मी बनवलेली ज्वारीची भाकरी(क्लीप)..

Submitted by अर्चना पुराणिक on 22 February, 2013 - 15:22

मी बनवलेली ज्वारीची भाकरी(क्लीप).. छान आहे का पहा Happy

https://www.youtube.com/watch?feature=player_detailpage&v=Wt8bq3Y4MdE

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे.
पाण्याशिवाय व दोन हाताने थापून बघायची आहे मला येते का?
मस्त फुललीय तव्यावरच... तुम्ही ज्वारीच्या पीठात काही टाकता का? गहू पीठ वगैरे?

मी भारतात गेली की ट्राय करणार.

सहीच की. माझी भाकरी अशी इतकी छान कधीच होत नाही. परत एकदा ह्या क्लीप प्रमाणे प्रयत्न करून बघण्यात येईल.

मला लिंक सलग बघताच येत नाहीये. लोड होण्यातच चिक्कार वेळ जातोय. पण मस्त पातळ थापली गेली आहे. फुगलेली दिसेपर्यंत बहुतेक संध्याकाळ होईल.

बापरे, इतकी एकसारखी पातळ थापली गेलेली आणि फुललेली भाकरी आयती खायला मिळणेही दुर्मिळ, स्वतःला जमणे तर त्याहून दूरची गोष्ट !
मस्तच जमलीय Happy

अमेझींग! काय एक्सपर्ट आहात तुम्ही!!!

पीठ मळतानाचीही क्लिप काढा प्लीज! आणि भाकरी तव्यावर घातल्यानंतर गॅस कधी मोठा/बारीक करता तेही प्लीज् सविस्तर लिहा!

फारच मस्त! Happy

वॉव..ग्रेट..मस्त टम्म फुगली...
प्लीज पीठाचा गोळा मळण्यापासूनचं सगळं रेकॉर्ड करा नं..

अवांतर -- वरती इतक्या लोकांनी पाहिल्याचं म्हटलंय तरी मी या लिंकला गेले तर फक्त २ व्हुज काय सांगतोय यु ट्युब Wink

अमेझींग! काय एक्सपर्ट आहात तुम्ही!!! >>> सशल +१

पीठ मळतानाचीही क्लिप काढा प्लीज! आणि भाकरी तव्यावर घातल्यानंतर गॅस कधी मोठा/बारीक करता तेही प्लीज् सविस्तर लिहा! >>>>>> सशल +१

तुमच्या भाकरी कौशल्याला सलाम.

वेका, तो व्ह्यूजचा काऊंट गंडलाय. मी पाहिलं तेव्हा 'नो व्ह्यूज' येत होतं आणि तसं असणं शक्य नाही Happy

कसली मस्त करता तुम्ही भाकरी Happy

असली मस्त भाकरी कधी मला जमेल अस वाटत नाही..
प्लीज पीठाचा गोळा मळण्यापासूनचं सगळं रेकॉर्ड करा नं..>>>>>>++++११११११ खरचं सगळ रेकॉर्ड करा म्हणजे आमच्यासारख्याना थोडा तरी प्रयत्न करता येइल.

सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद Happy माझी दुसरी क्लिप टाकतेय ती कशी वाटली नक्की लिहा Happy ..पण हीं क्लिप बाजरीच्या भाकरीची आहे.

अशीच होते माझी पण .. मला ही पातळ फुगलेल्याच भाकरी आवडतात.. Happy फक्त परतल्यावर तुम्ही जे तव्यावर भाजेलीय ती मी गॅसवर भाजते डायरेक्ट..
मस्त क्लीप..

वॉव.. किती कुशलतेने एव्हढी पातळ भाकरी थापलीस .. ती उचलली जात असताना मलाच धाकधुक होत होती Happy सुप्पर्ब अर्चना.. __/\__

धन्यावद Happy दीपु...आग भाकरी हा काही नविन प्रकार नाही,पण ती बनवण्याचे व तव्यावर टाकण्याचे बरेच प्रकार आहेत... Happy त्यातली ही माझी स्टाइल... Happy

मी केलेली भाकरी, असे वाचून लोकं काहीही टाकतात असे वाटले. पण तरिही क्लिप पाहिली.

अमेझिंग आहे भाकरी ! करण्याची पद्धत फारच आवडली. बडवणे आणि थापने ह्यातील भेद क्लिप मुळे कोणालाही कळेल. Happy

पुराणिक वहिनी आता फक्त त्यात तूप आणि मिठ टाकून इकडे धाडून द्या Happy

तुमच्या youtube व्हिडीओ च्या निमित्ताने इतर लोकांचेही पोळ्या-भाकरीचे व्हिडीओ पाहून आले.
काय फुगतात एकेकीच्या पोळ्या आणि भाकऱ्या! ती bajias कूकिंग वाली बाई तर किती पातळ कणिक भिजवते.
तरी पोळ्या मस्त झाल्या तिच्या.

Pages