टॅबलेट कोणता घ्यावा?

Submitted by निंबुडा on 18 January, 2013 - 02:29

मार्केट मध्ये सध्या उपलब्ध असणार्‍या टॅबलेट्स बद्दल इथे चर्चा (अनुभव, वैशिष्ट्ये, किमती, तुलना इ.) करूया.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तीनचार गोष्टींचा क्रमाने विचार करा.

१) आकार - display size
- किती इंची? मला ७ इंच लहान वाटतात. म्हणून ९/१० इंचच बघतो.
- किती resolution? १२००-८०० पुरेसे आहे मला त्यामुळे retina ipad किंवा nexus10 आवश्यक नाही..

3) स्मॄती़क्षमता - Memory
- RAM : किमान ५१२ MB andorid >= 4 , पण १ GB preferable. For windows 1 GB किमान. ios is ok with less, windows will need more.
- साठवणक्षमता - स्मॄती़पत्री (memory chip) घालता येते का? apple products no, samsung galaxy no, nexus10 no.
- USB??

३) गणकक्षमता - Computing power
- द्विभागी/चतुर्भागी? (dual core/quad core?) 1 GHz? 1.5 Gha? Cortex 8/9/15?
- ios is ok with less, windows will need more.

४) प्रणाली - OS
- window? Andorid? Ios?

मी गेली २ वर्ष आय पॅड वापरतो आहे. फ्री अ‍ॅप्स भरपूर आहेत. २ वर्षात एकदाही काहीही प्रॉब्लेम झालेला नाही. खोर्याने फ्री आणि १ ते ५ डॉलर् च्या रेन्ज मधे अनेक उत्तम अ‍ॅप्स आहेत

सॅमसंगला घालु शकतो अ‍ॅडीशनल मेमरी कार्ड.

मागच्या पानावरचा आयबेरी मला बरा वाटलेला पण घरच्यांनी मोडता घातला. त्यांना सॅमसंग सेफ बेट वाटतो.

माझं मत आयपॅडला (ती ही मोठं, मिनी नको).

पण आयपॅड सगळ्यांच्याच खिशाला परवडेल असं नाही (मी स्वतःही विकत घेतलं नाहिये, जय ऑफिस Wink ) त्यामुळे बाकी उपलब्ध टॅब्लेट्समधलं कुठलं अखूडशिंगी, बहुदुधी, कमी खाणारं वगैरे पहायला गेलं तर सॅमसंग गॅलेक्सी टॅब बेस्ट (७ इंची असो वा १० इंची). वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे त्याला यूएसबी कनेक्टर वेगळा घ्यावा लागतो, पण तो मात्र १००-१२० रुपयात मिळतो. (हजारो रुपयांचं टॅब अन आणखी काही हजारांचे त्याचे कपडे घेतल्यावर १२० रुपये फार मोठी रक्कम ठरू नये Happy ).

१२००० खालची जी टॅबलेट्स आहेत त्याचा मधे सर्व्हे केला होता. यापैकी काही टॅब्स थ्रीजी सिमकार्ड सपोर्ट करत नाहीत (यूएसबी डाँगल / वायफाय मस्ट). काही व्हॉईस कॉलिंग सपोर्ट करत नाहीत. तर काही चक्क गूगल प्ले स्टोअरलाच अ‍ॅक्सेस देत नाहीत. १२००० पेक्षा स्वस्तातल्या टॅब्लेटमधे यापैकी किमान एक ड्रॉबॅक आहेच. शिवाय कमी रॅम, नॉन एचडी डिस्प्ले, कमी पॉवरचा प्रोसेसर, कमी क्षमतेची बॅटरी वगैरे काही ना काही अढळतंच. तसंच यापैकी बहुसंख्य टॅब्स ही रीबॅज्ड चायनीज टॅब्ज आहेत, त्यामुळे एकंदरीतच पार्ट्सच्या दर्जाबद्दल शंका घेण्यास भरपूर वाव आहे (एकदा काही प्रॉब्लेम आला की ही टॅब्ज सर्व्हिस सेंटरमधे बर्‍यापैकी वार्‍या करतात).

तस्मात घेणारच असाल तर आयपॅड घ्या, किंवा गॅलेक्सी टॅब घ्या.
गूगल नेक्सस ७ (आसूस) किंवा नेक्सस १० (सॅमसंग) हे पर्यायही विचारात घेऊ शकता.

