गूळचुनातील कोकणातली पक्वान्ने

Submitted by शैलजा on 22 February, 2013 - 04:48
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

गूळचून घालून केलेले ओले काजू (मवला वा मोवला असेही नाव आहे )

ओले काजू
एक नारळ खवणून
१ वाटी गूळ
१ टेबलस्पून पातळ तूप
१ चमचा - वेलची व जायफळ पूड (दोन्ही अर्धा, अर्धा चमचा घ्यावे)
चवीला मीठ

गूळचुनातील राजेळी केळी

६ पिकलेली राजेळी केळी
नारळाची अर्धी वाटी खवणून
पाव किलो गूळ
वेलची + जायफळ पूड एक चमचा
१ टेबलस्पून साजूक तूप
४-५ लवंगा

क्रमवार पाककृती: 

गूळचून घालून केलेले ओले काजू

१. थोडे पाणी घालून ओले काजू मऊ शिजवून घ्यावेत. निथळत ठेवावे.
२.गॅसवर पातेले ठेवून त्यात तूप घालून गूळ खोबर्‍याचे सारण एकत्र करुन घ्यावे, त्यात जायफळ व वेलचीची पूड घालावी.
३. त्यावर आता शिजवलेले ओले काजू घालून हलक्या हाताने ढवळावे व एक वाफ काढावी. होता होईतो काजू मोडणार नाहीत हे पहावे.

गूळचूनातील राजेळी केळी

१.केळ्यांच्या साली काढून त्यांचे लांबट तुकडे करावेत व सारण भरण्यासाठी केळ्यांना चिरा द्याव्यात.
२. गूळ, खोबरे व वेलची + जायफळ पूड एकत्र करावे व हे सारण केळ्यांमध्ये भरावे.
३. गॅसवर लंगडी ठेवून त्यात तुपाची फोडणी करुन लवंगा घालाव्यात.
४. लवंगा तडतडल्या की त्यात की भरली केळी आडवी ठेवून मंद गॅसवर एक वाफ आणावी.
५. एका वाफेनंतर केळी उलटावी व पुन्हा ५ मिनिटे ठेवून अजून एक वाफ आणावी.

वाटल्यास वरुन तूप घालता येईल. एक हळदीचे पानही सोबत घातल्यास छान वास येईल.
गॅस मंद असणे आवश्यक.

वाढणी/प्रमाण: 
३-४ जणांसाठी.
माहितीचा स्रोत: 
पारंपारिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खवलेल्या ओल्या खोबर्‍याला कोंकणात चून म्हणतात. हा शब्द 'चूर्ण' या शब्दावरून आलेला आहे. याचे चूर्ण,चून्न, चून,(चाफ्यातला च), चून/चोन (चित्रातला च), चोंव्/चोंय/सोय (त्स सारखा च),चव असे अनेक प्रांतभेद आहेत.

लाजो, लहानपणी मी आज्जीला गूळ, खोबरे, शेंगदाण्याचे कूट, वेलची, तूप इत्यादि एकत्र करुन गुळाच्या पाकात हे सर्व घालून, त्यात आल्याचा रस वगैरे घालून त्याच्या वड्या करताना पाहिलेले आहे आणि भरपूर खाल्यात पण. ती आमची चुनाची कापं, पण नीरजा बहुतेक काही वेगळे म्हणत असावी.

नीरजा?.

वॉव.

शैलजा, तू म्हणतीयेस त्याच वड्या.
नेरूर, पिंगुळी भागातली छोटी चहाची हाटेलं आहेत तिथे मिळतात विकत आता.

ओह... म्हणजे सॉर्ट ऑफ शेंगदाण्याच्या वड्याच की... हो ना?

किती ते प्रश्न!!!! Proud

आता नेक्स्ट टाईम मी आले की मला आणुन दे Wink

लाजो, नाही शेंगदाण्यांचं प्रमाण नगण्य, आणि अख्खा शेंगदाणा नाही घालायचा, त्याचं कूट.
तू सांग मला तुझ्या पुढच्या वारीत, नक्की देईन तुला. Happy

मयेकर, मला रसपोळे म्हणजे नारळाच्या दुधाचा रस ज्यात गूळ विरघळवतात आणि त्यात घावन मॅरिनेट करतात, ते माहिती आहे! (आठवणीनेच तोंपासु!) सातकापे घावन ऐकल्यासारखे वाटते आहे पण आठवत नाहीये. सांगा कसे करायचे.

मिळाले, मिळाले आईच्या वहीत! सात कापे नव्हे ते सात कप्पे! मी ह्यांच्या वाटेला आयुष्यात जायची नाही! Biggrin

येस्स मी पण सातकापे घावन बोलणार होते. आजी करायची अगोदर रेसिपी आठवत नाही.
बादवे घरी केलेल्या गुळचुनाच्या पातोळ्यांचा झब्बू देऊ काय? Happy

दे ना झब्बू! पातोळ्या, अह्हाहा Happy मस्त! चव आणि हळदपानांचो वास हय इलो! Happy

सात कप्पे घावनाची कृती टाकते वेगळी Happy कधी करेन माहिती नाही! Lol

कर लवकर आणि फोटू टाक. Happy विवेकदादांनी हळदीची पाना दिलेली त्याच्या पातोळ्या केल्यास का गं?

भारी.. कधी ऐकलेलेही नाहीत खास कोकणातले पदार्थ. कु ठे तयार मिळतील का? चव समजली की करायला उत्साह ये ईल + जमण्याची शक्यता वाढेल...

शैलजा अजून एक पदार्थ एकदा वाडीला असताना खाल्लेला... नाव आठवत नाही. फणसाच्या पानाचे द्रोण करुन त्यात बहुतेक पातोळ्यासारखे तांदळाची उकड लावून आणि गुळचुन भरुन केलेला... तुला माहित आहे त्याचे नाव?

फणसाच्या पानाचे द्रोण करुन त्यात बहुतेक पातोळ्यासारखे तांदळाची उकड लावून आणि गुळचुन भरुन केलेला... तुला माहित आहे त्याचे नाव?<< मला पण नाव माहित नाही. पण मंगलोरला आमच्या राव आंटीनी एकदा केलं होतं असं काहीतरी. शैलजा, खोट्टं किंवा सांदण नव्हे. हे मोदकासारखंच करायचं पण मोदक वळायच्याऐवजी द्रोणामधे भरून करायचं.

गुळचुनाचे काजू हा प्रकार माझ्यासाठी नविनच! भरलेली राजेळी केळी आमच्याकडे जन्माष्टमीच्या नैवेद्याला करतात.

नीलू आणि नंदिनी, पातोळ्या मस्त दिसतायत. माझी हळद हिवाळ्यात कशीबशी तगुन राहिलेय. पातोळे करायला एप्रिलपर्यंत थांबावे लागणार.

Pages