनी अधिक माहीती लिहावी.

हे परमेश्वरा!

मला जरा मठ्ठ कर!
अन असे धागे पहाणे माझ्या नशीबी येऊ देऊ नकोस...

थॅंकिंग यू इन अँटिसिपेशन,
63.gif

तुरडाळ आणि मेथी एकत्र करुन चांगली नाही? मी तर खूपदा आमटी करताना मेथी आणि तुरडाळ एकत्र शिजवून मगच करते. त्यामुळे पित्त झालंय असं आठवत नाही.
तसंच दूध, गूळ पोळी वगैरेही आपण खातो की एकत्र करुन. आत्ता एवढी पॉप्युलर नसेल कदाचित पण लहानपणी पोळी खायला लावायचा हमखास उपाय होता तो.

फणसाचे गरे (कापे कि बरके ते आता आठवत नाहि) खाल्यावर पाणी पिउ नये असं म्हणतात; पोटात काहितरी केमिकल लोचा होतो...

डॉक्टरसाहेब जरा विस्कटुन सांगा.

तुरडाळ आणि मेथी एकत्र करुन चांगली नाही? मी तर खूपदा आमटी करताना मेथी आणि तुरडाळ एकत्र शिजवून मगच करते.>> सायो, मला पित्ताचा अति त्रास असल्याने दोन पित्तकर गोष्टी एकदम खाल्ल्या की उल्ट्या होत्यात. प्रत्येकाला होईलच असे नाही.

एकदा टीव्हीवर एक आयुर्वेदाचार्यांनी आयुर्वेदाच्या मते पालेभाज्या खाणे उत्तम नाही, कारण पालेभाज्या नाशवंत आहेत, जी गोष्ट स्वत: टिकू शकत नाही, ती शरीराला काय पोषण देणार असा बिनतोड सवाल विचारला होता. Proud ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे हेच खरे!!!

खाण्यापिण्यामधे बर्‍याचशा गोष्टी ऋतूमान आणि उपलब्ध खाद्यपदार्थ यावर अवलंबून असतात. त्यामुळे आपल्याला जे झेपेल ते आपण करावे असे माझे मत. शेवटी तुमचा पिंड कशावर पोसलाय हे प्रत्येकाला माहित असतं. (आणी म्हणूनच मुलांना लहानपणापासून सर्व पदार्थ खाऊन सवय करवून घेणे चांगले)

बहुतेक जण पित्तावरती उपाय म्हणून आंबवलेले पदार्थ खाऊ नका असा सल्ला देतात. मला इडली डोसा कितीही खाल्ला तरी पित्त होत नाही. उकडलेले अंडे + दूध = पित्त हे समीकरण माझ्यासाठी तरी ठरलेलं आहेच. कोकम सरबत पित्तावर उपाय म्हणून घेतलं तर डोकं गच्च धरतं माझं.

डाळ भात आणि तळलेला मासा हे काँबीनेशन मला विसंग वाटते. माशाचा अपमान नाही का होत याने? घरी असे केले असेल तर मी सरळ भातात मासा कुस्करून खाते पण विसंग खाऊन मानसिक व शारिरीक त्रास करून घेत नाही. तंदूरी चिकन व चपाती-रोटी याबद्दलही पूर्वी असेच मत होते पण नुसतेच स्टार्टर खाऊन जेवण समाप्ती करण्यापेक्षा एखादी चपाती बरोबर खाल्याने त्रास होणार नाही असे स्वत:ला समजावते

>>सायो, मला पित्ताचा अति त्रास असल्याने दोन पित्तकर गोष्टी एकदम खाल्ल्या की उल्ट्या होत्यात. प्रत्येकाला होईलच असे नाही.>> तसंच असावं. कारण माझीही पित्त प्रकृती आहे. पण साबुदाण्याच्या खिचडीने पित्त व्हायची गॅरंटी पण मेथी+तुरडाळ आमटीने तसं वाटलं नाही. असो.

