हॅरी पॉटर ट्रिविया क्विज

Submitted by वैद्यबुवा on 1 February, 2013 - 11:31

हॅरी पॉटर नीलम-गेम खेळत असताना ही कल्पना सुचली. नीलम गेम मध्ये पुढचं कनेक्शन जोडताना पुष्कळ स्वातंत्र्य आहे त्यामुळे गेम आविरत सुरु राहतो खरं पण मला वाटतं हॅरी पॉटर ट्रिवियाची खरी मजा पुस्तकातल्या बारिक बारिक डिटेल्सची उजळणी करण्यात आहे.

खेळ तसा साधा आहे, पुस्तकामधल्या आपल्याला माहित असलेला एखादा बारकावा, घटना, व्यक्ती ह्या बद्दल प्रश्न विचारायचा आणि बाकी लोकांनी त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा. प्रश्नाचे बरोबर उत्तर मिळाल्याशिवाय दुसरा प्रश्न विचारायचा नाही. प्रश्न आणि उत्तर दोन्हीही vague नसतील ह्याची काळजी घेतली पाहिजे. सहसा अगदी खुपच सोपे प्रश्न विचारायचे टाळले पाहिजे नाही तर इतकी मजा येणार नाही. खेळ नक्की कसा पुढे सरकतो हे बघून हवं तर आपण नवीन नियम बनवू शकतो.

ह्या खेळाकरता गप्पांचे पान न उघडता धागा उघडलाय कारण एक तर प्रश्न वाहून जायला नको आणि दुसरं म्हणजे लगे हाथों हा धागाच एक हॅरी पॉटर ट्रिविया लायब्ररी होऊन जाईल. Happy

तर मग करायची सुरवात?... Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओके..माझा पहिला प्रश्न
वुल्फ्स्बेन पोशनचा शोध कुणी लावला?

आह..स्लगहॉर्नने याबद्दल काहीतरी सांगितले आहे...मला नक्की आठवत नाहीये पण प्रिझनर ऑफ अझकाबानमध्ये आहे ना याबद्दलचा उल्लेख

Democles

हाफ ब्लड प्रिन्स मधे त्या स्लग क्लबमधील बेल्बीचा काका म्हणून स्लगहॉर्नने उल्लेख केला आहे.

मला प्रत्येक हॅरी पॉटर फॅनला एक प्रश्न विचारावासा वाटतो, संधी मिळेल तेव्हा मी विचारतोच.

तुमचं आवडतं पात्रं कोणतं आणि का?
आणि आवडती घटना/प्रसंग कोणता?

मजा येते ऐकायला. क्विझ खेळण्याबरोबरच कुणाला हे सांगावसं वाटलं तर मी आहेच आवडीनं वाचायला.

आवडतं असं एक पात्र नाहीच कुठलं. सगळेच आवडतात कारण त्यांच्या पैकी कोणी एक सुद्धा नसलं असतं तर नक्कीच काहीतरी खटकलं असतं. हीच जे के च्या लिखाणाची कमाल आहे, कुठलंही पात्र बिन कामाचे टाकल्या सारखे वाटत नाही. अगदी पहिल्या भागात इंट्रोड्युस केलेल्या पात्रांचा सिग्निफिकन्स शेवटच्या काही भागात कळतो.
प्रसंग मात्र आहे आवडीचा, स्वतः हॅरीच तळ्याच्या दुसर्या बाजूला उभा राहून पट्रोनस चार्म सोडतो तो. हा प्रसंग सिनेमा मध्ये खुप सुंदर चित्रित झालाय त्यामुळे खुपच आवडतो.

प्रश्न: मि. डडलींची कंपनी काय बनवते?

प्रश्न: मि. डडलींची कंपनी काय बनवते? >> drills बहुधा.

प्रश्न: Daily prophet मधे येणार्‍या dark arts च्या वापराबद्दल येणार्‍या column/section चे नाव काय ?

तुमचं आवडतं पात्रं कोणतं आणि का? >> Hermione Granger. She is the bravest, smartest of troika. Imagine Harry succeeding his destiny without her.

प्रश्न: Daily prophet मधे येणार्‍या dark arts च्या वापराबद्दल येणार्‍या column/section चे नाव काय ? >> ब्लॅक मॅजिक ?

रैना ,
प्रश्न: Daily prophet मधे येणार्‍या dark arts च्या वापराबद्दल येणार्‍या column/section चे नाव काय ? >> ब्लॅक मॅजिक ? >> बरोबर .

७ पॉटर्स कोण कोण होते ?

