Submitted by अर्चना पुराणिक on 22 February, 2013 - 15:22
मी बनवलेली ज्वारीची भाकरी(क्लीप).. छान आहे का पहा
https://www.youtube.com/watch?feature=player_detailpage&v=Wt8bq3Y4MdE
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बजियाज कूकींग मलाही खूप
बजियाज कूकींग मलाही खूप आवडते. तेल सोडले तर चांगले असतात पदार्थ्.(विषय निघालाच म्हणून)
मामी, एवढ्या पहाटे उठलात तर
मामी, एवढ्या पहाटे उठलात तर भाकरी प्रयोग करायला भरपूर वेळ हाताशी आहे. लागा चटचट कामाला >>> सायो,
मामी झोपेत ठोकतायेत सलाम >>>> नाय गो डिज्जे, ती भाकरी पाहून झोप उडालीच माझी!
मुख्य म्हणजे ती भाकरी किती भराभर आणि सुमडीत मोठी मोठी होत जाते. आम्ही मेलं पाच मिनिटं थापत राहिलो तरी गोळा तसाच. फारतर फक्त कडा पातळ होत जातात आणि त्यांना एक झालर लावल्याचा फील येतो ... पुढे योग्य वेळी (म्हणजे तव्यावर टाकताना) त्या तुटतात. मग पाणी लावून चिकटवा-चिकटवी सुरू. मग ते पाणी जास्त होते. भाकरी उलटली की हमखास चिकटते. शिवाय करपतेही. असं ते दिव्य पॅचवर्क मी आता कलाकुसरीत टाकणार आहे. तिथेच माझी भाकरी शोभून दिसेल.
खुप सुंदर भाकरी आहे. अशी
खुप सुंदर भाकरी आहे. अशी भाकरी ताटत पडली तर दोन मिंट मी नुसता बघतच बसेन.
पण मळण्यापासून पण क्लीप पाहिजे. ( खरं तर ज्वारी कुठली वापरता, पिठ कुठे गळून घेता... असे बरेच प्रश्न आहेत. )
दिनेशदा ज्वारी घरचीच आहे
दिनेशदा ज्वारी घरचीच आहे स्वतःच्या शेतातली
पिठ घराजवळच्या गिरणीतून गाळलेल
आता थोड्याच वेळात माझी दुसरी क्लिप टाकतेय ती कशी वाटते ते पहा
(बाजरीची भाकरी)
मस्त झाली आहे भाकरी! पण मला
मस्त झाली आहे भाकरी!
पण मला गॅसवर भाजून खमंग केलेली भाकरी वाढा बॉ.... त्यावर मस्त लोण्याचा गोळा हव्वा आणि लसणीची चटणी!!
OMG!!!!!!! काय सुबक आणि सुंदर
OMG!!!!!!!
काय सुबक आणि सुंदर भाकरी आहे.....अत्ता उचलुन खाविशी वाटत्येय
भाकरी थापण्याचा पेशन्स , भजण्याची पद्धत.. सगळ्यालाच ___/\___
अशी भाकरी आणि त्यासोबत लोण्याचा गोळा..... लसणीच तिखट नाहीतर ठेचा.....स्वर्गसुख
इतक्यातच कोल्हापूरात बाबांकडे येणार्या स्वयंपाकाच्या मावशींच्या हातच्या भाकर्या चापून आल्येय ...
मस्तच! भाकरी जमत नाही अशी पण
मस्तच!
पण पोळी तव्यावर अशीच टम्म फुगते! 
भाकरी जमत नाही अशी
ती क्लीप अपलोड केली कि वेगळा
ती क्लीप अपलोड केली कि वेगळा धागा काढा प्लीज !
@मामी तुम्हाला दिव्य-दृष्टी
@मामी
तुम्हाला दिव्य-दृष्टी आहे का??? भाकरी करताना होणारी माझी फजिती तुम्हाला कशी कळली??
सहीच
सहीच
अर्चना........ एकदम जबरी
अर्चना........ एकदम जबरी यार.....
ही अशी मस्त टम्म फुगलेली भाकरी बघूनच सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं ..... पण आमची मज्जाय. आम्हाला अर्चनाच्या हातची अशी भाकरी खायला मिळते.......त्यामुळे आम्ही शिकायच्या वगैरे भानगडीत पडायचं नाही असं ठरवलंय
जोक्स अपार्ट....पण मी सुद्धा तिला हेच सांगितलं की अगदी पीठ मळण्यापासून सगऴं समजावून सांग.
मामी ....झोप वगैरे उडवू नका हो....... म्हणजे मला असं म्हणायचंय की खाण्यासाठी झोप उडणं ठी़क आहे पण खाणं बनवण्यासाठी झोप कशाला उडवायची...
>>पण आमची मज्जाय. आम्हाला
>>पण आमची मज्जाय. आम्हाला अर्चनाच्या हातची अशी भाकरी खायला मिळते.....>><<
ती कशी काय? शेजारी आहात काय?( उगाच चौकश्या..)
Pages