(मायक्रोसॉफ्ट सरफेस टॅब अजून स्वतः वापरून पाहिलं नाहिये, म्हणून त्याविषयी काही लिहिलं नाही. जे वापरत आहेत त्यांचा रिव्ह्यू 'झकास' आहे.)

नी,
फोटोशॉप चालवायचं असेल तर नेटबुक मुळीच नको. (कमी मेमरीपायी किती कुंथत कुंथत चालेल त्याची कल्पनाच न केलेली बरी).
आयपॅडसाठी अ‍ॅडोबचं फोटोशॉप लाईट का काहितरी अ‍ॅप येतं. अँड्रॉईडबद्दल कल्पना नाही.

आसुस ट्रान्स्फॉर्मर बघा. अ‍ॅन्ड्रॉईड आहे.त्याला डिटॅचेबल की बोर्ड आहे.विशेष ंहणजे मूळ टॅब व अट्टॅच्ड की बोर्डला दोन वेगळ्या बॅटर्‍या आहेत त्यामुळे डबल ब्याकप मिळतो.यूएसबी पोर्ट आहे. मेटॅलिक बॉडी आहे. १० इंच. रिसॉलुशन १९८० *७८० आहे त्यामुळे एच्डी ला प्रॉब्लेम येतो. टीव्हीला जोडता येतो.एचडी एम आय आहे.टॅब की बोर्डला जोडल्यास तो कीबोर्ड बॅट्री घेतो . डिटॅच केल्यावर टॅब स्वतंत्रही वर्चुअल की बोर्ड वर चालतो... वाय फाय आहे. सिम ची सोय नाही पण डाँगल चालत असावा.आयप्याडमध्ये रिसॉलुशनच हेवा करण्यासारखे आहे. बाकी अडचणीच जास्त आहेत. आयप्याडात मूव्ही कसा पहावा?
P_500.jpg

आयप्याडात मूव्ही कसा पहावा? >>> व्हाया आयट्यून्स ट्रान्स्फर करा. रिझोल्यूशन्चा प्रॉब्लेम असेल तर, एनी वीडिओ कन्व्हरटर या फुकट सॉफ्टवेअर ने हवा त्या फॉरमॅटात विडिओ कनव्हर्ट करता येतात...

व्हाया आयट्यून्स!
Wink
फोन वर धूळ जमली, व्हाया आयट्यून्स साफ करा..

(जेलब्रेक आयफोन स्वस्तात विकून मोकळा) इब्लिस Wink

टॅब आणि फोन यांचे फ्युजन असलेले फॅबलेट सध्या मार्केटात आहेत, samsung galaxy note 2,hauwai ascend mate वगैरे. टॅबपेक्षा युजर फ्रेंडली आणि वापरायला चांगले आहेत. नोटबुकप्रमाणे वापरता येतात.५' ते ७' स्क्रीन असतात, तेवढे पुरेसे वाटते.

माझ्याकडे आयबॉलचा i6012 टॅब आहे. पण तो अधून मधून केव्हाही आपोआप restart होतो. कोणी यावर उपाय सांगील का ?

माझयाकडे आसुस ट्रन्स्फॉर्मेर १०१ हा टॅब आहे.वरती पादुकानन्द यानी टाकलेल्या फोतो सारखाच थोडा वेगळा आहे. तो देखील बॅगेत असताना कधीही रिस्टार्ट होतो व सगळी बॅटरी सम्पते व ऐन कामाच्या वेळी पोपट होतो. याबाबत विविध फोरमवर पाहिले असत त्यातील चिपसेटचा काहीतरी प्रॉब्लेम असतो व कम्पनी ती चिपसेट बदलून देते. तसेच अ‍ॅन्ड्रॉइड अपग्रेड केल्यावर काही अ‍ॅप्स नॉन कॉम्पॅटिबल असतात त्यामुळे त्यानी स्टार्ट होण्यासाठी घेतलेल्या सर्चमुळे पण बॅटरी आपोआप ड्रेन होते असेही वाचले. मात्र टॅब आपोआप स्टर्ट होतो याबाबत विविध फोरम्सवर असंख्य तक्रारी आहेत आणि त्या अ‍ॅन्ड्रॉइड बेस्ड टॅबबाबतच आहेत असे दिसते....

