"सगळं विजोड असूनही संसार का टिकतात?"

Submitted by सौ. वंदना बर्वे on 30 December, 2012 - 21:51

"सगळं विजोड असूनही संसार का टिकतात?"

चिटक्या मोडता मोडता निलमने सोडलेली पुडी बऱ्याच वादांना जन्म देऊन गेली. तसं पहायला गेल्यास अनुरूपता ही कुठल्याच जोडप्यात असत नाही. बहुतांशी जोडपी ही विजोडच असतात. तशी ती असावी अशीच बहुतेक त्या नियंत्याची योजना असावी.

एकेकीचे अनुभव कथन तर फारच विलक्षण होते. "आमगेलो हो", "घो म्हणपाचो ना", "मावशेक ना म्हणचे पड्टा म्हणोन आवयन हय म्हटलें आनी हांव त्रासान पड्ले." इथपासून ते "सामको बोणेर", "भाणशिरें", "मात्तूय अक्कल म्हंटा ती ना" इथपर्यंत स्वत:च्या यजमानाची संभावना या बौध्दीक चर्चे दरम्यान झाली. आम्ही स्त्रिया जे संसारासाठी भोगतो ते सहसा मी पुरूष म्हणणाऱ्या कर्तृत्ववान माणसासही सहजी जमणार नाही. मला मान्य आहे की आम्ही सामाजिक क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात, ज्ञानाच्या क्षेत्रात फारसं काही नाही करत. आम्ही लहान आहोत. आमचं कार्यक्षेत्र मर्यादित आहे. पण घर संभाळणारी स्त्री ही उच्चपदस्थ स्त्री किंवा कर्तृत्ववान स्त्रीपेक्षा दुय्यम असते, हे म्हणणं पटत नाही. भले गृहीणेचे प्रोब्लेम्स काम करणाऱ्या स्त्रीहून निराळे असतील पण प्रोब्लेम्स असतातच. अगदी लहान लहान अडचणी असतात. गृहीणीचा झगडा हा नित्यनूतन आणि नित्यनवा असतो. अनुरूपतेविषयी त्यांच्या प्रतिक्रिया त्यांना शब्दांच्या कोंदणात नाही मांडता येत. म्हणूनच त्यांच्या प्रतिक्रिया ह्या थेट येतात.

बहुतेक मैत्रिणींचा म्हणण्याचा सूर हा मी आहे म्हणून संसार चालला आहे असाच होता. बहुतांशी ते खरच आहे. जसे समाजाला सांसारिक स्त्रीच्या लहानसहान अडचणी समजत नाहीत तसेच लहानसहान त्यागही समजत नाही. गृहीणीला कायम गृहीतच धरलं जातं. त्यामानाने नोकरी, उद्योग करणारी स्त्री ही थोडी तरी दुय्यमतेच्या मर्यादा ओलांडते. काही ठिकाणी तर ती कमावते तरीही दुय्यमच राहते.

विजोड असण्याचे अनेकविध अनुभव ऐकायला मिळाले. सगळं नीट नेटकं, व्यवस्थित ठेवणाऱ्या स्त्रीचा जोडीदार कमालीचा अव्यस्थित. त्याला सकाळी बाहेर जाताना चपलांची आठवण होते तेंव्हा काल घरी परतल्यावर भिरकवटलेल्या होत्या हे नाही आठवत. अशा नवरोबाला, बायकोला किमान दिवसातून पंचवीस वेळा हाका माराव्या लागतात. नमुनेदार उदाहरण म्हणजे अंघोळीला जाताना टॉवेल घेउन न जाणं, अंग पुसायची वेळ झाली की मग त्याची आठवण होणं. दिवसभरात अशा गोष्टींची यादीच असते. कंजुष स्त्रीला उधळ्या नवरा मिळतो तर उधळ्या स्त्रीला कंजुष नवरा. सडपातळ स्त्रीला ढेरपोट्या जाड्या नवरा व सिक्स पॅक अ‍ॅब असलेल्या नवऱ्याला, वन पॅक थ्री टायर स्त्री. कुठे शारिरीक ठेवण विजोड असते तर कुठे विचार विजोड असतात. मला हाच प्रश्न नेहमी पडतो, असं पराकोटीचं विजोडत्व असूनही आधीच्या काळी संसार कसे वर्षानुवर्षे टिकून रहात? व थोड्या प्रमाणात आत्ताही कसे टिकून आहेत?

