हॅरी पॉटर ट्रिविया क्विज

Submitted by वैद्यबुवा on 1 February, 2013 - 11:31

हॅरी पॉटर नीलम-गेम खेळत असताना ही कल्पना सुचली. नीलम गेम मध्ये पुढचं कनेक्शन जोडताना पुष्कळ स्वातंत्र्य आहे त्यामुळे गेम आविरत सुरु राहतो खरं पण मला वाटतं हॅरी पॉटर ट्रिवियाची खरी मजा पुस्तकातल्या बारिक बारिक डिटेल्सची उजळणी करण्यात आहे.

खेळ तसा साधा आहे, पुस्तकामधल्या आपल्याला माहित असलेला एखादा बारकावा, घटना, व्यक्ती ह्या बद्दल प्रश्न विचारायचा आणि बाकी लोकांनी त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा. प्रश्नाचे बरोबर उत्तर मिळाल्याशिवाय दुसरा प्रश्न विचारायचा नाही. प्रश्न आणि उत्तर दोन्हीही vague नसतील ह्याची काळजी घेतली पाहिजे. सहसा अगदी खुपच सोपे प्रश्न विचारायचे टाळले पाहिजे नाही तर इतकी मजा येणार नाही. खेळ नक्की कसा पुढे सरकतो हे बघून हवं तर आपण नवीन नियम बनवू शकतो.

ह्या खेळाकरता गप्पांचे पान न उघडता धागा उघडलाय कारण एक तर प्रश्न वाहून जायला नको आणि दुसरं म्हणजे लगे हाथों हा धागाच एक हॅरी पॉटर ट्रिविया लायब्ररी होऊन जाईल. Happy

तर मग करायची सुरवात?... Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अलास्टर,

BB - Broderic Bode. Unspeakablesपैकी एक. ज्याच्या हॉस्पिटल रूममध्ये डेव्हिल्स स्नेअर ठेवून त्याला संपवतात.

हा बीबी (भारतातल्या) रात्रीच जोर पकडतो! दिवसभर जास्त कोणी फिरकत नाही.

श्रद्धा! प्रणाम माते! Happy
PP -Pansy Parkinson
DD -Dudley Dursley

अरे!! इतक्या वेळा वाचून सुद्धा कधी इनिशियल्स बद्दल लक्षातच आले नाही .
खरच हि पुस्तके म्हणजे खजिना आहेत. प्रत्येक वेळी नवीन काही तरी मिळते

अरे!! इतक्या वेळा वाचून सुद्धा कधी इनिशियल्स बद्दल लक्षातच आले नाही .
>> +१.

शिवाय या प्रत्येक नावामागे काहीतरी अर्थ ठेवून वगैरे नावं रचली आहेत. माझे सर्वात आवडते नाव मात्र नेव्हिल लाँगबॉटम आहे. (आधी हे आडनाव मला काल्पनिक वाटले होते. इग्लंडच्या टीममधे एक साईडबॉटम होता, मग गूगलून बघितले तर हे पण ब्रिटीश आडनाव आहे)

शनपाईक म्हणजे बस कंडक्टर बहुतेक जो नंतर ७ पॉटर बॅटलच्या वेळी वॉल्डी च्या साईड्नी येतो.

सिनेमात लॉंगबॉटम खरच लांब पाय असलेला घेतलाय, छान केलाय रोल त्यानी. Happy

नेव्हिल माझ्या अतिशय आवडत्या कॅरेक्टरपैकी एक आहे.पहिल्या भागातला आजीच्या छायेतला काहीसा बावळट/मंद मुलगा शेवटच्या भागात किती कमालीचा बदललाय. सुरवंटाचे फुलपाखरु वै! अतिशय gradual change! घरच्यांच्या अपेक्षांचे दडपण घेउन वावरणारा, बुजरा मुलगा. योग्य मित्र आणि आत्मविश्वासाची साथ मिळाली की कुठल्याकुठे पोहोचला. शेवटच्या भागात जेव्हा रेक्वायरमेंट्स रुममध्ये तो जे बोलतो ते सहज कधीतरी पुस्तक काढुन मी वाचत असते.
रोलिंगबाईंना परत एकदा दंडवत. कमालीच्या परिणामकतेने त्यांनी हे शेड्स रंगवले आहेत.

अ‍ॅक्चुअली नेविल अन हॅरी दोघेही प्रोफेसीत इन्टरचेन्जेबल असतात, केवळ वोल्डीच्या चॉईसमुले हॅरी हीरो बनतो. अन्यथा त्या जागी नेविल असू शकला असता, असे रोलिंगबाईंनीच लिहून ठेवलेले आहे.

हो. आणि हे ही की जर व्होल्डमार्टने त्या मुलाला (हॅरी/नेव्हिल) याला मारयचा घाट घातल्यामुळेच पुढचा पार्ट घडला.

