ओट्स टोमॅटो सॅलड

Submitted by चिन्नु on 17 January, 2013 - 07:03
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ मोठा चमचा ओट्स पावडर करून
२-३ टे. स्पून दुध,
२ मध्यम टोमॅटो,
मीठ,
मेथी किंवा पुदिन्याची पाने - ऐच्छीक

क्रमवार पाककृती: 

दुध एका पॅनमध्ये घालून गॅसवर ठेवा. त्यात ओट्सची पावडर टाकून परतत रहा, म्हणजे खाली लागणार नाही. गोळा होईल, पण तो फार घट्ट करू नये, मऊसर असु द्या. गॅस बंद करा. ह्या गोळ्याला बोलमध्ये काढून १० मिनिटे थंड करत ठेवा. आता त्यात टोमॅटोचे तुकडे, मीठ आणि मेथी/पुदिन्याची पाने घाला. मिक्स करा. २० मिनिटे मुरल्यावर खायला द्या.

वाढणी/प्रमाण: 
२ जणांसाठी
अधिक टिपा: 

१. लागणार्‍या वेळात पदार्थ थंड करायचा तसेच सॅलाड मुरण्याचा वेळ गृहीत धरलेला नाही.
२. ओट्स शिजल्यावर गोळा घट्ट झाल्यास एक टोमॅटो जास्त घालावे. टोमॅटोअच्या रसामुळे सॅलाड मिक्स व्हायला मदत होईल.
३. यात वरून खारे शेंगदाणे पेरता येतील.

माहितीचा स्रोत: 
तेलुगु कूकरी शो
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users