@योगेश कुलकर्णी. रिसेट मारून काहीही उपयोग होत नाही...:(

काही ओएस वर विकणारी कंपनी गेंडयाची कातडी(skin) चढवून विकतात त्यामुळे टैबलेट किचकट अथवा संथ होतात .वेबसाईट बघताना सर्वरकडून मोबाईलचे पेज आल्यास पूर्ण समन्वय (इंटिग्रेशन ) मिळणार नाही .

.

Samsung Galaxy Tab 3 10.1विषयी काय रिव्ह्युज आहेत. कोणी घेतला आहे का?

लोकांन्नो!

मि खूप शोधाशोध, विचार, चर्चा करून माझी खरी गरज बघून शेवटी बी-स्लेट नावाचा टॅब घेतला. रु. ९,५००/- सुमारे ३ महिन्यापुर्वी. आता कमि झाला.

विथ सिम - ३-जी-अ‍ॅन्ड्रॉइड ४.२ -मस्त आहे!

सॅमसंग गॅलेक्सी नोट १०.१ नुकताच वापरायला सुरुवात केली आहे. माझ्यासारख्या टेक्नॉलॉजिकली चॅलेंज्ड व्यक्तीलाही बर्‍यापैकी वापरता येतोय. मला टचस्क्रीनची अजिबात सवय नाही, त्यामुळे थोडेसे अवघड जाते कधी कधी. माझ्या बहिणीच्या भाषेत 'तांदूळ फार निवडायला लागतात!' Proud

२ भाच्या (वय वर्षे ८ आणि ११ अनुक्रमे) यांची शिकवणी लावावी म्हणतेय. त्यांच्या आईवडिलांपेक्षा त्या टॅब सफाईने व नाना तर्‍हेने वापरू शकतात आणि जास्त चांगल्या प्रकारे टॅबचा उपयोग करतात.

वर्डमधे देवनागरी टायपिंग - युनिकोड नव्हे तर लिखाणासाठी (एरवी सर्व पिसीज वर श्री लिपी आहे)
चित्र काढणे (फोटोशॉप, कोरल किंवा इक्विव्हॅलंट)
या दोन गोष्टी मस्ट

मग
पॉपॉ आणि एक्सेल
इंटरनेट - इमेल्स आणि बेसिक सर्फिंग
म्युझिक ऐकणे
सिनेमे बघणे
इत्यादी गरजेचे आहेच

या दृष्टीने आयपॅड बरे की विंडोज टॅबलेट?

आयपॅड! देवनागरी कीबोर्ड डिफॉल्ट सेटिगात आहेच. फोटो / चित्र प्रोफेशनल आर्ट करता अ‍ॅडॉब्चे अ‍ॅप्स आहेत. आयफोटो तर फ्रीच मिळेल. अ‍ॅडॉबचेही अ‍ॅप अवेलेबल आहे आयपॅड्करता.
आतापर्यंतच्या सगळ्या टॅब्स मधे आयपॅड्चीच ब्याटरी ३जी + वायफाय वर पूर्ण १० तास चालते.
ईमेल्स + वेब करता आयपॅड बेस्ट.
मात्र बाकी सगळ्याकरता घरी पीशी लागेल अन आयट्यून्सही... (आयट्यून्स = सॅमसंग काईज सारखं पण खूप जास्त ईवॉल्व्ड अन सोपं)... चला आता धूम पळतो...

If you r fine with 7 " screen then go with Nexus 7 tablet. They r best and less expensive. No after purchase tension.
If u purchase micromax, karbon or similar brands they sell at cheap price but no guarantee that tablet will work for even 1 year . And no service warranty.

Google Nexus 7 2013 - 32GB हा tablet कोणी वापरत आहे का ?? कसा आहे ??

पावभाजी 'No after purchase तेन्सिओन' म्हणजे काय ?? मला या बद्दल खरेच काही माहित नाही त्यामुळे हा मूर्ख प्रश्न.

पावभाजी,
नेक्सस ७ वर व्हॉट्सॅप चालते का? इन्स्टॉल कसे करता येते? सरळ साधं आहे की जरा त्रासदायक?
या व अशा सिंपल गोष्टींमुळे आफ्टर सेल टेन्शन येत असावे बहुतेक.

मायक्रोमॅक्स व कार्बन इ. चा माझा वैयक्तिक अनुभव उत्तम आहे. ग्यारंटी वॉरंटी पावती घेतली तर नक्कीच मिळते. माझा संपूर्ण फोन त्यांनी फुकटात रिप्लेस करून दिला. पेटीपॅक नवा पीस मिळाला.

Pages