पहिल्या भागात नेव्हिलमुळे ग्रिफिंडररला पॉइंट्स मिळतात..तो प्रसंग मला खूप आवडतो. ज्या कॅरॅक्टरचा प्रवास सगळ्यात लक्षणीय वाटला - जीनी वीझले
सगळ्यात आवडते कॅरॅक्टर : मिनर्व्हा मॅकगुनगल . शाळेतल्या एका आवडत्या बाईंची आठवण होते त्यांच्यामुळे. मॅकगुनगल - अंब्रिज यांच्यातली जुगलबंदी आवडते.

आवडलेला प्रसंग : युल बॉलसाठी हॅरी आणि रॉन पार्टनर शोधून थकतात आणि हर्मायनीला म्हणतात, की तूसुद्धा मुलगीच आहेस...लिंगनिरपेक्ष मैत्रीचे उदाहरण Lol

नंदिनी यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात एकाची भर :
कंसाला कळलेली आकाशवाणी आणि व्होल्डमॉर्टला कळलेली प्रोफेसी.

व्हीला= अप्सरा?

चिंगीला नेव्हिलसाठी अनुमोदन Happy माझीही आवडती व्यक्तीरेखा. सिनेमात त्याला लुनापण मिळते Proud

अजून एक आवडती- मॉली वीझली. नंतर लिहीन तिच्याबद्दल.

सध्या, मस्त चालू आहे हे. मला एकाही प्रश्नाचं उत्तर ऑफहॅन्ड आलं नाही Sad

आता एक डार्क प्रश्न :

हॉरक्रक्स कसा तयार करतात ? त्याचे फायदे आणी तोटे कोणते ?

खुन करुन माणूस त्याचा soul तोडतो (इथे आपल्या हिंदू टर्म्स मध्ये आत्मा अभिप्रेत असावा). जितके खुन तितके तुमच्या आतम्याचे तुकडे होतात. प्रत्येक तुकडा तुम्ही मॅजिक नी कुठल्या वस्तू/माणसामध्ये ठेवू शकता.
फायदा:
सगळे तुकडे जो पर्यंत नष्ट होत नाही तो पर्यंत तुम्ही मरणार नाही कारण शरिर परत रिजनरेट करता येतं (ट्रायविजार्डच्या वेळी वॉल्डमॉर्ट कॉल्ड्रन मध्ये तयार होतोत तसा).

तोटा: मला वाटतं, स्वतःचा सोल कोणाचा खून करुन तोडून घेणे हे खुपच वाईट आणि डार्क मॅजिक आहे. सगळे सोल नष्ट केल्यावर सुद्धा माणूस पर्गेटोरी (purgatory) टाईप स्टेट मध्ये खितपत पडून राहू शकतो (आठवा हॅरीच्या स्वप्नातला ट्रेन स्टेशन मधल्या बाकड्याखालचा वॉल्डी). म्हणूनच बहुतेक डंबलडोअर वॉल्डीला म्हणतात की मृत्यु पेक्षाही भयानक गोष्टी अस्तित्वात आहेत हे तू नेहमीच विसरतोस.

ग्रिंडलवॉल्डला अ‍ॅझ्काबानमध्ये न ठेवता त्याच्याच न्यूरेनगार्डमध्ये ठेवण्याचं काय प्रयोजन असेल?त्याच्यासाठी वेगळा तुरुंग का बनवला? (नाझी वगैरे रेफरंस माहित आहेत पण तरी..)
आणि एल्डर वाँड असूनही ग्रिंडलवॉल्ड डंबलडोरकडून कसा हरतो. पूर्ण कथेत कुठेच एल्डर वाँडची अद्वितीय ताकद दिसून येत नाही असं का?
ह्या शंका आहेत प्रश्न नाही. प्रयत्न करूनही नक्की डीटेल्स आठवत नाहीयेत.

हॉरक्रक्स कसा तयार करतात ? त्याचे फायदे आणी तोटे कोणते ?
>>> Lol हा थेट शाळेच्या प्रश्नपत्रिकेतला प्रश्न वाटला.

आता कोण कोणास म्हणाले, संदर्भासहीत स्पष्टीकरण द्या, टीपा द्या, जोड्या लावा, गाळलेल्या जागा भरा हे प्रश्नही येऊ देत.

ग्रिंडलवॉल्डला अ‍ॅझ्काबानमध्ये न ठेवता त्याच्याच न्यूरेनगार्डमध्ये ठेवण्याचं काय प्रयोजन असेल?त्याच्यासाठी वेगळा तुरुंग का बनवला? (नाझी वगैरे रेफरंस माहित आहेत पण तरी..)
<<
अझ्काबान इंग्लंडचा तुरुंग आहे. दुसर्‍या देशाचा विझार्ड प्रिझन वेगळा असेल ना? सगळ्या जगभराचे थोडेच अझ्काबान ला येणारेत?
---
आणि एल्डर वाँड असूनही ग्रिंडलवॉल्ड डंबलडोरकडून कसा हरतो. पूर्ण कथेत कुठेच एल्डर वाँडची अद्वितीय ताकद दिसून येत नाही असं का?

