खाण्यापिण्यातील चुकीचे संयोग!!!!

Submitted by हर्ट on 4 March, 2013 - 02:51

बर्‍याचदा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, कडधान्ये, मसाले एकत्रित करुन भाज्या करतो. पण असा संयोग....मिश्रण योग्य कि अयोग्य हे आपल्याला माहिती नसते.

इथे आपण अशा चुकीच्या संयोगाबद्दल...मिश्रणाबद्दल लिहिणार आहोत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

योग्य की अयोग्य नेमके कशाच्या दृष्टीकोनातून? आयुर्वेदाच्या, अ‍ॅलोपथीच्या, लोकल - धर्मिक रूढींच्या, की आपल्या उगीच अंधश्रद्धांच्या?

Rofl

बी मला काही माहिती नाही.. बरंच ऐकलंय की दूध फळं एकत्र खाऊ नयेत इ. पण नेमकं कारण माहिती नाही.

मी असे ऐकलेय (अनेक वर्षांपूर्वी) की, पांढरे पदार्थ एकत्र खाऊ नयेत. जसे की दुध्-भात्-साखर.

मी एकदा मेथीचि पाने आनि उकडलेली तुरडाळ एकत्र करुन कणीक मध्ये मळुन थेपले सारखे केले पन काय माहित ? का य चुकले ? त्या दिवशी मुलगा,नवरा आणी मला मळमळ्यासारखे झाले आणि उलटी पण झाली.....काय कारण असेल ?

मी गुगल क्रोम वापरतो. अनुस्वार येत नाही. जर प्रयास केला तर सगळी वाक्ये एकमेकान्ना चिकटतात.

दूध + फळे
दूध + मीठ
दूध + मांस
दही + गूळ
दही + मासे
( हल्लीच ऐकलेला ) मधाचा उच्च तापमानाशी संयोग करु नये Wink

पण असे असताना मिल्कशेक्स, व्हाईट सॉस असलेले पदार्थ, व्हाईट सॉसमध्ये शिजवलेले मांस, मध घालून बेक केलेले केक, नट्स, मांसाहारी पदार्थ, बंगाली लोकांत प्रचलित असलेले दही-गूळ आणि दह्याच्या करीतले मासे हे ही सर्रास खाल्ले जाते. अनेकांचे पिंड त्या खाण्यावर पोसले आहेत.

त्यामुळे आपल्या आवडीचे पदार्थ खावेत. खाऊन त्रास झाला तर आपल्याला सोसत नाही असे समजून बंद करावे. चुकीचे अन्न खातोय असा विचार करुन मानसिक ( आणि त्यामुळे शारीरिक ) रोग मागे लावून घेऊ नये. खाऊन त्रास होत नसेल तर आपल्या दृष्टीने चुकीचे खाणे दुसर्‍यांच्या दृष्टीने बरोबर आहे असा विचार करुन सोडून द्यावे.

मी गुगल क्रोम वापरतो. अनुस्वार येत नाही. जर प्रयास केला तर सगळी वाक्ये एकमेकान्ना चिकटतात.<<<

मीही गुगल क्रोमच वापरतो. अनुस्वारासाठी 'म' हे अक्षर वापरतो. व्यवस्थित अनुस्वार येतो.

वरदा, कोणत्या प्रतिसादाला + १ देता आहात? तुम्हालाही असेच वाटत आहे का की सृष्टी यांनी घाईघाईत ती कणीक ठेपल्याच्या आकाराची थापून तशीच खायला घातली असेल सगळ्यांना, म्हणून तसे झाले असेल?

मिल्क्शेक्स आपले नाहीत. <<<
शिक्रण!

दुध आणि मुगाच्या डाळीची खिचडी, सुंदर लागते. पण खाऊ नये असं म्हणतात.
दुध आणि कांदापण खाऊ नये असं म्हणतात.

शिफ्ट + एम ने अनुस्वार येतो. डिलीट केल्यावर आधी लिहिलेल्या शेवटच्या अक्षराला जोडून लिहिले तर चायनीज लिपी तयार होते. ते अ‍ॅव्हॉईड करायला एक स्पेस देऊन पुढचा शब्द / राहिलेली अक्षरे टाईप करावीत मग मागे जाऊन जोडून घ्या. पहिल्यांदा कटकट वाटते पण सवय होईल

बी,
शिफ्ट + म.

काही दिवसांपूर्वी, दुध-पोळी खाऊ नये, असे कोठेतरी वाचले. का बरे?
आम्ही लहानपणापासून खात आलो, आणि माझ्या मुलानाही फार आवडते दुध्+साखर+ पोळी.
काही कारण असेल तर सांगा, म्हणजे, देणार नाही.

मासे आणि अंड एकञ खाउ नये किंवा मांसाहारानंतर दुधाचे पदार्थ खाऊ नये असे कुठेतरी ऐकले आहे यात किती तथ्य आहे?

बंगाली गोड्या पाण्यातले मासे खातात तर आपण खार्‍या पाण्यातले. खार्‍या पाण्यातले मासे दुधात शिजवले तर माशातल्या मीठामुळे अन्न नासायची किंवा तब्बेतीला अपाय व्हायची शक्यता असेल का?

व्हाईट सॉसमधे मासे कधी केले नाहीत. खाल्ले आहेत तेव्हा सॉस वरून देतात. मासा त्यात शिजवलेला नसतो. दूध आधी वेगळे शिजवून घेतल्यामुळे फरक पडतो का?

ठेपल्याच्या आकाराची थापून तशीच खायला घातली असेल सगळ्यांना, म्हणून तसे झाले असेल>> ............. तशीच कशी खायला देइन.. ?????

त्या दिवशी मुलगा,नवरा आणी मला मळमळ्यासारखे झाले आणि उलटी पण झाली.<<<

गॅस लावून तव्यावर भाजले होतेत का? >>> आपण पोळी/ थेपले करतो तशीच...

सृष्टी, मेथी आणि तूरडाळ दोन्ही भयंकर पित्त होणार्‍या गोष्टी आहेत. त्यामुळे पित्त झाले असावे.

Pages