नवरा बायकोचा संसार टिकण्यासाठी परस्परांविषयी आदर असणे, प्रेम असणे अत्यंत आवश्यक आहे.

शिक्षण अहंकार निर्माण करतं. अहंकार हा आदराचा सर्वात मोठा शत्रू आहे. "त्यात काय विशेष, हे मी सुध्दा करेन" ही जोडीदाराबद्दलची भावनाच अनादराला जन्म देते. म्हणूनच जोडीदारामध्ये एकमेकांची कार्यक्षेत्रे भिन्न असली पाहिजेत. भिन्नत्व आदर निर्माण करतच असही नाही. उलटपक्षी असूया उत्पन्न होऊन दुय्यम स्थान देणे किंवा हेटाळणी करणे हेच प्रकार जास्त अनुभवास येतात. सुशिक्षित, नोकरी करणाऱ्या नवऱ्याला बायकोचा जास्त पगार खुपतो किंवा तिचे त्याच्या नोकरीच्या ठिकाणी असलेल्या पदापेक्षा, तिच्या नोकरीच्या ठिकाणी उच्चपदस्थ असणे असह्य होते. बऱ्याचदा अशा बायकोने केलेली साधी संसारोपयोगी सुचनासुध्दा नवऱ्याला "डॉमिनेटिंग" वाटते.

प्रेमविवाह हे संसार सुखी करतात हे देखिल काही प्रमाणात सत्य असलेलं गोड अर्धसत्य आहे. विवाहानंतर जोडीदाराविषयी निर्माण झालेलं प्रेम हे बऱ्याच अंशी संसार टिकवून ठेवतं. लग्नाआधी एकमेकांना समजून घेतलं, आवड निवड, स्वभाव अनुरूप आहेत की नाही ह्याची चाचपणी केली तर पुढे संसार सुखी होतो असा समज आहे. प्रेम असण्यात तशीच अपेक्षा असते. पण गंमत म्हणजे लग्नाआधी प्रेम असतं तिथे नेहमी चांगलीच बाजू बघितली जाते. लग्नानंतर जोडीदाराची वाइट बाजूच दिसू लागते. अवास्तव अपेक्षा व तडजोड ही प्राधान्यक्रमाने प्रेमात घडते. लग्न झाल्यावर संसारात प्राथमिकता बदलत जातात. लग्नाआधी चांद तारे तोडून आणायला तयार असणारा प्रियकर नवरा झाला की साधी कोथिंबिरीची जुडी आणायलाही कचरतो. "विवाहप्रेमात" म्हणजे विवाह झाल्यानंतर जिथे प्रेम निर्माण होतं ते अनेक सांसारीक अनुभवानी समृध्द होत जातं. जोडीदाराची ती सवय नाही, तसा स्वभाव नाही तरी देखिल दोघेही एकमेकांच्यासाठी आपापल्या सवयींना, स्वभावांना मुरड घालतात हीच भावना प्रेम जुळवत जाते. जोडीदार गुणदोषांपलिकडे जाऊन आवडायला लागतो. हे आवडणं, हेच प्रेम टिकतं. विजोडत्वाकडून अनुरूपतेकडचा हा प्रवास खडतर, भांडणानी भरलेला असला तरीही नात्यांची वीण घट्ट करणारा असतो. हे खरं "मी" पासून "आम्ही" होणं असतं, खरं अनुरूप होणं असतं.

चर्चेच्या ओघात नवऱ्याला नावं ठेवणाऱ्या मैत्रिणी, "तसं असेल तर नवऱ्याला सोडून का नाही देत?" ह्या प्रश्नावर बुमरॅंन्ग झाल्यासारख्या त्याचे चांगले गुण सांगू लागल्या. लोकांनी कायम वापरूनच घेतलेला "भाणशिरें" नवरा मुलांच्यावर जीवापाड प्रेम करणारा होता. व्यवहारशून्य "बोंडेर" नवरा बायकोच्या आजारपणात रात्र रात्र जागून काळजी घेणारा होता. तोडून टाकावं हा पर्याय न स्विकारण्यासाठी त्यांच्या पोतडीत बरेच अनुभव, गोष्टी होत्या. पदरही जळू नये आणि निखाराही विझू नये असा पदर होता.