डंबलडोर त्या वाँडचा हेरेडिटरी मालक असतो ना? मग तो वँड त्याच्याशी जास्त प्रामाणिक राहिल. शिवाय, वँड म्हणजे जस्त अ‍ॅम्प्लिफायर. वँड नसतानाही स्पेल्स टाकता येतातच की!

अझ्काबान इंग्लंडचा तुरुंग आहे. दुसर्‍या देशाचा विझार्ड प्रिझन वेगळा असेल ना? सगळ्या जगभराचे थोडेच अझ्काबान ला येणारेत? >> ह्या नियमाने मग कर्कारॉफ पण न्यूरेनगार्डमध्ये जायला हवा ना? मग त्याला का अ‍ॅझ्काबान्मध्ये पाठवतात.
मला नाही वाटत की देशांचा काही संबंध होता. न्यूरेनगार्ड कोणा मिनिस्ट्रीचे प्रिझन नव्हते ते ग्रिंडलवॉल्डने स्वतःच्या ऊपयोगासाठी बनवले होते, त्यामुळे मिनिस्ट्रीने कुणाला तिथे पाठवण्याचा प्रश्नच येत नाही.
म्हणूनच ग्रिंडलवॉल्डला त्याच्या गुन्ह्यांसाठी प्रॉसिक्यूट न करता फक्त जेरबंद करून ठेवलेले असते. असे का? डंबलडोरच्या त्याच्यावरच्या प्रेमाखातर की काय? काहीतरी लिंक नक्की आहे पण नेमकी आठवत नाहीये.

डंबलडोर त्या वाँडचा हेरेडिटरी मालक असतो ना? >> कसा काय? वाँडच्या पॉवरचा हेरेडिटीशी काय संबंध? जो जिंकेल तो त्याचा मास्टर असे होते ना?

त्या तुरुंगाचं नाव 'नर्मेन्गार्ड' आहे असं मला वाटतं..
वाँड पावरफुल असली तरी तिच्या नियमांत असं थोडंच आहे कि तिचा ओनर कायम जिंकलाच पाहिजे?
'अनबीटेबल वाँड' ही तिच्यासोबत जोडली गेलेली आख्यायिका आहे. ते सत्य नाही..

त्या तुरुंगाचं नाव 'नर्मेन्गार्ड' आहे असं मला वाटतं.. >> जर्मन ऊच्चाराबाबत मलाही शंका आहे.

वाँड पावरफुल असली तरी तिच्या नियमांत असं थोडंच आहे कि तिचा ओनर कायम जिंकलाच पाहिजे? >> हेहे! पीवरेल, ग्रिंडलवॉल्ड, डंबल्डोर ते वॉल्डर्मॉट सगळ्यांच्या अट्टहासातली हवा काढून घेतली की तुम्ही. Happy
एकतर ग्रिंडलवॉल्डने तो ग्रेगॉरविचकडून चोरलेला असतो, जिंकलेला नाही म्हणूनही कदाचित असू शकेल की काय.

'अनबीटेबल वाँड' ही तिच्यासोबत जोडली गेलेली आख्यायिका आहे. ते सत्य नाही.. >> वाँड तोडण्याच्या आधी हर्मायनीने हॅरीला विचारलेला प्रश्न आठवा. ऑलिवँडर हॅरीला आता 'तुझं काही खरं नाही' सांगतो तेही आठवा.

We were evenly matched, rather I was shade more skillful than him. इति डंबल्डोअर.

elder wand can perform better than other wands. e.g. repairing harry's wand which Hermoine's wand could not do. but that doesnt mean owner can win any dual.

वाँड पावरफुल असली तरी तिच्या नियमांत असं थोडंच आहे कि तिचा ओनर कायम जिंकलाच पाहिजे?
<< बहुतेक जण वॉंड म्हणजे फिजिकल छडी असेल असे समजतात. ईव्हन वॉल्डमार्टदेखील म्हणूनच डंबल्डोरच्या कबरीमधून त्याची वाँड काढून घेतो. नंतर ती देखील छडी त्याच्या मनासारखे काम करत नाही बघून स्नेपला पण मारतो. प्रत्यक्षात ते तसे नाही. त्या छडीचे गुणधर्म ओनरकडे जातात. उदा: ड्रॅको डंबलडोरला डिसार्म करतो त्यामुळे तो एल्डर वाँडचा ओनर असतो. हॅरी ड्रॅकोला डिसार्म करतो म्हणून एल्डर वाँडचा मालक होतो. मालकाला "मारणे" आणी मग वाँड जिंकणे असं नसून मालकाला "हरवणे" आणि मग त्या वॉंडची मालकी आपसूक येते. स्नेपने जरी डंबलडोरला मारलेले असले तरी तो त्या छडीचा मालक कधीच नसतो कारण, स्नेपने डंबलडोरला मारावी अशी डंबलडोरचीच इच्छा असते.

Pages