ईब्लिस >> ईतका अ‍ॅरोगन्स का? अनामिक राहून लिहिता येतं म्हणून तुम्ही धाग्यावर लिहिणार्‍या कुणालाही असे लिहू शकत नाही.
तुमची प्रज्ञा तुम्हाला स्वस्थ बसू देत नसल्यास बीच्या प्रश्नासाठी योग्य प्रतिसाद लिहा.

चमन,
इतका अ‍ॅरोगन्स का? मी स्वतःला मठ्ठ करण्याची विनंती परमेश्वरास केली आहे. मधेच तुम्ही कसे आलात? Sad देवदूत वगैरे आहात की काय?
आता माझ्या प्रश्नाला योग्य प्रतिसाद लिहा बरे?
अन जमले तर अभ्यास म्हणून हे ही वाचा.

बी, केवळ विरुद्धाहार हे आयूर्वेदातले प्रकरण वेगळे काढता येणार नाही. त्यासाठी प्रकृती ( पित्त / कफ / वायू ) ऋतुचर्या याची विस्तृत चर्चा वाच आणि मग स्वतःच्या प्रकृतीनुसार / ऋतुनुसार आहार ठेव. एकाचा नियम सर्वांनाच लागू होईल असे नाही. त्यामूळे योग्य अश्या वैद्यांचाच सल्ला घे.

तूला हवी असतील तर काही पुस्तके सांगू शकेन.

अश्विनी ताई

मुळात दूधामध्ये कुठलाही पदार्थ मिसळल्यास दूध फाटते. त्यात गव्हाची पोळी करून ती दूधाबरोबर आपण खातो. काही लोक कणीकमध्ये मिठ ही मिसळतात. अर्थातच हे अन्न पोटात गेल्यावर ब:याच जणांना पित्ताचा त्रास होतो. मला पूर्वी पित्ताचा त्रास व्हायचा मला एका आयुव्रेदिक डॉक्टरने दूध पोळी न खाण्याचा सल्ला दिला होता.

च्यवनप्राश ची रेसीपी बनवणार्‍या च्यवन ऋषींची एक कथा सांगतो.
एकदा च्यवन ऋषींना अस वाटलं की आपल्या विद्यार्थ्यांची जरा परिक्षा घ्यावी. सगळ्यांना त्यांनी बोलावल अन परिक्षा म्हणून एकच प्रश्न विचारला.....

"निरोगी कोण रहातो? "

कुणा विद्यार्थ्याने म्हटल की जो रोज लवकर उठतो व्यायाम वगैरे करतो तो निरोगी रहातो, कुणी म्हटल की जो भरपूर पौष्टीक पदार्थ खातो तो निरोगी रहातो, कुणी म्हटल की जो अमुक अमुक औषधींच सेवन करतो तो निरोगी रहातो..... कुणी काही कुणी काही.....

च्यवन ऋषींनी विचारल की "अरे तो माझा आवडता शिष्य अबक दिसत नाहीये परिक्षा द्यायला? कुठे गेला तो?" विद्यार्थ्यांनी सांगीतल की तो पाणी आणायला नदीवर गेलाय. च्यवन ऋषी म्हणाले की त्याचीही परिक्षा घेतली पाहिजे अन त्यांनी योगबलाने एका पक्ष्याच रूप घेतल व उडत नदीकाठी गेले.शिष्य पाणी भरत होता तिथेच एका झाडाच्या फांदीवर बसले व "कोSSरुक ? कोSSरुक ? कोSSरुक ? " असा तीनवेळ आवाज काढला. शिष्याने ओळखल हे आपले गुरुजी आहेत व परिक्षा घेण्याकरता प्रश्न विचारत आहेत.
शिष्यही हुशार, मेधावी!! गुरुजींनी तीन वेळ कोSSरुक असा आवाज काढून विचारल तर त्याने ही तीन शब्दांतच उत्तर दिल....

"हितभुक !!"
"ऋतभुक !!"
"मितभुक!!"