"लोक काय म्हणतील", "इतकी वर्ष झाली लग्नाला आता काय तोडायचं नातं" असेही सूर होते. घटस्फोटितेकडे पाहण्याची समाजाची नजर ही दुषित असते. सामाजिक असुरक्षितता संसार टिकून राहण्याचं कारण होतं. काडीमोड झाल्यावर स्वत:च्या पायावर उभं राहण्याएवढं शिक्षण, तेवढी धमक नाही म्हणून संसार चाललेला होता. संसार तोडला तरी आणि टिकवला तरी हाल हे स्त्रीचेच होतात. तिलाच दोषी धरलं जातं. दारूपायी महिना पंचवीस हजार जोडून आणणाऱ्या नवऱ्याच्या बायकोच्या गळ्यात फुटका मणी होता. त्यातही पुन्हा दिवसरात्र मारबडव, मुलगा नाही म्हणून सासूचा छळवाद. ना सुटकेला केलेले संसार हे असून नसल्यासारखेच असतात. नाण्याची ही दुसरी बाजू विषण्ण करणारी होती.

अनुरूप नसणे हा सहजीवनातला, संसारातला दोष नाही. एकमेकांच्या कष्टाची जाणीव, तडजोडीची जाणीव, आदर, प्रेम हे संसार टिकवतात, फुलवतात.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नंदिनी, नीधप आणि इतर सर्व मनापासून मुद्देसूद प्रतिसाद देणार्‍यांसाठी अनाहूत पण तेवढाच मनःपूर्वक सल्ला - तुम्हीही घर, संसार, नवरा, लग्न यातून बाहेर पडा बरं Proud माबोवर एवढाच एक बाफ उरलाय का इतक्या कळकळीने लिहायला?

लग्न न झालेल्या वयाने मोठ्या बाप्यालाही श्रीयुत असे म्हणले जाते. हे माहितीये का? की लग्न झालेले मोठ्य वयाचे बाप्ये पाह्यलेच नाहीत आजूबाजूला?

हांग अश्शी !

काय हे वरदा.. केवढा अहंकार तुला शिक्षणाने... आम्हाला लग्न संसार घर यातून बाहेर पडायला सांगतेस... घरमोडी कुठली... Wink Light 1 Proud

लग्नाआधी स्त्री कुमारी, लग्नानंतर सौ आणि नवरा मेला की श्रीमती.
पुरुष मात्र कायम श्रीयुत. म्हणजे स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीला येण्यासाठी प्रथम लग्न करून .......

मग मज्जा मज्जा चाललीये करत कशाला टवाळी करताय तिही तीन तीन वेळा.
तसल्या आयडींमधेच तुमची गणना करावी काय?

<<मग मज्जा मज्जा चाललीये करत कशाला टवाळी करताय तिही तीन तीन वेळा.>>
तरी म्हणल प्रतिसाद का उमटत नव्हता? आत्ता कळलं.

कठोर ब्रह्मचर्याशिवाय उपाय नाही. ब्रह्मचर्याने भावना नियंत्रित होतात. शरीर बलवान होते. धातू पुष्ट होतो. विचार तेजस्वी होतात. संतान सर्वगुणसंपन्न आणि उच्च संस्कारयुक्त पैदा होते. ब्रह्मचर्याचे पालन करीत असएल्या पुरुषाच्या अंगी बलोपासनेमुळे बारा हत्तीचे बळ असते. असा पुरूष माता भगिनींचे संरषण करतो. गृहस्थाश्रमात स्त्रीस हरेक प्रकारे सुखी करतो.

कठोर ब्रह्मचर्याशिवाय उपाय नाही.

गृहस्थाश्रमात स्त्रीस हरेक प्रकारे सुखी करतो. <<<

दोन वाक्ये एका दमात.. ये बात कुछ हजम नही होती!

मगाशी लिहायचं राहून गेलं -
स्वतःच्या जोडीदाराला मजेतही निर्बुद्ध किंवा पायपुसणं म्हणायची अक्कल नक्की कुठलं शिक्षण देतं? मी (किंवा माझ्या आसपासच्या माझ्यासारख्या बायका, माझ्या आई, मावश्या, आज्ज्या, माम्या, इ. आणि तमाम पुरुषवर्गही) कधीच मजेत/अतीव रागात/ वैतागात सुद्धा स्वतःच्या जवळच्या कुठल्याही व्यक्तीला उद्देशून तिसर्‍या जवळच्या/लांबच्या व्यक्तीसमोर असं काही बोलेन हे या जन्मात शक्य नाही.... त्यापेक्षा मी आहे ती शिक्षित (त्यामुळे ऑब्व्हियसली अहंकारी) बरीये की!!