तुमचं आवडतं पात्रं कोणतं आणि का? >>> स्नेप . विशेषतः The Prince's Tale नंतर . कुणीतरी लिहिल्याप्रमाणे HP becomes Snape's tale after that .
रोलींग बाईं ची खासियत आहे ग्रे शेड्स . हॅरी काय , अल्बस काय कुणीही धुतल्या तांदळासारखा नाही . पण स्नेप तयार करताना मात्र बाईनी कमाल केलीये . मी बर्याच जणांशी बोललोय series पूर्ण वाचलेल्या . पण स्नेप कसा वाटला या वर कुणाचच एकमत होत नाही हेच त्याच यश आहे Happy

७ पॉटर्स कोण कोण होते ?
<<<< हर्मायनी(किंग्स्लीबरोबर), फ्लर(बिलबरोबर), रॉन(टाँक्सबरोबर), फ्रेड(त्याच्या वडिलांबरोबर), जॉर्ज(ल्युपिनबरोबर), मंडंगस(मूडीबरोबर) आणि खरा हॅरी हॅग्रिडबरोबर.

हर्मायनी क्रीचरकडून कुठले पुस्तक वाचायला घेते?>>>>>> Nature's Nobility: A Wizarding Genealogy गूगल ची मदत घ्यावी लागली पूर्ण नाव शोधायला, फक्त Genealogy आठवत होतं

आवडतं असं एक पात्र नाहीच कुठलं. सगळेच आवडतात कारण त्यांच्या पैकी कोणी एक सुद्धा नसलं असतं तर नक्कीच काहीतरी खटकलं असतं. हीच जे के च्या लिखाणाची कमाल आहे, कुठलंही पात्र बिन कामाचे टाकल्या सारखे वाटत नाही. अगदी पहिल्या भागात इंट्रोड्युस केलेल्या पात्रांचा सिग्निफिकन्स शेवटच्या काही भागात कळतो.>>>>>>>>>>>>> प्रचंड अनुमोदन... Happy

सिरियस हॅरीला जमलं तर तो त्याच्या घरी रहायला येउ शकतो असं म्हणतो तेव्हाचा क्षण मला प्रचंड आवडतो...

आवडतं असं एक पात्र नाहीच कुठलं. सगळेच आवडतात कारण त्यांच्या पैकी कोणी एक सुद्धा नसलं असतं तर नक्कीच काहीतरी खटकलं असतं. हीच जे के च्या लिखाणाची कमाल आहे, कुठलंही पात्र बिन कामाचे टाकल्या सारखे वाटत नाही. अगदी पहिल्या भागात इंट्रोड्युस केलेल्या पात्रांचा सिग्निफिकन्स शेवटच्या काही भागात कळतो<<<<<< अगदी खरय...

मला सुद्धा स्नेप आवड्तो.. सगळी पात्रच काय पण आपण वाचकसुद्धा तिरस्कार करतो की शेवटपर्यन्त..

मला स्नेप मरताना हॅरीच्या डोळ्यात बघतो तो सीन आवड्तो..

चमन कठीण आहे. बरेच उच्च वाटणारे प्रसंग आणि व्यक्तिरेखा थोड्याफार फरकाने सारख्याच उंचीवर वाटायला लागतात. एकाचं पारडं जड व्हायला लागलं की लगेच दसर्‍याचं पारडं त्यापेक्षा खाली येऊन ते जड वाटायला लागतं. शेवटी प्रसंग आणि व्यक्तिरेखा बाजूला राहतात आणि राऊलींगबाईच महान हाच खुंटा मजबूत होतो.

माझं आवडतं पात्र स्नेप आहे. पावणेसहा सीरीजमधे तो व्हिलन आहे. शेवटच्या एका प्रकरणात तो हीरो ठरतो. ते प्रकरण वाचल्यावर जेव्हा पहिल्यापासून सगळी पुस्तकं वाचली होती. तेव्हा स्नेप खर्‍या अर्थाने समजत जातो.

डंबलडोर जेव्हा स्नेपला हॅरीचे डोळे त्याच्या आईसारखेच आहेत म्हणतो तो सीन माझा फेवरेट. मूव्हीमधे ते इतकं खास जमलं नाही. पण पुस्तकांत मात्र ज ब र द स्त!!

मी प्रश्न विचारू का?
हॉगवर्ट्सच्या चार हाऊसच्या भुतांची नावे सांगा. Happy

राऊलींगबाईच महान हाच खुंटा मजबूत होतो.>>>>>>>> +१००००००००००००००००००००००० प्रचंड अनुमोदन.. पण या महान बाईंनी हॅपॉ सोडुन दुसरं काही लिहायला हातात लेखणी का घेतली ते कळेन Wink

मला तर काही प्रश्न सुचत नाहिये.. त्यामुळे बाकी कोणीतरी विचारा

पण या महान बाईंनी हॅपॉ सोडुन दुसरं काही लिहायला हातात लेखणी का घेतली ते कळेन >>>चिमुरे, कॅज्युअल व्हेकन्सी झालं का वाचून? Proud

Pages