अर्थात जो स्वतः च्या प्रकृतीला मानवेल हितकर असेल अस अन्न जेवतो..... जो ऋतु नुसार जे योग्य असेल अस अन्न जेवतो... आणि जो भुके पेक्षा थोड चार घास कमी जेवतो तो निरोगी रहातो.

ही कथा वसुंधरा पेंडसे नाईक लोकसत्ता मधे संस्कृत ग्रंथ परिचय नावाची लेखमाला लिहित असत त्या मधे मी वाचली होती. फार सुंदर लेखमाला होती.
( विषेश सुचना; ही कथा असल्याने त्यातून ज्याना घ्यावासा वाटत असेल त्यांनी बोध घ्यावा. कथा सत्य की असत्य, याला काय पुरावा आहे? माणसाला अस योगबलाने रूप बदलता येत का वगैरे डिसेक्शन करू नये ही नम्र विनंती !! )

राज, पिऊन बघा. वाट पहाण्यापेक्षा परिणाम कळेल, उत्तराची गरज रहाणार नाही Wink

बहुतेक कापा(?). लहानपणी दुखल्याचं आठवतंय. आता प्रयोग करायची धास्ती वाटतेय म्हणुन विचारलं तर डॉक्टरसाहेब भाव खातायत...

डिड समबडी टिक् हिम ऑफ?

ईब्लिस
मला वाचण्यासाठी काहीही लिंक नको आहे. प्रश्न बीने विचारला आहे, प्रतिसाद त्याला हवा आहे. तुमच्याकडे त्या विषयाबद्दलचं काही ज्ञान असेल तर त्याच्या आणि ईतरांच्या प्रश्नांना ऊत्तरं लिहा.
तुमच्या मठ्ठपणाबद्दल बोलत असाल तर तो शब्दखेळ फार केविलवाणा वाटतो आहे एवढंच म्हणेन. तुम्ही ऊपरोधिक आणि अहंकारी प्रतिसाद लिहून धाग्यावर लिहिणार्‍यांचा अनादर करत आहात. तुम्हाला तसे वाटत नसल्यास तुम्ही अजूनही तश्याचप्रकारचे प्रतिसाद ईथे आणि ईतरत्र लिहिण्यास मोकळे आहात.

कित्येक वेळा लोकांची काही प्रतिक्रिया पहिलीय तेव्हा, कोणाचा धागा वाचून इतका त्रास होत असेल तर लोकं येतात तरी का हा प्रश्ण पडतो?

मेंथॉसची गोळी उदा. पोलो आणि पेप्सी व तत्सम एअरेटेड ड्रिंक्स एकत्र घेऊ नयेत. हे आधुनिक काळातले विरुद्धाहार मानले जावेत.

धन्यवाद फेरफटका!

काप्या गर्‍यावर ताक प्यायचे आणि बरक्या गर्‍यावर पाणी, असे लहानपणापासून ऐकले/केले आहे.

काप्या गर्‍यावर ताक प्यायचे आणि बरक्या गर्‍यावर पाणी, असे लहानपणापासून ऐकले/केले आहे.>>>>>>>>> पण मी म्हणते गरे खाल्ल्यावर काही प्यायची गरजच काय?? Proud Light 1

विदर्भात आवळा खाल्ल्यानंतर पाणी पितात. खूप गोड लागत मग ते पाणी.<<<

ते पुण्यातही आवळ्यानंतर प्यायले की गोडच लागते की?

Light 1

कित्येक वेळा लोकांची काही प्रतिक्रिया पहिलीय तेव्हा, कोणाचा धागा वाचून इतका त्रास होत असेल तर लोकं येतात तरी का हा प्रश्ण पडतो? > ++

खाण्याबरोबर पिण्याबद्दलही विचारलय धाग्यात म्हणुन आठवलं. मद्यपान केल्यानंतर कलिंगड खाउ नये असं अहो म्हणतात. कैतरी केमिकल लोचा होतो म्हणे.

Pages