वंदनाताई तुम्ही आता जे सहावीतल्या मुलीचे उदाहरण दिलेत त्याचा संबध तुम्ही कर्वे,फुले यांच्या कार्याशी किंवा त्यांना अपेक्षित शिक्षणाशी का जोडत आहात हे कळले नाही. ती मुलगी जर हुशार आहे व तिला स्वत:ला अभ्यासाची आवड आहे तर इतरजण फक्त हजेरी ५०% देउन अभ्यास न करता पुढच्या वर्गात जात असतील तर नुकसान त्या इतरांचेच होईल. आज त्यांना अभ्यासाचे, शिक्षणाचे महत्व समजले नाही तेव्हा पुढे स्पर्धेच्या युगात त्यांना कोणीही विचारणार नाही. ती मुलगी लहान आहे तिला देखील इतरांना बघुन अभ्यास टाळण्याचा मोह होणारच. तेव्हा तुम्ही तिच्या शुभचिंतक बनुन तिला अभ्यासाचे, शिक्षणाचे महत्व सांगा. त्यामुळे तिची हुशारी तरी वाया जाणार नाही.

वर "वरदा" यांनी लिहील्याप्रमानेच नवरयाला मजेत किंवा त्याचा राग आलेला असतानाही निर्बुद्ध किंवा पायपुसणे म्हणणे हे त्याच्यासमोर किंवा त्याच्या पाठीमागे इतर कोणाला सांगणे हे तर मुळीच पटले नाही.

नीधप,

>> दोन वाक्ये एका दमात.. ये बात कुछ हजम नही होती!

माझ्या अंदाजाप्रमाणे यथायोग्य ब्रह्मचर्य पाळल्याने अनैच्छिक क्रिया ऐच्छिक नियंत्रणाखाली येते.

आ.न.,
-गा.पै.

वरदा, ती एक पद्धत आहे गं कोंकणात. त्यात वाईट अर्थ असेलच असे नाही.
म्हणजे घाटावर कसं प्रेमाने/कौतुकानेप्रेमाने/रागाने असं कसंही 'नुसता पोत्यासारखा पडून राहतो' म्हणतात ना तसाच अर्थ भाण्सेरु/ घाणसेरू मधून व्यक्त होतो.
Happy

तू म्हणतेस तसा अर्थ असेल त्याच्या मागे, साती.
तरीही असल्या अर्थाच्या कुठल्याही शब्दाच्या वापरावर माझं वरचं मत तेच आहे. कितीही घिसापिटा झालेला असो, निगेटिव्ह अर्थाची 'शेलकी' विशेषणं अशा संदर्भात वापरणं माझ्या विचारात बसत नाही

वंदनाजी
क्षमा करा. आधी थोडा घाईत वाचला होता लेख. आज थोडासा समजला. प्रतिक्रिया अधूनमधून पाहिल्या. सगळ्या पाहणं खरंच शक्य नाही. लेख आणि प्रतिक्रिया यामुळे गोंधळ उडणे स्वाभाविक आहे. लेखाचा स्वतंत्रपणे विचार करायचा म्हटला तर हा अशा जगातून आलेला आहे जो निम्नवर्गीय, मध्यमवर्गीय समाजाचा हिस्सा आहे. इथे स्त्री काय पुरूष काय , आपले आयुष्य कसे जगावे हे त्यांच्या हाती नाही. आयुष्यात काय बनावे, कुठल्या प्रकारचे आयुष्य जगावे याबद्दल त्यांना कल्पना नाही, महत्वाकांक्षा नाही आणि असली तरी स्वप्ने पूर्ण होतील अशी दृष्टी / रस्ता / मार्गदर्शन नाही. छोट्या छोट्या गोष्टींपासून ते आयुष्यातल्या महत्वाच्या निर्णयांमधे, सुखांमधे तडजोड हा या जगातील लोकांच्या जगण्याचा सहजभाव आहे. शंभर शंभर किलोची पोती रोज मार्केट यार्डात वाहणा-या हमालाला त आयुष्य हवे म्हणून त्याने मागून घेतलेले नसते. त्याच्या नशिबी हे भोग आले आणि कुठलाच पर्याय नसल्याने त्याने ते अ‍ॅक्सेप्ट केले. हे असं का झालं याची खोलात गेलं तर अनेक कारणं असू शकतात. त्याबद्दल काहीही बोलायचे नाही. इतकेच म्हणायचे आहे कि असे आयुष्य हे लोक
कसे काय जगू शकतात ? हा प्रश्न अर्थात आपल्याला पडू शकतो. इथे आपण म्हणजे ज्याला चॉईस आहे.

