Submitted by पुरंदरे शशांक on 17 February, 2013 - 06:22
सदिच्छा ..
असे उजाडावे | मनाच्या क्षितीजी |
नुरावी काळजी | नावालाही ||
लख्ख व्हावे सारे | हृदय गाभारी |
प्रकाशाची झारी | बरसावी ||
मोकळे मोकळे | होताच आकाश |
कुठला आवेश | नसो तेथे ||
स्वैर वारा वाहे | किंवा झरा मुक्त |
व्हावे बंधमुक्त | चित्त तसे ||
असावा तयात | प्रेमाचा ओलावा |
सुखाचा गारवा | सदोदित ||
हीच एक आस | मनी तोचि ध्यास |
न करी उदास | जगदीशा ||
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ओव्या आवडल्या. लख्ख व्हावे
ओव्या आवडल्या.
लख्ख व्हावे सारे | हृदय गाभारी |
प्रकाशाची झारी | बरसावी ||
मोकळे मोकळे | होताच आकाश |
कुठला आवेश | नसो तेथे ||
सुंदर. अत्यंत आवडीचा फॉर्म
सुंदर. अत्यंत आवडीचा फॉर्म आहे हा पण असे अर्थवाही शब्द सापडले तरच यात मजा येते. मस्तच
लख्ख व्हावे सारे | हृदय
लख्ख व्हावे सारे | हृदय गाभारी |
प्रकाशाची झारी | बरसावी ||
अतिशय सुंदर
व्वा ! शशांकजी, छान वाटल्या
व्वा ! शशांकजी,
छान वाटल्या ओव्या.
अतिशय सुंदर! नुसतं वाचुनच आणि
अतिशय सुंदर! नुसतं वाचुनच आणि कल्पना करुन खुप प्रसन्न वाटलं.
असं अजुन वाचायला आवडेल.
प्रकाशाची झारी..! सुरेख
प्रकाशाची झारी..! सुरेख कल्पना..
अगदी प्रसन्न वाटली सारीच कविता
शशांकजी,अशा सदिच्छा तुम्हालाच
शशांकजी,अशा सदिच्छा तुम्हालाच सुचू शकतात. इतक्या निर्मळ,नितळ झळाळत्या शब्दात.
अप्रतिम...
अप्रतिम...
खूप सुंदर लिहीलंस
खूप सुंदर लिहीलंस शशांक...
इतकं पॉझिटीव्ह वाटलं ना वाचून की, बस्स..!!
जियो
मस्तच
मस्तच
सर्वांना मनापासून धन्यवाद...
सर्वांना मनापासून धन्यवाद...
सुन्दर
सुन्दर
सुंदर अभंग रचना ! काही
सुंदर अभंग रचना !
काही शब्दसमुहांतून एकच अर्थ पुनरूक्त झाला आहे. पण तो ओघवता असल्याने फारसा जाणवत नाही , यात आपले यशच आहे.
भवसागराला टाळून वैराग्य मिळवण्यासाठी किँवा गृहस्थाश्रमातून वानप्रस्थ , संन्यासाश्रमाकडे वाटचाल करण्याची इच्छा प्रभावी शब्दांत व्यक्त झाली आहे.
एकूणच रचना खूप आवडली.
सुंदर रचना. मला आवडली.
सुंदर रचना. मला आवडली.
अतीशय सुंदर !! धन्स
अतीशय सुंदर !!
धन्स
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद...
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.....
उजळत राहो अंतर
दीपोत्सव निरंतर....
___/\___
सुंदर !
सुंदर !
___/\___ नमस्कार, प्रसन्न
___/\___ नमस्कार, प्रसन्न ,निर्मल
खुप सुंदर!
खुप सुंदर!
अप्रतिम!!
अप्रतिम!!