तर या लोकांचं एक तत्वज्ञान आहे. ते म्हणजे सुख हे मानण्यावर असतं. हे नाईलाजाचं तत्वज्ञान आहे. पण रोजची जगण्याची लढाई सुखकर करणारं आहे. तुरुंगात असणारे कैदी, वेश्यालयातल्या वेश्या जगतातच. या जगण्याला सुसह्य करण्यासाटी मनाला खूष ठेवणं आणि आनंदी राहणं यामुळे नरकही सहन होतो. नाहीतर काय झालं असतं ?

वर उल्लेख केलेल्या वर्गाचं ज्याप्रमाणे तत्वज्ञान आहे त्याला अनुसरून विचारसरणी असणार. इथे स्त्रीवाद वगैरेचा मुद्दामच विचार केलेला नाही. तुमच्या लेखातल्या स्त्रिया ज्याप्रमाणे तडजोड करत आहेत ती तडजोड या समाजातच रूजलेली आहे इतकंच दाखवून द्यायचं आहे.

पण ज्यांना तडजोड मान्य नाही, चॉईस आहे, चॉईसप्रमाणे जगण्याचं आव्हान झेलण्याची कुवत आहे त्यांना हे सगळं असह्य होणं शक्य आहे.

ही दोन वर्गातली आणि त्यांच्या विचार करण्यातली दरी आहे इतकंच म्हणेन. आपण जिथे उभे असू तिथून ती बाजू बरोबर दिसते.

वंदना ताई तुमच्या लेखाकडे आणखी एका वेगळ्या कोनातून पाहूयात.

आम्ही स्त्रिया जे संसारासाठी भोगतो ते सहसा मी पुरूष म्हणणाऱ्या कर्तृत्ववान माणसासही सहजी जमणार नाही. >>>>

यावर काहीच म्हणत नाही. पण स्त्रीवादी दृष्टीकोणातून पाहील्यास आम्ही स्त्रिया या शब्दाने वाक्यरचना गंडली आहे. गृहीणीपद हे स्त्री आणि पुरूष या दोहोंनाही करता येण्यासारखं आहे. तडजोड म्हणून स्त्री ने स्विकारणे हे आपण पाहीलं. पण अशाने स्त्री ही अशीच कायम तडजोड करीत राहील आणि मुलांवरही तेच संस्कार करेल. गृहीणीपदाची जबाबदारी वाटून घेणे आणि अशा स्त्रीच्या कर्तुत्वाला संधी देणे या दृष्टीने काही करता येतं का ते पहावं असं सुचवावंसं वाटतं.

विजोड असण्याचे अनेकविध अनुभव ऐकायला मिळाले. >>>>

वरच्या पोस्ट्मधे नाईलाजातून आलेली तडजोड हे एक कारण पाहीलंच आहे. शक्य आहे तिथे असा विजोड जोड कुणी नाकारला जाईल याबद्दल दुमत नाही. या विचारांचं उदात्तीकरण करण्यात अर्थ नाही. हे सर्व नाईलाजाचे तत्वज्ञान आहे ज्यातून प्रगतीची संधी शून्य उरते असं मला वाटतं. चुकीचं काही असल्यास निदर्शनास आणून द्यावं ही विनंती.

एक प्रतिसादक, प्रतिसाद आवडला
<<या विचारांचं उदात्तीकरण करण्यात अर्थ नाही. हे सर्व नाईलाजाचे तत्वज्ञान आहे ज्यातून प्रगतीची संधी शून्य उरते असं मला वाटतं>> याला सणसणीत अनुमोदन!

एकच फक्त - प्रत्येक वेळा चॉईस समोर असतोच असं नाही तर तयार करूनही घ्यावा लागतो. आव्हानं झेलण्याची कुवत वेगळी अशी काही नसते. एकदा तुम्हाला कसं जगायचं नाहीये/ काय करायचं नाहीये हे पक्कं झालं की स्वतःचं आयुष्य स्वतः जगायला सुरुवात करता येते. त्यात अडचणी असतील तर त्या 'चाकोरी'तल्या किंवा आपण नाकारलेल्या निर्णयांत नसतात असं थोडंच आहे? पण मग तिथे (स्वयंनिर्णयात) मात्र तडजोडींचं गुणगान, त्याग त्याग खेळणं वगैरे करता येत नाही, इतर समाजावर, कुटुम्बघटकांवर जबाबदारी ढकलता येत नाही! प्रत्येक निर्णयाची एक किंमत असते. कुठली किंमत आपण चुकती करणार आहोत हे एकदा ठरवलं की मग नंतर उगाच कटकट करणं, त्याचं उदात्तीकरण करणं बरोबर नाही.

मी स्वतःला दुसर्‍या गटातली मानते - चॉईसवाल्या. पण आम्ही काही आकाशातून पडलेले नसतो. अगदी पारंपरिक मध्यमवर्गीय समाजातलेच एक आहोत. फक्त शिक्षणाचा, आसपासच्या घडामोडींचा, जगाच्या अनुभवांचा परिणाम आमच्या विचारांवर झालाय. मला परंपरेने काय शिकवलंय यापेक्षाही मला स्वतःला त्यातलं काय पटलंय आणि काय वेगळं आवडेल याचा सजगपणे विचार केल्याने आम्ही अशा/असे झालोत. असो.

वंदनाताई,

ह्या दोन गोष्टी बघा पटल्या तर घ्या,

१. शिक्षणाचा व अहंकाराचा काहीही सबंध नाही
२. शिक्षणाचा व सुसंकॄतपणाचा(कसा लिहितात हा शब्द?) काहीही सबंध नसतो.

झंपी, अल्मोस्ट सहमत!

फक्त.......

...... अनेक जण आपापल्या दैनंदिन आयुष्यात आपण स्वतः जर शिकलेले असलो व एखादा कुणी फारच कमी शिकलेला असला तर त्याच्याशी केलेल्या वर्तनात 'मी कोणीतरी आहे' हा घटक समाविष्ट करतात. धिस मे नॉट बी ट्रू फॉर मास्टर्स डिग्री अ‍ॅन्ड बॅचलर्स, बट शूड बी ट्रू फॉर गॅज्युएट घरवाली आणि अडाणी कामवाली (जस्ट अ‍ॅन एक्झँपल)! शिक्षणाने अहंकर येतो तो अगदीच कमी शिकलेल्यांशी केलेल्या वर्तनात, इतकेच म्हणायचे आहे. ह्याचा मूळ मुद्याशी कदाचित काहीच संबंध नसेल.

एक प्रतिसादक, आपला इथला प्रतिसाद आवडला. त्यास १००% अनुमोदन. तसेच त्याच्या खालोखाल लिहिलेला प्रतिसादही अतिशय समर्पक आहे.

आ.न.,
-गा.पै.

बेफिकिर तुमची परत गल्लत होतेय.
वंदनाताईंचे वाक्य नीट वाचा बरे परत

<<लेखात शिक्षणातून अहंकार निर्माण होतो हे वाक्य नवराबायकोमध्ये एकमेकांना दुय्यमता देणे व अनादर निर्माण होण्याचे कारण शिक्षणातून निर्माण झालेला अहंकार असे होते. >>
, म्हणजे शिक्षणाने मनुष्य पुर्णपणे अहंकारी बनत नसून तो फक्त आणि फक्त 'जोडीदारा'शीच अहंकाराने वागतो होय. अत्ताच कळले की मला हे Sad आपल्यापेक्षा कमी शिकलेला जोडीदार निवडावा काय मग ? बहुतेक पुरुष तर असेच करतात. तरी अता लग्नाळू बायांनो लक्षात ठेवा ताईंचा सल्ला - कमी शिकलेला नवरा बघा.

वंदनाताईंना , उच्च शिक्षित आणि उत्तम कमाई करणार्‍या बायकांविषयी फारच राग आहे म्हणायचा.

ताकाला जाऊन भांडे कशाला लपवायचे वंदनाताई. सरळ सरळ लिहा ना की कमी शिकलेल्या आणि न कमावणार्या बायकाच उत्तम संसार करू शकतात. अणि शिकलेल्या , भरपूर कमावणार्‍या बायका नवर्‍याला , सासरच्यांना विचारत नाहीत , त्यांना माणसांची किंमत नसते ब्लाअब्ला ब्ला. बघा कीती सरळ ,सोपे आहे नाही सगळे

गामा पैलवान
आपली विपु बंद आहे. आपण हे नेमके प्रतिसादावर जाण्याचे तंत्र शिकवू शकाल का ? मला आवडले.

Pages